गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

"वाचाल, तर(च)वाचाल!":

🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑 👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न ! साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?' या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ? आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा. जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे. थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत, त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌 😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा