शुक्रवार, १४ जून, २०२४
बोल अमोल :126-145
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-126 !":👌
💐 " नियतीचा संकेत !":💐
👍" एक मे 2024 ते 14 मे 2025 या कालखंडात गुरु वृषभ राशीत असल्यामुळे, हा कालखंड ज्यांची जन्मचंद्रराशी अथवा जन्मलग्न मेष, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मकर आहे त्यांना हा कालखंड सर्वसाधारणपणे शुभ फलदायी ठरावा !"👌
II शुभम भवतु II
💐II(अ))मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-127 !":👌
🙃"आपल्या स्वार्थापोटी अथवा मजबुरीमुळे जो सातत्याने निष्ठा बदलत राहतो, तो कायम अविश्वसनीय ठरतो आणि अखेरीस त्रिशंकूसारखे हेलकावे खात राहणे त्याच्या पदरी येते !":🙃
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-128 !":👌
💐 " नियतीचा संकेत !":💐
👍" सध्या शनि कुंभ राशीतून प्रवास करत असल्यामुळे, मकर, कुंभ आणि मीन राशींना शनीची साडेसाती सुरू आहे. शनी 25 मार्च 2025 ला कुंभ राशीतून मीन राशीत गेल्यावर, मकर राशीची शनीची साडेसाती संपून, मेष राशीला सुरू होईल. अर्थातच कुंभ आणि मीन राशीची
साडेसाती तशीच पुढेही चालू राहील !":👌
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-129 !":👌
💐""Any one's Life happens to be a limited overs' match and the winners have better 'run rate' than many others. For that You ought to understand what's the 'run rate' is all about!":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-130 !":👌
💐"Ideals are always out of box Ideas and emerge only after 360 degree review of the situation. They are the role models for the most desired best outcome !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-131 !":👌
💐 "नित्य बदल हा निसर्गाचा खेळ आपण दिवसा मागून दिवस पाहत असतो. माणसांच्या जीवनात देखील असेच अनेक बदल होणे नैसर्गिक असते. अशा अनेकानेक बदलांची परिणती म्हणजे परिवर्तन होय. अशा परिवर्तनांच्या लाटांमागून लाटा, आतापर्यंत समाजाने अनुभवल्या आहेत !":💐
[
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-131 !":👌
💐"नित्य बदल हा निसर्गाचा खेळ आपण दिवसा मागून दिवस पाहत असतो. माणसांच्या जीवनात देखील असेच अनेक बदल होणे नैसर्गिक असते. अशा अनेकानेक बदलांची परिणीती म्हणजे परिवर्तन होय. नव्या परिवर्तनाची लौकरच नांदी होणार कां, ही हुरहूर लागली आहे !":💐
II (अ) मंगल प्रभात II
👍"बोल, अमोल-132 !":👌
🤣 "भौतिक विकास, पण नैतिक र्हास,
भ्रष्टाचाराचा फास, साराच सर्वनाश !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-133 !":👌
💐"पैसा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे, अंथरूण पाहून पाय पसरावे, आहे त्यात समाधान मानावे ही पूर्वी प्रवृत्ती होती;
तर आता साऱ्याच मुबलकतेमुळे चंगळवाद फोफावतोय आणि अधिकाधिक हव्यासापायी मनःशांती हरवली आहे...
"अहा, ते सुंदर दिन हरपले !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-134 !":👌
💐"आपल्या आयुष्याचे प्रयोजन काय, हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला केला आहे काय? केला नसेल तर ताबडतोब करा आणि जर उत्तर मिळाले तर सातत्याने त्याचा पाठपुरावा करत रहा. अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी हे आवश्यक आहे !":💐
💐II (अ)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-135 !":👌
😇 "Catharsis, अर्थात वेदनेतून आनंदाचा अनुभव घेणे: उदाहरण: "अच्च्छे दिन" अंतर्धान पावलेले, उभी केलेली सारी स्वप्ने भुईसपाट असे असताना त्याच म्रुगजळामागे धावणे!":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-136 !":👌
💐"दक्षिण कोरिया'मध्ये एक अभिनव स्पर्धा घेतली जाते. त्यामध्ये स्पर्धकांनी काहीही न करता अक्षरशः काहीही न करता, त्यांनी ज्या स्थितीत आहोत त्याच स्थितीत जास्तीत जास्त दीड तास राहावयाचे असते. ह्या स्पर्धेमध्ये शेकडो स्पर्धक भाग घेतात आणि ती बघायलाही हजारो प्रेक्षक येतात.
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपणही दररोज निदान पाच ते दहा मिनिटं तरी आहे त्याच स्थितीत निर्विकारपणे बसण्याची संवय (ध्यान लावणे) लावून घेतली पाहिजे. मानसिक व शारीरिक आरोग्याला ते हितकारक आहे !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-137 !":👌
💐 "कामात अधून मधून बदल,
हाच एक विरंगुळा !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-138 !":👌
💐"सोशल मिडीयाचा उपयोग,
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा व विचारधनाचा फायदा उभरत्या पिढीला करुन देणे हे उपयोगी ठरेल !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-139 !":👌
💐" सहनशील माणसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण प्रतिकूल जरी सतत घडत असलं तरी ते सहन करायची त्यांची तयारी असते. 'घडलं तेच पसंत' अशी वृत्ती त्याकरता कारणीभूत असते !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-140 !":👌
💐" माणसांचे दोन गट असतात, वेळ कसा जाणार अशी चिंता असणारा पहिला गट; तर वेळ कसा गेला हे त्यांचे त्यांनाच न कळणारा दुसरा गट ! आपण कुठल्या गटात आहात, ते तपासा !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-141 !":👌
💐 "कावाकामि !":💐
👍"दररोज विविध प्रकारचे वाचन करावे आणि टिपकागदासारखं ज्ञान व उपयुक्त माहिती इथून तिथून कायम गोळा करत राहावी, त्यामुळे तुमच्या जाणीवांचे क्षेत्र उत्तरोत्तर विकसित तर होत जाईलच पण तुमच्या व्यक्तिमत्वातही एक प्रकारची प्रगल्भता येईल !.......
आपण काय वाचले आणि काय त्यामधून मिळावले ते नोंदवून ठेवावे !":👌
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-142 !":👌
💐"घडी घडी निर्णय घेताना, निदान दोन तरी पर्याय उपलब्ध असतात. प्रत्येक पर्यायाचा परिणाम व त्यामुळे आपल्या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतात, याचा अंदाज घेऊनच योग्य तो पर्याय निवडणे शेवटी शहाणपणाचे ठरते !":💐
💐II (अ)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-143 !":👌
🤣 "समोर खड्डा आहे, हे दिसत असूनही, बाजूला सुरक्षित रस्ता असूनही जर माणूस त्या खड्डयातच जाणून बुजून उडी घेत असेल, तर त्याचा सर्वनाश होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे !
करणार काय?"🤣
II विनाशकाले विपरीत बुद्धी II
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-144 !":👌
💐" 'आता तरी शहाणे व्हा !' असा संदेश देत, 'मतदारराजा'ने सगळ्यांना ज्याची त्याची जागा ज्याला त्याला दाखवून दिली.
निसर्गदत्त न्याय म्हणतात, तो ह्याहून वेगळा काय असतो !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-145 !":👌
💐"काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ
"उद्या" ये😢ऊ नये !":💐
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा