शुक्रवार, ३१ मे, २०२४
@मुक्तसंवाद-कावाकामि !":
👍"मुक्तसंवाद-'कावाकामि !":👌
💐'वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. त्यामध्ये आपणच आपल्यामध्ये गुंगून, मनासमोरचे भावविश्व न्याहाळत अंतर्मुख होत जातो. आपली जिज्ञासावृत्ती वाढत जाते. मला देखील वाचनाची खूप आवड आहे आणि त्यामुळेच मला ही कल्पना सुचली की, आपण काय वाचले आणि काय त्यामधून मिळाले यासंबंधी आपले विचार व्यक्त करावेत. म्हणूनच हे लेखाला असे अनोखे शीर्षक -'कावाकामि"!
मला जे काही सांगायचंय ते मी कुठे वाचलं किंवा कुठे पाहिलं किंवा कुठे अनुभवलं असं आहे ते प्रथम माहेर मे'24चा मी अंकातील आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की 'जनरेशन झेड' अर्थात
1997 ते 2012 यामध्ये जन्मलेली पिढी,
यांचा मेंदू आधीच्या पिढीपेक्षा मोठा आहे; परंतु त्यांचा बुद्ध्यांक किंवा IQ कमी आहे. तसेच त्यांची जिज्ञासावृत्ती हळूहळू नष्ट होत चालली आहे. कारण अर्थातच मोबाईलचा अती वापर आणि वेगवेगळी सर्च इंजिन्समुळे सारं काही तयार असंच त्यांना समोर मिळत आहे !
दुसरं एक उपयुक्त ते म्हणजे स्ट्रेस टेेस्टसंबंधी. हृदयविकार हा आजकाल विशी तिशीपासून सापडणारा असा प्राणघातक विकार आहे. त्याला वयाचे बंधन नाही. अशी वेळ आली आहे कारण जीवनामध्ये वाढणारे ताण-तणाव. त्याकरता आपल्याला स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं असतं. त्यामध्ये VO2 मॅक्स'ची परीक्षा केली जाते. म्हणजे एकूण ऑक्सिजन जास्तीत जास्त व्यायामाच्या वेळेला किती वापरला जातो ते दाखवणारा आकडा. तो जितका जास्त तेवढी आपली हृदयाची ताकद अधिक. शक्यतोवर 30 ते 36 हा आकडा चांगला असतो. कमी असला तर अर्थात प्रयत्नपूर्वक आपल्याला तो वाढवता येतो, असेही त्या छोट्याशा लेखात म्हटले आहे डॉक्टर अनुराधा देशपांडे यांचे ते सदर आहे.
माणसाच्या मनात काय चाललंय ते आपल्याला समजावं, अशी प्रत्येकाची खूप खूप इच्छा असते. पण अजून तरी समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय, ते कळत नाही. ही जर माणसांची कथा तर पशुंचा काय ! इजरायल मधल्या एका शास्त्रज्ञाने प्रयोग करून प्राण्यांचं मन जाणून घेण्याचा, त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वटवाघळांच्या वेगवेगळ्या आवाजामधून त्यांनी पुष्कळ डेटा गोळा करून हे संशोधन केले आहे. कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वापरून प्राण्यांची भाषा समजता येऊ शकेल अशी परिस्थिती आहे ! वाचावं ते नवलच असंच म्हणायचं !!:💐
####################
2.
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"परवलीचा शब्द-'पासवर्ड !":💐
👍"कोणतेही कुलूप उघडण्यासाठी जशी ठराविक किल्लीच लागते, तसंच नव्या जमान्यात तंत्रज्ञानाचा इतका विकास झाल्यामुळे, काहीही करायला जाण्यापूर्वी आपल्याला परवलीचा शब्द अर्थात पासवर्ड वापरायला लागतो. मग ते एटीएम असो ईमेल असो, कुठली फाईल असो अथवा आपला स्मार्टफोन उघडणं असो, 'जिथे जातो तेथे तू माझा सांगाती' अशा प्रमाणे पासवर्ड ही दररोजची आवश्यक गोष्ट बनली आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या खाजगीकरणाची परिसीमा म्हणजे हे पासवर्डस् ! अर्थातच सारे पासवर्ड लक्षात ठेवून, ते ते योग्य वेळी वापरणे अथवा अधून मधून बदलणे हे सारे जे काम जिकीरीचे झाले आहे. तर अशा आजच्या युगातील सगळ्यात महत्त्वाच्या शब्दाचा अर्थात पासवर्डचा लेखाजोखा घेणारा हा महाराष्ट्र टाइम्स पुणे आव्रुत्तीमधील प्राध्यापक डॉ प्रमोद दामले ह्यांचा लेख खरोखर वाचनीय आणि संग्राह्य आहे, त्याबद्दल लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे !":👌
####################
3.
💐'पुरुष उवाच'या दिवाळी अंक'23 मध्ये मेंदूमध्ये स्त्रवणाऱ्या विविध चार प्रकारच्या हार्मोन्सची माहिती आली होती. ती खरोखर वाचनीय आणि उपयुक्त होती. दुर्दैवाने ती नोंदण्याची मी विसरलो. साहजिकच आता तीच विशेष माहिती मी 'गुगल'वरून काढली ती अशी:
1 Dopamine acts on areas of the brain to give you feelings of pleasure, satisfaction and motivation. Dopamine also has a role to play in controlling memory, mood, sleep, learning, concentration, movement and other body functions.
2 Serotonin is a chemical that carries messages between nerve cells in the brain and throughout your body. Serotonin plays a key role in such body functions as mood, sleep, digestion, nausea, wound healing, bone health, blood clotting and sexual desire.
3 Endorphins are a type of neurotransmitter, or messenger in your body. They attach to your brain's reward centers and carry signals across your nervous system. Endorphin comes from the words “endogenous,” which means within the body, and “morphine,” an opiate pain reliever.
4 Oxytocin is a natural hormone that manages key aspects of the female and male reproductive systems, including labor and delivery and lactation, as well as aspects of human behavior. Your hypothalamus makes oxytocin, but your posterior pituitary gland stores and releases it into your bloodstream.
आहे की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती !
थोडक्यात माणसाने जिज्ञासा जागृत ठेवावी. दररोज विविध प्रकारचे वाचन करावे आणि टिपकागदासारखं ज्ञान व उपयुक्त माहिती इथून तिथून कायम गोळा करत राहावी, त्यामुळे तुमच्या जाणीवांचे क्षेत्र उत्तरोत्तर विकसित तर होत जाईलच पण तुमच्या व्यक्तिमत्वातही एक प्रकारची प्रगल्भता येईल !":💐
धन्यवाद
सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा