बुधवार, २५ डिसेंबर, २०२४
" सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग पाच
बोल, अमोल-308 !":👌
😀 "ह्रदयी धरा, हा बोध खरा":😀
संकल्प आणि सिद्धी ह्यामध्ये, उत्तम अंमलबजावणीचा काळ जावा लागतो.
त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ केलेल्या वारेमाप संकल्पांचा उदोउदो करत फुशारकी मारणे, म्हणजे अर्ध्या हँळकुंडाने पिवळे होणे असते !":😀
🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑
👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?'
या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ?
आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा.
जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे.
"टेलीरंजन- काहीही हं !"
'सन टीवी मराठीवरील 'नवीन जन्मेन मी' आणि 'मुलगी पसंत आहे' ह्य् दोन मालिका निरर्थकपणे कशाही भरकटत चाललेल्या आहेत. त्या बंद ताबडतोब बंंद कराव्यात.
थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत,
त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌
😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁
💐 "जी गोष्ट आपल्याला भावते, आवडते, आपल्याला करावीशी वाटते, ती करताना आपण आपले राहत नाही, आपले देहभान हरपते. माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर वाचन करायला मला आवडते आणि एखादे आत्मभान विसरून, आत्मसमाधान देणारे पुस्तक वाचायला मिळाले की, "याची देही याची डोळा स्वर्गसुख" मिळाल्याचा आनंद मला होतो. काळाचा महिमा अघाध आहे, आता आयुष्याच्या उतरंडीवर अशा तऱ्हेची एकापेक्षा एक 'जीवा-शिवा'ची भेट घडवणारी पुस्तके, पाठोपाठ वाचायला मिळणे, यासारखे सद्भाग्य नाही ! आणि वाचून झाल्यावर जे अनुभवले, जे रुचले, जे भावले ते असे इतरांसाठी व्यक्त करण्यासारखा मणीकांचन योग नाही !
ह्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक वृत्त माझ्या वाचनात आले:
"शालेय विद्यार्थ्यांचा वाचनाचा छंद किती आहे व त्यांना किती गोडी आहे यासंबंधीचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये दुर्दैवाने ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये वाचनाची आवड खूपच कमी विद्यार्थ्यांना आहे हे ध्यानात आले, तसेच ग्रामीण भागातीलही वाचनाची गोडी तितकीशी उत्साहवर्धक नव्हती."
मोबाईल संस्कृती आणि तयार उत्तरे देणारी तंत्रज्ञानाची झेप यामुळे भावी पिढ्यांचे कल्पनादारिद्र्य वाढत जाईल आणि म्हणूनच त्यांचे भवितव्य कठीण आहे !":😭
"Different Strokes !":
What is Knowledge? How to think correctly? How to think from all angles?
Knowledge is basically attempting to be aware about the World around you and within. To think correctly, you need to focus your attention on the issue under consideration, based on your available knowledge. To think about an issue from all angles is to imagine, how differently all others would form their opinions about the issue.
Qn noticed on the social media:
"What is your expert advise to become 3rd largest economy in world?
Any suggestions?"
My Answer:
It's futile, absolutely meaningless and not worth to dwell on, boost for, unless the totally skewed income pattern with 90% of population owning just less than 10% of wealth and vice versa is brought back to reasonable/ acceptable level.
---------------
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍""मुक्तसंवाद-अशाश्वत अमर्याद तर शाश्वत चिमुकले !":👌
"अभिवाचन क्रमांक 322 !"
💐 स्वतंत्र विचारांच्या जोडीला कल्पना करण्याची शक्ती नवीन दिशा दाखवत असते, तसेच इतरांना अधिक सुजाण बनवत असते. सकाळी चहा पिता पिता प्रकट केलेलाश्री सुधाकर नातू यांचा हा मुक्तसंवाद तुम्हाला निसर्गनिरीक्षणाबरोबरच टीव्ही मालिका, चित्रपट आणि सोशल मीडियावरील संचार असा मुक्त विहार करत, या दुनियेमध्ये काय क्षणभंगुर आहे आणि काय निरंतर टिकाऊ आहे ! ते तुम्हाला देखील अंतर्मुख करून, तुुमच्याही जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे....
त्यासाठी पुढील ध्वनिफीत ऐका....💐
"मुक्तसंवाद-'सुबुद्ध नागरिक होऊया' !":
https://youtu.be/T4eUFTFEk0s?si=XHvr4Nu5AI9hg3B-
व्हाट्सअप वर
डॉक्टर विजया वाड यांची कथा बेसिकली त्यांच्या आत्मसंवादाची आहे. विवाहानंतर सासू-सासऱ्यामध्ये-सासरच्या माणसांशी विकोपाला जाणारे भांडण होणे आणि आपण स्वाभिमानाने आपल्या दोन मुलींसह घर सोडायचा निर्णय घेणे, आपला सुरक्षा विभागातला अधिकारी असलेला भाऊ आपल्या घरी येणे आणि नंतर मात्र शेवट गोड होणे असे त्या कथेचे थोडक्यात स्वरूप होते, हे मला चांगले आठवते. ती कथा कोणती, हे आपल्या कदाचित आता लक्षात आले असेल. ती कथा आपण कुठल्याही ग्रुप वर/Facebook वर पाहिली असेल, वा ती कुठल्याही अंकात आपण वाचली असेल, तिचे डिजिटल स्वरूप वा लिंक जर आपल्या संग्रही असेल, तर ती मला पाठवावी यासाठी ही विनंती.
धन्यवाद
"चारोळी: 'दावे अन् वादे'!:"
आकाश फाटले, कुठे कुठे ठिगळं लावणार?
रस्त्यांमधले खड्डेच् खड्डे, कसे बरे भरणार!
नेते आपले दाव्यांमागून वादेच, देत रहाणार,
पर्वा कशी कुणाला, माणसं मरतच रहाणार!
अंतर्वाचाल
वाचाल तरच वाचाल
वाचनासारखा छंद नाही वाचनाबद्दल
Only the Achievement
Motivation
can propell your rapid progress & development, continuously & surely.
Due to renovation work in most of the flats in our A wing, unbearable noise levels create nuisance to those- especially the Sr Citizens, who have already occupied the flats & have started living in them. Obviously this is surely unavoidable.
However to understand the gravity of the situation, can we know how many flat owners have started living in them and how many are yet to do so.
We have started living in our flat-A1603 already.
Looking forward for suitable responses. Thanks.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-305 !":👌
😁 "वाचाल तर(च?) वाचाल !":😁
👍"सध्या मी रवींद्र पिंगे यांचे
'मोकळे आकाश' हे पुस्तक वाचत आहे. मला जे लेखक मनापासून भावतात, त्यामध्ये रवींद्र पिंगे यांचा समावेश होतो. त्यांची भाषा आणि विचार खरोखर मनाला भिडणारे आणि प्रसादिक असतात. कुठेही मी पणाचा भाव नसलेले असे त्यांचे हे बोल खरोखर आयुष्याचा अर्थ किती अमोल आहे ते सांगून जातात:
"मागच्या घटना आगामी घटनांची सूचना देत असतात. म्हणजे सगळ्याच घटनांचे जळ पुढे पुढे पसरत जाते. सगळ्या घटना मिळून एक पुण्याई बनते, एक आयुष्य बनतं. त्यात काढाघाली कोणा करता येत नाही. जे झालं, ते जसंच्या तसं ऊनसावलीसह स्वीकाराव लागतं. अविरत पानगळ आणि अक्षय फुलोरा यांची एक जुडी नियती हातात देते. प्रज्ञा आणि प्रयत्न यांच्या कक्षेबाहेरच्या नियतीच्या तालावर आपल्याला नाचावं लागत. तेच आपलं संपन्न परंतु पराधीन आयुष्य पुढे पुढे वाहत जाणारं !":👌
-रवींद्र पिंगे :💐
https://youtu.be/RiIwCVOfkr0?si=8ivJk6aNkAR6H2U5
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा