शुक्रवार, १४ जून, २०२४
":बोल अमोलः 65-85 !"
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-65 !":👌
🤣 "माणूूस काय कसा बोलतो, यापेक्षा तो कसा केव्हा वागतो, यावर त्याची स्वीकारार्हता अवलंबून असते. अशा तऱ्हेने 'माणसांना वाचणे' वा समजून घेणे, व्यवहारात आवश्यक असते !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-66 !":👌
💐" सातत्याने बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे. माणसाचेही शारीरिक मानसिक अंतर्गत बदल अविरत होत असतात. 'मन चंचल, तशीच लक्ष्मी चंचल'. त्याचप्रमाणे रक्तदाब हृदयाचे ठोके आणि रक्तातील साखर यात बदल घडत असतो. नेहमीच बदलांशी जुळवून घेत, समतोल राखण्याचे कौशल्य अंगीकारावे लागते !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-67 !":👌
💐"प्रत्येक माणसामध्ये काही ना काही वेगळा स्पार्क, टॅलेंट अथवा गुणवत्ता ही असतेच असते.
पण आयुष्य उजळून टाकणारा असा क्षण तेव्हाच येतो, जेव्हा त्याला स्वतःला त्याची जाणीव होते. त्या जाणिवेचा पाठपुरावा अहर्निशपणे जे करतात, ते सेलिब्रिटी-नामांकित होतात !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-68 !":👌
💐"दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस असा अंधार प्रकाशाचा खेळ सतत चाललेला असतो. पाणी एकाच ठिकाणी थबकले, तर डबके बनते. गती हाच निसर्गाचा आधार आहे. माणसाने देखील अविरत पुढे पुढे 'चालत' जावे....
कारण 'थांबला तो संपला' !":💐
👍बोल, अमोल-69 !":👌
💐"आश्वासनं ही स्वप्नांसारखी असतात, स्वप्नांमध्ये मनातील इच्छांची जशी भरारी असते, तशीच आश्वासनांमध्ये देखील ! स्वप्नं जशी प्रत्यक्षात येणे कठीण असते, तेच आश्वासनांचे देखील !! जाग आल्यावर, स्वप्नं जशी विसरली जातात, तशीच आश्वासनंही हवेत विरून जातात !! दोन्हींवर विश्वास न ठेवणेच शहाणपणाचे असते.":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-70 !":👌
💐"आभासी जग' सुद्धा अखेरीस तंत्रज्ञानाचा ताल, अवचित बेताल झाल्यामुळे अंतर्धान पावते आणि 'सारी दुनिया मुठ्ठीमे' खतम झाल्याची वेदना अवघे जग अनुभवते ! अखेरीस 'आभासी ती आभासी'च, तिच्या नादी किती व कां लागायचे?":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-71 !":👌
💐"पुरुषाचे कर्तृत्व हेच त्याचे सौंदर्य, तर स्त्रीचे सौंदर्य हेच तिचे कर्तृत्व असे मानणे योग्य नव्हे, त्यापेक्षा मनमिळाऊ स्वभाव आणि कुटुंबहितैशी जीवनद्रुष्टि अखेर संसाराची गोडी वाढवेल आणि ती खात्रीने टिकाऊ असेल !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-72 !":👌
💐"आभाळा एवढी माया आपल्या लेकरावर फक्त आईच करू शकते कारण लेकरू तिचाच एक अंश असून, त्याला तिने आपल्या पोटात फुलवले असते आणि पूर्णत्वाला नेलेले असते ! पित्याची भूमिका केवळ गाडीच्या स्टार्टर सारखी क्षणिक पण अचूक आणि अफलातून प्राण ओतणारी !! "रेस्ट ईज हिस्टरी":💐
👍बोल, अमोल-73 !":👌
🤣 "चारोळी-व्यथा !":🤣
"रोजचेच तेच ते आणि तेच ते,
मन बावरे, मन कावरे बावरे,
बदल हवा, बदल हवाहवासा वाटे,
काय बदल, कसा बदल, ते मात्र न कळे !:
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-74 !":👌
💐"जे आहे ते नाही आणि नाहीच ते आहे, असा यश-अपयशाचा लपवाछपवीचा भुुलभुलैय्या
जेव्हा होतो, तेव्हा निवड करणे कठीण असते. अशा वेळी, जर निवड चुकली तर हमखास पश्चातापाची गॅरंटी !":💐
👍बोल, अमोल-75 !":👌
💐"जे निष्ठा आणि स्वाभिमान यांना तिलांजली देऊन ओढवलेल्या विपरीत परिस्थितीपायी मजबूर होऊन जो निर्णय घेतात त्यांना लाचारी स्वीकारावी लागते, कारण त्यांच्या पाठीचा कणा ताठ नसतो !":💐
💐II अमंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-77 !":👌
😄 "दुहेरी' दोनाची !": 😄
"चारोळी' चाराची
'हायकू' तीनाची
तर....
'दुहेरी' दोनाची !":
😇 "नव्या महाभारतात धमाशान होणार,
'कौरव'च 'कौरवां'शी 'युद्धा'त लढणार !":😇
💐II अमंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-78 !":👌
😄 "दुहेरी'-निवड !": 😄
😇 "हे असे, तर तेही तसेच,
सांगा, निवडायचे कसे?:😇
👍बोल, अमोल-79 !":👌
😄 "दुहेरी'-जुमले !": 😄
😇 "सत्तेसाठी काहीही कुठेही कसेही,
'जुमले' करता भुले कुणीही कधीही !":👍
👍बोल, अमोल-80 !":👌
😄 "दुहेरी'-विश्वासघात !": 😄
😇 "विश्वास ठेवावं, असं कोणी उरलं नाही,
मनातला 'तारणहार', 'तसा' राहिला नाही !":😇
💐II अमंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-81 !":👌
🤣 "हायकू-व्यथा !":🤣
"इकडे आड, तिकडे विहीर !
इकडे कहर, तिकडे जहर !!
इकडे जरब, तिकडे उबग !!!
💐II अमंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-82 !":👌
🤣 "दुहेरी-अंधाधुंदी !":🤣
"इकडे, तिकडे सगळीकडे सुंदोपसुंदी,
ही तर विधिनिषेधतेची विचित्र अंधाधुंदी !"
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
💐II अमंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-83 !":👌
🤣 "दुहेरी-कडबोळे !":🤣
इकडे कडबोळे, तिकडे कडबोळे !
कुणाचे बरे गुंडाळणार चंबुगबाळे!!
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-84 !":👌
💐"होळीची गोडी, तूप अन् पुरणपोळी,
पुनवेच्या ह्या राती, अवगुण ती जाळी !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍बोल, अमोल-85 !":👌
💐"दुहेरी-न्याय!":💐
👍"चुकांचा हिशोब द्यावा लागतोच लागतो,
काव्यगत नैसर्गिक न्याय मिळतोच मिळतो !":👌
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा