शुक्रवार, १४ जून, २०२४

बोल अमोल:106-125

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-106 !":👌 💐" काळाचा महिमा अगाध आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते ! काही दशकापैकी पूर्वी कोकणातील आई बाप, मुंबईला आपले नशीब काढायला गेलेल्या मुलांच्या विरहापोटी तळमळायचे; आता परदेशात सोन्याचे दिवस पाहायला गेलेल्या मुलांच्या, ताटातुटीमुळे शहरा शहरातले गावागावातले आईबाप तशाच दयनीय अवस्थेत दिवस कंठत आहेत !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"वाचता वाचता, वाचवा !":👌 💐"दररोज सकाळी चहा पिताना पेपर वाचण्याची सवय मला आहे. आजच्या दोन बातम्यांनी माझे अचानक लक्ष वेधले, एक बातमी भारतात व्हाट्सअप बंद होऊ शकते यासंबंधी, तर दुसरी डीएनए टेस्टिंग संबंधित. अशावेळी चहाच्या वेळच्या गप्पा आम्ही दोघं मारतो असं म्हणायचं खरं पण मीच नेहमी बोलत असतो ! मला या दोन बातम्यांमध्ये काय वाटतं, ते नाही तरी मी बोलणारच, तर ते जर रेकॉर्ड केलं तर काय हरकत आहे, असं वाटून काहीही याविषयी बोलण्यापूर्वी मी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि जी ध्वनिफित तयार झाली, ती पुढे सादर करत आहे. नांवही चांगलं सुचलं "वाचता वाचता, वाचवा !  करा, बरं विचार ! ":💐 👍"बोल, अमोल-107 !":👌 😇 "करा, बरं विचार ! ":😇 🤣 "चिंताजनक महागाई, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दयनीय स्थिती या ज्वलंत समस्यांपासून पळ काढून, इतर आभासी विषयांवर आधारित प्रचार करणे, हा संभाव्य धोक्यापासून पळण्याचा मार्ग असूू शकतो कां ?":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-108 !":👌 🤣 "सत्तेची नशा अत्यंत धोकादायक. सत्ता मिळवणं जेवढं कठीण, त्यापेक्षा ती टिकवणं महाकर्मकठीण ! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मिळालेली सत्ता जाण्याची वेळ येणं म्हणजे आणीबाणीची तापदायक परिस्थिती !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-109 !":👌 🤣 "आपल्या गुणांवर,योगदानांबद्दल प्रभावशाली बोलणे शक्य नसल्यामुळे, केवळ विरोधकांच्या चुकांवर सातत्याने बोलणाऱ्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाहीत !":🤣  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-110 !":👌 🤣 II 2024 नाही, 2014 सारखे II🤣  🤣 II कुछ तो गडबड है II🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-111 !":👌 😇 "परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे कारण म्हणजे, आपले फसलेले निर्णयच असतात. ते जेव्हा घेतले जातात, तेव्हा तेच अचूक आणि योग्य असे वाटतात खरे; पण तसे काहीच घडत नाही आणि सारेच भांडे फुटून पश्चाताप करण्याविना हातात काहीच राहत नाही ! II कालाय तस्मै म: II😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-112 !":👌 💐 " अखंड अविरत वाहणाऱ्या महाविशाल काळप्रवाहापुढे, प्रत्येकाचे जीवन क्षणभंगुर होय. परंतु प्रत्येकाचे जीवन ही एक विलक्षण चमत्कारिक अनेकानेक नाट्यमय प्रसंगांची अविस्मरणीय कादंबरी असते, जी कोणाचीच एकाची दुसऱ्यासारखी नसते. ती लिहीणारा, वाचणारा, पाहणारा आणि भोगायला लावणाराही तोच आणि अखेर ती संपवणारा देखील तोच तो: -'नियंता' !! II वाह् क्या बात है II:💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-113 !":👌 💐"ब्रँड आणि बेंडबाजा !":💐 👍" नांव ही फक्त ओळख असते, तर 'ब्रँड' उपयुक्ततेची पावती असते; ग्राहकाला गृहीत धरण्याची चूक मात्र 'ब्रँड'चा 'बेंडबाजा' वाजवू शकते !":👌 [ 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-114 !":👌 💐 "जिथे एका माणसाचे मनच आधी गुढ, अनाकलनीय आणि अथांग असते, तिथे माणूस जर समूहात असला तर काय होतं, याचं मानसशास्त्रीय विश्लेेषण आणि त्यातील 'एबिलिन विरोधाभास' अर्थात पॅराडॉक्स ह्या तत्वाची आता कसोटी आहे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-115 !":👌 💐 " एकच एक लकेर !":💐 👍"करून करून भागले आणि देवपूजेला लागले !":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-116 !":👌 💐 " एकच एक लकेर !":💐 👍"Never put all your eggs in one Basket!":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-117 !":👌 💐"सभोवताली जे वास्तव घडत असतं, त्याचा धांडोळा घेऊन त्याचा समाजमनावर काय परिणाम होऊ शकतो, याचा शोध घेत आपल्याला जे सुचतं ते असतात, 'बोल अमोल' !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-118 !":👌 💐"7 steps together-सप्तपदी bring two soles together for life time, so much essential to continue the Human race for ever & ever to eternity !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-119 !":👌 💐 "वाह् क्या खेल है !":💐 👍"आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पहायचं वाकून !":👍  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-120 !":👌 💐 "भौतिक विकासाचा अभिमान बाळगता बाळगता, नीतिमत्तेच्या चिंधड्या ठाई ठाई उडताना दिसत आहेत ! काय हे दुर्दैव !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-121 !":👌 💐"कृतज्ञता, स्वीकारशीलता आणि विनम्रता या गुणत्रयींच्या बळावर माणूस आपल्यासमोरच्या कठीणात कठीण आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतो !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-122 !":👌 💐"वाचनसंस्कृतीचा उगाचच एवढा बोलबाला कशाला करायचा ? त्यापेक्षा वाचायचं आणि विसरून जायचं, हे उत्तम! जे वाचलं, त्याच्यातलं जर आपल्याला काहीही प्रत्यक्षात आणता येणार नसेल, तर उगाचच वाचनसंस्कृतीचा ढोल कशाला !!":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-123 !":👌 💐"अखंड अविरत वाहणाऱ्या महाविशाल काळप्रवाहापुढे, प्रत्येकाचे जीवन  क्षणभंगुर होय. परंतु प्रत्येकाचे जीवन ही एक विलक्षण चमत्कारिक अनेकानेक नाट्यमय प्रसंगांची अविस्मरणीय कादंबरी असते, जी कोणाचीच एकाची दुसऱ्यासारखी नसते. ती लिहीणारा, वाचणारा, पाहणारा आणि भोगायला लावणाराही तोच आणि अखेर ती संपवणारा देखील तोच तो: -'नियंता' !! II वाह् क्या बात है II:💐  II(अ)मंगल प्रभात II 👍"बोल, अमोल-124 !":👌 😇 "एकच एक लकेर!":😇 🤣"नरे'ची हीन किती केला रे 'नर' !":🤣  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-125 !":👌 💐" प्रत्येकाचा 'कम्फर्ट झोन' वेगवेगळा असतो. ज्याला त्याला त्याच्याच 'कम्फर्ट झोन'मध्ये नेहमी राहावेसे वाटते. परंंतु सतत बदलत जाणाऱ्या परिस्थितीमुळे ते शक्य नसते. अशावेळी केवळ 'घडेल तेच पसंत !' ही वृत्ती  आवश्यक असते !!":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा