सोमवार, २९ मे, २०२३

"IPL: एका रोमहर्षक जत्रेची अफलातूून अखेर !":

 "IPL: एका रोमहर्षक जत्रेची अफलातूून अखेर !":


IPL रोमहर्षक जत्रा अखेर काल मध्यरात्री संपली आणि एक प्रकारची पोकळी यापुढे काही दिवस निर्माण होणार आहे. पहिले काही आयपीएल सीझनस् वगळता मी त्यानंतर सहसा मुंबई इंडियन सोडून इतर सामने कधीच बघितलेच नव्हते. मात्र या वेळेला ज्या तऱ्हेचे एकापेक्षा एक नाट्यमय सामने झाले, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामना मी निदान अधून मधून तरी पाहत आलो. त्यामुळे गेल्या काही रात्री खरोखर आनंददायी होत राहिल्या.

कालचा सीएसके आणि गुजरात टायटन्स यामधील अंतिम सामना देखील दोलायमान अवस्थेमध्ये पहिल्या दिवशी पावसामुळे ..रद्द करावा लागला  आणि दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा नको तेव्हा पाऊस आल्यामुळे जवळ जवळ मध्यरात्रीपर्यंत हा सामना लांबला. त्यामुळे एक सूचना अशी की, अंतिम सामना, अशा वेळी अगदी
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नव्हे, पण  साडेतीन वाजता ठेवायला काय हरकत आहे? त्यामुळे भरपूर वेळ जरी मधून मधून पाऊस आला, तरी अडचण येणार नाही. उगाचच हट्टाने नियमानुसार रात्री साडेसातला सामना सुरू करायचा अट्टाहास टाळावा असं मला वाटतं.

250 इतके विक्रमी आयपीएल सामने खेळणाऱ्या धोणीचाच संघ विजयी व्हावा, असेच बहुतेक जणांना पहिल्यापासून वाटत असेल. परंतु गुजरात टायटनच्या 214 धावसंख्येमुळे हे अशक्य आहे अशी भीती निर्माण झाली. मात्र कदाचित पाऊस धावून आला आणि संख्या धावसंख्या 200 च्या खाली आली त्याचा फायदा मानसिक दृष्ट्या निश्चितच केला झाला.

गुजरातचा डाव संपल्यानंतर सीएसकेचा डाव सुरू व्हायला खूप वेळ लागला. मध्येच पाऊस सुरू झाला. त्यामुळे मी सामना न बघता झोपून गेलो. परंतु सामन्याचे काय होते हे कुठून डोक्यात कुठेतरी असल्यामुळे त्यानंतर जेव्हा जेव्हा जाग आली, तेव्हा गुगलवर जाऊन काय स्कोअर काय ते बघत राहिलो आणि अशा तऱ्हेने शेवटी सीएसकेने सामना जिंकला हे समजल्यावर झोपी गेलो.

काल सीएसके च्या क्षेत्ररक्षणातील कमकुवतपणामुळे त्याचप्रमाणे गोलंदाजांचाही स्वेेर मारा, तेवढासा प्रभाव नसल्यामुळे कधी नव्हे इतकी फायनल मध्ये गुजरात टायटल ने 214 ही धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्स विरुद्ध जी कामगिरी शुभमनने केली, तिचाच कित्ता सुदैवाने या वेळेला साई सुदर्शनने गिरवल्यामुळे आणि इतरही खेळाडूंनी चांगली साथ दिल्यामुळे गुजरातला 214 ही आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. धोनीला खरोखर मानले पाहिजे कारण त्याने जी चपळाई, शुभमनला यष्टिचीत करताना दाखवली, तशी आजतागायत बहुदा चपळाई कुणीही कधी दाखवली नसेल.

पावसामुळे अंतिम लक्ष कमी करणे याबद्दलही विचार व्हावा. कारण मानसिक दृष्ट्या आपोआपच 200 च्या वरची धावसंख्या पार पडायची नाहीये, तर त्या 171 या धावसंख्येमुळे तेवढे दडपण सीएसके वरचे कमी झालेले असू शकते. त्यामुळे हे खरोखर न्यायाचे आहे कां, याचाही विचार व्हावा. मात्र काही झाले तरी विजयी संघ हा विजयीच होय आणि त्याचे सारे श्रेय कॅप्टन कूल धोणीला जाते, असा कॅप्टन होणे नाही एवढेच खरे !

IPL: एका रोमहर्षक जत्रेची अफलातूून अखेर !":


171 धावांचे लक्ष त्यात सीएसकेच्या
प्रारंभीच्या फलंदाजांची लवकरच एक्झिट, शेवटची ओव्हर 13 रन्स हव्या, त्यातील पहिल्या चार चेंडूंमध्ये केवळ तीन, शेवटच्या दोन बॉल मध्ये दहा पाहिजेेत, अक्षरश: दोलायमान परिस्थिती-उस पार या इस पार अशी! रविंद्र जाडेजा अशा कसोटी पहाणार्‍या क्षणी, चक्क एक चौकार आणि एक षटकार मारून संभाव्य पराभवाचे रूपांतर विजयात केले हे सारे नंतर सकाळी विडीओतूून समजल्यावर मी अक्षरशः थक्क झालो अन् व्यथितही, कारण एका विलक्षण न भूतो न भविष्यती असा प्रसंग बघायला आपण मुकलो याचा खेद वाटला.

मात्र यंंदा IPL मध्ये, भरपूर मोबदला देऊन जे नामवंत खेळाडू घेतले गेले, त्यांच्यापेक्षा त्यामानाने माफक मूल्य असणाऱ्या नवोदित अनेक खेळाडूंनी या वेळेला जो परक्रम गाजवला त्याला तोड नाही. त्यामुळे शेवटी क्रिकेट अन्सरटंटीचा खेळ आहे, आपण जास्त मूल्य मोजले म्हणजे उत्तम कामगिरी मिळेलच असे नाही, हेच यावरून समजायला हवे. कोण केव्हा कशी कामगिरी करेल, काही सांगता येत नाही. एकापेक्षा एक चांगले उमदे तरुण खेळाडू, आयपीएलमुळे गवसले ही एक उत्साहवर्धक बाब आहे.

सामना संपल्यावर सकाळी उठलो आणि मनामध्ये जे जे आले, ते या सामन्यासंबंधी मी येथे लिहिले ही माझी वैयक्तिक मते आहेत चूक भूल द्यावी घ्यावी.

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, २८ मे, २०२३

" आपके साथ, जीवन भकास !":

"सबके साथ, जीवन भकास":

येथे मला, एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधायचे आहे. सध्या कुणा विशीतल्या तरुणाला अचानक हार्ट फेल होऊन म्रुत्यु येतो, तर कुणी खेळाडू असाच मैदानावर खेळता खेळता राम म्हणतो. चाळीशींत कोणे एके काळी लागणारा चष्मा पहिली दुसरीतल्या मुलांना लागतो. पन्नाशी साठीनंतर येणारे उच्च रक्तदाब वा मधुमेहासारखे आजार आता वयाच्या पंचविशी वा तिशीत शिरकाव करताना दिसत आहेत. कँन्सर सारखा भयावह जीवघेणा रोग कुणाला केव्हा जडेल ह्याचाही काही नेम राहिला नाही. विविध प्रकारच्या जीवघेण्या अपघातांमुळे तर माणसे दररोज किड्यामुंगीसारखी मरताना दिसत आहेत. एकी कडे शरीर विज्ञान व मेडीकल संशोधन अचंबित करणारे पराक्रम करत असताना, अनारोग्याची ही वयातीत अनिश्चितता भयावह आहे. जीवनातील स्पर्धा विकोपाला गेली आहे, अपेक्षा उंचावत असताना प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि ताणतणाव असह्य मर्यादा गांठत आहेत. दुसर्या बाजूला सार्वजनिक आरोग्यसेवेलाच अव्यवस्थेमुळे आयसीयुमध्ये घालण्याची वेळ आलेली दिसत आहे. खाजगी आरोग्यसेवा उत्तरोत्तर महागडी व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाली आहे. गरीब श्रीमंतामधली विविध आर्थिक स्तरांवरील दरी भयानक रूंदावत चाललेली आहे, ते वेगळेच!

हे असे कसे कां व कुणामुळे झाले त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. ऐहीक प्रगती व श्रीमंती म्हणजेच जीवनातील यश असे मानण्याच्या नवसंस्क्रुतीने जो तो अक्षरश: सुसाट धावत सुटला आहे. अशा तर्हेच्या जीवन तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊन माणूसामाणसातील आपुलकीचे नाते भंग पावताना दिसत आहे. माणसे एखाद्या रोबोटचा अवतार बनण्याचा व त्यांची बेटे बनण्याचा धोका आ वासून उभा आहे.

"सबका साथ, सबका विकास" ऐवजी

"सबके साथ जीवन भकास" असे म्हणायला लागण्याची वेळ आता खरोखर दूर नाही. जीवनविषयक आणि सार्वजनिक विकासविषयक मूलभूत संकल्पनांचाच गांभीर्याने पुन्हा सर्वांनीच विचार करणे ऐरणीवर येणे गरजेचे आहे.

#####################################

"आत्मवंचना  !":

खाजगी वृत्तवाहिन्यांवर वाढते अपघात आणि गुन्हेगारी स्वरूपाचे घोटाळे याच्याच जास्तीत जास्त बातम्या येत असतात.

त्यातील काल अचानक 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून दाखवलेली बातमी आणि ती दृश्ये खरोखर कुणालाही लाज वाटावी अशीच होती. एक ट्रक नाशिक जवळ रस्त्यावरून जात असताना, त्यातील काही खोके खाली पडले. ते दारूच्या बाटल्या असलेले खोके पाहून माणसांची जी धावपळ त्या बाटल्या गोळा करायला झाली, ते पाहणे हे खरोखर मान खाली घालायला लावणारे होते. एवढेच नव्हे तर त्यात लहान मुलेही बाटल्या उचलायला धावत होती. 

आप्पलपोटेपणा आणि दुुसर्यांंच काही करून फुकटात जे मिळेल ते ओरबाडून, अशा तऱ्हेचे वाढते सायबर फसवणुकीचे गुन्हे तर आपण पाहत आलो आहोतच. परंतु हा प्रकार दारूच्या बाटल्या उचलण्याचा हा खरोखर विदारक होता आणि माणसांची नैतिकता किती ढासळत चालली आहे, त्यातून व्यसनाधीनतेचा जर असा अतिरेक होत असेल तर, उज्वल भविष्याची स्वप्न पाहणे ही खरोखर आत्मवंचनाच ठरणार नाही कां? कारण When character is lost, everything is lost!"


धन्यवाद 

सुधाकर नातू

बुधवार, २४ मे, २०२३

"बिंब प्रतिबिंब !":

 

 👍"बिंब प्रतिबिंब !":👌

1
# "श्री विजय केंद्रे ह्यांचे महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन पुरवणीतील प्रतिपादन:
'छोटी नाट्यगृहे हवीत !'
त्यावरील मतमतांतरे:

# सुनील :
'आजच तुमच्या नाटकाचे तिकीट परवडत नाहीत...छोटी नाट्यगृह झाल्यावर तिकिटाचा दर आणखी वाढेल !'

# सुबोध
'अनेक शाळा काॅलेज मधुन अशी छोटी नाट्यगृहे उभी राहात आहेत. त्यांची संख्या वाढली पाहिजे त्यांना अनुदान मिळते पण त्याची माहिती शाळा महाविद्यालयांना मिळाली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापक आणि प्राचार्य या विषयाची जाण असलेले पाहिजे !'

# संजय :
'आम्ही आधीपासून बोंबलतोय पण मुंबई वाले बोलल्याशिवाय हे लोक खोकलात नाही. महाराष्ट्रात 85 थिएटर ची अवस्था वाईट आहे !'

# विरेंद्र :
'आता बाल्कनी नकोच दोनशे ते अडीचशे  आसन वेवस्था पुरे !'

# डिगी :
'पण मी म्हणतो हल्लीच्या मनोरंजन मैदानातच छोटेछोटे स्टेज असतात. त्यावर सादरीकरण का सुरू करत नाही?...... असे स्टेज, त्याचसाठी असतात.

इमारत छोटी जरी असली तरी त्याला मेन्टेनन्सचा खर्च येतोच. तेव्हा ह्या छोट्या नाट्यगृहांवर कोण खर्च करणार?
आधीच्या मोठ्या नाट्यगृहांनाच कोणी वाली नाही.

ज्यांना जहांगीर मध्ये show करायला मिळत नाही, त्यांच्या साठी art plaza उत्तम पर्याय आहे. तसाच ह्या गार्डन स्टेजचा वापर करता येईल का?'

# निलेश :
'लोकसंख्येच्या तुलनेने नाट्यगृहांची संख्या वाढली पाहीजे व टिकलीही पाहीजे !'
# सतीश व अनंत :
'100 % बरोबर !'

# प्रदीप:
'खरे आहे !'

##########################

2

""वारसा, खालसा!":

नामवंत घराण्याची मूळ व्यक्ती जितकी धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारी असते, तेवढे व तसे कार्यक्षम तिचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.

राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच

कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.

त्यावरील मतमतांतरे:

#विश्वास :

'पहिल्यानं कर्तृत्वान "मिळवलं "असतं, पुढच्याला मिळालेलं असतं, वाढवलं तर ते वाढतं! आणि त्याला तेच "ओझं "वाटलं तर कोसळतं, पण टिकविण्या कडे "प्रवृत्ती "होते !'

# सुधीर :

'निसर्गाचा क्रूर नियम आहे, निसर्ग एकाच घराण्यात पिढ्यानपिढ्या सतत कर्तृत्ववान व्यक्ती जन्माला येऊ देत नाही. लोकमान्य, स्वातंत्र्यवीर यांच्या घरात बघा. 

किंवा अतिशय गरीब, निरक्षर घरात अत्यंत बुद्धिमान, कर्तबगार, शूर व्यक्ती जन्माला येतात !'

# प्रणव :

साहजिक आहे. विशेष कर्तृत्ववान व्यक्ती एकाच घराण्यात सातत्याने निपाजव्यात ही अपेक्षा अवास्तव आहे. पण तरीही पूर्वजांच्या पुण्याईवर उभी राहिलेली त्यांचे वंशज म्हणून आपल्याप्रती लोकांची जी निरपेक्ष सद्भावना आहे, तिचा फायदा घेत सामान्यातील उत्तम आयुष्य जगता यायला हवे. आज पेशव्यांचे वंशज उत्तम वकील म्हणून पुण्यात जगत आहेतच. लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, मात्र अपेक्षा कसलीच नाही. त्यांनीही राजकारणात वैगरे उतरून पेशवा व्हायला जाण्याचे दुःसाहस केले नाही.

मात्र आपल्या पूर्वजांच्या बरोबरीचा मान, मरातब आणि पद मिळवायचा अट्टाहास केला, तर मात्र असलेली अब्रू निघून जाते आणि कीर्ती धुळीस मिळते. आता याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर सध्या किळसवाण्या अवस्थेत राजकीय अस्तित्व टिकवतानाची धडपड करताना दिसताच आहेत !'

# हेमंत :

'सहमत! प्रत्येक जीव आपले आपले कर्माचे गाठोडे घेऊ  जन्माला येतो!'

गुरुवार, १८ मे, २०२३

"मनातले जनात !":

 "मनांतले जनांत":

चिंतनिकाः

# 'ह्या' मनीचे,'त्या' मनी,
जाणे कां, कुणी मनोमनी?
मनांतले गुपित ठेवती मनांत,
कधी, कसे कां, सांगती जनांत??

# नशीबाचे चक्र फिरते असते,
जे आज वर आहेत,
ते उद्या खाली जाणारच!

# "यश व प्रसिद्धी कायम टिकतीलच असे नाही. अंगभूत दोष पहाता, पहाता रंग दाखवतात, ध्यानात येतातच, येतात.
सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो."

# खरोखरच मनापासून कौतूक करावे अशी असामान्य कामगिरी जेव्हां होते, तेव्हांच नांव घ्यावेसे वाटते. तसे नसेल तर नांवं ठेवली जाणे सहाजिकच!

#"जाणून बुजून, अपेक्षित स्वार्थ मनांत ठेवून,
जे अशक्य आहे,
ते शक्य करून दाखविण्याचे स्वप्न म्हणजे म्रुगजळ."

# हलते फिरते,
अन् चालते बोलते रहाणं,
हे अती ज्येष्ठ नागरिकांचं,
खरंखुरं भाग्यच!

# 'आजचा दिवस,
कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें.'

#"परिस्थिति व आपण, एकमेकांवर सतत प्रभाव पाडत असतो.
आपला निर्णय,
क्रुती कुशलताच, आपले भवितव्य ठरवत असते."

# "किती काळ जीवन जगता,
ह्यापेक्षा कसे जगता आणि
त्यामुळे इतरांना
किती, कसा आनंद व समाधान देता, ह्यावरच जीवनाचे खरे मूल्य ठरते."

# दारुण अपयशासारखेच अतोनात यश पचवणे कठीण असते. अहंकार, मग्रुरी आणि गर्व ह्यांचा कैफ डोक्यात भिनून पहाता मिळवलेले सारे गमावते.

# "क्षणा क्षणांतच रंग भरा,
अमर प्रितीचा,
हा मंत्र खरा!"

# "चिरंतन":
क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा!"

# "जबाबदारीचे उत्तरदायित्व
पूर्ण न करता, जनतेच्या सेवकांनी, अवास्तव वेतनवाढीचा हट्ट धरणे,
हा राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय ठरावा."

# "कर्तव्यपूर्तीचे उत्तरदायित्व व गुणवत्तेला स्थान नाही.
म्हणून,
"चालसे कल्चर" पूर्वापार चालू आहे
व पुढेही चालत रहाणार आहे."

# "नितीमत्ता, गुणवत्ता, कर्तव्यपरायणता, निस्वार्थता
आणि सहिष्णूता ह्यांची नितांत गरज, कधी नव्हे ती,
आता भासत आहे."

# प्रत्येकापाशी देण्याजोगे असे काही ना काही असतेच, असते.
जे देण्यामुळे आपल्याला आनंद होतो,
ते नेहमी देत रहावे.

# सातत्याने आपला दिनक्रम,
एकाग्रता ठेवून वेळेवर पाळला, की तो आपल्या नैसर्गिक बाँडी क्लाँकबरोबर जुळतो. आपले आरोग्य त्यामुळे सुधारते.

# सत्य खरोखर काय आहे,
ते ज्याचे त्याला माहीत असते.
मुखवट्यांच्या आड,
ते एकमेकांपासून लपविण्याचा खेळखंडोबा मात्र नेहमीच चालतो!

# जगाला फसवले तरी, कुणी
कधीही
आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.

# आपले समाधान-असमाधान,
हे आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकतो की, परिस्थिती आपल्यावर, ह्यांच्याशी निगडीत असते.
ऊन-पावसाचा
सारा खेळ!

# विश्वास ठेवावा:
प्रकाश देणाऱ्या सूर्यावर, फुले देणार्या वेलींवर, जन्मभर खस्ता खाणाऱ्या
आईवर.......

# विश्वास ठेवावा:
ऋतुचक्र आणणाऱ्या निसर्गावर,
कडक शिस्तीने कार्य करणाऱ्या मुंग्यांवर, अनिवार्य असणार्‍या मृत्यूवर!

# दिवस येतात् अन् जातात.
आयुष्याच्या मण्यांची ही माळ कधी ओघळून जाणार,
हे रहस्य कधीच कुणालाही उलगडतच नाही!
केवढे हे वरदान!!

# सध्याच्या "सार्वजनिक उत्सवां"तील उन्माद व विक्रुतीकरण पाहून, स्वर्गात माननीय "लोकमान्य" विषादाने म्हणतील:
"हेचि फळ काय मम तपाला?"!

# एक खोटं, दहादा खरं म्हणून ठोकणारेच,
डोळ्यांवर झापड बांधून,
स्वत:चेच ढोल, स्वत:च बडव बडव बडवतात!

# "बोलायचं अन् सोईस्कर विसरायचं."
अशांना,
सांगा, काय बरं, म्हणायचं?
"विसरभोळे की, साळसूद??!

# "सोशल मिडीया" वर,
कोणता संदेश कोणत्या समुहात प्रकाशित करायचा,
हे ज्यांना अचूक उमजते, ते विजयी;
हे न कळणारे, लाईकस् ची वाट पहाणारे!

# समाधानाची सप्तपदी:
१. दृष्टी बदला.
२. बुद्धी बरोबर तारतम्य हवे.
३. जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका.
४. हाताने देत रहा.
५. कान उघडे ठेवा.
६. पायाने पुढे चालत रहा.
७. मन काबूत ठेवा.

सुधाकर नातू माहीम मुंबई १६
Mb 9820632655





माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

रविवार, ७ मे, २०२३

छाप(पड)लेले शब्द-24..."

"छाप पडलेले शब्द-24" :

"96 व्या साहित्य संमेलना नंतरचे कवित्व !":

"अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी साहित्य संमेलन आयोजिले जाते. त्याकरता जनतेतर्फे देणगी रूपात निधी उभारण्याचे काम पुरेसे झाले नाही, इतकी वर्ष झाली तरी. परंतु नेहमीच शासनाकडून घसघशीत देणगी मिळावी, ही अपेक्षा मात्र ठेवली जाते. यावर्षी तर महाराष्ट्र शासनाकडून उदार अंतकरणाने घसघशीत दोन कोटी रुपये इतकी अनुदानाची रक्कम या संमेलनासाठी दिली गेली. परंतु त्यानंतर सोहळा तर दिसण्यापुुता पार पडला. मोठाले भव्य सुशोभित मंडपही उभारले गेले. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने नंंतर प्रकाशात आली, ती म्हणजे रसिक वाचकांचा त्या संमेलनाला पुुरेसा प्रतिसाद नव्हता. रिकामे मंडप किंवा रिकाम्या खुर्च्या बघण्याची वेळ आली. शिवाय मोठी देणगी मिळाल्यामुळे खर्चही तसाच आवाक्या बाहेर गेला असे वृत्तांवरून समजते.

पण सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे साहित्याचा जो दोन विभागांमुुळे विस्तार आणि प्रसार होतो, तो लेखक आणि प्रकाशक ह्या जोडगोळी शिवाय साहित्य वाचकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या दोन्हीही आवश्यक अशा समूहांना  योग्य तो मानसन्मान व व्यवस्था मिळायला हवी. लेखकांचा बडेजाव केला जातो, मांडला जातो. परंतु प्रकाशक मात्र दुर्लक्षित राहतात अशी व्यथा या सोबतच्या वृत्तांत समजते.

ही खरोखर अयोग्य व चिंताजनक अशी गोष्ट आहे. अशा महत्त्वपूर्ण सोहळ्यात कुठल्याच प्रकारची अव्यवस्था होता कामा नये, याची दक्षता यापुढे तरी घेतली जावी. आगामी शतक महोत्सवी साहित्य संमेलनात, रसिक वाचक, लेखक आणि प्रकाशक तसेच आयोजक व शासन या सर्वांचा  चांगला खेळीमेळीचा सहयोग अपेक्षित आहे. त्याप्रमाणे संबंधितांकडून आतापासूनच तयारी व्हायला हवी, असे सुचवावेसे वाटते.

धन्यवाद
सुधाकर नातू


############

👍"छाप(पड)लेले शब्द !": 👌
👍"वाचा, फुला आणि फुलवा !":👌

💐 "प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली, पांंढर्याशुभ्र नाजूक  पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण न्हाऊन निघावे, हा एक विलक्षण अनुभव असतो. 

"वाचा फुला आणि फुलवा !" हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे. कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा मागोवा घेत, आपल्या जाणीवांचा परिघ विस्तारला जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो, तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. परंतु सध्याच्या भाऊबंदकी, वादविवाद उखाळ्यापाखाळ्या, टोमणे आणि अर्वाच्य शब्द याचबरोबर विलक्षण धक्का देणारे अपघात, अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या बातम्या अशा सगळ्या नैराश्यजनक बातम्यांनी सारा माहोल झाकोळलेला असताना, "छाप (पड)लेले शब्द" शोधणे हे एक जिकीरीचे काम असते. 

मानवाला अग्नीचा शोध लागण्याआधी एकमेकांची संपर्क साधण्यासाठी शब्द आणि भाषा यांचा शोध लागला ही एक मानव जातीला नव्या वळणावर नेणारी घटना होती शब्दांचे सामर्थ हे शस्त्रापेक्षाही जास्त असते, हे आपण सारे जाणतो. भाषा अनेकविध असल्यामुळे दोन भाषांमधील  प्रत्येक शब्दाचे अर्थ व साधर्म्य जाणणे हे अत्यंंत गरजेचे असते.

या पार्श्वभूमीवर अचानक आज एक मनाला उभारी देणारे व्रुत्त अवचित नजरेत आली. शब्दकोश निर्मितीचा इतिहास वाचकांसमोर थॉमस मोल्सवर्थ ह्यांनी मराठी-इंग्रजी शब्दांचा अपार कष्ट करून एक परिपूर्ण शब्दकोश निर्माण केला, हे ते व्रुत्त. त्याचीच आठवण म्हणून 'शब्दप्रभू मोल्सवर्थ' या पुस्तकाचे प्रकाशन मोल्सवर्थच्या 151व्या स्मृतिदिनी प्रकाशित केले जाणार आहे. 

अशा तऱ्हेच्या शब्दकोशांमुळे दोन मने, दोन भाषिक एकमेकांना जोडणारे अनंत पूल आपोआप निर्माण होतात.  अशा तऱ्हेचे मुुलभूूत काम परिपूर्ण करणे, हे एक खरोखर कठीणातले कठीण काम असते. अशी ध्येेयवादी 'मोल्सवर्थ' सारखी माणसे आगामी पिढीला वर्षानुवर्ष उपयुक्त होईल असे योगदान देत असतात, म्हणून प्रगतीचे नवनावे मार्ग मिळत जातात. खरंच अशी माणसे हा इतिहासातला भावगर्भ ठेवाच म्हणावा लागेल !":💐
##############



####################
👍"छाप पडलेले शब्द-26" :👌
👍" अंधश्रद्धेचे खेळ खंडोबे !":👌
"आज 21 व्या शतकामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञानाने इतकी प्रगती केल्यानंतरही सामान्य माणसांनी, कोणाही भोंदू बाबावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेपोटी त्याच्या आहारी किती जायचं, त्यासाठी तारतम्य सोडायचं आणि त्याचे भयानक दुष्परिणाम या म.टा. अग्रलेखात मांडले आहेत.

कार्य कारण भाव आणि प्रात्यक्षिक प्रयोगांतीच कोणताही निष्कर्ष काढून नंतरच समतोल बुद्धीने यथायोग्य निर्णय घेणे, किती आवश्यक आहे तेच यावरून समजावे. सर्वात महत्त्वाची बाब अधोरेखित होते ती ही की, शासन व्यवस्थेने अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे टाळणे आवश्यक आहे."



👍"छाप(पड)लेले शब्द-3 !": 💐
(25th dec22 )
"बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे रोग होत आहेत. त्यामध्ये डायबिटीस हा प्रामुख्याने आढळून येणारा आहे. अनियंत्रित खाणे पिणे, आणि डायबिटीज अशा विविध कारणांनी माणसाचे मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने काम करेनाहीशी होतात. अशा वेळेला डायलिसिस हाच एक उपाय असतो.हा खर्चिक उपाय करूनही अखेरीस अशी वेळ येते की मूत्रपिंड कामच करत नाहीत अशा वेळेला मूत्रपिंड प्रत्यारोपण अनिवार्य असते. त्यासंबंधी उपयुक्त माहिती देणारा हा वृत्तांत सगळ्यांनी गांभीर्याने घेणे, गरजेचे आहे."
#################

👍"छाप(पड)लेले शब्द-2 !:👌

👍"आठवणी दाटतात !": 💐
(21dec22)

"बोलका चेहरा, डोक्यावर दाट कुरळे केस आणि दमदार आवाज या जोडीला धडाडी, नैसर्गिक सहजसुंदर अभिनय असे अतुलनीय मिश्रण असलेल्या, विनय आपटे यांच्या स्मृतीनिमित्त जो वृत्तांत महाराष्ट्र टाईम्स पुरवणीतआला, तो येथे द्यावासा वाटला.

विनय आपटेचे वडील आणि माझे वडील दोघेही रुईया कॉलेजमध्ये होते. माझे वडील अकाउंटंट तर विनय आपटेचे वडील पी टी फिजिकल ट्रेनिंग शिकवायचे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा कौटुंबिक परिचय होत गेला. ते कधी कधी आमच्या सायनच्या घरी देखील यायचे. त्यानंतर योगायोगाने विनय आणि माझी गाठ मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर, जेव्हा जेव्हा मी काही निमित्ताने किंवा माझा सहभाग असलेले काही कार्यक्रम रेकॉर्डिंग करायला जात असे, तेव्हा त्याची आणि माझी भेट व्हायची.

आत्मविश्वास असलेला आणि अत्यंत तडफदार
उत्साही असा हा तरुण माझ्या मनावर खूप छाप पाडून गेला. त्यानंतर मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये पब्लिसिटी डिपार्टमेंटमध्ये असताना, देखील काही व्यावसायिक निमित्ताने त्याची माझी थोडीफार भेेटगाठ होत गेली. त्याच्या दादरच्या डि एल वैद्य रोडवरील जाहिरात संस्थेमध्ये मी एकदा गेलोही होतो आणि तिथे तो त्यांच्या सहकार्यांबरोबर तो ज्या उत्साहाने काम करायचा तेही माझ्या चांगले लक्षात आहे.

पुुढे खूूप उशिराने झालेेली, त्याची माझी भेट ही कदाचित शेवटचीच ठरली, असे नंतर लक्षात आले. माझ्या मुलाकडे मी लंडनला 2011 मध्ये गेलो असताना, तिथे विख्यात अभिनेते निर्माते श्री महेश मांजरेकर यांनी आयोजित केलेला भव्य दिव्य कार्यक्रम Mifta मी पाहायला गेलो होतो, त्या वेळेला जी मांदियाळी कलाकारांची आली, त्यामध्ये विनयची माझी भेट झाली.

असा हा अत्यंत गुणवंत चतुरस्त्र कलाकार नंतर सात डिसेंबर 2013 रोजी निधन पावल्यावर खूप दुःख झाले. आता त्यांच्या स्मृतीनिमित्त जो कार्यक्रम त्यांच्या पत्नी सौ आपटे यांनी आयोजित केला, त्याच्या ह्या वृत्ताने, मला या सगळ्या आठवणी उलगडायला प्रवृत्त केले."
Open Roj kay ka gappa maar do Chintan
🙏🏼 🙏🏼🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼

############
👍"छाप(पड)लेले शब्द-18 !":💐
"बदलत्या काळाचा महिमा !":
कोणे एकेकाळी, 'ब्रेन ड्रेन' सुरू झाले आणि आपल्या सुशिक्षित आणि तंत्रज्ञानात पारंगत, मनुष्यबळ परदेशात गेली स्थायिक होण्याचा ओघ सुरु झाला. त्याचे जे काय परिणाम होत राहिले आहेत त्यावर भरपूर उहापोह झालेला आहे.
पण आता जागतिक परिस्थिती बदलत चालल्यामुळे जर हे चक्र उलटे होत असेल आणि आपल्या मनुष्यबळाला इथे चांगल्या संधी मिळू लागतील तर ते नक्कीच स्वागतार्ह आणि आवश्यक आहे. फक्त इच्छा एवढीच की हा उलटा ओघ तात्पुरता ठरु नये.
##########
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"वाचावे, ते ते नवलच !":💐

👍"कधी कधी वर्तमान पत्रामधले, एखादे वृत्त आपले लक्ष त्याच्या शीर्षकामुळे वेधून घेते. 'सनातन' ध्यासाचा सन्मान" या शीर्षकानेही माझे लक्ष ते वृत्त वाचण्यासाठी उद्युक्त झाले आणि काय आश्चर्य ! एकाहून एक नवल वाटाव्यात, अशा कितीतरी गोष्टी त्यामधून गवसल्या. गोरखपूरची 'गीता प्रेस' या संस्थेला, 2021 चा "गांधी शांतता पुरस्कार" जाहीर झाला आहे. 

आज पर्यंत ह्या प्रेसने 93 कोटी होऊन अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत ! पंधरा भाषांमधील 1800 प्रकारची पुस्तके हे वाचून मी थक्क झालो !!  त्या पुढचा या पुरस्काराचा आकडा वाचून मी तर हवेतच उडालो एक कोटी रुपये आणि इतर बऱ्याच काही गोष्टी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे !!! 

खरंच एखादी संस्था  निरलसपणे, इतके
उपयोगी आणि अवर्णनीय कार्य करत असेल याची आपल्याला कल्पनाच नसते.":👍
##########


👍"छाप(पड)लेले शब्द-33 !":💐
"आरोग्यम् धनसंपदा !":
👍"वाचनांमधून असे काही गवसते की, जे इतरांना देखील पाठवावेसे वाटते. त्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा देखील विस्तारित व्हाव्यात, म्हणून हे प्रयत्न !
पूर्वी Cataract म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनची चलती होती. उतारवयात बहुतेकांना हे ऑपरेशन करावे लागायचे जणूकाही स्टेटस सिम्बॉल ! आता बैठक जीवनशैलीमुळे व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढणे आणि इतर काही तक्रारीमुळे गुडघेदुखी आणि नी रिप्लेसमेंट, ही खूप जणांची डोकेदुखी झालेली आहे कालाय तस्मै नम:  दुसरे काय म्हणायचे !": 💐

":👌
#############


👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
"लोकमान्य फिल्ममेकर!":
👍" छोट्या पडद्यावरती "लोकमान्य" ही लोकमान्य टिळकांवरची मालिका उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत चालली आहे. याच विषयावरच्या चित्रपटापेक्षा अगदी वेगळा अभिमानास्पद इतिहास त्यामधून उलगडला जात आहे.

अशा महत्त्वाच्या विषयावरती मालिका निर्माण करणारे श्री नितीन वैद्य, हे खरोखरच 'लोकमान्य फिल्म मेकर' आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि समाज प्रबोधनासाठी धडपडणाऱ्या कारकिर्दीचे यथातथ्य चित्र उभे करणारे हे वृत्त निश्चितच प्रेरणादायी ठरावे.":👌
###########

👍"छाप(पड)लेले शब्द-20 !":💐
👍"वाचा, फुला आणि फुलवा !":👌
💐" प्रतिभासंपन्न लेखक आणि रसिक वाचक, ही जोडगोळी माणसांच्या आयुष्यांची गोडी वाढवत असते. लेखन, हा लेखकाने अंतर्मुख होऊन स्वतःचा घेतलेला शोध आणि बोध असतो. तर वाचक तीच प्रक्रिया पुढे नेत, पुस्तकांशी बोलत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माणसांच्या आणि इतर सजीवांच्या हाच तर फरक आहे तो म्हणजे विचारांची शब्दांची नवनिर्मिती करत स्वतः भोवतालचा भवताल अधिक समृद्ध करण्याची त्याची शारदोत्सवी ताकद.

खरं म्हणजे प्रत्येकातच एक लेखक आणि वाचक हा दडलेला असतो, पण त्याला ती जाणीव नसते, जशी कस्तुरीमृगाला जाण नसते, त्याच्या जवळच्या सुगंधाची, तशी !"💐


👍"निखळ वास्तव !": 💐
👍"प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोनच स्थिती नेहमी कार्य करत असतात. पहिली म्हणजे परिस्थिती, त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते
आणि
दुसरी म्हणजे, तो स्वतः परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो.

सातत्याने बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव असल्यामुळे, या दोन गोष्टी चक्रनेमिक्रमाने, सातत्याने प्रत्येकाच्या आयुष्यात येत  असतात. 

#########

👍"छाप(पड)लेले शब्द-20 !":💐
          "ऐकावे ते नवलच !":
रस्तो रस्ते वाहतूक कोंडी ही तर सर्वच महानगरे शहरे आणि आता

कदाचित गावांमध्ये सुद्धा सर्व माणसांना त्रस्त करणारी गोष्ट झाली आहे वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान अशा अनेक गोष्टी त्यामुळे सहन कराव्या लागतात वाहतूक कोंडी नंबर मुंग्यांच्या शिस्तीचा कसा उपयोग करता येईल यासंबंधीचे हे वृत्त म्हणूनच थक्क करणारे आहे.


"छाप(पड)लेले शब्द-39, 38, 37, 28, 29,

 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌

💐"हरवले ते गवसले !":💐

👍" सोबतच्या वृत्तामधील आजोबांचा चष्मा समुद्रात पडून देखील पुन्हा सापडला हे वाचल्यावर, मला तशाच एका प्रसंगाची आठवण झाली. काही कामानिमित्त मी माहीमहून दादरला बसने चाललो होतो. सर्वसाधारणपणे मी बाहेर पडल्यावर टोपी घालतो.त्या बसमध्ये बसल्यावर ती टोपी बहुदा बाजूला मी सीटवर ठेवली होती, पण ते मी विसरून गेलो. बसमधून दादरला उतरून काम करून, पुन्हा काही वेळाने घरी जायच्या वेळेला आपल्या डोक्यावर टोपी नाही हे माझ्या लक्षात आले. खूप हळहळ वाटली आणि मी बससाठी स्टाॅपशी उभा राहिलो,  मेचकी मी दाारला जिने आलो तीही 52 नंबरची बस होती, बहुदा तीच उलटा प्रवास करून योगायोगाने मला मिळाली ! बघतो ते काय एका सीटवर कोपऱ्यात माझी टोपी तशीच पडलेला होती. कोणी ती उचलून नेली नव्हती, हे एक आश्चर्यच ! त्यावेळेला मला जो आनंद झाला, तसाच आनंद बहुदा ह्या चष्मा हरवलेल्या आजोबांना झाला असेल. 

खरंच काय योगायोग असतात कळत नाही. 'हरवलेले अवचित गवसते आणि ते तसे कां होते, हे कुणाला कधीच कळत नाही !:"👌

#######@####

👍"छाप(पड)लेले शब्द-29 !":💐
👍"मराठी भाषा, दिन'( की, दीन?)":👌
"मराठीबद्दल प्रेम केवळ भाषा दिनीच दरवर्षी २७ फेब्रुवारीलाच फक्त कां येते, आणि नंतर त्याचे काय होते, याचा विचार करायलाच हवा.

अशा वेळी मुंबईतील, सेंट झेवियर्स कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाने मराठी भाषा जपण्यासाठी केलेला उपक्रम आणि त्याचे हे वृत्त निश्चितच आशादायी आहे. फक्त इच्छा अशी की अशा तरी चे उपक्रम केवळ कॉलेजातील वांग्मय मंडळांपुरतेच मर्यादित न राहता, सर्वच समाज घटकांनी त्यासाठी हातभार आणि कृती करायला हवी.

👍"छाप(पड)लेले शब्द-34 !":💐
👍 "देणाऱ्याचे हात हजार !:👌
💐"अचानक अवचितपणे आपल्याला असे प्रेरणादायी वृत्त वाचायला मिळते की, आपण अक्षरशः अचंबित होतो. ही बातमी देखील तशीच आहे. एका माजी विद्यार्थ्याने, त्याने ज्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन पुढे प्रगतीचे कळस गाठले, त्या महाविद्यालयाची आठवण ठेवून त्या संस्थेला थोडी थोडकी नव्हे, तर चक्क सव्वा आठ कोटी रुपयांची देणगी दिली !
खरंच, देणाऱ्याचे हात हजार !"👌👌👌

👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
👍 " तुझ्या विना, जीव झाला वेडा पिसा !:👌
"स्मार्टफोन आणि टीव्ही हा अविभाज्य भाग बहुतेकांच्या विशेषत: जेष्ठ नागरिकांच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. सोबतच्या वृत्ताप्रमाणे केबल टीव्हीवर अवलंबून असणाऱ्या दर्शकांसाठी, केबलवाल्यांचा संपाचा काळ हा म्हणजे, 'तुझ्या विना जीव झाला वेडा पिसा ! असेच वाटणारा होता. हे म्हणजे 'कथा कुणाची व्यथा कुणा !' असेच झाले.

या साऱ्या टीव्हीच्या व्यवहारात जो पोशिंदा ग्राहक तोच भरडला जातो, हे केवढे दुर्दैव तीच गोष्ट, संबंधितांच्या संपामुळे, बहुतेक अत्यावश्यक सार्वजनिक सेवेवर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांवर येत असते. पण लक्षात कोण घेतो !

शिक्षक व शिक्षकेतर मंडळींच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळे, बारावी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे हाही तसाच प्रकार. स्वतः पलीकडे, व्यापक सामाजिक दृष्टिकोन व जबाबदारी विसरण्याचा ही प्रर्वुत्ती अत्यंत घातक आहे.

👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐
👍 " अजून यौवनात मी !":👌
💐"हल्ली पुुष्कळांना आपण तरुण दिसावे असे वाटत असते. वय वाढले तरी ते दिसू नये, यासाठी काही ना काही प्रयत्न अशी मंडळी करत असतात. सौंदर्यप्रसाधनांची विक्री प्रचंड प्रमाणात त्यामुळेच वाढत आहे, स्त्रियांप्रमाणेच पुरुषही या तऱ्हेच्या  खरेदीत मागे नसतात.

अर्थात शरीर तरुण असले, तरी मन तरुण असेलच असे नाही. कारण हल्ली ताण-तणावामुळे मानसिक आरोग्य खूप ढासळत चालले आहे-विशेषत: तरुण वर्गाचे. त्याउलट केस पांढरे झाले, तरी मनाने तरुण असणारे पुष्कळ वरिष्ठ नागरिक आपल्याला दिसतात. तसेेच स्त्रियाच फक्त वय चोरतात असे नाही, तर पुरुषांना देखील हल्ली आपण रुबाबदार तरुण दिसायचा प्रयत्न करत असतात.

हा पार्श्वभूमीवर विज्ञान आणि संशोधन आता खूपच पुढे गेले आहे आणि वय रोखण्याची गुरुकिल्ली शोधण्याचा संशोधक कसा आटापिटा करत आहेत, ते ह्या व्रुत्तावरुन समजेल. तरुण दिसण्याची गुरुकिल्ली मनाच्या समाधानात आहे हेच खरे. शेवटी,
"अजून यौवनात मी !", हे म्हणण्यासाठी मन देखील नेहमी प्रसन्न आणि सकारात्मक विचार करणारे हवे !"
👍"छाप(पड)लेले शब्द-39 !":💐
👍 "बोल हे अमोल !":👌
💐"कोणतीही गोष्ट आत्मसात करायची तयारी हवी. त्यासाठी मडके होण्यापेक्षा मातीचा गोळा होणे, हे जास्त श्रेयस्कर !" असे बोल अमोल विख्यात लेखक श्री अरुण खोपकर यांनी मांडले. त्याचा हा व्रुत्तांत....":💐

👍"छाप(पड)लेले शब्द-39 !":💐
👍 "स्नेहवन'- असामान्य प्रेरक प्रवास !":👌
👍"इथून तिथून सातत्याने नकारात्मक अशा घटना आणि बातम्या आपल्यासमोर येत असताना, अचानक या वृत्तातील स्नेहवन आणि ती स्थापन करणाऱ्या देशमाने दाम्पत्याची कहाणी वाचून आपले मन कौतुकाने भरून जाते.

आयटी कंपनीतील नोकरी सोडून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, आपल्या पत्नीच्या सहकार्याने शेतकरी मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीचे आणि विकासाचे व्रत अंगावर घेऊन ते यशस्वी पद्धतीने पार पााणारे हे दाम्पत्य खरोखर सर्वांनी आदर्श ठेवावा असेच आहे.
अशी माणसे सेवाभावी, त्यागी माणसे जोपर्यंत समाजात आहेत, तोपर्यंत आपल्याला आपल्या आशेला वाव आहे.":💐

👍"छाप(पड)लेले शब्द-40 !":💐
👍" आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!":👌

"सध्या, हवेतील वाढते जीवघेेणे प्रदूषण ही एक मोठी समस्याच होऊन गेली आहे. विशेषत: मुंबईसारखे महानगर तर, भारतात दिल्ली पाठोपाठ किंवा दिल्लीपेक्षाही जास्त प्रदूषित अशी बिरुदावली मिळवत आहे, ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. उंच उंच इमारती आणि वाढते, नको इतके बांधकाम शिवाय हजारो वाहनांची दाटीवाटी आणि माणसांची अतोनात गर्दी यामुळे पूर्वी कधीही नाही इतकी, मुंबई आता बकाल आणि प्रदूषित झाली आहे. अनारोग्याला निमंत्रण देणाऱ्या भौतिक विकासाचा वेगळ्याने विचार करावा लागेल अशी वेळ, या वृत्तातील धडकी भरवणार्या धोक्याने आणली आहे. ओझोन चे प्रदूषण हा एक नवा प्रकार, हृदयविकाराच्या धोका वाढवणारा आहे असे हे वृत्त आहे. म्हणून म्हणायचे 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास" !:

👍"छाप(पड)लेले शब्द-37 !":💐
👍"सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व!":👌
👍"एकोणिसाव्या शतकापूर्वीच्या काही शतकांमध्ये, महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव अशी संतांची मांदियाळी होऊन गेली. तिने "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !" अशी निरपेक्ष स्थितप्रज्ञ वृत्ती दिली, तशीच अध्यात्म व मोक्ष प्राप्तीसाठी करावयाची साधना देखील.

तर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक थोर समाजसुधारक, राजकारणी आणि प्रतिभासंपन्न विचारवंत यांची मालिकाच येथे अवतरली. त्यांच्या असामान्य योगदानामुुळे, नव्या युगाची, स्वातंत्र्याची पहाट आपण पाहू शकलो. त्या साऱ्या थोरांंच्या मालिकेमध्ये अग्रणी शोभावेत असे, सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले कृतिशील नेतृत्व, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दिले. त्यांच्या वैविध्यपूर्ण कहाणी, सोबतच्या वृत्तात आहे.

अशी गुुणवंंत माणसे येथे होऊन गेली, म्हणून, आज आपण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे.":💐

👍"छाप(पड)लेले शब्द-38 !":💐
💐" आठवणीतली साठवण !":👌
👍"माझे आजोळ आंजर्ले अन् तेच माझे प्रिय जन्मगांव ! त्याच्या मनोहारी आठवणी जागी करणारी माहिती, या वृत्तांत आल्यामुळे, माझ्या बालपणच्या नयनरम्य घटनांची उजळणी झाली....
रमणीय असे निसर्ग सौंदर्य असलेल्या आंजर्ले गावाबद्दल, मी बालपणी एक कविताही केली होती:

'खेडेगावची निसर्ग शोभा असे,
फारच सुंदर,
कड्यावरचा गणपती आणि 
समुद्रावरचे बंदर ...'

त्याकाळी, आमच्या घरातून सायन ते आंजर्ल्याला जायचं, म्हणजे एक मोठी त्रिस्थळी यात्राच असे. प्रथम चालत स्टेशन, तिथून आगगाडीने मशिदबंदर स्टेशनला उतरायचं. त्यानंतर टांग्यात बसून भाऊच्या धक्क्यावर जायचं. तेथे समुद्रात उभ्या असलेल्या सेंट अंथुनी, रोहिदास वा चंपावती अशा भल्या मोठ्या बोटींमध्ये चढायचं आणि डेकवरून प्रवास करत, समुद्रावरची सुसाट हवा खात, जंजिरा, श्रीवर्धन बंदर घेत, हर्णे बंदराला समुद्रात बोट उभी राहायची. मग पडावात आम्हा बाळगोपाळांना अक्षरश: फेकलं जायचं. तिथून किनाऱ्यावरच्या बसमध्ये बसायचं, धूळ उडवणारं मार्गक्रमण करत आंजर्ल्याला बंदराच्या पलीकडे उतरायचं. पुन्हा 'तरी'वरच्या होडीतून आंजर्ले किनाऱ्यावर उतरायचं व घरी काळोख होईल त्या सुमाराला पाखाडीमधल्या घरी चालत वा बैलगाडीतून जायचं. हा एक विलक्षण अनुभव होता. तेव्हा वीज नव्हती, कंदिलाच्या प्रकाशात, आजी आमची वाट पाहत असायची.

तिथल्या वास्तव्यात, नारळाचे खोबरे व मधुर पाण्यावर ताव मारायचा,
हापूसचे आंबे, फणस मनसोक्त खायचे, सकाळी, विहिरीवर आमचा गडी काशा, आपली बैलजोडी घेऊन वाडीचे शिपणे काढायला आला की, रहाटांच्या धो धो पाण्यात डुंंबत आंघोळी करणे किंवा सायंंकाळी डोंगरकड्यावरच्या श्री गणपतीमंंदिराला जाणे, समुद्रावरच्या बंदरावर जाऊन हॉटेलमधली गरमागरम भजी खाणे, असे अनेक उद्योग आमचे असायचे.

उभाघरच्या दुर्गादेवीच्या यात्रेमध्ये मी बालपणी लोकमान्य टिळकांची 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' ही गोष्ट मोठ्या धीटाईने सर्वांसमोर सांगितली होती आणि त्यामुळे आनंदाने आजोबांनी मला खांद्यावर घेऊन घरापर्यंत मिरवत आणले होते ! ही न विसरणारी गोष्ट पुन्हा जागी झाली.

तो काळच अक्षरशः हृदयंगम आणि
मनभावन होता. त्याच गावचे हे वृत्त वाचून, तुम्हालाही आंजर्ले गावची यात्रा करावीशी वाटेल !"...💐💐💐


👍"छाप(पड)लेले शब्द-36 !":💐
👍"उचलली जीभ, लावली टाळ्याला !":👌
👍"सध्या वादविवाद, आरोप-प्रत्यारोप आणि काहीही करून नवे नवे असे उपद्व्याप करत, भांडणे वाढत चालली आहेत. कोणत्याही समंजस माणसाला उद्विक न करावे असेच वातावरण आहे. 'आपणच बरोबर, दुसरा मात्र चुकीचा' हे ठरवण्याची अहमहमिका सुरू आहे. समंजसपणा, शहाणपणा खुंटीला टांगून वैमनस्याच्या अशा तमाशांमुळे, "उचलली जीभ, लावली टाळ्याला !" या म्हणीचा प्रत्यय सतत येत आहे.

सोबतच्या वृत्तांत याच नाण्याच्या एका आगळावेगळ्या बाजूकडे लक्ष वेधले आहे. दोन स्त्रियांचे रस्त्यामध्ये भांडण सुरू झाले की, शब्दांमधून निर्माण होणाऱ्या दंगलीचा तमाशा बघायला कशी गर्दी होते, ते मांडले आहे.
"नको रे मना क्रोध हा अंगीकारू" हे संत रामदासांचे सांगणे, झिडकारून भांडणाऱ्यांबरोबरच इतरांचाही मनस्ताप वाढवणाऱ्या घटना अधिकाधिक होत आहेत हे दुर्दैव !:👌

👍"31 डिसेंबर 2015 !":👌


👍"छाप पडलेले शब्द-26" :👌
👍" अंधश्रद्धेचे खेळ खंडोबे !":👌
"आज 21 व्या शतकामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञानाने इतकी प्रगती केल्यानंतरही सामान्य माणसांनी, कोणाही भोंदू बाबावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेपोटी त्याच्या आहारी किती जायचं, त्यासाठी तारतम्य सोडायचं आणि त्याचे भयानक दुष्परिणाम या म.टा. अग्रलेखात मांडले आहेत.

कार्

"छाप(पड)लेले शब्द, नव्या रुपात!"

 👍"छाप(पड)लेले शब्द, नव्या रुपात!":

"करा कर्तव्यांकडे दुर्लक्ष, समस्या, लक्ष लक्ष !":👌

# "अवैैध झोपडपट्ट्यांमुळे, खारफुटी धोक्यात..
# रस्ते, फूटपाथ, कुणासाठी? पादचाऱ्यांसाठी की, फेरीवाल्यांसाठी?"👌
👍"शासकीय यंत्रणा, राजकारणी आणि जागरूक नागरिक यांनी आपापली विहित कर्तव्ये न केल्यामुळे, निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुयोग्य आर्थिक नियोजनाची हेळसांड, तसेच सरसकट नागरिक शास्त्रातले नियम वाऱ्यावर सोडणे, राजकारण्यांनी मतपेट्यांसाठी अवैैध गोष्टींंना प्रोत्साहन देणे, अशा विविध गोष्टी प्रामुख्याने असे प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. आपापली कर्तव्ये जर निमूटपणे चोख, सगळ्यांनीच जर केली, तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत !":👌


मोटो' या स्टार्टअपने बनवली आहे. त्यांना यंदा स्टार्टअप मधील दळणवळण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला आहे, त्याचे हे वृत्त आहे. बेरोजगारीच्या गहन समस्येवर स्वतंत्र उद्योग करणे हेच उत्तम उत्तर आहे. त्याचे महत्त्व जसजसे तरुणांना कळत जाईल, तसतशौ आर्थिक आघाडीवर आपल्याला वेगाने प्रगती करता येईल हेच खरे!:👌
-------------------------------------

👍"छाप(पड)लेले शब्द, नव्या रुपात-2 !":👌

"इतिहासाच्या पाऊलखुणा !":


👍"नळदुर्ग !":👍
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण. लोकसंख्या ७,३६७ (१९७१). क्षेत्रफळ ३४·७० चौ. किमी., स. स. पासून उंची ६७०·५६ मी. असून येथील हवामान आरोग्यवर्धक आहे.

हे तुळजापूरच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. येथील बोरी नदीकाठावरील चौदाव्या शतकातील नळदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्यावरूनच या ठिकाणास नळदुर्ग नाव पडले असे म्हणतात.

१८५३ पर्यंत नळदुर्ग जिल्ह्याचे आणि १९०५ पर्यंत तालुक्याचे हे मुख्य ठिकाण होते. नळदुर्ग दख्खन पठारावरील तटबंदी केलेल्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. यावर चालुक्य, बहमनी व आदिलशाही इत्यादींची सत्तांतरे झाली.

दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे १९४६ पासून नगरपालिका आहे. कर्नल मेडोज टेलरच्या कारकीर्दीत (१८५३-५७) याची फार भरभराट झाली. त्याने येथील बाजारपेठ सुधारून व्यापारास चालना दिली आणि या किल्ल्याचा मनोवेधक वृत्तांतही लिहिला.

नळदुर्गच्या आसमंतात ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. येथे दवाखाना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. राम, महादेव व हनुमान यांची मंदिरे येथे आहेत. वनवासकाळात रामाचा येथे काही दिवस मुक्काम होता, असे म्हटले जाते. येथे रामनवमीचा उत्सव होतो व पौष पौर्णिमेस खंडोबाची यात्रा भरते.
लेखक - य. रा. कांबळे

बदामी आणि हंपी ही २ अद्भुत स्थळांची नावे आहेत. भारताची स्थापत्य कला किती विकसित होती ह्याची ती "मूर्ति"मंत उदाहरणे आहेत.
बदामी येथे काही गुफा आणि कआळभैरवाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. ह्या देवळाचा दगड हा बदामी रंगाचा अतिशय सुरेख दगड आहे. ह्या परिसरात बदामी रंगाचे दगड आढळतात. अतिशय काटेकोर प्रमाणबद्धता आणि दगडांचा सुंदर रंग आणि आजूबाजूचा परिसर ह्यामुळे हे मंदिर अलौकिक वाटते.

हंपी ला पोचल्याबरोबर आपण कुठेतरी वेगळ्या गूढ जगात प्रवेश केला आहे असे लगेच जाणवायला लागते. तेथील दगड हे वेगळ्याच आकाराचे आणि कोणीतरी मुद्दाम त्याची रचना करून ठेवली आहे असे वाटत राहते. तेथील विरूपाक्ष मंदिर आणि दगडी रथ तर अलौकिकच.  तेथील पट्टदकल येथील मंदिरे सौंदर्याची आणि स्थापत्यकला यांची उधळणच आहे. I would say if Hampi is maintained like Rome then it will beat Rome hands down with its Marvel and structures. आजतरी तिथे जाण्याचे रस्ते आणि सुविधा यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पण कदाचित त्याचमुळे ही स्थळे जीर्णावस्थेत का होईना आपल्या रम्य भूतकाळाची साक्ष म्हणून उभी आहेत. आपल्याकडे गर्दीच्या ठिकाणी किती encroachment होते हे सर्वांना माहीत आहेच. परंतु भारतातील एक अतिशय सुरेख किंबहुना जगातील अनेक स्थळांपेक्षा काकणभर श्रेष्ठ असा आपला वारसा विस्मरणात जाणार नाही ना अशीही भीती वाटते.

धन्यवाद 
सुधाकर नातू

शुक्रवार, ५ मे, २०२३

☺️ "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-'टेलीरंजन !":😊💐 👍" दृष्टी, बनवते सृष्टी !":👌 ☺️"झी मराठीवरील 'तू चाल पुढे': या सध्या विलक्षण लोकप्रिय होत असलेल्या मालिकेची नायिका अश्विनी, तिच्या स्वतंत्र बांधकाम व्यवसाय करणाऱ्या नवऱा, श्रेयसचा मोठा साहेब चक्क त्यांच्या घरी भोजन करायला येणार असताना अचानक वीज गेल्यामुळे घरात अंधकार होऊन निर्माण झालेला संकटसमय आणि साऱ्यांनाच काय करावे ते सुचत नसताना, ती जे प्रसंगावधान राखते आणि घरामध्ये जणू दिव्यांची दिवाळी निर्माण करून भारतीय पारंपारिक पंक्तीचे भोजन या साहेबांना सादर करते. त्या प्रसंगातून शिकण्यासारखे आहे की आव्हाने संकटे किती आली तरी त्यातून संधी शोधायचे असते आणि आपल्या समस्येचे चांगल्या फळात सोने करायचे असते अशाच स्तरीची शिकवण देणारा हा व्हिडिओ आवर्जून पहा..... ---------------------- 😆 "छोट्या पडद्यावरील धडे-1 !":😆 "सन मराठी" वाहिनीवरील "कन्यादान" मालिकेतला, ऋषी त्याला फसवणाऱ्या पत्नीला-वेधाला माफ करतो आणि तेव्हा तो राणाशी बोलताना जे म्हणतो, ते सर्वांनीच धडा घेण्यासारखे आहे. तो म्हणतो: "मी काही मोठं काम केलं नाही, मला नेहमी दुसऱ्याच्या जागी उभं करून त्याच्या बाजूने विचार करता येतो, एवढंच !" खरंच किती महत्त्वपूर्ण असा हा दृष्टिकोन आहे. वादविवाद, भांडणतंटे वा रुसवे फुगवे अशा तऱ्हेची फसवणूक जेव्हा होते, तेव्हा हा असा ऋषीसारखा गुण सर्वांनीच अंगीकारला तर किती चांगलं होईल ! ---------------------- "टेलीरंजन-"रसभंग !": "मराठी मालिकांमध्ये, पात्रांमधील संवादांपेक्षा, पदोपदी येणारे उच्चारवांतील पार्श्वसंगीत रसभंग करते. हा अनावश्यक वाद्यमेळा टाळणे योग्य ठरेल. तसेच पात्रांचे संवाद योग्य तऱ्हेने ऐकायला मिळत नाहीत विशेषतः ज्येष्ठ नागरिक कांची तर जास्तच अडचण होते. म्हणून ते संवाद टायटलच्या रूपाने सोबत पडद्यावर दाखवले जावेत. माझ्या निरीक्षणाप्रमाणे, एखाद दुसऱ्या मालिकेत अशा तऱ्हेने संवाद शब्दरूपात दाखवले जातात. त्यामुळे रसभंग होणे टळते. विविध वाहिन्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा." ---------------------- 👍"टेलीरंजन: काही ही हं !":👌 # "सन' टीव्ही मराठीवरील 'सुंदरी' मालिकेची नायिका 'सुंदरी' आपल्या नवऱ्याला- आदित्यला, स्वतःच्या सवतीपासून-अनुपासून कां वाचवते, सातत्याने ते कळतच नाही. # " तुझ्या नवऱ्याने पहिल्या रात्रीच तू मला बायको म्हणून नको असे झिडकारले आहे, त्याला घटस्फोट देण्याचा विचार केल्यावरही मंगळसूत्र 'सुंदरी' का काढत नाही हेही पटतच नाही! # 'आपला नवरा आदित्य आपल्यापासून सातत्याने काय लपवतोय हे कधीही न लक्षात येणारी त्याची बायको अनु इतकी बावळट आणि भोळी कशी ?' # "सर्वात कळस म्हणजे इतक्या उचापती करून सुद्धा, 'सुदरी' IAS च्या प्रिलीमनरी (?) परीक्षेत राज्यात पहिली येते हे नवलच !" ही सारी मालिका लेेखकाची कृपा !!! # "अक्षरश: कशीही भरकटत चाललेली 'स्वाभिमान' ही अर्थहीन मालिका संपणार कधी? पुरा नाही कां झाला, हा पोरखेळ?" # "कोणताही, कसाही 'माल इका' = मालिका भरकटत चाललेल्या!" # "अरे, आवरा रे ह्यांना!": "सध्या आधीच भरकटलेल्या मालिकांमध्ये "टाईम पास" चा प्रयोग चालू असलेला दिसतो." ---------------------- 👍"रंगांची दुनिया !": 👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 "वाहता वाहे, 'मालिका'माई"!: "विसंगत वागणे": मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेकवेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते भविष्यात महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते. "एंट्री नवीन पात्राची": दुसरे निरीक्षण असे की, ज्या वेळेला एखादी मालिका आता पुढे काय करायचं काय दाखवायचं, हे न समजण्याइतकी रटाळ होते, तेव्हा एखाद्या नवीनच पात्र त्यात प्रवेश करते आणि कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अंत पाहिला जातो. ---------------------- # ☺️"रंगाचा बेरंग !":😊 ☺️"हे एक नवलच !":😊 "बहुतेक वाहिन्यांवरील अनेक मालिका बंद व्हाव्या असे वाटत असूनही पुढे ढकलल्या जात असताना, "सोनी" मराठीवरील "बॉस माझी लाडाची" ही मालिका कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करून काय साधले?" ---------------------- ☺️"क्या, अब जमाना बदल रहा है?!:👌😢 मालिकांमधल्या नायकांच्या दोन दोन बायका?: पूर्वी..... 'मानबा': गुरुनाथ-राधिका-शनाया, 'घांवसू': अक्षय-अम्रुता-टियरा, 'राप्रेरंर': प्रेम-राधा-दीपिका, 'नसाघ': प्रताप-नेहा-माया,

 👍👍💐💐👍👍💐💐

👍"रंगांची दुनिया !": 👌
👍"आनंद घ्या, आनंद द्या !":👌

☺️ "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-'टेलीरंजन !":😊💐

👍" दृष्टी, बनवते सृष्टी !":👌
☺️"झी मराठीवरील 'तू चाल पुढे': या सध्या विलक्षण लोकप्रिय होत असलेल्या मालिकेची नायिका अश्विनी, तिच्या स्वतंत्र बांधकाम व्यवसाय करणाऱ्या नवऱा, श्रेयसचा मोठा साहेब चक्क त्यांच्या घरी भोजन करायला येणार असताना अचानक वीज गेल्यामुळे घरात अंधकार होऊन निर्माण झालेला संकटसमय आणि साऱ्यांनाच काय करावे ते सुचत नसताना, ती जे प्रसंगावधान राखते आणि घरामध्ये जणू दिव्यांची दिवाळी निर्माण करून भारतीय पारंपारिक पंक्तीचे भोजन या साहेबांना सादर करते.

त्या प्रसंगातून शिकण्यासारखे आहे की आव्हाने संकटे किती आली तरी त्यातून संधी शोधायचे असते आणि आपल्या समस्येचे चांगल्या फळात सोने करायचे असते अशाच स्तरीची शिकवण देणारा हा व्हिडिओ आवर्जून पहा.....
----------------------
😆 "छोट्या पडद्यावरील धडे-1 !":😆
"सन मराठी" वाहिनीवरील "कन्यादान" मालिकेतला, ऋषी त्याला फसवणाऱ्या पत्नीला-वेधाला माफ करतो आणि तेव्हा तो राणाशी बोलताना जे म्हणतो, ते सर्वांनीच धडा घेण्यासारखे आहे.
तो म्हणतो:

"मी काही मोठं काम केलं नाही, मला नेहमी दुसऱ्याच्या जागी उभं करून त्याच्या बाजूने विचार करता येतो, एवढंच !"

खरंच किती महत्त्वपूर्ण असा हा दृष्टिकोन आहे. वादविवाद, भांडणतंटे वा रुसवे फुगवे अशा तऱ्हेची फसवणूक जेव्हा होते, तेव्हा हा असा ऋषीसारखा गुण सर्वांनीच अंगीकारला तर किती चांगलं होईल !
----------------------
"टेलीरंजन-"रसभंग !":
"मराठी मालिकांमध्ये, पात्रांमधील संवादांपेक्षा, पदोपदी येणारे उच्चारवांतील पार्श्वसंगीत रसभंग करते. हा अनावश्यक वाद्यमेळा टाळणे योग्य ठरेल.

तसेच पात्रांचे संवाद योग्य तऱ्हेने ऐकायला मिळत नाहीत विशेषतः ज्येष्ठ नागरिक कांची तर जास्तच अडचण होते. म्हणून ते संवाद टायटलच्या रूपाने सोबत पडद्यावर दाखवले जावेत.

माझ्या निरीक्षणाप्रमाणे, एखाद दुसऱ्या मालिकेत अशा तऱ्हेने संवाद शब्दरूपात दाखवले जातात. त्यामुळे रसभंग होणे टळते. विविध वाहिन्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा."
----------------------
👍"टेलीरंजन: काही ही हं !":👌
# "सन' टीव्ही मराठीवरील 'सुंदरी' मालिकेची नायिका 'सुंदरी' आपल्या नवऱ्याला- आदित्यला,
स्वतःच्या सवतीपासून-अनुपासून  कां वाचवते, सातत्याने ते कळतच नाही.
# " तुझ्या नवऱ्याने पहिल्या रात्रीच तू मला बायको म्हणून नको असे झिडकारले आहे, त्याला घटस्फोट देण्याचा विचार केल्यावरही मंगळसूत्र 'सुंदरी' का काढत नाही हेही पटतच नाही!
# 'आपला नवरा आदित्य आपल्यापासून सातत्याने काय लपवतोय हे कधीही न लक्षात येणारी त्याची बायको अनु इतकी बावळट आणि भोळी कशी ?'
# "सर्वात कळस म्हणजे इतक्या उचापती करून सुद्धा, 'सुदरी' IAS च्या प्रिलीमनरी (?) परीक्षेत राज्यात पहिली येते हे नवलच !"
ही सारी मालिका लेेखकाची कृपा !!!
# "अक्षरश: कशीही भरकटत चाललेली 'स्वाभिमान' ही अर्थहीन मालिका संपणार कधी?
पुरा नाही कां झाला,
हा पोरखेळ?"
# "कोणताही, कसाही
'माल इका'
=
मालिका भरकटत चाललेल्या!"
# "अरे, आवरा रे ह्यांना!":
"सध्या आधीच भरकटलेल्या मालिकांमध्ये "टाईम पास" चा
प्रयोग चालू असलेला दिसतो."
----------------------
👍"रंगांची दुनिया !": 👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:
"विसंगत वागणे":
मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेकवेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते भविष्यात महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते.

"एंट्री नवीन पात्राची":
दुसरे निरीक्षण असे की, ज्या वेळेला एखादी मालिका आता पुढे काय करायचं काय दाखवायचं, हे न समजण्याइतकी रटाळ होते, तेव्हा एखाद्या नवीनच पात्र त्यात प्रवेश करते आणि कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अंत पाहिला जातो.
----------------------
# ☺️"रंगाचा बेरंग !":😊
☺️"हे एक नवलच !":😊
"बहुतेक वाहिन्यांवरील अनेक मालिका बंद व्हाव्या असे वाटत असूनही पुढे ढकलल्या जात असताना, "सोनी" मराठीवरील "बॉस माझी लाडाची" ही मालिका कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करून काय साधले?"
----------------------
☺️"क्या, अब जमाना बदल रहा है?!:👌😢
मालिकांमधल्या
नायकांच्या दोन दोन बायका?:
पूर्वी.....
'मानबा': गुरुनाथ-राधिका-शनाया,
'घांवसू': अक्षय-अम्रुता-टियरा,
'राप्रेरंर': प्रेम-राधा-दीपिका,
'नसाघ': प्रताप-नेहा-माया,
'लसमं': मल्हार-लक्ष्मी-आर्वी.
आणि
आता,
'रंमावे': डॉ कार्तिक-दीपा-आयेशा?
'आईकुकाक': अनिरुद्ध-अरुंधती-संजना,
'स्वाअ': शंतनु-पल्लवी-निहारिका?
'लबे': राघव-सिंधू-मधु/राणी?
'बाँमाला': मिहीर-राजेश्वरी-माधुरी?
'कदा': समीर-ओवी-xgf?

यह क्या हो रहा है छोटे पर्देपे?!"😢
----------------------
And
Finally,
"कार्यक्रमांच्या पुन:प्रक्षेपणाचा खटाटोप रविवारी न चुकता करण्यापेक्षा, मनोरंजन वाहिन्यांनी पूर्ण दिवस सुट्टी घ्यावी कां?"
☺️Instead of wasting precious Time,
seeing meaninglessly dragged serials on TV,
use it for purposeful constructive work.👌
-------------------------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू