शुक्रवार, १४ जून, २०२४

बोल अमोल:86-105

💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-86 !":👌 💐"चारोळी-जननी !":💐 👍"गरज ही शोधाची जननी,      कल्पना ही स्वप्नाची जननी,       चूक ही शिक्षेची जननी,       भूक ही भिक्षेची जननी !":👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-87 !":👌 💐"चारोळी-निवड!":💐 😀 "नेता म्हणजे लहरीप्रमाणे नेणारा, जेता म्हणजे रणांगणात जिंकणारा, त्राता म्हणजे संकटात वाचवणारा, दाता म्हणजे मनापासून देणारा !":😃  💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-88 !":👌 💐"दुहेरी-विश्वासघात !":💐 😇 "कोण कुठला, कोणाचा काही कळेना, जागा व तिकिटे यांचा मेळच जुळेना !":😇  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-89 !":👌 💐"चारोळी' चाराची, 'हायकू' तीनाची, 'दुहेरी' दोनाची, तर.....आता..... एकच एक लकेर !":💐 😃 "तिकीट मिळणं म्हणजे जय नव्हे, तर 'परीक्षे'चे हॉल तिकीट !" 😃  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-90 !":👌 💐"दुहेरी-दिवस!":💐 👍"एक काळ असा, दिवस जातो भसा भसा ! एक काळ कसा, दिवस संपे असा तसा !!:👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-91 !":👌 😇 ""कसौटी जिंदगीकी!":😇 👍"सार्वजनिक जीवनातील निष्ठा, साधनशुचिता, शाश्वत नीतिमूल्ये यांचा जबरदस्त वेगाने र्हास होत असताना, येत्या निवडणुकांमध्ये मतदारांची कधी नव्हे एवढी कसोटी पाहिली जाणार आहे. तारतम्य, कठोर परिक्षण आणि भविष्याचा वेध घेणारी अचूक निर्णय शक्ती, ह्यांचे जोरावर ज्याची त्याची जागा दाखवण्याच्या अमोल संधीचा हितकारक फायदा करून घेण्याची, अशी वेळ कदाचित पुन्हा कधीही येणार नाही !":👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-92 !":👌 💐"एकच एक लकेर!":💐 👍" दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं !": 👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-93 !":👌 💐"आंधळी भक्तीच नेहमी, स्वखुषीने एका भस्मासूराला जन्म देते. त्यांत सर्वांचाच अखेर घात होतो आणि हा इतिहास पुन:पुन्हा अवतरत असतो !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-94 !":👌 💐"दाद, प्रतिसाद!":💐 श्री अजित फाटक, सादर वंदन मी एक माहीम येथील ज्येष्ठ नागरिक सुधाकर नातू. आपले 'पुण्याची स्मरणचित्रे शतकापूर्वी व आता' हे पुस्तक हातात घेतले, आपले मनोगत वाचले आणि आपले आजोबा दादासाहेब फाटक यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुण्याच्या इतिहासाचा जो मागवा आपण या पुस्तकात घेतला आहे, त्याबद्दल माझी ही मनःपूर्वक दाद व अभिनंदन. वेगळ्या रूपात ध्वनिफितीच्या. आपण जरूर ऐकावी. धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-95 !":👌 मालिकांमध्ये कुठे लांबलेली होळी तर कुठे रंगपंचमी ! तर कुठे आताच गुढीपाडवा !!:" !": 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-96 !":👌 💐"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार: मानसिक स्थितीनेच आपले भवितव्य अधिक घडते. दैवी शक्ती ही मनाला फक्त तथास्तु म्हणत असावी !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-97 !":👌 💐"तिकिटां'चा बाजार चाललेला असताना, पक्षाचा विचार करण्यापेक्षा उमेदवाराचे चारित्र्य आणि हितकारक योगदान याची तपासणी करून निवड करणे शहाणपणाचे ठरावे !":💐 👍"बोल, अमोल-98 !":👌            II विरंगुळा II 💐"प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आडनावाची माणसे येत असतात, काही काळापुरती ! स्मरणरंजन म्हणून आपल्या आयुष्यात कोणकोणत्या आडनावाची कोणती माणसं आली आणि ते अनुभव आठवावेत !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-99 !":👌 💐"मनुष्याला सगळ्यात महत्त्वाची देणगी निसर्गाने कोणती दिली असेल, तर ती म्हणजे त्याला स्वतंत्र विचार करायची बुद्धी होय ! यामधूनच त्याला अनेकानेक कल्पना सुचूही शकतात. त्या कल्पनांच्या अविस्मरणीय पाठपुराव्यामुळे, आज माणसाची उत्तरोत्तर चित्तथरारक प्रगती झालेली आपल्याला दिसते आहे....💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-100 !":👌 💐" माणसाच्या दृष्टिकोनाची व्यावहारिकता हीच त्याच्या जीवनातील यशापयाशाची गुरुकिल्ली असते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-101 !":👌 💐" एकच एक लकेर !":💐 🤣 "लाचारी सारखा पराभव नाही आणि स्वाभिमानासारखा विजय नाही !":😄 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-102 !":👌 💐"फसवणुकीच्या खेळात, फसलेल्याची होते अडवणूक, तर फसवणाऱ्याची सोडवणूक; मात्र जेव्हा फसवणूक उघडकीस येई, त्याची त्रेधा तिरपीट होई !":💐  👍"बोल, अमोल-103 !":👌 💐"प्रयत्नांती परमेश्वर' आणि 'जैसी करणी वैसी भरणी' ही दोन मूलतत्त्वे, हेच खरे !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-104 !":👌 💐"खाल्ल्या मिठाला जागणारे हल्ली कोणी मिळत नाहीत' आणि 'सरशी तिथे धावशी' हेच खरे !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-105 !":👌 💐" काळाचा महिमा अगाध आहे. 'पंत गेले, राव आले' हा चक्र नेहमीक्रम, हेच निसर्गाचे सत्य आहे. आपण त्याला नशीब म्हणतो एवढेच !":💐 धन्यवाद  श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा