मंगळवार, १८ जून, २०२४
"छाप (पड)लेले शब्द!":
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
👍"मुंबईच्या 'नावलौकिक' पाऊलखुणा !!":👌
💐"मुंबईचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. सुंदर समुद्रकिनारा आणि सतत जणु 24 तास कार्यरत असलेली ही मुंबापुरी देशभरच्या सर्वच स्तरातील लहान मोठ्यांना आकर्षित करून घेते आणि ती सगळ्यांना सामावूनही घेते. जणू मुंबई म्हणजे आपल्या देशातील अमेरिकाच !
मुंबईमधील विविध रस्त्यांची वैशिष्ट्ये दर्शविणारे नावलौकिक हे मनोरंजक सदर महाराष्ट्र टाइम्स मध्ये नेहमी प्रकाशित केले जाते. त्यातीलच हे सोबतचे वृत्त आहे. 'अप मार्केट' किंवा शहरातील प्रतिष्ठित प्रगत उच्चभ्रू भाग म्हणून चर्चगेट फोर्ट आणि अर्थातच समुद्रात भर टाकून बनवलेला नरिमन पॉईंट इथला विभाग तर उत्तुंग इमारतीने आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक प्रतिष्ठांनानी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय, सचिवालय, विधिमंडळ आदि इमारतींनी सजलेला आहे. त्यातीलच क्वींन्स नेकलेस किंवा मरीन ड्राईव्ह हा समुद्रालगतचा रस्ता तर जागतिक आकर्षण आहे. समुद्रानजिक सुरू होणार्या, ते थेट हाॅर्निमन सर्कल पर्यंत जाणाऱ्या, वाटेेतील ब्रेबाॅॅर्न स्टेडियम, चर्चगेट स्टेशन आणि ओव्हल मैदानालगत जाणाऱ्या प्रचंड वर्दळीच्या रस्त्याची येथे माहिती आहे. ती ज्यांच्या नावाने दिली गेली, ते 'वीर नरिमन' कोण होते आणि त्यांचे योगदान काय याची अतिशय संग्राह्य माहिती येथे आहे. या सोबतच्या वृत्ताचे शीर्षकही 'नावलौकिक' असे आहे आणि हा 'वीर नरिमन' रस्ताही तितकाच मुंबईकरांसाठी व सगळ्यांसाठीच 'नावलौकिक' असलेला मार्ग आहे !":💐
########@
😃 "कालजयी शब्द !":😃
9 मार्चच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या अखेरच्या भागात 'ऋणुझुणु' या शब्दाविषयी जे स्फूट लिहिले आहे, ते खरोखरच अंतर्मुख करणारे आहे. त्यामध्ये आपण आवाहन केल्याप्रमाणे ऋणुझुणु सारखेच असे अनेक शब्द जे
कालमर्यादा न जाणता सातत्याने मराठी माणसाच्या बोलीमध्ये येत आहेत, असे कालातील शब्द मी इथे सुचवत आहे:
'आई ग', 'बापरे' ' ईश्य
श्री गणेशाय नमः, 'राम राम'
'जय जय राम कृष्ण हरी'
'टाटा', 'बाय-बाय',
'गुड मॉर्निंग' 'शुभ प्रभात' 'शुभ मंगल'
आपणही प्रतिसादात असे कालजयी शब्द सुचवू शकता....
[9/5, 8:15 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-118 !":👌
💐"7 steps together-सप्तपदी bring two soles together for life time, so much essential to continue the Human race for ever & ever to eternity !":💐
########
एका जागृत हितचिंतकाची यावर प्रतिक्रिया अशी:
"Please correct - spelling is "Souls" !
त्यामुळे मला जे सुचले ते असे:
इंग्रजी भाषा मोठी गमतीची आहे. तिच्या मधली काही काही स्पेलिंग माझी नेहमी चुकतात. Soul च्या बाबतीत असेच झाले. इथे u मध्येच आला आहे आणि उच्चार 'सौ'ल
मात्र नाही, तर 'सोल' असा आहे ! अर्थातच कदाचित तोच योग्य, कारण सप्तपदीमधल्या दोन जीवांमध्ये 'सौ' सर्वात महत्त्वाच्याच !
आणि मला वाटतं बुटामधल्या तळव्याला किंवा 'सर्व', 'एकूूण' या अर्थाने Sole शब्द वापरला जातो असा माझा कयास आहे.
इंग्रजी स्पेलिंगस् च्या गमतीवरून आठवले की विचार अर्थातच Thought मध्ये g h कुठून आले? 'कर्नल' शब्दाबद्दलचं स्पेलिंग वेगळंच आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. असेच अनेक शब्द या इंग्रजी भाषेमध्ये स्पेलिंग आणि उच्चार अन् अर्थ याचा कदाचित ताळमेळ नसणारे असावेत. संशोधन करायला खूप वाव आहे. तुम्हालाही असे शब्द आठवत असले तर प्रतिसादात अवश्य मांडा. तेवढेच इंग्रजीचे ज्ञान सगळ्यांचेच वृद्धिंगत होऊ शकेल.
माझा संदेश अनेकांना गेला पण अशा तऱ्हेने त्यातील चूक दाखवणे तुम्हीच साधले म्हणून आभार प्रामुख्याने या करता की त्यामुळे माझ्या कल्पनेचे दारू असे भरारी घेऊ शकले.
########
👍"वाचा आणि गांभीर्याने विचार करा !":👌
"सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून राजकारणात प्रवेश मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी.
कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल.
After all one must remember:
"When Character is Lost, Everything is Lost !"
[19/5, 4:01 PM] Sudhakar Natu: "परिक्षे'चा 'निकाल'!":
"Beginning of the End?."
कधी नव्हे ती एकदाची परीक्षा आता लौकरच संपणार. ह्या वेळेस एक बरे होते, परिक्षेसाठी 'सात पेपरां'मध्ये तयारी करायला भरपूर दिवसांचा वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची. जन्मानंतर म्रूत्यू जसा अटळ, तसंच ह्या परिक्षेनंतर 'निकाल-ही अटळच!
आता हुरहुर, काळजी व धागधूग सुरू झाली. केव्हां एकदाचा तो निकालाचा दिवस येतो, अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्हे, तर परीक्षकांच्या सुद्धा मनात खळबळ, रुखरुख सुरू आहे. ही परीक्षा खूपच आगळी वेगळी होती. विचारलेल्या प्रश्नांना सोडून, हुशार विद्यार्थ्यांनी काहीबाही उत्तरे देणेच पसंत केले, त्यात नको नको त्या शब्दात उखाळ्या पाखाळ्या अधिक होत्या. हुशार मुलांनी आणि त्यांच्या मॉनिटरनी वर्षभर अभ्यास सोडून अक्षरश: उनाडक्या केल्यामुळे त्यांच्यापाशी दुसरे काहीच उरले नव्हते.
सद्य परिस्थितीची जाणीव करून देणारा आणि अंतर्मुख करणारा लेख पुढे वाचण्यासाठी ही लिंक क्लिक करा.....
https://moonsungrandson.blogspot.com/2024/05/beginning-of-end.html
🤗🤗🤗🤗🤗
ह्या लेखातील मल्लिनाथीनंतर आपणास काय वाटते ?....
[31/5, 9:19 AM] Sudhakar Natu: 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"परवलीचा शब्द-'पासवर्ड !":💐
👍"कोणतेही कुलूप उघडण्यासाठी जशी ठराविक किल्लीच लागते, तसंच नव्या जमान्यात तंत्रज्ञानाचा इतका विकास झाल्यामुळे, काहीही करायला जाण्यापूर्वी आपल्याला परवलीचा शब्द अर्थात पासवर्ड वापरायला लागतो. मग ते एटीएम असो ईमेल असो, कुठली फाईल असो अथवा आपला स्मार्टफोन उघडणं असो, 'जिथे जातो तेथे तू माझा सांगाती' अशा प्रमाणे पासवर्ड ही दररोजची आवश्यक गोष्ट बनली आहे.
पासवर्ड, जणु खजिन्याची किल्ली !"
प्रत्येक व्यक्तीच्या खाजगीकरणाची परिसीमा म्हणजे हे पासवर्डस् ! अर्थातच सारे पासवर्ड लक्षात ठेवून, ते ते योग्य वेळी वापरणे अथवा अधून मधून बदलणे हे सारे जे काम जिकीरीचे झाले आहे. तर अशा आजच्या युगातील सगळ्यात महत्त्वाच्या शब्दाचा अर्थात पासवर्डचा लेखाजोखा घेणारा हा लेख खरोखर वाचनीय आणि संग्राह्य आहे, त्याबद्दल लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे !":👌
######
💐"प्रत्येकाने वाचायलाच हवं असं !":💐
👍 " जीवनात चढ-उतार प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. संकटांना तोंड देत, आत्मविश्वासपूर्वक कसं जगायचं, याचं दर्शन घडवणार असं हे पुस्तक खरोखर प्रत्येकाने वाचायलाच हवं असंच आहे, कारण पुस्तक कुठूनही मिळवल्यानंतर आणि वाचल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येक जण हेच म्हणणार आहे :
'What a Fighter, Fighting successfully against all types of odds/challenges !
Hats off to you,
Mr Sathe !!": 👍
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
👍" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌
🤗🤗🤗🤗🤗
🤣" रानटी अवस्थेतील माणसाचा उत्तरोत्तर प्रगतीचा प्रवास आज तंत्रज्ञानामुळे प्ररमोच्च बिंदूला पोचला असला, तरी त्याची मूलभूत शिकारीवृत्ती अजूनही कमी झाली नाही, अशाच तऱ्हेचे सध्याचे एकंदर गुन्हेगारी विश्वाचे भयावह चित्र आहे. दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची ही प्रवृत्ती भीषणावह आहे. पॉकेटमारी,चोऱ्या दरोडे ही सारी त्याच प्रवृत्तीची अनिष्ट उदाहरणे आहेत.
अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावून, संभाव्य पकडले जाऊन मार खाण्याच्या धोक्याला तोंड देण्याची शक्यता गृहीत धरूनही, हे गुन्हे काही केल्या कमी होत नाहीयेेत. हा खरोखर मानवसंस्कृतीला लागलेला हा काळीमा कधी दूर होणार कुणास ठाऊक !
त्यात आता भर पडली आहे, ती सायबर क्राईमस् भस्मासुराची ! सोबतच्या वृत्तामुळे आपल्याला लक्षात येईल की, फसवणुकीद्वारे किती भयानक वेगाने अशा गुन्ह्यांची संख्या वाढत जात आहे आणि त्यामानाने पकडले जाणारे नगण्य आहेत. येथे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाद्वारे रिमोट ठिकाणी हजेरी असूनही, कुठेही कसेही संभाव्य भक्ष हेरून त्यांना भीती दाखवून त्यांचेच पैसे या गुन्हेगारांना बिन दिक्कतपणे धाडले जातात. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमस् मध्ये एकदा फसवणूक झाली की हातात तक्रार करण्याशिवाय काहीच उरत नाही, कारण समोर गुन्हेगार कोण आहे याचाच पत्ताच नसतो.
भौतिक प्रगती जरी झाली तरी नैतिक अध्यपतन इतक्या थराला गेले आहे की, हे असले आधुनिक भामटे गुन्हेगार सहजतेने निरपराध सामान्य जनतेने घामाने मिळवलेल्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत.
ही मानवी प्रवृत्ती कधी कशी संपणार, त्यासाठी खरोखर काय करायला हवे, प्रामाणिकपणा सचोटी निस्पृहता या गोष्टी समाज कसा कधी अंगीकारणार, याचा विचार करायची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. मानसशास्त्रज्ञ यासाठी पुढे यायला हवेत. अथक संशोधन करून अगदी बालपणापासून कोणते, कसे संस्कार
करायला हवेत याचे मार्गदर्शन त्यांनी करायला हवे.
सर्वसामान्यांनीही जागृत राहून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही, अनोळखी अशा कुठल्याच संपर्कात न येण्याची खबरदारी त्यांनी जर घेतली तर कदाचित काहीसा आळा या असल्या चिंताजनक सायबर क्राईमस् वर घालता येईल !":🤣
🤗🤗🤗🤗🤗
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा