शनिवार, १५ जून, २०२४

"बोल अमोल :146-165 !":

:💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-146 !":👌 💐 " काही काही शब्द कोड्यात टाकणारे आणि गमतीशीर असतात, जसे: अलक्षित व दुर्लक्षित, परोक्ष व अपरोक्ष, ग्रंथ व पुस्तक ! अर्थ तोच वा विपर्यास करणारा असू शकतो; जसं: ग्लास अर्धा भरला आहे कां रिकामा आहे ! माणसाचीही अशीच चक्रावणारी रूपे असतात: जसे बघावे, तसा तो वाटतो !! शेवटी, II दृष्टी, बनवते सृष्टी II":💐 💐II (अ) मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-147 !":👌 💐"आपल्या वाटेला आले आहे, ते काम मनापासून व कुरकुर न करता, उत्तम रितीने करणे एवढेच नाही, तर त्यामध्ये सुधारणा करत अधिक चांगल्या परिणामांची आस धरत, सातत्याने करत राहणे ही प्रवृत्ती हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. त्याउलट कर्तव्यापेक्षा हक्क जास्त महत्त्वाचे मानणारे, स्वार्थी, कामचुकार अधिक संख्येने वाढत आहेत. सर्वंंकष विळखा घालणाऱ्या भ्रष्टाचाराचे मूळ तिथेच आहे. नैतिक अधोगती हीच खरी आपली समस्या आहे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-148 !":👌 💐"माणसाच्या आयुष्यामध्ये वयोमानपरत्वे, अपेक्षा, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ह्या बदलत जात असतात. त्या त्या वेळी त्यांचे अचूक निदान ज्यांना होते आणि जे त्याबर हुकूम वागतात, ते आयुष्यात बहुश: यशस्वी होतात. जरा जरी कुठल्याही एका गोष्टीची चूक झाली, तर आयुष्याची गाडी भरकटत जाऊ शकते !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-148 !":👌 💐 "दररोज सकाळी, काल आपण कोण कोणती कामं, यशस्वी केली त्यांची न चुकता नोंद ठेवणं, अत्यंत उपयुक्त असते. आपला वेळ आपण कसा वापरला हे त्यावरून समजून, सातत्याने आपल्यांत सुधारणा करण्याची प्रेरणा तर मिळतेच, पण त्याच बरोबर जी कामं राहिली, त्यांना  प्राधान्यही देता येते !":💐 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-149 !":👌 😇 "माणसाला माणसाची सोबत नकोशी होत चालली आहे, आबालवृद्धांपासून प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवी, हे खूळ वाढतच चालले आहे. त्यामुळे माणसं ही बेटं बनत चालली आहेत, चहुबाजूने स्वतःच्याच कोशात वेढलेली ! मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने हे एक अवलक्षण नव्हे कां? असं कां घडावं? तंत्रज्ञानाच्या अक्राळ विक्राळ पाशांमुळे? की, जीवन जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या ईर्षांमुळे?:😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-150 !":👌 💐" दररोजच्या जीवनानुभवातून, निरीक्षणातून वा वाचनातून, जसे चिमण्या हात नसतानाही चोचीमध्ये योग्य ते भक्ष गोळा करतात, त्याप्रमाणे काय शाश्वत विचारधन मी मिळवले, ते शब्दबद्ध करण्याचा, माझा स्वनिर्मित 'बोल अमोल' सिलसिला आता चक्क दीडशेचा पल्ला गाठत आहे ! आपणही आपल्या परीने असाच उपक्रम चालू ठेवू शकलात, तर सोन्याहूनही पिवळे !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-151 !":👌 😇 "राजकारणातील अविश्वसनीय आणि अनाकलनीय चढ-उतार: "रावाचे रंक, कधी रंकाचे राव" पाहता नशीब नावाची काहीतरी चीज असावी, यावर विश्वास बसू लागतो. नशीब म्हटले की, आपोआपच प्रारब्ध वा पूर्वसुकृत आणि अर्थातच पुनर्जन्म हे देखील आलेच ! काय खरे, काय खोटे सारेच गुढ आणि अतर्क्यच !!"😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-152 !":👌 💐 "शब्द" हे माध्यम, आणि "विचार" ही शक्ती, कशी, कशासाठी व केव्हां वापरावयाची ते ज्याचं त्यानं ठरवायचं!:💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-153 !":👌 💐"अडचणी ,संकटेही येतात.... त्यांतूनही मार्ग सापडतो.... लक्षांत येतं..... कुणाचच, कशाही वाचून अडत नसतं!":💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा