गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 3":

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 3": "बिंब": मूळ संदेश: "आई कुठे काय करते" मालिकेत काही नव्यानं सांगण्यासारखं काहीही घडत नाही व तोच तोपणा आला आहे. ती बंद करणे श्रेयस्कर. "प्रतिबिंब किंवा प्रतिसाद": या संदेशाला उत्स्फूर्त अनेक प्रतिसाद आले त्यातील काही निवडक येथे सादर करीत आहोत: 1 बहुतेक सर्व मालिका अति लांबवून कंटाळवाण्या केल्या आहेत. 2 मालिकानांही आता भागांची मर्यादा घालयला हवी. एखाद प्राधीकरण नेमायला हवे 3 सर्वच्या सर्व मालिका छुपा अजेंडा म्हणून चालवल्या जात आहेत. 4 आम्ही एक सुद्धा मालिका बघत नाही, किती ही महिन्याने बघीतले तरी तिथेच फिरत aste 5 केबल कनेक्शन घेऊ नका बहुसंख्येने जर हे झाले तर होईल,मग जाहिराती कोण बघणार मग बंद होतील आपोआप,पण आधी केलेची पाहिजे 6 मालिका बघतच नाही हो आम्ही 7 केबलचे पैसे भरून आपण हा अन्याय का सहन करायचा? 8 ती मालिका आपल्या घरी कुणी बघत नाही पण चुकून कधी तो चॅनल लावला आणि दर्शन झालेच तरी एपिसोड लगेच कळून येतो कारण कुणी ना कुणी काहीतरी लफडे केलेले असते.. आता फक्त आप्पा आणि आजी यांचे बाहेर काही उद्योग दाखवले की मालिका बंद करतील बहुतेक.. त्या दोघांचे उद्योग pending आहेत आता.. किंवा अरुंधती ने तरी तिसरे लग्न करावे.. असाच कधीतरी चुकून चॅनल लावल्यावर कळेल.. 9 Bhikardi malika 10 पिंडे पिंडे मतीर्भिना:| 11 जवळपास सगळ्या मालिकांचे हेच झाले आहे. म्हणून तर ग्रूप काढलाय! 12 इतके दिवस चालणाऱ्या मालीकाच नकोत 14 Tya malike madhe day 1 pasun kahich sangnya sarkhe navte😂😂 15 प्रायोजकांनी स्पाँसर केलय तितके दिवस ते दाखवतील ते बघावच लागेल.बाकी श्रोत्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही. 16 अजून आजी अप्पा यांचा divorce आणि सुलेखा ताईचं लग्न, नितीन च्या न दाखवलेल्या बायको बरोबर divorce. खूप खूप राहिलंय. 17 करा बंद. आमची काहीही हरकत नाही तुमचा टिव्ही तुमचा रिमोट.... 18 इतकी irrelevant serial चालली आहे. बघूच शकत नाही 19 Tich kai...saglya band kelya tari chalel. Pithachya girni sarkhe Dhalan dalat rahtat. Rojgar Hami yojna.. 20 म्हणजे आपण अजून बघताय? 21 ईशा सुधारली दाखवा आणि मालिका संपवा. एवढी मूर्ख मुलगी कुठे असेल? 22 You have option to stop watching. But if you wish to watch Madhurani then she is not working any other serial 23 😜😜अनेक आहेत अशा serials 24 बघूच नयेत त्यापेक्षा योगासन करा 25 बरोबर आहे. 26 नाव आई कुठे काय करते आणि त्या मध्ये तर सगळं आईच करतेय जे अशक्य आहे ते पण आई करताना दिसते 27 तुमच्या सहनशीलतेला दंडवत. किती अत्याचार सहन करता. आमच्यावर हे अत्याचार होत नाही कारण आमच्याकडे टि.व्ही च नाही..... 28 Don't waste your time in watching Marathi serials. Language, crime, Superstition are presented & we as most wise personal wasting our time as well as peace of mind. Read some books, it will give a stability & many more. ITS MY PERSONAL VIEW, U PEOPLE MAY NOT AGREE 🙏🏽 29 ती व अशा मालिका बघणे बंद करणे जास्त श्रेयस्कर! मनोरंजनाला अनेक पर्याय असतात! 30 त्या मालिकेत अरुंधती, अप्पासाहेब, यशगंधार, अनघा एवढीच पात्र आहेत की ज्यांचा आदर्श घ्यावा. बाकी सगळे अनादर्शक आहेत. त्यातही कांचन, ईशा, अभिषेक हे कधीही न सुधारणारे आहेत. त्यातही अनघा एवढी समजूतदार कोणी सापडणार नाही. आता कांचचा हत्ती स्वभाव ईशाने उचलला असावा. आरोही पण छान भूमिका आहे. यशगंधार सर्वांनाच आवडावा असाच आहे. मालिका संपवा नाहीतर त्यालाही बाधा होईल. 31 तुम्ही बघणे थांबवा, TRP घसरेलंआणि मालिकाआपोआप बंद होईल. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की, हीच मालिका नव्हे तर बहुतेक सर्व टीव्हीवरील मराठी मालिका या कशाही बरकटत चाललेल्या आहेत आणि हा प्रकार खरोखर कधी ना कधी थांबायला हवा. t20 सामन्याप्रमाणे मालिकादेखील 13 26 जास्तीत जास्त 52 इतक्याच भागांच्या असाव्यात. अर्थात हे कोण ऐकणार आणि कसं होणार हा ही प्रश्न आहेच. पण इतक्या भरघोस प्रतिसादाचा अर्थ एवढाच की, सुरुवातीच्या काळात जितके उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मालिका दूरदर्शनच्या पडद्यावर येत होत्या, ते सारे आता पूर्ण बंद झाले आहेत आणि प्रगतीपेक्षा अधोगतीच वेगाने होत आहे. धन्यवाद सुधाकर नातू

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 2":

"बिंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 2": "बिंंब-मूळ संदेश": "MTNL चा बट्टयाबोळ करून टाकला आहे. बहुतेकांनी LL phone परत केले आहेत. दोन महिने माझाही LL फोन डेड होता, मी देखील परत दिला. ऑफिसेस रिकामी जवळ जवळ. आजच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणीत mtnl mb ची Sim cards 2 महिने न मिळाल्याने ग्राहकांचे किती हाल होत आहेत ती बातमी चिंताजनक आहे." नव्या policies कसल्या काढता, हे असे खाजगी सेवा देणार्या कंपन्यांचे भले करणारे उद्योग कशासाठी? "प्रतिबिंब": 1 अनंंत: बंद करायचे आहे. 2 सिद्धेश: MTNL चि सेवा चांगली कधी होती ? त्याला कायमच लोक Mera Telephone Nahi Lagta म्हणत आलेत लोक. 3 श्रीप्रसाद: अजून MTNL जीवंत आहे?? 4 सुधीर: उगीच प्रायव्हेटला दोष देवू नका.गेले काही वर्षे दिल्ली सरकार अखत्यारीतल्या कंपन्या घोडदौड करत आहेत.NTPC,ONGC,PFC,PTC,NHPC,SJVNL,Coal India,BHEL,Mazgaon dock,Cochin shipyard,HAL आणि काही!! 5 विजयदत्त: आम्ही एमटीएनएल चे भावंडं असलेल्या बिएसएनएल चे लॅंड लाईन वापरत होतो. सेवेच्या दर्जाला कंटाळून बंद केला. सरकारी आस्थापन असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांचे लोकांंना सेवा देणे हे आपल्या खासगी कामधंद्यातुन वेळ मिळाला तर करण्याचे काम होते. 6 उदय: माझं ट्रम्प चं म्हणजे mtnl चच कार्ड होत. पण त्याला mtnl च्या ऑफिस मधेच सिग्नल मिळतं नसे. (बोरिवली mtnl office) म्हणून इतर कार्डकडे वळावं लागलं. 7 विजयंता: दिल्ली ला आम्ही त्याला मेरा टेलिफोन नही लगता म्हणायचो.

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

"रंग-बेरंग !":

"रंग-बेरंग !": प्रत्येक कल्पना ही वेगळी असते, नवीन असते तसेच तिचे प्रयोजनही आगळे वेगळे असते. साहजिकच त्या कल्पनेचे मूर्त स्वरूप काय आहे, हे समजण्यासाठी त्याला शीर्षकही चपखल द्यावे अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे आता माझ्या मनात, जे घडतं, जे वाचतो वा पहातो किंवा ऐकतो, आपण जे अनुभवतो त्यामधलं काळं गोरं किंवा खट्टा मीठा काय असू शकेल, याचा उहापोह करणारा ऐवज आपण लेखाच्या स्वरूपात सादर करावा, अशी कल्पना माझ्या मनात आली. बघता बघता पहिलं स्फूट तयार झाल्यावर त्याला नांवही अचूक असं मिळालं 'रंग-बेरंग' ते चपखल कां, ते तुम्हाला पुढील पहिल्या पुढील नोंदीवरून लक्षात येईल: # "अती तिथे माती !" एका नामवंत अभिनेत्याची धावपळ आणि त्यासाठी त्याने केलेले प्रवास व घेतलेले श्रम याचे वृत्त नुकतेच वाचायला मिळाले. सध्या गाजत असलेली एक टीवी मालिकेचे चित्रण, व्यावसायिक नाटकाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रयोग आणि त्या जोडीला नव्या प्रायोगिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असे त्रिस्थळी कलाविष्काराचे क्षण खरोखर त्याचे कौतुक करावे असेच निश्चित होते. पण यश मिळत असतं त्या वेळेला, आपल्याला भान राहत नाही आणि आपण ते यश प्रसिद्धी आणि त्यातून होणारी आर्थिक समृद्धी यामागे धावत सुटतो. अर्थात कोणी किती धावायचे याचा विचार ज्याचा त्याने करावा असेच या वृत्तावरून वाटले. त्याचे कारणही तसेच होते, नुकताच तसा तरुण असलेल्या श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्याचे वृत्त ताजेच होते. त्यामुळे कुठे धावायचे, किती धावायचे याचे भान सर्वांनीच विशेषत: कलावंतांनी ठेवायला हवे असेच मनात आले, अखेरीस 'मॉडरेशन इज द की' हे सर्वांनी लक्षात ठेवले, तर चांगले. कारण नाही तर अति तेथे माती होऊ शकते. शेवटी यश आणि प्रसिद्धी ही कायम टिकत नाही ती क्षणभंगुर असते. म्हणूनच त्याची किती हाव ठेवायची आणि स्वतःला विसरून हे असे आपल्या शरीरारोग्याचे हाल करणाऱ्या किंवा हानी करणाऱ्या गोष्टींमध्ये किती गुंतायचे, हे ज्याने त्याने ठरवणे गरजेचे आहे ! # "कोण बरोबर कोण चूक !": त्याच पुरवणीत दुसरे एक वृत्त वाचले, तेही असेच मन व्यथित करणारे आणि संभ्रमात पाडणारे होते. मुंबईमध्ये आधीच हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विविध प्रकारचे असे त्रास आणि रोग होत आहेत. त्यातून आता कोरोनाचा नव्या वेरियंटचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांचा आणि त्रासाचा आधीच त्यांना मनस्ताप होत आहे. अशा वेळेला वाढत्या कबुतरांच्या संख्येचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. भूतदया प्रेमी मंडळी मुंंबईत विविध ठिकाणी कबूतरखाने आहेत, तिथे कबुतरांना दाणे घालतात आणि त्यामुळे कशा समस्या निर्माण होताा, त्याचे ते वृत्त होते. कबूतर जेव्हा उडतात त्यावेळेला हवेमध्ये त्यांची विश्टा आणि पिसे उडून श्वसन विषयक रोग निर्माण होतात, हा सध्याचा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे दाणे घालणारे, काहीतरी पुण्याचे काम करतोय, म्हणून रंगात येतात, तर दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाल्यामुळे सारा बेरंग होत आहे. बिचारे प्रशासकीय अधिकारी, धावून धावून किती कुठे धावणार असाही तो प्रश्न आहे. शेवटी काय बरोबर, काय चूक याचे तारतम्य ज्याचे त्याने ठेवायला हवे, एवढेच म्हणावयाचे. पण हाही एक रंग बेरंगाचाच नमुना ! # "किती, ही भटकंती, कशासाठी ?": तिसरा मुद्दा जो नजरेसमोर आला, तो म्हणजे मुंबईकरांसारख्या शहरी मंडळींची भटकंती ! कोकणातले सगळे किनारे आणि गाव फुल्ल आहेत आणि मुंबई एक्स्प्रेस रोडवर पाच पाच, सहा किलोमीटरच्या रांगा लागून ट्रॅफिक जॅम आहे. अशा तऱ्हेच्या बातम्या आपल्याला बहुतेक वीकेंडला वाचायला मिळत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर खरंच वाटतं की, एवढा सोस कशाला ? सुखाचा जीव प्रवासामध्ये, जो प्रवास खरं म्हणजे तीन साडेतीन तासात होईल तो सहा आठ तास करत घाावाायचा? हे कशा करतात, त्याच्यापेक्षा एवढा आपण स्वतःचे ब्लॉक घेतले आहेत, ई एम आय भरतोय, तर उठ सूट अशी भटकंती करण्यापेक्षा, वीकेंडला आपल्या सुह्रुुदांबरोबर, निवडक मित्रांबरोबर एकत्र काळ घरातच मजेत घालवायला काय हरकत आहे? म्हणजे एकीकडे पण भटकंतीची रंगत तर हवी, पण त्यामुळे हा जो त्रासाचा मुद्दा आहे आणि उगाचच भटकत राहायचं दर वीकेंडला हे कितपत योग्य आहे ? तीच गोष्ट हॉटेलिंग बद्दल हल्ली झाली आहे. कुठल्याही शहरांमध्ये विशेषत: पुणे मुंबई येथे मंडळी वीकेंडला हॉटेलमध्ये जाऊन हजारो रुपये उडवतात. आता आरोग्याच्या दृष्टीने कुठे स्वयंपाक केला जातोय, कोणत्या अवस्थेत केला जातोय, काय स्वच्छता आहे कोण ते करतोय हे काही बघितलं जात नाही. पण क्षणिक आनंदासाठी आपण पैसे तर उडवतोच पण आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो हे लक्षात कोण घेणार म्हणजे रंगबेरंगचा हा ही एक मुद्दा ! धन्यवाद सुधाकर नातू

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

"बिंब प्रतिबिंब-वैचारिक जुगलबंदी !":

"बिंब प्रतिबिंब-वैचारिक जुगलबंदी !": B: 😃🙋🏼‍♂️ *आज सर्व उपद्रवी, देशविघातक आणि गुंड प्रवृत्तीच्या , साधारण कुवतीच्या तथाकथित लोकप्रतिनिधींना त्यांच्या निंदनीय वागणुकीमुळे निलंबित केले गेल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दर्जेदार कामकाज झाले आणि ते आत्ता पण चालु आहे. सादर केलेल्या सर्व विधायकांवर साधकबाधक चर्चा झाली, ज्या विरोधी सभासदांचे त्यांच्या सभ्य वर्तनामुळे निलंबन झालेले नाही त्यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, आपल्या परीने सरकारला सुचना केल्या, सरकारने त्यांचे विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यावर प्रत्यक्ष भेटुन विचारविनिमय करण्याचे आश्वासन दिले. देश आणि जनहितासाठी संसद कशी चालावी याचा आज प्रत्यय आला. जय भारत.* 👍🏽 A : जे होऊन गेले, जे होत आहे तसे आजतागायत वर्तन झाले नव्हते. साधे निवेदन करण्याचे टाळणे हा पळपुटेपणा होता. B: 👆🏾👆🏾👆🏾👆🏾 *राजीव गांधीच्या काळातली ही घटना आहे. ६३ खासदारांना त्यावेळी अध्यक्षांनी निलंबित केले होते. याहुन महान घटना म्हणजे १९७५ साली इंदिरा गांधींनी संपूर्ण विरोधकांना नुसते संसदेतुनच बाहेर काढले नव्हते तर त्यांना अनेक दिवस तुरुंगात टाकले होते. अपुऱ्या आणि चुकीच्या माहीतीच्या आधारे निष्कर्श काढु नयेत. सत्य कधी लपत नाही.* A : जवळ जवळ तशीच मानसिकता दिसत, तीच पुनरावृत्ती सध्या होत आहे. B: *यात पण परत अज्ञान आणि अपुरी माहीती दिसुन येते आहे. दोन्ही संसदेचे स्वामित्व आणि अधिकार दोन्ही अध्यक्षांचे असतात. म्हणुनच ओम बिडला यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली, निवेदन केले आणि जाच कमिटी स्थापन केली. गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नसतो. एव्हढे होऊन देखील गरज नसताना सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदन केले. या प्रकरणी गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करण्याचे काहीच औचित्य नाही. चौकशी पुरी झाल्यावर संसदेत यावर सविस्तर चर्चा नक्कीच होईल आणि त्यावेळी हे सर्व विरोधक बाहेर पळुन जातील कारण निष्कर्ष चौकानेवाले असतील हे निश्चित, जरा धीर धरा.* B: *शाळेत बिघडलेले विद्यार्थी शिक्षकांपुढे त्यांच्या टेबला भोवती नाचून अर्वाच्च भाषेत घोषणा द्यायला लागले तर ते शिक्षक काय करतील? त्या बिघडलेल्या मुलांना वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे करतील, तेच इथे झाले आणि यापुढेही होईल याची आशा आहे. हे गुंड देशविकासासाठी कुठलेही योगदान देऊ शकत नाहीत, हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.* A : हे प्रतिपादन हास्यास्पद आहे. ज्या मंत्र्यांचा संबंध नाही, त्यांना पुढे करणे हा जबाबदारी टाळण्याचा अट्टाहास. अंगाशी शेकले की लपायचे हा प्रकार, सर्वोच्च दोन नेत्यांकडून नेहमी घडत आला आहे. A : घुसखोरीची घटना कां घडली, त्याची जबाबदारी टाळल्यावर दुसरे काय घडणार? येथे 'शिक्षकांनी संबंधित जबाबदार महाशयांना उत्तर द्यायला भाग पाडणे अपेक्षित होते. B: 🙋🏼‍♂️ गृहमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. उद्या राष्ट्रपतींनी यावर निवेदन द्यावे अशीही मूर्ख मागणी होईल. या गुंडांचे तमाशे देशाने खुप पाहीले आणि सहन केले. यापुढे ते होणार नाही. सरकारचा आक्रमक पवित्रा पाहुन ही मंडळी आता बिथरली आहेत. त्यांनी आज पंतप्रधानांची भेट मागितली. पंतप्रधानांनी सर्व पक्षीय फ्लोअर मॅनेजरांबरोबर संवाद साधला. यातुन काय निष्पन्न होते ते बघायचे. A : केवळ आणि केवळ निरंकुश सत्तेसाठी विधिनिषेधशून्य राजकारण करणाऱ्यांचा निषेध करावा तितका थोडाच. B: शिक्षकांपुढे "जबाबदार महाशय" नव्हते तर बिघडलेले गुंड होते. तरीही सुसंस्कृत शिक्षकाने हात जोडून विनवुन पाहीले व शेवटी बडगा उचलला. खरेतर यांना मार्शलांच्या हस्ते उचलुन बाहेर टाकायला पाहीजे होते. संसदेचे रुल बुक आहे. सर्व त्यानुसारच चालते. थोडक्यात बिघडलेल्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली. जय हो. B: *देशविघातकांच्यावतीने निषेध करत रहावा, नैतिकतेच्या गप्पा मारत राहाव्यात, देशाला त्याकडे बघायला आता वेळ नाही आणि गरज पण नाही. जय हो.* 😂😂😂😂😂😂 B: *काँग्रेसचा सध्याचा महान तरुण नेता गेली काही वर्षे एका विशिष्ट उद्देशाने, आपल्या संरक्षक यंत्रणेला चुकवून, सातत्याने विदेशी जातो. जाॅर्ज सोरोस आणि कंपनी सारख्या भारतविरोधी बदमाषांशी हातमिळवणी करतो आणि हार्वर्ड, केंब्रिज सारख्या विद्यापीठातल्या डाव्या जहाल लोकांच्या मदतीने भारत विरोधी वक्तव्य करतो. यासंबंधीची जबाबदारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण ते संसदेत नसल्याने गृहमंत्री त्यांच्यावतीने निवेदन करु शकतात. अशा देशविघातक अॅक्टीविटींवर निवेदन करण्याची मागणी या गुंड मंडळींनी सरकारकडे कधी केली आहे का? आपली तरी तशी इच्छा आहे का? आपल्याला ते आवश्यक वाटते का? याचे उत्तर कोणीही देणार नाही.* A : नैतिकतेला कस्पटासमान समान मानणारे, देशविघातक कोण हे ठरवणार, ह्यासारखा विनोद नाही. Remember When Character is Lost, everything is LOST B: 😂😂😂😂😂😂 नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी देशविघातकांची बाजु घेऊन कॅरॅक्टर की काय ते सांभाळत रहावे, जागृत झालेल्या देशाला त्याची आता पर्वा नाही, गरज पण नाही. आज संसदेत पास झालेल्या विधेयकांत देशविघातकांची आणि आतंकवाद्यांची पहिल्यांदाच व्याख्या करण्यात आली आहे. आता ही मंडळी कायद्याच्या कचाट्यातुन सुटणार नाहीत. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला असा कायदा करण्याचा सल्ला दिला होता. जय हो. 👍🏽😂 B: *आज देशांत "तेलगु देसम" "बिजु जनता दल " यासारखे भाजप विरोधी पक्ष आहेत. ते संसदेत पण आहेत. त्यांची अनेक मुद्यांवरची मते भाजपपेक्षा वेगळी आहेत. ती ते सर्वत्र खुलेपणाने मांडतात. सरकार त्यांच्या सुचना आवर्जून विचारात घेते. कारण " ते देशाच्या विभाजनाची योजना, इच्छा, कारस्थाने करत नाही ". त्यामुळे त्यांना कोणीही कधीही "देशविघातक " म्हणत नाही. हा फरक आहे. आजच्या संसदेतल्या चर्चेदरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते सविस्तरपणे मांडली. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा सरकारने सहज स्विकारल्या. डाॅ. सन्मित पात्रा या BJD च्या खासदाराने खुप वेगळी भुमिका मांडली. सरकार पक्षाने त्याचे खुल्या मनाने स्वागत केले, कौतुक केले. असे हे गुंड करु शकतात का? त्यांना १० मिनीटे मुद्देसुद भाषण पण करता येत नाही. असो. याचा विचार करुन आपली शक्ती आणि वेळ घालवायची गरज नाही.* 😂😂😂😂😂 A 😇 "आजच्या महाराष्ट्र टाइम्स 'संवाद' पुरवणीमध्ये, सध्या गाजत असलेल्या खासदारांच्या घाऊक निलंबनासंबंधीचे विडंबनात्मक स्फूट वाचण्यासारखे आहे आणि ते डोळ्यात अंजन घालणारे आहे, एकाधिकारशाही फार दूर नाही, हे ध्वनीत करणारे !": 😇 B 🙋🏼‍♂️ *वाह् वाह् मस्तच. निलंबित खासदारांपैकी काही उपद्रवी गुंड तुरुंगाच्या वाटेवर आहेत. मजा पहावी नाहीतर अश्रु ढाळावे. ज्यांना विडंबनात्मक लिहिण्यासाठी आणि ज्यांना ते वाचण्यासाठी फावला वेळ आहे त्यांनी आपले आत्ममनोरंजन करत राहावे. देशाला यांच्याकडे बघायला वेळ नाही आणि कारण पण नाही. देशात सर्वागिण बदलाचे वारे वाहातच राहणार आहेत. जय भारत!* 😂😂😂😂😂😂 🤗 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗🤗

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

"राहू व केतूच्या पाप कर्तरी योगाचे परिणाम !:"

"राहू व केतूच्या पाप कर्तरी योगाचे परिणाम !:" राहू व केतू हे दोन अत्यंत अनिष्ट ग्रह आहेत, त्यांच्या एका बाजूला जर सर्व ग्रह पत्रिकेत असतील तर कालसर्पयोग होतो आणि त्याचे त्या व्यक्तीला त्रासदायक परिणाम होतात हे आपणास ज्ञात आहे. कोरोना काळातही अशा राहू केतूच्या अनिष्ट योगामुळे सबंध जगावर संकट कोसळल्याचे आपण अनुभवले आहे. असे हे राहू केतू मूळ पत्रिकेत कुठे आहेत, हे पाहून, सध्याच्या राहू केतूच्या पाप कर्तरी योगात कोणती दोन स्थानं येतात, त्याचे निदर्शन व काय परिणाम संभवू शकतात त्याचा खुलासा ह्या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे. "राहू व केतू हे दोन पापग्रह दर दीड वर्षांनी राशी बदल करतात, ते उलटे मागच्या राशीत जातात. जसे आता राहू मेेष राशीत व केतू तुळेत आहे. ते 28 नोव्हेंबर'23 रोजी अनुक्रमे मीन व कन्या राशीत प्रवेश करतील. अशा वेळेला कुंभ लग्नाच्या मूळ पत्रिकेमध्ये ज्यांच्या द्वादश स्थानात म्हणजे मकर राशीत केतू व षष्ठ स्थानात राहू कर्क राशीत असेल तर, त्या व्यक्तीच्या पत्रिकेत लग्नस्थान आणि सप्तम स्थान हे राहू व केतू यांच्या पापकर्तरी योगात येतील. ही दोन अत्यंत महत्त्वाची स्थाने आहेत, लग्नस्थान म्हणजे स्वतः, शरीरारोग्य मानसिक स्थिती तर लग्नस्थान म्हणजे जोडीदाराचे स्थान, वैवाहिक सौख्य भागीदारी विषयक फळे. साहजिकच या पापकर्तरी योगामुळे स्वतः त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदाराला त्रासदायक काळ, नुकसानकारक अशी फळे मिळण्याची शक्यता असू शकते. जन्मलग्न पत्रिकेमध्ये जर राहू आणि केतू यांच्या पुढच्या आणि मागच्या घरां मध्ये जर तूळ आणि मेष रास असेल तर अशा पत्रिकांमध्ये सध्याच्या परिस्थितीत राहू केतूचा पापकर्तरी योग होऊ शकतो आणि त्याचे त्या त्या स्थानांबद्दल अनिष्ट परिणाम मिळू शकतात. याच गोष्टीचा सखोल अभ्यास विविध पत्रिकांचा करून केला असता, असे लक्षात येते की ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये राहू आणि केतू , हे मिथुन आणि धनु अथवा सिंह आणि कुंभ या राशीत असतील तर फक्त त्यांनाच राहू केतूचा पापकर्तरी योग होईल, बाकी जर तसे नसेल तर त्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. अर्थात त्यामुळे जी दोन स्थाने ह्या अनिष्ट पापकर्तरी कुयोगात येतात त्यानुसार त्या स्थानांचे कारकत्व असलेल्या गोष्टींची फळे क्लेशकारक संभवतील. तेव्हा प्रत्येकाने आपल्या जन्मलग्न पत्रिका तपासून पहाव्यात आणि जन्मलग्न कुंडली मध्ये राहू आणि केतू हे वरील प्रमाणे कुठे आहेत का? ते पहावे आणि तसे जर नसेल तर चिंता करायची कारण नाही. अजून एक उदाहरण: कर्क लग्न असून पत्रिकेमध्ये तेथेच केतू आणि राहू मकर राशीत असल्यामुळे द्वितीय स्थान व अष्टम स्थान पापकर्तरी योगात असतील.. ही दोन अत्यंत महत्त्वाची स्थाने असल्यामुळे स्वतः त्या व्यक्तीला कौटुंबिक सौख्य, आर्थिक स्थिती आणि अचानक अपघात आरोग्य समस्या नुकसान असा पाप कर्तरी योगाचा त्रास सहन करावा लागेल. यावरून असे लक्षात येईल, जन्मलग्न पत्रिकेला हा असा अनिष्ट योग राहू केतूचा होऊ शकतो. मात्र ती बाधीत दोन स्थाने प्रत्येक जन्मलग्नाला वेगळी असणार आहेत. धन्यवाद सुधाकर नातू

"बोल, अमोल !"

👍"बोल, अमोल !":👌 # 👍"दिशा आणि दशा, फक्त एका वेलांटीचा फरक ! पण तीच वेलांटी, बरोबर कां चूक ह्यावर परिणीती होणारी 'दशा' दयनीय की, वंदनीय हे ठरत असते !!":👌 #👍"प्राजक्ताची फुले !:👌 💐"शुभ प्रभाती, कोंबडा जसा न चुकता आरवतो, तसा सकाळी साडेसहा वाजता अस्मिता वाहिनी आकाशवाणी मुंबई वरील 'चिंतन' मी ऐकायला सुरुवात केल्यापासून, 'कल्पनेतल्या अकलेचे तारे' शब्दरूपात पकडत, जणु प्राजक्ताच्या लालचुटूक देठांचा पांढर्या शुभ्र फुलांचा स्वानंदाचा सडा सोशल मीडियावर विखुुरत जातो !":👌 #👍"नशा आणि नाश, फक्त एका कान्याची अदलाबदल ! पण किती अर्थपूूर्ण व समर्पक, घातक नशा अखेरीस नाश करते हे ध्यानात आणून देणारी !!":👌 #👍"तारतम्य व समजूतदारपणा ह्यांच्यामधील सीमारेषा धुसर असते. किंबहुना समजूतदारपणा हा तारतम्याकडे नेणारा मार्ग असतो. ह्यांच्या अभावी वादविवाद, मतभेद आणि अशांती संभवते !":👌 #👍"समजूतदारपणा आणि शहाणपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात खऱ्या पण थोडा फरक आहे समजूतदारपणा हा बहुत शहा संभाव्य किंवा प्राप्त परिस्थितीतील प्रतिकूलपणा किंवा प्रतिकूल परिणाम स्वीकारणे असते तर शहाणपणा संभाव्य परिस्थितीत प्रतिकूल परिणाम येऊच नये यासाठीचा घेतलेला पवित्रा असतो !!":👌 #👍"पहाटे तीन च्या आसपासच्या वेळेला अमृतवेळ कां म्हणतात, त्याचे कारण गवसले मला ! बहुदा त्याच सुमारास झोपेतून जाग येते आणि कशी कुणास ठाऊक, जीवनानुभवाच्या मुशीतून शाश्वत विचारलहरी उचंबळून येतात !":👌 #👍"स्मरण आणि विस्मरण यामध्ये धुुसर सीमारेषा असते. काल-परवा पाहिलेल्या मालिकेचे शीर्षक काही केल्या आठवत नाही, मात्र कित्येक वर्षांपूर्वीच्या शाळेतल्या दिवसांचे अनुभव मात्र ताजे होऊन लपकन समोर येतात. ह्याला काय म्हणायचं ?स्मरण आणि विस्मरण हे कालातीत असतं, काळावर अवलंबून नसतं हेच खरं !":👍 #👍"प्राजक्ताची फुले !:👌 👍"बोल, अमोल!":👌 👍"हवेहवेसे न वाटणे व नकोसे होणे ह्यांमध्ये फरक हा, की पहिल्यात भोगलेल्यामुळे विरक्ती, तर दुसर्यामागे त्यांच्यामुळे लाभलेली त्रुप्ती!":👌 👍"बोल, अमोल !":👌 👍"मॅनेजमेंट कोर्सला असताना मी ऐकले होते की, गृहिणी ह्या जगातील सर्वोत्तम मटेरियल मॅनेजर असतात, कारण त्यांना घरामध्ये कोणत्या गोष्टी केव्हा, कशा कुठून आणि किती किंमतीला घ्यायच्या, याचे उपजतच ज्ञान असते. त्याचप्रमाणे आपणही केव्हा, कुठे, काय कसे, कुणाशी बोलावयाचे किंवा नाही बोलावयाचे, याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे !":👌 👍"बोल मोल !":👌 👍"मराठी भाषा किती लवचिक तरीही किती समर्थ, किती सम्रुद्ध आहे ! शब्दातले एकच अक्षर जर बदलले, तर किती भिन्न अर्थ त्यामुळे निर्माण होतात!! बंड कंड दंड पुंड..... धींड खिंड धेंड खिंड..... पेंड...... शिवाय काही असांसदीय शब्दही!":👌 👍"सुुख पहाता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण Missing Tile Syndrome' हे होय. ते म्हणजे, जे 'देखणं ते न दिसणं' आणि 'जे खुपणं तेच बघणं' होय !":👌 👍"बोल, अमोल-!":👌 👍"पहाटे तीन च्या आसपासच्या वेळेला अमृतवेळ कां म्हणतात, त्याचे कारण गवसले मला ! बहुदा त्याच सुमारास झोपेतून जाग येते आणि कशी कुणास ठाऊक, जीवनानुभवाच्या मुशीतून शाश्वत विचारलहरी उचंबळून येतात !":👌 👍"बोल, अमोल!":👌 👍"आयुष्यात मनभावन क्षण मोजकेच येतात अन् ते तुमचे रोम रोम फुलवत आणि चित्त वृत्ती उजळवत प्रेरक उदात्ततेच्या महासागरात तुम्हाला चिंब चिंब करून जातात ! तो अनुभव अनोखा, न विसरण्याजोगा असतो. असे मनभावन क्षण येणे भाग्याचे !!":👌 धन्यवाद सुधाकर नातू

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

"मल्लीनाथी-2 !":

"मल्लीनाथी-2 !": ""ते" तसे, तर "हे" असेतसेच!: प्रादेशिक पक्ष असलेल्या, चंद्राबाबूंना आंध्रात, नंतर "केसीआर"ना तेलंगणात तसेच DMK वा AIDMK च्या नेत्यांना तामिळनाडूमध्ये अथवा नवीन पटनाईक ह्यांना ओरिसात जर स्वबळावर सत्ता मिळविता येते, तर मराठी मातीचा अभिमान बाळगत प्रारंभ केलेल्या, शिवसेनेला गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रात काही केल्या ते जमू नये, ह्यातच त्या पक्षाच्या स्वयंघोषित "स्वबळा"चा अंदाज यावा. गेले चार वर्षे त्यांना दुय्यम भूमिका स्विकारायला लागल्यापासून त्यांनी जो धरसोडीचा तमाशा मांडला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता रसातळाला जात आहे, हे वास्तव आहे. मागील खेपेस जसे मनसेचे पानीपत झाले, तसेच ह्यांचे आगामी निवडणूकीत होण्याचा रास्त धोका आहे. गुणवत्ता, धोरणांतील व प्रयत्नांतील सातत्य व सुसुत्रता, बदलत्या स्थितीबद्दलचा चाणाक्षपणा ह्या सार्यांचा सत्ताकारण हा मेळ व खेळ असतो. शेवटी पाणी, आपल्या ठराविक पातळीवरच येते, हा नैसर्गिक नियम आहे, असेच म्हणावयाचे !" (फेसबुक संदेश 5 वर्षांपूर्वी ) @ "यक्ष प्रश्न": अटीतटीच्या लढतीत भूषणावह विजय मिळविल्यानंतर, शीर्षस्थ पदासाठी होणारा जबर संघर्ष पाहून दु:ख करावे की, आपल्याकडे सक्षम नेत्रुत्वाची वाण बिलकुल नाही, ह्याचे समाधान मानावे?" # "चिरंतन": क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा, नसा नसांतूनी तो चंग करा, मना मनांतूनी ते प्रेम बहरा, चरा चरांतूनी हा नाद खरा! # 😄"तत्त्वज्ञानी योगी !":😄 👍"आपली कुणीच दखल घेत नाही, ना आपली कुणी आठवण काढतं, जणु आपल्याला बेदखल केल्यासारखं, इतरांनी किंवा आपल्या वर्तुळात असणाऱ्यांनी वागणं अशामुळे खंत करत राहणं स्वतःलाच दोष देत राहणं, मनाचा कमकुवतपणा होय. याचं कारण म्हणजे आपण समजूनच घेत नाही की, इतरांच्या भावविश्वाच्या भवतालांत आपले कुठलेच प्राधान्य नाही किंवा स्थान नाही हे ! तसे असले तरी नाऊमेद न होता, श्रेयस्कर हेच आहे की, आपण आपल्यातच गुंतून जाणं, रमणं आणि ते होण्यासाठी जे जे आपल्याला योग्य वाटतं, आवडतं, चांगलं जमतं ते ते मनापासून करत, आत्मसमाधान मिळवत आपल्याच भावविश्वात आपण विरघळत जाणं ! असं ज्यांना जमत, ते आणि तेच खरे तत्त्वज्ञानी योगी !!":👌 # 👍"ह्याला जीवन ऐसे नांव......"👍 💐मनाची द्विधा मनस्थिती पदोपदी होत असते, त्या त्या वेळेस घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे परिणाम वेगवेगळे होतात आणि आयुष्याला भिन्न वळणे संभवतात. म्हणूनच लहान वा महान थोर, प्रत्येकाचे आयुष्य हे कल्पिताहूनही अगम्य असे सुरस अन् चमत्कारिक असते..........💐 # # बदलते वास्तव हे आहे की, विविध भाषी, विविध धर्मी, विविध जाती जमाती, विविध संस्क्रुती अशा विविधतेने बनलेल्या आजच्या भारताला, एकांगी एककल्ली, दुही दुफळी-प्राधान्य पुरस्कर्ता आणि विरोधकच नको असलेला संकुचित व्रुत्तीचा मार्ग नको आहे. सर्वधर्मसमभाव सहिष्णुता व सगळ्यांना सामावून घेत सलोखा वाढवणारा, भावनिक प्रश्नांपेक्षा व्यावहारिक गरजपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा, मार्गच असणे अंतिमतः त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. धन्यवाद सुधाकर नातू

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

"Different Strokes !":

"Different Strokes !": # "A Worthy Monologue" : I happened to read in One Go,a wonderful book: 'Who Moved My Cheese' by Dr. Spencer Johnson, which my grandson had got as a reward as a winner in a contest. It's an amazing story to deal with the change in your Professional and Personal lives! It's an enlightening narration of four characters, who live in a 'Maze' and look for 'Cheese' to nourish them and make them happy. 'Maze' is the 'environment, you are in and the 'Cheese' is the 'Fruit' you want. The contents of the book show you: 'How to anticipate change'; 'Adapt to the change quickly'; 'Enjoy the change'and'Be ready to change quickly again and again'. The four characters in the story are: 'Sniff' who has a habit to notice Change; 'Scurry' who sees the change early and acts fast; 'Hem' Who denies and resists change and is comfortable where he is; and the last one is 'Haw' who sooner than latter,laughs at his mistakes and adapts to the change! After absorbing the essence of the book, you are compelled to find out who you, exactly are, from these four characters And final lesson learnt is : You must avoid to be a 'Hem'! Surely & definitely, It is A Must Read book for One and All. Pl. Go for it. # Lost Key: Almost every one is running an endless race, towards the 'Goal Post of Happiness and Contentment' but in vain. The result is that the Life Styles and Relationships have become mechanical and monotonous. Really an eye opener. This is due to more and more externalization, than much needed internalization of today's Life styles. Off and on, 'Introspection' about the external happenings and internal responses/reactions to them, is the 'Lost Key'! # 😃 "Inspiration & Motivation:😃 👍"The meanings of the two words, Inspiration and Motivation appear to be look a like but they do have a difference. While Inspiration is a force that triggers creative ideas, the Motivation is an inner urge to take actions to convert those ideas, into reality. Thus the Concept here in is an outcome of Inspiration and apt explaination of it, is the child of the Motivation !":👍 # I just read with interest an article on Vaidik Science in Kistreem Diwali issue'11 written by Mr.S.Kulkarni. It highlights our ancient treasure of Knowledge about the mysteries of the Universe. It also brings about the fact, what modern science is attempting to probe into, was already known to our Rushis, thousands of years ago. If interested, please do read the above article. # The creation of a new born !": The creation of a new born is the most astonishing work of the Nature and while mostly, all the new born, almost look similar, it's a puzzle, as time unfolds, how each one gets transformed into an adult, in an unique form, shape and body's operating systems. Further, the human body happens to be the most intricate, complex and very large Laboratory or a Factory, in the World. The Brain happens to be the CEO and Mind has a role of a Mentor, throughout one's Life. Unfortunately, in today’s rat race, no one has time to look at and to manage the intricacies and complexities of body's various operating systems, properly. No wonder, 'Health is Wealth' then remains a slogan, not to be followed and acted upon. One wakes up only when some ailment occurs, not otherwise. Many a times, it turns out to be too late. To manage the well-being of the Body and Mind is a full time, 24by7 job- an interesting and the most essential, critical job. All the management principles and practices need to be used consciously, for this task, First Learn in depth the basics of the operations of the Body Clock-the inputs-outputs' relationships and then adapt the principles of timely maintenance, moderation and of course the prevention. Please bear in mind, Neglect and Avoidance could prove you, very deer. Finally and honestly, these are the words from my own experience, that has witnessed till now, the situations of the brink of disaster, thrice, just due to shear Neglect and Avoidance. So, let’s All Wake up and Walk this Talk. Sudhakar Natu

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

"विचारधन !":

"विचारधन !":

मुंंबई अस्मिता वाहिनीवरील चिंतन कार्यक्रम ऐकल्यानंतर मला दररोज प्रातःकाळी प्रेरणा मिळून मी स्वनिर्मित आणि अनुभव सिद्ध असे विचारधन न चुकता सोशल मीडियावर दररोज सामायिक करत असतो. त्याचीच झलक या खास लेखात आहे आणि ती तुम्हाला देखील अंतर्मुख करून तुुमच्या जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे....

# 👍"भूतकाळाचे कांटे उलटे फिरविणे, केवळ अशक्यच असते. त्यांतून कुणी अट्टाहासाने तसे करायचा प्रयत्न केलाच, तर ते आत्मघातकी ठरू शकते. कालप्रवाहाबरोबर, वर्तमान जसजसे रुप घेईल ते खुल्या दिलाने स्विकारणेच अंतिमतः शहाणपणाचे ठरते !":👌

#👍"माणसाचं आयुष्य नशिबाच्या धनुकलीवर पिंजलं जात कुठे कसं वाहत जाईल, ते कळतच नाही. त्याचे गुण त्याला प्रकाशातले यश, तर अवगुण एखाद्या जहरी विषारी नागासारखे अपयशाचे फूत्कार काढत, त्याच्या र्हासाला कारणीभूत ठरतं !":👌

#👍"The Era of Mind Power !:👌                    "Data, when analysed, is Information and such Information when properly introspected, is Knowledge and Applying Knowledge to accomplish set goal is The Mind Power !":👌

# 💐"Most of the times, Information contains an Opportunity. One must try to identify such Opportunity and it's relation with his own needs to achieve the desired goal !":💐

#👍"माणसाचं जीवन हा बहुरंगी नात्यांचा अनुभव घेत, ती निभावून नेण्याचा स्वतंत्र प्रयोग असतो. त्याचे यशापयश प्रत्येकाच्याच हातात असूनही, त्याकडे काणाडोळा केला जातो !":👌

#👍"माणसाचे डोळे अन् देहबोली हे त्याच्या मनाचे आरसे असतात. ज्यांना माणसं वाचता येतात, त्यांनाच त्यांतील प्रतिमा दिसतात.....👌

#👍" जेव्हा आपण आपल्याला आवडणारे काम समाधानकारक रीतीने पूर्ण करतो त्या वेळेला आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेच्या लहरी निर्माण होतात हे असे घडणे आपल्या आरोग्याला अत्यंत हितकारक असते !":👍

#👍"आज अचानक चमत्कार घडावा तसे जाणवले की, आमचे आडनाव 'नातू' हे किती प्रेरणादायी आहे ते ! 'नातू' म्हणजे इंग्रजीत 'Grandson' अर्थातच चांगली मुले-नातवंडं-अर्थातच दुधावरची साय जशी !":👍

#👍"आजही कालच्याच सारखे जाणवले की, आमच्या आईचे माहेरचे आडनाव 'विद्वांंस', हे देखिल किती अर्थपूूर्ण आहे ! 'विद्वांंस' अर्थातच विद्वान, बुद्धिमान माणसं !":👍

#"अर्थ" हाच सर्वार्थ आणि कमी श्रम जादा दाम ह्या प्रर्व्रुत्तीचे विदारक चित्र आपल्याला ठायीठायी नजरेस येते. आपण कुणाचे भले जरी करू शकलो नाही, तरी निदान आपण जे काही करतो, त्यामुळे इतरांचे जराही नुकसान होताच कामा नये" हा निदीध्यास जेव्हां, समस्तजन घेतील तोच सुवर्णदिन!":

# "तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईमस् सारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत. अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे. मुद्दा मात्र वेगळा आहे, अशी गुन्हेगारी करायला दुसऱ्यांना फसवायला माणसे कां तयार होतात, याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी करावे अशी वेळ आली आहे."

# "नटवर्य बाबूराव पेंढारकरांचे 'चित्र आणि चरित्र' हे आत्मकथन मी नुकतेच वाचले. त्यामधील एक नोंद दखल घेण्याजोगी ! एके काळचा सुप्रसिद्ध प्रभात स्टुडिओ हा पुण्यामधील ज्या जागी होता, ती जागा पुण्याचे सरदार नातू यांची ! ती सुमारे 11 एकर आणि त्या जागेचे त्या काळात खरेदीखत 17 हजार रुपयात करून प्रभात स्टुडिओची उभारणी केली गेली. विष्णूपंत दामले हे प्रभातच्या संस्थापकांपैकी एक !:"

#👍"सुख क्षण हातात काही पकडून ठेवता येत नाहीत, जसे गुलाबी थंडी मध्ये पानावरील दंवबिंदू घरंगळत जातात, तसेच सुख क्षण हातातून क्षणार्धात कधी निसटून जातत, ते कळतच नाही !":👍

#👍"प्रात:काळच्या समयी मातीला आणि आसमंताला एक आगळावेगळा सुगंध असतो, निळ्याशार आकाशातील गुलाबी प्रकाशशलाका मंद गतीनेभवताल उजळत जात असतात आणि मंद सुगंधी वारा मनामनाला नव आशेची दुलई पांघरून जात असतो !":👌

#👍" सारे समजून उमजून न समजल्यासारखे जे करतात, अशा माणसांसमोर कुठलाही वाद घालणे व्यर्थ असते. मौनं सर्वार्थ साधनम् !":👌

#👍""एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे सन्मतीमुळे आणि सत्क्रुत्यांमुळे सद्गतीत होऊन जेव्हा अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे आत्मसमाधानाचे व क्रुतार्थतेचे अश्रू असतात. त्यांचे मोल, अमोल असते. म्हणूनच जे पुस्तक अशा तऱ्हेने तुम्हाला रडायला लावते, ती श्रेष्ठ, उत्तम कलाकृती !":👌

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार":

 "आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार":

आपणच आपल्या करणीची फळे भोगत असतो. आपला र्हास किंवा आपला विकास, हा नेहमी आपण काय काय केले, समस्यांकडे कशा दृष्टीने बघितले आणि त्यांतून मार्ग कसा काढला, ह्यावर अवलंबून असतो. रडत राऊंवर कायमच तसे रहाण्याची वेळ येण्याचा धोका असतो. 

संकटातून प्रतिकूल परिस्थितीतून देखील संधी शोधणारे, आपली प्रगती करून घेत असतात. त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. पण ते न करता, आपण अपयशी ठरलो व मागे राहिलो, ह्याचेच केवळ दुःख बाळगत, त्याचे अवडंबर माजवत, अनुकंपा मिळवण्यासाठी झगडत रहाणे, शूरवीरांना शोभत नाही. आपली शक्ती, दयेची क्रुपेची पोटतिडकीने याचना करण्यात वाया घालवणे योग्य नव्हे. त्यापेक्षा आपण आपले प्रामाणिक, आत्मपरीक्षण करून, कुठे चुकले, काय चुकले अन् काय करायला हवे होते आणि आता काय पुढे केले पाहिजे याचा शोध घेणे आवश्यक आहे. नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, समस्यांना विघ्ने आणि आपली सर्व शक्ती त्या समस्या दूर करण्यासाठी वापरणे जास्त श्रेयस्कर असते.

कोणे एके काळी वैभवात लोळणारे आणि समुदायाचे आपआपल्या गांवाचे नेतृत्व करणारे, केवळ त्यांच्या ऐतखाऊपणामुळे, निष्क्रियतेपायी अथवा आपल्या अहंकारापायी स्वतःचेच नुकसान करून घेणारे सापडतात. जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचायची वेळ कां व कधी आली, ह्याचे भान त्यांना राहत नाही.

केवळ आपल्याच श्रेष्ठत्वाच्या गुर्मीत मग्न राहून जर वेगाने बदलत्या परिस्थितीचा योग्य तो आढावा घेऊन, त्यातून मार्ग काढला नाही, तर आपली वेगाने पिछेहाट होणे अपरिहार्य असते. अनुकंपा मिळवण्यासाठी झगण्यापेक्षा, तशी वेळ आपल्यावर येणारच कशी नाही, ह्याचा सारासार विचार करून त्या मार्गाने जाण्यात, आपले तन मन धन वेचणे गरजेचे असते. ज्यांना असे शहाणपण सुचते, तेच योग्य तो मार्ग चोखाळून नेहमीच आघाडीवर राहतात, आपला विकास भरभराट करत राहतात. अशीही अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. तसे जे वागत नाहीत, त्यांच्यावर दुसऱ्यांच्या कृपेवर जगण्याची पाळी येणे अपरिहार्य असते.

काळाचा महिमा हा असाच असतो. असाच रहाणार.

सुधाकर नातू

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

👍"आठवणीतल्या साठवणी भाग 1":👌

👍"आठवणीतल्या साठवणी भाग 1":👌

पुष्कळ दिवस सादर करायचा संकल्प सोडलेला, आज कदाचित पूर्ण होईल असे दिसते. माझं आजोळ आंजर्ले, त्या गावाची आठवण विसरता म्हणून विसरत नाही. तेथील विद्वासांच्या कुटुंबात जन्माला आलेली माझी आई आणि तिची अकरा बहीण भावंडे यांच्यासंबंधी माझ्या आठवणीतली ओळख करून देण्याचा हा विचार प्रत्यक्षात आता येत आहे. तत्पूर्वी आंजर्ले या गावाविषयी, ह्या पहिल्या भागात.

आंजर्ले गांव नयनरम्य आणि समुद्राचा विशाल किनारा लाभलेले, नारळी पोफळीच्या वाड्यांनी विनटलेले असे रत्नागिरी जिल्ह्यातले, दापोली तालुक्यातले गांव ! तेथे असलेल्या कड्यावरच्या गणपती मंंदिरामुळे खूपच प्रसिद्ध आहे. गांवाच्या सुरुवातीला असलेली खाडी, तिच्या बाजूला एक डोंगर आणि समोरील किनार्यावरून गांवामध्ये येण्यासाठी असलेली पुळण मला अजून आठवते.

बालपणी मे महिन्यातील आमच्या तेथील वास्तव्यात बंदरावर जाणं हा दररोजच्या दिनक्रमाचा आमचा एक भाग असे. कधी मधी कड्यावरच्या गणपतीलाही जात असू. 

मुंबईहून आंजर्ल्याला जायचं हा एक मोठा काशीयात्रेसारखा प्रयोग असे. सायनहून स्टेशनवर गाडी पकडून मशिद बंदर स्टेला जाणे, मशिद बंदरवरून टांगा करून भाऊच्या धक्क्यावर बोट पकडण्यासाठी जाणे. बोट धक्क्याला लागली की डेकवर जाण्याची लगबग. जंजिरा श्रीवर्धन आणि नंतर येणार हर्णै बंदर, हा प्रवास जवळजवळ आठ तासाचा सुद्धा असू शके. डायरेक्ट हर्णै बंदर घेणारी एखादी बोट असायची कधी कधी. रोहिदास, चंद्रावती चंपावती आणि सेंट अंथुनी अशी नावं असलेल्या बोटी मला आठवतात. जंजिरा श्रीवर्धन आणि हर्णैला धक्का नसल्यामुळे बोट समुद्रातच उभी राहायची आणि पडावातून म्हणजे खपाट्यातून माणसं किनाऱ्याला नेली जायची. 

जंजिरा आणि श्रीवर्धन आले की आमच्यासारखी हर्णैवाले प्रवासी, डेेकवरून गंमत बघत ते हलणारे खपाटे आणि त्याच्यात उड्या मारणारे प्रवासी बघत असा प्रवास तो व्हायचा. काही लोकांना बोट लागायची, म्हणजे उलट्या व्हायच्या. हर्णैला बोटीतून पडावात उतरलं की अक्षरच्या डुलत डुलत उंच लाटांचा सामना करत, किनाऱ्यावर जायचं. तिथे तेव्हा एसटी एवढी प्रचलित नव्हती. त्यामुळे हर्णै ते आंंजर्लेसाठी दापोली मोटार संघाच्या बसेस असायच्या. त्या बसमधून आंंजर्ल्याच्या पलीकडे म्हणजे डोंगरावर ती बस उभी राहायची. तिथे उतरून तरी वा होडीमध्ये बसून किनाऱ्याला यायचं. वाळूतून चालत बंदरावरून पाखाडी हा जो भाग आहे तिथे, जर जमलं तर बैलगाडीने, बहुदा ती नसायचीच, चालत जाणे आणि मग एकदाचे आजीकडे पोहोचणे. त्यावेळेपर्यंत रात्र झालेली असे. वीज नव्हती. मिणमिणत्या कंदीलाच्या प्रकाशात आजी आमचे आनंदाने स्वागत करायची, ही ती आठवण मनात कोरलेली आहे.

पुढील भागात आईची अकरा बहीण भावंडे यांच्यासंबंधी माहिती उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे आजोबा अण्णांच्या पहिल्या बायकोचं आडनाव माहेरचं ओक होतं. तिला एक मुलगी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला महाडमध्येच वाढवलं. नंतर तिचा विवाह सातारचे वकील साठे यांच्याशी झाला आणि तिला सहा मुलगे आणि दोन मुली होत्या. त्यातील सर्वात मोठा डॉक्टर दामोदर हा दादरला राहायचा शिवाजी पार्कला, त्याचा बंगला होता. त्याची बायको गायनाकालॉजीस्ट होती. त्याचा एक धाकटा भाऊ अशोक रूईयामध्ये माझ्या पुढे एक वर्ष होता, तोही डॉक्टर झाला.

आईच्या आधीची बहीण ताई, हिला दापोलीच्या परांजपेंकडे दिली होती. तिला एक मुलगी उषा म्हणून झाली, त्यानंतर ताई निवर्तली आणि त्या परांजप्यांनी नंतर दुसरे लग्न केले.

उषाचे यजमानांंचे आडनाव थत्ते होते, ते हर्णैला पोस्टमन असताना मी त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे. तसेच जालगाव दापोलीजवळ परांजपे यांच्याकडेही आम्ही लहानपणी गेलो होतो. एक गंमत म्हणजे त्या परांजपे यांचे वडील पोस्टात होते. जवळजवळ शंभर वर्षे जगले आणि 40 वर्ष त्यांनी पेन्शन मिळवले.

ताईच्या आधीच्या आईच्या दोन सख्ख्या बहिणी बालपणीच निवर्तल्या. अशा रीतीने आई धरून सख्खी दहा बहिण भावंडे आणि पहिली सावत्र साताऱ्याची अक्का साठे.

आजोबा गणू अण्णांचे दुसऱ्या लग्नात 24 25 चे आसपास वय होते आणि आपली आजी सावित्रीबाई ही लग्नात बारा वर्षाची होती असे ऐकले आहे ती 77 वर्षे जगली.

ताईनंतरच्या आईच्या इतर बहिण-भावंडांची कथा पुढील भागात.

धन्यवाद 

सुधाकर नातू

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

"Different Strokes!":

 😄"Different Strokes !"😄


Please Read this article carefully, think and Introspect:

"My FB Post-9 years ago!":
"It is really required at this stage of morally and ethically poor
people, to seriously and scientifically  probe, investigate the reasons, causes for such a moral downfall, generations after generations in the last century. Add to that there is a growing tendency not to follow set rules/laws or systems and 'Hum Kare so, Kayada' mentality is seen ever now and then. Let's find what went wrong during the last  century and onwards.. Despite present generations'  better economic status, we would get ashamed if we examine what was the Model, honest generation a century ago was and what pathetic we are today. It is just not easy to find the answer.
Is it due to 'LPG' factor or any genetic change over all  these years , or is it that our priorities, outlook towards  the way we should lead life has dramatically changed as economic, scientific advancement went on improving or is it that due to our rapid growth of comforts increased over the last century, there has been our  moral degradation? Thus Qs are plenty,
I believe this is a crucial Turning Point for all of us, as we walk fast
to future years of this century and such a meaningful probe is 
the most desirable right now. Remember the menace, monster of corruption and craze for easy fast prosperity, due to which all our Noble values are getting eroded. It is hence, high time that the genetic scientists, social thinkers/ reformers, economists come together to probe about the Mission Moral Revival of the coming Generations. Other wise I am afraid anarchy won't be fae away."
#############################
"My FB Post-9 years ago!":
In different areas of Mumbai and it's suburbs there  have been many instances of drainage water flowing out and making the surroundings dirty and filthy, thus endangering the health of citizens. It's an ironical paradox that the Civic Body-BMC which just cannot manage it's drainage system effectively, is going to have a cleanliness drive in Mumbai on 7th Nov'14 to combat the spread of Deadly Disease Dengue! It's further shameful that it's own KEM Hospital has been found to have a colony of the germs of Dengue and has been issued Notice by the parent body itself! What kind of health management is this?
The pot holed, uneven roads through out the city,  polution, unsettling noise, traffic jams, crowded local trains, unwanted, unplanned sky-walks, just to name the few,are yet many  'feathers' in the cap of India's Economic Capital. The BEST bus service is also in loss and going from bad to worst. Why should we have monopoly of BEST for public road transport? Can we not have more private players as is now in Power supply sector, for the same to improve the citizens' misery?
One can go on,on 'singing'  the sad songs of pains of the helpless citizens of Mumbai. Due to Pay commisions, salaries of 'Babus' are at very high level without any reasonable output and acoountability. All seem to be concerned about their 'Demands' but not bothered about their responsibilities and duties.Politicians and People in power have been busy in improving their fortunes and so on.In nutshell, the state of affairs here were never ever, so worst and pathetic in its history!
It is heartening to note that under these circumastances there is a hope of a competant, Honest CEO being appointed for Mumbai. One must welcome this move and hope to look for a radical turn arround in the affairs ofthe city. all those who oppose this move, may kindly introspect these facts and whole heartedly back this decision."
############################

"My FB Post-9 years ago!"

Taking into account the promises made at the Election time, are regularly either forgotten, side tracked, or just not fulfilled in the desired time frame, there must be a monitoring system in place to review their status annually. What we need now, is the results' hungry, development oriented, transparent Governance and for that power crazy, selfish politicians should not have any place in the same. The voters shld hv power to recall the inactive, selfish elected candidates. There is an acute need for the candidates who are self-less, genuinely committed for well being of the country, in the elections. Finally, emotional promotion in the elections should be out and pure developmental plans, with definite time frame must be in."
######################
Life is a roller coaster ride. It's only for few days, not going generally, beyond single digit, that u feel that there r no problems on your slate to tackle. All of a sudden,these gooddy, gooddy feelings get shadowed by the entry of an uncertain problem, thus making room for his 'fellow-brothers' to enter the fray. Then on, you struggle not, for just few days but for months, with an ocean of worries to tackle and swim thru'. But 'Lo', Life being a wheel of fortune, some magic wand appears on the scene and cleans the clouded slate, swiftly and you, then again have a clear blue 'sky' with the bright, shining 'Sun' of hope and joy. That's, what Life is, for one and All. Amen...
############################

Sudhakar Natu

"सोशल मीडियावरील दुर्मिळ माहिती !"


🤑 "सोशल मीडियावरील दुर्मिळ माहिती !":🤑
सोशल मीडियाला कितीही नावे ठेवली तरी कधी कधी नोंद घेण्याजोगी आणि संग्रह अशी उपयुक्त माहिती आपल्याला फॉरवर्ड केली जात असते फक्त तशा तऱ्हेची माहिती वेचण्याची दृष्टी हवी माझ्या नजरेत अशा काही नोंदी आल्या त्याच येथे देत आहे:

😗🤥"बोलावे कसे किती या संबंधी माझी आचारसंहिता !":😗☺️
"ही आचारसंहिता तयार करण्यापूर्वी मला आठवले की, केव्हातरी श्री संत तुकाराम यांनी वाणी कशी वापरावी यासंबंधी अभंग लिहिले होते.
फेसबुकवर आणि गुगलवर जाऊन मी ते शोधण्याचा आटापिटा केला आणि अखेरीस माझ्या गुुगलवरील प्रयत्नांना यश आले.

संत तुकारामांचे पुढील अभंग आपल्या सर्वांना बोलण्यासंबंधीची
आचारसंहिता सहजतेने सांगून जातात.....
😆 "घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये !"😆
इती संत तुकाराम!
#############################

😆 "इसे सेव कर सुरक्षित कर लें, ऐसी पोस्ट कम ही आती है।"😆

विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय गणना तन्त्र (ऋषि मुनियों द्वारा किया गया अनुसंधान)

■ काष्ठा = सैकन्ड का  34000 वाँ भाग
■ 1 त्रुटि  = सैकन्ड का 300 वाँ भाग
■ 2 त्रुटि  = 1 लव ,
■ 1 लव = 1 क्षण
■ 30 क्षण = 1 विपल ,
■ 60 विपल = 1 पल
■ 60 पल = 1 घड़ी (24 मिनट ) ,
■ 2.5 घड़ी = 1 होरा (घन्टा )
■3 होरा=1प्रहर व 8 प्रहर 1 दिवस (वार)
■ 24 होरा = 1 दिवस (दिन या वार) ,
■ 7 दिवस = 1 सप्ताह
■ 4 सप्ताह = 1 माह ,
■ 2 माह = 1 ऋतू
■ 6 ऋतू = 1 वर्ष ,
■ 100 वर्ष = 1 शताब्दी
■ 10 शताब्दी = 1 सहस्राब्दी ,
■ 432 सहस्राब्दी = 1 युग
■ 2 युग = 1 द्वापर युग ,
■ 3 युग = 1 त्रैता युग ,
■ 4 युग = सतयुग
■ सतयुग + त्रेतायुग + द्वापरयुग + कलियुग = 1 महायुग
■ 72 महायुग = मनवन्तर ,
■ 1000 महायुग = 1 कल्प
■ 1 नित्य प्रलय = 1 महायुग (धरती पर जीवन अन्त और फिर आरम्भ )
■ 1 नैमितिका प्रलय = 1 कल्प ।(देवों का अन्त और जन्म )
■ महालय  = 730 कल्प ।(ब्राह्मा का अन्त और जन्म )

सम्पूर्ण विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय गणना तन्त्र यहीं है जो हमारे देश भारत में बना हुआ है ।
#############################

धन्यवाद 
सुधाकर नातू

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

💐 👍 "साधा, स्वत:च स्वत:शी संवाद !":👌

 👍"रंगांची दुनिया !":👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

💐"शारदोत्सव!":💐

👍 "साधा, स्वत:च स्वत:शी संवाद !":👌

वाचनासारखा जाणिवा समृद्ध करत आत्मसमाधान आणि आनंद देणारा दुसरा कुठलाही छंद नाही. माझं भाग्य हे की, मला देखील वाचनाची आवड आहे आणि वाचनामध्ये मला शक्यतोवर व्यक्तिचित्रे आणि आत्मचरित्रे अधिक आवडतात, कारण त्यामुळे जीवनांचा विविध असा बरा वाईट भवताल, आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. कारण प्रत्येक व्यक्तीचं जीवन म्हणजे एक कादंबरी असते. त्या त्या व्यक्तीचे अनुभव त्या वेळच्या प्रसंगांचा घटनांंचा परामर्श आणि त्या त्या काळांत आपण तेव्हा कुठे होतो, कसे होतो याचा पडताळा घेत, स्वतःशीच स्वतः संवाद साधत, आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या दुनियेत प्रवेश केल्याचा आभास देखील होतो. 

माझ्या आवडत्या लेखकांमध्ये रवींद्र पिंगे यांचं नांव पहिल्या रांगेतील आहे. नाट्यदर्पण रजनीच्या 'जीवनगौरव पुरस्कारां'च्या मानपत्राचे लेखन आणि अतिशय प्रासादिक अशी लेखनशैली असलेली रवींद्र पिंग्यांची बहुतेक पुस्तके मी आवर्जून मिळवली आहेत आणि वाचली आहेत. त्यातील 'सर्वोत्तम पिंगे' हे एक पुस्तक अचानक मला वाचनालयातून गवसले आणि अक्षरशः एका वेगळ्याच अशा अनुभूतीच्या प्रांगणात मी न्हावून निघालो. त्यांचे सर्वोत्तम असे हे बावन्नकशी लेख म्हणजे प्रत्येक जणू एक एक उत्कृष्ट शब्दशिल्प आहे. त्यामध्ये अनेक 

प्रथितयश व्यक्तींची जी व्यक्तिमत्वं आणि जीवनकहाण्या रेखाटल्या आहेत त्या अक्षरश: न विसरण्याजोग्याच आहे

त्यातील एक लेख तर मी कधीच विसरू शकत नाही, कारण त्यामधूनच मला जे गवसले, ते म्हणजे शारदेच्या खजिन्यातील कुबेराचे जणू शब्दभांडार आहे. 'स्वतःशीच स्वतः संवाद साधा' अशा स्वरूपाचा त्यांचा तो लेख त्यांचे संपूर्ण जीवन गाणे आपल्यासमोर रंगवतोच, पण त्यामधून आपल्याला प्रत्येकासाठी उपयुक्त अशी प्रश्नावली मिळते. तीच प्रश्नावली मी इथे संपादित करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही ती नजरेतून जरूर घालावी, त्या अनुषंगाने आपणच आपल्याशी संवाद साधावा, त्याची उत्तरे लिहून काढावीत. आपण कुठे होतो, यापुढे आपल्याला कुठे जायचंय आणि आपले खरोखर जीवन तत्वज्ञान काय आहे, आपण काय मिळवले अन् काय गमावले याचाही यथायोग्य मागोवा त्यामुुळे प्रत्येकालाच घेता येईल !

"संपादित प्रश्नावली":

: नांव, पत्ता, फोन नंबर, ई मेल, मूळ गाव, व्यवसाय, सध्या काय करता, कुटुंबातील व्यक्ती, शिक्षण, शाळा, महाविद्यालय, विशेष छंद, महत्त्वाकांक्षा काय होती, ती सफल झाली का, निखळ आनंदाची कल्पना, आनंदाचा प्रसंग, संस्मरणीय प्रसंग, देव मानता कां, आपला स्वभाव कसा आहे, आवडते लेखक, तुमच्या जवळची मौल्यवान गोष्ट, आवडलेली पुस्तके, आवडलेले चित्रपट व नाटके, आवडते कलावंत, आवडतं गाव, आवडती गाणी, मित्रपरिवार, आवडते गायक व गायिका,जीवनावर प्रभाव टाकणार्या व्यक्ती, सर्वात प्रिय गोष्ट, तुम्ही तुमच्या जवळ कोणती वस्तू नेहमी वापरता, उपजीविकेचे साधन, तुम्हाला तिटकारा येतो का, फावल्या वेळात काय करता, धन्यतेचा क्षण कोणता, दुःखाचे क्षण कोणते, काय करायचं राहून गेलं, कोण व्हायला आवडलं असतं, जीवनविषयक तत्त्वज्ञान, तुम्हाला वैताग कशाचा येतो,  स्वतःची आवडती कलाकृती, तुम्ही काय लिहिता, तुमचे खास गुण, जगून झालेल्या आयुष्याबद्दल काय विचार, तुमची स्मृती कशी उरावी, संकल्प, नवीन पिढीसाठी कान गोष्ट...

शेवटी जाता जाता सर्वोत्तम पिंगे या लेखसंग्रहात मला जाणवलेले सार हे असे आहे:

👍"माणसाचं आयुष्य नशिबाच्या धनुकलीवर पिंजलं जात कुठे कसं वाहत जाईल, ते कळतच नाही. त्याचे गुण त्याला प्रकाशातले यश, तर अवगुण एखाद्या जहरी विषारी नागासारखे अपयशाचे फूत्कार काढत, त्याच्या र्हासाला कारणीभूत ठरतं !":

👌

धन्यवाद 

सुधाकर नातू

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य-'23/24

 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌

👍"शांतीसमाधानाचा मार्ग दाखवणारे, ग्रहबदलानुसार अनुकूल गुणांवर आधारित संक्षिप्त वार्षिक राशी भविष्य-'23/24
!":👌
"अभिवाचन क्रमांक 170 !":
💐"प्रथम आपणा सर्वांना आणि आपल्या कुटुंबीयांना आगामी दिवाळी व नववर्ष
सुखशांती,समाधान आणि भरभराटीचे जावो, ही मनःपूर्वक सदिच्छा !

आत्मविकासासाठी मागील व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मॅनेजमेंट मंत्र सांगितला गेला नव्हता. तो म्हणजे 'EAR' !:
E-Expectations
A-Actions
R-Results
अर्थात अपेक्षा आणि प्रयत्नांचा योग्य तो समतोल राखला, तर मिळणारे फळ समाधान देणारे असते हा तो मंत्र आहे. याच मंत्रावर आधारित आपण आपल्या चंद्रराशीला ग्रहबदलानुसार मिळालेल्या अनुकूल गुणांकडे पाहू शकता. त्यानुसार आगामी वर्षात आपले प्रयत्न आणि अपेक्षा ह्यांचा समतोल साधत, आपल्या प्रगतीचा मार्ग निवडू शकता.

अशा तर्हेचे हे एकमेवाद्वितीय "वार्षिक संक्षिप्त राशीभविष्य" येथे श्री सुधाकर नातूंच्या लेखांमधून विस्ताराने उलगडले आहे. त्याचे सुलभ अभिवाचन श्री उदय पिंगळे येथे तन्मयतेने सादर करत आहेत सादर करत आहेत, ते शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐका.....नीट समजून घ्या....
जाता जाता चंद्रराशीनिहाय नशिबाच्या संपूर्ण कालखंडातील परीक्षेचा निकाल असा:
👍सर्वोत्तम पहिल्या गटात, पहिला क्रमांक कन्या, दुसरा धनु आणि तिसरा मेष....👌
सोबत राशीनिहाय माहवार अनुकूल गुण कोष्टके आपल्या संग्रहासाठी दिली जाणार आहेत. त्यानुसार आपणच आपल्या जीवनाचे यशस्वी शिल्पकार व्हा !":💐
💐II शुभम् भवतु II💐
त्यासाठी...पुढील लिंक उघडा......
https://drive.google.com/file/d/1ds70vmwhx8reZ6uHeDk-oEHual3exvk6/view?usp=drivesdk

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

😄"Food For Thought !":😄

 😄"Food For Thought-1 !":😄

In yesterday's 'Golden hour' 8 to 9 pm, I played an interesting mind game. All I did was to attempt to define the 'Very Purpose' of 5 different classes of people from our day to day Life. When u go through it now, u would also be tempted to repeat what I did. :

The Vital Definitions: 
1. The Students reflect the learnt understanding of the knowledge/information assembled by them in their minds.

2. A Teacher transmits the desired knowledge and information to the best of his ability, so as to be clearly understood by his students for it's reproduction, as and when needed.

3. An entrepreneur, having identified the needs/wants of his target customers,  which can be offered by him, goes on to do it  continuously, at a profit that's feasible in the competitive market.

4. An employee attempts to do continous value additions for the organization, which are much more than his own economic burden on the organization, where he is employeed.

5. A writer converts his creative imagination into a form that is welcome by his prospective readers.

Friends, that's what I have done here. If interested, how about you? Thanks.

############################

 😄"Food For Thought-2 !":😄

"Few irritating issues ! : 
On the foot-over bridges, the dirt spread every where, the loud noise and unauthorized occupation of hawkers; the footpaths too, grabbed by hawkers or occupied by slum dwellers, on the roads, parked vehicles, on the both sides and unending flow of vehicles making road walk,  as well as cross-over almost impossible; the poor citizen has no where to go, as the roads too, have potholes in between to give them company!

Hardly, any public wash rooms in the city roads and dirty, filthy wash rooms if any, on the railway stations; what activity goes on the sides of the rail tracks in the morning, less said the better; more and more slums and traffic jams, careless drivers not following traffic rules, the cigarette smokers on the road, adding already very polluted atmosphere, no one having any control over them...... 

These are just few grass-root irritating issues a citizen is facing every day and night, not to speak of the other monsters like lawlessness, rising corruption and the pinching  inflation as if, hand in hand, appetite and passion increasing, showers of shameless advts spread all over, to name few of such major irritants. 

In spite of this, the competing political parties' leaders however seem to have blind eyes to the real plight of the poor citizens and they only go on criticizing the other contenders, even their earlier 'partners' more and just not bothered about what's the 'Reality' on the ground, forgetting at all to show the way to combat these evils. 

God bless them? No, Sorry,  but God  save the poor, pathetic  citizens from these Power sharks! Thank You."
##########################

 😄"Food For Thought-3 !":😄

"La Tamasha !":

Our Festivals seem to hv lost their original purpose and they hv become Events a La Tamasha and most importantly Nuisance of Noise pollution. 

Like there is a policy consideration of banning cigarette smoking in public places in festivals too, programmes should not be in open places with music playing thruout the day and upto almost midnight, as the desired levels of decibles of noise and the time limit are never controlled to the extent required. 

Who is going to take a note seriously to the fact that Like cigarette smoke, loud continuous loud noise too damages heath. Moreover such noise disturbs students' studies and patients too. 

When are we all going to be wise and learn the fundamental principle of a cooperative living, ' to do only that which is at least not harmful to others.' Honestly, why others should suffer,  just for your own  enjoyment?"

#######################################

Sudhakar Natu


Sudhakar Natu

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

👍"आचारसंहिता एक अत्यावश्यक गरज !":👌

 👍"आचारसंहिता एक अत्यावश्यक गरज !":👌


💐"अस्मिता वाहिनीवरील सकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारा 'चिंतन' हा कार्यक्रम मी गेल्या काही दिवसापासून सातत्याने ऐकत आहे. त्यापूर्वी सहा ते साडेसहा मधील मंगल प्रभात, जर गाणी ऐकावीशी वाटली तरच ऐकतो. या सवयीमुळे लवकर उठण्याची जशी सवय लागली आहे, त्याचप्रमाणे आदल्या रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान झोपण्याची आपोआपच मला शिस्त लागली आहे. शिवाय 'चिंतन' ऐकल्यावर सात ते सातच्या आसपास पर्यंत मी 'सोमि'वरील सर्विंग करतो, माझा एखादा नवनिर्मित संदेश देखील पाठवतो.

नुकतेच 'चिंतन' या कार्यक्रमात 'कायदा'  या विषयावर डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार ऐकले. त्यामधून कायदे हे आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी आणि हितकारी पद्धतीने आपले जीवनव्यवहार आपल्याला करण्यासाठी सर्वंकष विचार करून केलेले असतात. त्यासाठी प्रत्येकाने विहित कायदे काटेकोरपणे पाळले पाहिजेत,  हे त्यामध्ये आवर्जून मांडले होते.

दुर्दैवाने सध्या कायदे मोडणे ही एक प्रतिष्ठेची बाब समजली गेल्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत चाललेली आपण पहात आहोत. सर्वसाधारणपणे समाजामध्ये 90% माणसं प्रामाणिकपणे सरळ मार्गी पद्धतीने आपली जीवन प्रमाणात करावी या इच्छेने जगत असतात. कदाचित उरलेले दहा टक्के कायदे पाळण्यात बेेपर्वाही आणि अपराधी प्रवृत्ती असलेले दिसतात. शेवटी, दुधामध्ये जसा एखादा मीठाचा खडा टाकला, तर ते नासून जाते, त्याचप्रमाणे ही अल्पसंख्य गुन्हेगारी वृत्तीची माणसे समाजातील व्यवस्था मोडकळीस आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात हे दुर्दैव !

प्रत्येक व्यक्तीने जर कायदे व्यवस्थित पाळले तर शांतता आणि सुव्यवस्था तर राहीलच परंतु अनेक बाबींवरील आपले मनुष्यबळ आणि आर्थिक क्षमता यांची बचत होऊ शकेल. अर्थात असे होणे हे, असे स्वप्नच की जे कधीच प्रत्यक्षात येणार नाही !

या पार्श्वभूमीवर मी माझ्या पुरता सोशल मीडिया मोबाईल फोन आणि एकंदर व्यावहारिक जीवनात बोलणे या विषयांवर आचार संहिता तयार केली असून ती पाळण्याचा माझा यापुढे प्रयत्न राहील आपणही या तीनही आचारसंहिता नजरे खालून घालाव्यात आणि आपल्याही स्वतःच्या अशा याच पद्धतीच्या आचारसंहिता बनवाव्यात, अशी माझी नम्र सूचना आहे !":💐.
############################
 👍"सोशल मिडीया: 
माझी (फिसकटणारी?) आचारसंहिता !"::👌

१ दररोज जास्तीतजास्त प्रत्येकी चार स्वनिर्मित उपयुक्त संदेश-फेबु wapp वर पाठविणे.
२ नीट तपासून अत्यावश्यक संदेशच पुढे पाठविणे.
३. ज्यांच्याकडून जेव्हां आपल्याला संदेश येतात, त्यांनाच अनाहूत संदेश पाठविणे.
४ विषयाविना असलेला विडीओ वा फोटो न पहाता डिलीट करणे.
५. ब्लॉग व चँनेल प्रमोशन आठवड्यातून फक्त दोनदाच.
६. राजकीय विषयावर संदेश पाठविणे शक्यतो टाळणे.
७ लोकोपयोगी, विचार, विकास प्रवर्तक असे स्वनिर्मित संदेशच शक्यतो पाठविणे.
८ केवळ उपयुक्त व रास्त संदेश वा विडीओ आँडीओ forward करणे
९ "रंगांची दुनिया" समुहात संदेश वेळापत्रक तयार करून त्यानुसार एक दिवसाची गँप सोडून ते प्रकाशित करणे.
१० आठवड्यात निदान एक दिवस सोमिवर गैरहजरी ठेवणे.
############################

👍"मोबाईल फोनसाठी माझी आचारसंहिता !":👌
# शक्यतो मी स्वतःहून कोणाला फोन करत नाही.
# अगदी नितांत आवश्यकता आणि योग्य ते काम असेल तरच त्या व्यक्तीला फोन करतो.
# पुष्कळदा फोन करण्यापूर्वी व्हाट्सअप करून फोन करू कां असे विचारतो.
# माझ्या संग्रही असलेल्या फोन नंबरचेच आलेले फोन मी घेतो.
#अनाहूत फोनवरून आलेला काॅल मी घेत नाही.
# माझी अपेक्षा: व्हाॅट्सअपवर त्या अनाहूत व्यक्तीने आपले नाव आणि फोन करण्याचे कारण प्रथम संदेशाद्वारे सांगावे, माझा होकार आल्यानंतरच त्या व्यक्तिने मला फोन करावा.
#####################
  
👍 "फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्टसाठी माझी आचारसंहिता !":👌
# आता मी स्वतःहून सहसा कुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही.
# आलेली फ्रेंड रिक्वेस्ट जर परिचय लॉक केला असेल तर शक्यतो स्वीकारत नाही.
# कुठलीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सामायिक परिचित व्यक्ती अर्थात फ्रेंड्स कोण आहेत, ते पाहूनच निर्णय घेतो.
# यापुढे शक्यतोवर कोणीही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही, तरी चालेल.
#####################
आणि आता सर्वात महत्त्वाची अशी.......
"बोलावे कसे किती या संबंधी माझी आचारसंहिता !":
ही आचारसंहिता तयार करण्यापूर्वी मला आठवले की, केव्हातरी श्री संत तुकाराम यांनी वाणी कशी वापरावी यासंबंधी अभंग लिहिले होते. 
फेसबुकवर आणि गुगलवर जाऊन मी ते शोधण्याचा आटापिटा केला आणि अखेरीस माझ्या गुुगलवरील प्रयत्नांना यश आले. 

संत तुकारामांचे पुढील अभंग आपल्या सर्वांना बोलण्यासंबंधीची 
आचारसंहिता सहजतेने सांगून जातात.....
😆 "घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये !"😆
इती संत तुकाराम!

हीच आचारसंहिता म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार आहे....
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

"शारदोत्सव: 'शब्द- रंगढंगगंध !": 👍आयडियलचा कट्टा'-अनोखी साहित्य जत्रा !":👌

 👍"रंगांची दुनिया !":👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

👍"शारदोत्सव: 'शब्द- रंगढंगगंध !":
👍आयडियलचा कट्टा'-अनोखी साहित्य जत्रा !":👌

💐"मी 'भक्ती पंथेची जावे' या पुस्तकाच्या प्रभावामुळे दादरचे वसंत वाचनालय
सुरू केले, त्याला आता दोन अडीच महिने झाले. अशा वेळेला अचानक माझ्या हाती श्री अशोक बेंडखळे यांनी लिहिलेले 'आयडियलचा कट्टा' हे पुस्तक हाती आले आणि मला जणू अनोख्या साहित्य जत्रेे भाग घेतल्याचा विलक्षण अनुभव आला !

'आयडियल बुक डेपो' हा दादर मधील जुना प्रतिष्ठित असा बुक डेपो आहे. त्याचे कांताशेठ नेरुरकर आणि अशोक बेंडखळे या दोघांनी मिळून साहित्यिक गप्पांचा
आयडियलचा कट्टा हा रोमांचक सिलसिला आठ जानेवारी 1993 रोजी मोठ्या आव्हानात्मक स्थितीत सुरू केला. तेव्हापासूनच्या घडामोडींची माहितीपूर्ण मनोरंजक, अशी लेखक प्रकाशक वाचक आणि अर्थातच स्तंभलेखक पत्रकार यांच्या गप्पांंच्या मेळाव्याची ही अद्भुत कहाणी आहे.

जवळजवळ 50 हून अधिक मान्यवर असे साहित्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या दरमहा  गप्पांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा हा आढावा म्हणजे गेल्या जवळजवळ तीन दशकातील मराठी सारस्वताचा जणू एक
जीताजागता इतिहासच आहे, असे मला जाणवले अन् मी प्रभावीत झालो.

'लक्षवेधी नोंदी' हे हाताने लिहिण्याचे माझे जे प्रयत्न होते ते पुनश्च या पुस्तकामुळे, मी पुनरुज्जीवीत करू शकलो.  माझे हे पुस्तक वाचून झाल्यावर, ताबडतोब केेवळ एका दिवसात, मी त्यावरील माझा अनुभव आणि रसास्वाद थोडक्यात हा एकटाकी हाताने लिहून काढला. ज्या हाताने माझी बोटे वयोमानपरत्वे थरथरत असल्यामुळे, मला साधी सही करता येत नव्हती, त्याच हाताने मी जवळजवळ सहा पृष्ठे लिहून काढली हे नवलच आणि त्यामागे या पुस्तकाची प्रत्यककारी प्रेरणा आहे.

असे संग्राह्य पुस्तक माझ्या हाती आले हे माझे अहो भाग्यच ! वसंत वाचनालयाबरोबरचा माझा हा ऋणानुबंध असाच वृद्धिंगत होत जाणार असा मला विश्वास आहे. माझ्या त्या हस्तलिखित नोंदी पुढे दिल्या आहेत, त्यात आपण जरूर नजरेखालून घालाव्यात":💐

चुकभूल द्यावी, घ्यावी.

धन्यवाद
सुधाकर नातू


दादरचे वसंत वाचनालय सुरू केल्यापासून गेल्या तीन महिन्यात मी वाचलेली पुस्तके:
1 भक्ती पंथेची जावे- संपादक अरुण घाडीगावकर
2 तेथे कर माझे जुळती- संपादक अरुण शेवते
3 कट्टा- लेखक शिरीष कणेकर
4 आठवणीतले 'पुल'
5 बाबूमोशाय-हेमंत देसाईंंचे पुस्तक:
बॉम्बे टॉकीज
6 अक्षरसंवेदना दिवाळी अंक'22
7 आत्मरंग-लेखक आत्माराम भेंडे
8 मंतरलेल्या आठवणी- लेखक श्रीधर माडगूळकर
9 ऋतुरंग दिवाळी अंक 22
10 माझी कॉर्पोरेट दिंडी-लेखक माधव जोशी
11 मी बहुरूपी- लेखक अशोक सराफ
12 घातचक्र दोन भाग- लेखक दीपक करंजीकर
13 किस्त्रीम दिवाळी अंक 22
14 'वपु' काळ्यांचे रंग मनाचे
15 साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक'22 16 अनुबंध- लेखक सुधीर मोघे
17 विपुलश्री ऑगस्ट 23 अंक
18 व्यक्तीरंग-लेखक डॉक्टर कुमार सप्तरची
19 अनुराधा दिवाळी अंक'22
20 आयडियलचा कट्टा-संपादक लेखक अशोक बेंडखळे
21 विपुलश्री दिवाळी अंक'22
22 फिल्मफेअर ऑगस्ट'23
23 बकुळफुले, फुले मोहाची- लेखक रवींद्र पिंगे

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

👍"शारदोत्सव- मौलिक अमृतमंथन !":👌

 👍"शारदोत्सव- मौलिक अमृतमंथन !":👌

#👍"संसाराचा सारीपाट !":👌
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृति किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना, मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच कां वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून, मगच आपण वागले तर संसारात गोडी येते.

आपला संसार सुखाचा करणे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फले देतो.

आपले समाधान-असमाधान,
हे आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकतो की, परिस्थिती आपल्यावर, ह्यांच्याशी निगडीत असते.
ऊन-पावसाचा
सारा खेळ!
####################
👍"नव्याची नऊ दिवस नवलाई!":👌💐
कोणतीही गोष्ट नवीन असते तेव्हा कुतुहूलापोटी आपल्याला ती आवडू लागते. परंतु रोज तेच तेच झाले की, त्याचा आपल्याला कंटाळा येतो. अर्थात् हा म्हणजे 'लॉ ऑफ डिमिनेशनिशिंग रिटर्न' होय.

निसर्ग वा नियती आणि मानवाचे आयुष्य यांचाही असाच परस्पर संबंध असावा की काय ! माणसाचा जन्म झाला की, किती कौतुक, आवडीने लाड होतात. परंतु 'लॉ ऑफ डेमिनेशनिशिंग रिटर्न' प्रमाणे निसर्ग वा नियतीला देखील, त्याच त्या गोष्टीचा कंटाळा येत असावा, म्हणून तर माणसाचा त्याग होतो की काय ? ही निसर्गाची किमया वा इच्छा म्हणायचं दुसरं काय ?
किंवा
मानवजन्म म्हणजे जणु...
"नव्याची नऊ दिवस नवलाई !"
######################👍"तुणतुणे !":👌
"कार्यक्षमता मर्यादित असणारे,
नेहमी
'रडीचा डाव खडी' खेळत आपल्या चुकांचे, अपयशाचे खापर दुसर्यांवर फ़ोडण्याचे तुणतुणेच वाजवत रहातात !
######################
👍"सोशल मीडिया हे एक वरदान !":👌
असे मी जे नेहमी म्हणतो, त्याला आज अजून एक कारण घडले. मोबाईलवर सरफिंग करताना "लिंकड् ईन" मध्ये मला एक विलक्षण जिद्दीची आणि कठीणातली कठीण आव्हाने स्वीकारून, त्यांना धीटाईने सामोरे जाण्याची, एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलीची कहाणी वाचायला मिळाली. विलक्षण रोमहर्षक अशी ती कहाणी कुणालाही स्वतःला अंत प्रेरणा देऊन प्रोत्साहित करेल, अशीच होती.

कुठल्याशा एका रस्त्यावरील अपघातात तिला एक पाय गमवावा लागतो आणि तसे होऊनही ती निराश नाउमेद न होता, जिद्दीने आलेल्या संकटांना सामोरे जात कृत्रिम पाय बसवून हळूहळू आपल्या विस्कटलेल्या आयुष्याची पुनश्च जोमाने घडी कशी बसवते, ती ही कहाणी. एवढेच काय कृत्रिम पाय बसवल्यावर, तिच्या आवडीच्या बॅडमिंटन खेळात दिव्यांगांसाठी असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ती विक्रमी यश मिळवत जाते. एवढेच काय, तर लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही झेप घ्यायची तिची मनीषा आहे !

हे सारे वाचून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले, उर भरुन येत डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. धडधाकट माणसांचे डोळे उघडणारी, कुणालाही प्रोत्साहित करणारी अशी ही कहाणी, केवळ सोशल मीडियाच्या कृपेनेच मला वाचायला मिळाली.
म्हणूनच मी सुरुवातीचे विधान केले:
👍"सोशल मीडिया हे एक वरदान !":👌

धन्यवाद
सुधाकर नातू




"मन वढाय वढाय !"

 "मन वढाय वढाय !":

😀👍🏽"कालचा दिवस आजच्यापेक्षा चांगला होता असे म्हणण्याची वेळ उद्या येऊ नये म्हणून आजच जागे होऊन आजचा दिवस माझा असे मनोमन समजून उत्साहाने सामोरे जा. चिंतन या कार्यक्रमात आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या समाजोपयोगी विविध कार्य कर्तृत्वाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा तसेच खंबीर व्यक्तिमत्त्वाचा जो आलेख समोर उभा राहिला. 

त्याने नवीनच प्रेरणा मिळाली त्या पाठोपाठ मटा पुरवणीमध्ये भानू काळे यांचा अत्यंत कार्यक्षम आणि प्रशासकीय कार्यात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याच्या कार्याचा आढावा घेतला आणि गेला आहे आणि तो वाचून खरंच वाटलं दोन वेगळ्या शतकात जन्माला आलेली ही माणसं समाजासाठी पुढच्या कित्येक वर्षात उपयोगी पडेल असे चिरंतन कार्य करून जातात आणि आपल्या आयुष्याचे सार्थक बावन्नकशी सोन्याप्रमाणे जळाळून टाकतात असं काही ऐकायला आणि वाचायला मिळणं हे एक भाग्यच !"

😀👍🏽"आधुनिक वैद्यक शास्त्राने शरीराची पूर्ण रचना कार्यपद्धती आणि त्याद्वारे त्यामध्ये निर्माण होणारी गुंतागुंत व विविध दुर्धर रोगांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण याबाबतीत गरुडभरारी घेतली आहे. जवळ जवळ कुठल्याही अवयवाचे प्रत्यारोपण

व कृत्रिम अवयव बसवणे शक्य झाले आहे पण त्या मानाने मनाचा आणि त्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास मागेच आहे मनाचा ठाण पत्ता कुणाला लागलेला नाही अदृश्य असे मनच

माणसाच्या जीवनाला घडवणारे किंवा बिघडवणारे असते मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हटलेलं आहे. असं कां म्हटलं जाते, ते उगाच नाही !"

😀👍🏽 आपले आयुष्य हेच मुळी प्रवाही आहे. आपण ना त्याची गती वाढवु शकतो, ना कमी करू शकतो, ना ते तात्पुरते थांबवु शकतो. आत्महत्या करून ते संपवण्याचा पर्याय मात्र आपल्याकडे आहे. त्यामुळे त्या प्रवाहातुन विचारपूर्वक योग्य निवड करुन सुरक्षित आपल्या *निश्चित केलेल्या ध्येयाकडे* प्रवास करणे  एव्हढेच आपल्या हातात असते. खरेतर सुरवातीला आपल्यापुढे २/३ च ढोबळ पर्याय असतात. त्यातुन आपण एकाची निवड केल्यावर त्यातुन विस्तृत पर्यायांची मालिका आपल्यापुढे येते आणि ती वाढतच जाते. यात *आपले अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय निश्चित आणि सुस्पष्ट असेल तर पर्यायाची निवड कठीण नसते.* 

आपल्या वेळेला इंग्रजी माध्यमाचे एव्हढे स्तोम नव्हते. म्हणुन मी आपसुक शिरस्त्याप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळेत गेलो आणि abcd ७वीत शिकलो. कॉलेजच्या सुरवातीच्या काळात धडपडलो पण पुढे सावरलो. त्याने माझे काहीच अडले नाही की माझ्या पुढच्या कारकिर्दीवर त्याचा काहीही विपरीत परिणाम झाला नाही. मी फक्त शेक्सपीयर वाचला नाही एव्हढेच. पर्याय निवड ही एकाअर्थी इनाॅरगॅनिक केमेस्ट्रीच्या क्वाॅलिटेटीव्ह अनालिसीससारखी असते. पण *आपले विचार सुस्पष्ट नसतील तर समस्यांची मालिका, साखळी सुरु होते.* 

जी व्यक्ती आयुष्यात काही करते ती निश्चितच केव्हातरी चुका करते, त्यातुनच शिकते, सावरते आणि आपल्या उद्दिष्टाकडे मार्गक्रमणा चालुच ठेवते. रडत कुढत बसत नाही. आपण नेहमी म्हणतो न कि "केल्याने होते आहे, आधी केलेच पाहिजे ". 

या प्रवासात त्या व्यक्तीला असंख्य माणसे भेटतात आणि आपापले योगदान देऊन हातभार लावतात. यात अनेक विध्वंसक वृत्तीचे पण असतात. त्यांना ओळखुन, त्यांच्या पासुन दूर राहुन कौशल्याने प्रवास चालु ठेवावा लागतो. म्हणुनच *कोणाच्याही दैदिप्यमान कर्तृत्वाचे सादरीकरण करताना आधीच्या कलंकित काळ्या कॅनव्हासचा इतिहास वारंवार सांगावाच लागतो. नाहीतर नव्याने हे चित्र पाहाणार्‍याला त्याची किंमत कळत नाही.* यावर खरेतर खुप लिहिण्यासारखे आहे. ✌🏽✌🏽

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

"छाप पडलेले शब्द":

 👍"छाप(पड)लेले शब्द !":👌

👍"चाकोरी बाहेरचा धाडसी उपक्रम
!":👌
😜 "सजीवांमध्ये नर आणि मादी किंवा
मनुष्यमात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष एवढी दोन लिंग आपल्या परिचयाची असतात आणि अजून काही वेगळा प्रकार असू शकतो, याची सहसा दखल घेतली जात नाही. त्या तिसर्या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक पुष्कळदा असते, हे आपण पाहत आलो आहोत.
अशा वेळेला हे धक्कादायक वृत्त नजरेसमोर आले आणि मी अचंबित झालो.

त्या दखल न घेतल्या जाणार्या पारलिंगी (हा शब्दही आगळावेगळा) समूहासाठी काही वेगळे असे करावे हे रुईया
महाविद्यालयासारख्या, (ज्याचा मी देखील कोणी एकेकाळी विद्यार्थी होतो) त्यांनी हे धाडस करावे, हे खरोखर काळापुढचे पाऊल होय. ज्याप्रमाणे कोणी एकेकाळी रधों कर्वे यांनी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत समाजाचा प्रखर विरोध पत्करून प्रयत्न चालवले, त्याची आठवण झाली. महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या माध्यमातून काळाच्या पुढे नेणाऱ्या समाज सुधारकांच्या मांदीयाळीच्या परंपरेतील हा प्रयत्न आहे असे वाटते.

काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि त्याबरोबरच समाज देखील बंदिस्त वातावरणामधून अधिकाधिक मोकळा होत चालला आहे, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल !:😜


👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"वाचाल, तरच वाचाल !":👌

वाचनसंस्क्रुती हळू हळू लयाला जात
चालली आहे, माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे. हे चांगले नव्हे. दुर्दैवाने सोबतचे वृत्त चिंताजनक असेच आहे. उत्तरोत्तर मराठी वाचनाची जी दुर्दशा झाली आहे त्याचे निदर्शक असे हे वृत्त आहे

"प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली, पांंढर्याशुभ्र नाजूक  पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण न्हाऊन निघावे, हा एक विलक्षण अनुभव असतो.

वाचनातूनही असाच सुखद अनुभव येत असतो. वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा ज्ञान तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भावभावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते. माणसाच्या जाणिवा विस्तारित आणि समृद्ध करण्यासाठी वाचनासारखा जसा छंद नाही.

पण आज संगणक, मोबाईलचा अती वापर ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले, ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेसबूक, वाँटस्अँप इ.इ... अशांसारख्या सोशलमिडीयांमुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे.

मला एक सुचना कराविशी वाटते: पुस्तके मासिके वाचली की आपण घरातच न ठेवता इतरांना देत जावी. त्यामुळे वाचनसंस्कृती वृद्धिंगत होऊ शकते. मी शक्य होईल तशी, पुस्तके अथवा दिवाळी अंक इतरांना वाचल्यावर देत आलो आहे. त्यातही मला आनंद व समाधान मिळवून गेले आहे......"
धन्यवाद
सुधाकर नातू





"वाचा फुला आणि फुलवा !" हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे.
कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा मागोवा घेत, आपल्या जाणीवांचा परिघ विस्तारला जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो, तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. परंतु सध्याच्या भाऊबंदकी, वादविवाद उखाळ्यापाखाळ्या, टोमणे आणि अर्वाच्य शब्द याचबरोबर विलक्षण धक्का देणारे अपघात, अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या बातम्या अशा सगळ्या नैराश्यजनक बातम्यांनी सारा माहोल झाकोळलेला असताना, "छाप (पड)लेले शब्द" शोधणे हे एक जिकीरीचे काम असते.
मानवाला अग्नीचा शोध लागण्याआधी एकमेकांची संपर्क साधण्यासाठी शब्द आणि भाषा यांचा शोध लागला ही एक मानव जातीला नव्या वळणावर नेणारी
घटना होती शब्दांचे सामर्थ हे शस्त्रापेक्षाही जास्त असते, हे आपण सारे जाणतो. भाषा अनेकविध असल्यामुळे दोन भाषांमधील  प्रत्येक शब्दाचे अर्थ व साधर्म्य जाणणे हे अत्यंंत गरजेचे असते.

या पार्श्वभूमीवर अचानक आज एक मनाला उभारी देणारे व्रुत्त अवचित नजरेत आली. शब्दकोश निर्मितीचा इतिहास वाचकांसमोर थॉमस मोल्सवर्थ ह्यांनी मराठी-इंग्रजी शब्दांचा अपार कष्ट करून एक परिपूर्ण शब्दकोश निर्माण केला, हे ते व्रुत्त. त्याचीच आठवण म्हणून 'शब्दप्रभू मोल्सवर्थ'
या पुस्तकाचे प्रकाशन मोल्सवर्थच्या 151व्या स्मृतिदिनी प्रकाशित केले जाणार आहे. अशा तऱ्हेच्या शब्दकोशांमुळे दोन मने, दोन भाषिक एकमेकांना जोडणारे अनंत पूल आपोआप निर्माण होतात.  अशा तऱ्हेचे मुुलभूूत काम परिपूर्ण करणे, हे एक खरोखर कठीणातले कठीण काम असते. अशी ध्येेयवादी 'मोल्सवर्थ' सारखी माणसे आगामी पिढीला वर्षानुवर्ष उपयुक्त होईल असे योगदान देत असतात, म्हणून प्रगतीचे नवनावे मार्ग मिळत जातात. खरंच अशी माणसे हा इतिहासातला भावगर्भ  ठेवाच होय.

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

""वेचक, वेधक पाऊलखुणा !":👌

 👍"रंगांची दुनिया !"👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

👍"वेचक, वेधक पाऊलखुणा !":👌

दररोज सकाळी आपल्यापैकी बहुतेक जण वर्तमानपत्र वाचतात किंवा चाळतात, त्याशिवाय बहुधा कोणाचाच दिवस सुरू होत नाही. मी गेली सहा दशके न चुकता, महाराष्ट्र टाइम्स वाचत आलो आहे. आजच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मध्ये, मी काय वाचलं, वा काय माझ्या नजरेत भरलं त्याचा हा धावता लेखाजोखा !

'श्रावण क्वीन'चा बोलबाला'

पहिल्याच पानावर, पहिलं लक्ष वेधलं गेलं ते गेली कित्येक वर्ष तरुणींमध्ये विलक्षण लोकप्रिय असलेला श्रावण क्वीन स्पर्धेचा वृत्तांत ! सौंदर्याबरोबर बुद्धिमत्तेचीही आणि सामान्य ज्ञानाची चाचणी घेणारा हा उपक्रम करमणूक क्षेत्रासाठी खूपच उपयोगी आणि संधीचे नवीन द्वारे उघडणारा असतो. 

'सिझेरियन प्रसुती'

त्या पाठोपाठ लक्ष वेधते, प्रसुती दरम्यान वाढती सिजेरियनची शस्त्रक्रिया, बहुदा शहरी भागात अधिक, ग्रामीण भागापेक्षा पसंंत कां केली जाते त्याचे कारण: नैसर्गिक प्रसुतीमधील गुंतागुंत अथवा वेदना टाळण्यासाठी बहुदा हा मार्ग स्वीकारला जातो.

'फ्लाईंग किस'

पुुरवणीचे चौथे पान हे बहुदा रंगभूमी, चित्रपट वा टीवी मालिका व तत्सम क्षेत्रातील घटना, व्यक्ती यासाठी राखलेला असतो. सध्या चर्चेत असलेला फ्लाईंग किसचा विषय आणि बॉलीवूडच्या कलाकारांना त्यामुळे निर्माण होणारा संभ्रम आपले लक्ष वेधून घेतो.

'श्रावण खाद्य संस्कृती'

ऋतूबदलाप्रमाणे आपले खाद्य आपण बदलत जातो, तशी आपली परंपरा आहे आणि सणवार देखील त्याच प्रमाणे साजरे केले जातात. श्रावणाला आणि चातुर्मासाला सुुरूवात झाली की, वेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती कशी उपजतच आपलीशी केली जाते, त्याबद्दल देखील चविष्ट मनोरंजक उलगडा आहे.

'उघडलेली पाने'

पान उघडलं की, दुसऱ्या पानावर संपूर्ण व तिसऱ्या पानावर जवळजवळ अर्ध्या भागातील अनेक नाटकांच्या जाहिराती आपल्यासमोर आ वासून असतात. आपल्याला हे लक्षात येते की, मराठी रंगभूमी पुनश्च जोमात आली आहे. उरलेल्या भागात लक्ष वेधलं ते सारखी डोकेदुखी कां होते, यासंबंधीची उपयुक्त माहिती...

आणि आणि....

'कॅन्सर मुक्त रुग्णांचा मेळावा'

संपूर्ण वर्तमानपत्रात व पुरवणीमध्ये, मनात घर करून जाणारा व्रुत्तांंत म्हणजे कॅन्सर मुक्त रुग्णांचा मेळावा हा ! निश्चितच प्रेरणादायी तो उपक्रम तर आहेच, परंतु त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोनच दुर्धर आजारातून आपल्याला जीवनाचा नवा अर्थ व मार्ग कसा दाखवतो हेच मनावर बिंबवले गेले. 

तर अशी आहे ही म.टा. पुरवणीची  साठा उत्तराची कहाणी !

'उपसंहार':

आज सकाळी चहा नाश्ता झाल्यावर, बिछान्यावर पडून आरामशीरपणे म.टा. पुरवणी वाचता वाचता ही संकल्पना सुचली आणि लगेच ती प्रत्यक्षातही अशी आणलीही गेली ! अर्थात हा उपक्रम कितपत चालू राहील कल्पना नाही, परंतु त्यामुळे ज्यांनी वाचले नाही, त्यांना वाचावेसे वाटेल आणि ज्यांनी वाचले आहे त्यांना पुन्हा प्रत्ययाचा आनंद होईल असे मनोमन वाटते !":

धन्यवाद .                                                                  सुधाकर नातू

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

"संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य"२3/२4":

  👍"संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य"२3/२4":👌


💐💐"शुभ दिपावली"🪔🏮🕯
👍"12 नोव्हेंबर'23 पासून दीपावलीचा प्रारंभ होत आहे.
💐सर्वांना दीपावलीच्या खूप खूप
शुभेच्छा !💐... !!!!!
त्यानिमित्ताने आगामी काळाची चाहूल घेणारा, गृहबदलानुसार चंद्रराशीनिहाय अनुकूल गुणांच्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांची योग्य ती सांगड घालून समाधान कसे मिळवायचे त्याचे मार्गदर्शन
देणारा, हा खास लेख आपण जरूर वाचा.
             👍👍💐💐👍👍💐💐
👍प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर 
पाश्च्यात्य ज्योतिष रविला.  त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीतअसतो, ती आपली जन्मरास मानली 
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत 
घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि 
त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांच अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी 
मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होतअसतो. 

प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा 
संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर 
अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. 
सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार 
निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे 
चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय 
ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे 
तथ्य आहे.

👍अनुकूल गुण पद्धती:

कालचक्र अव्याहत फिरत असते, 
माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम 
प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या 
आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा 
असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो 
दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात 
असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा 
बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी 
काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी 
कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे 
अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक 
असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस 
कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या 
ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. 

👍नशिबाच्या परिक्षा: 
सोबतच्या अनुकूल गुण कोष्टकाच्या
पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली 
डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या 
वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.  

३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० 
आणि फेब्रुवारी २०२३चे जास्तीत जास्त 
अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक 
महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते 
अनुकूल गुण दाखवले आहेत. जास्तीत जास्त अशा ह्या चौदा महिन्यांंच्या कालखंडाचे 2556 गुण होतात.
 तुमच्या राशीला मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची 
युक्ती तुम्हाला मिळेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे!

👍अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख 
ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा 
आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार 
किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण 
देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
👍"नशिबाची गटवारी":👌
आगामी 1 नोव्हेंबर'22 ते 31 डिसेंबर'24 ह्या 14 महिन्यांच्या कालखंडात वरील 
महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ 
आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस 
अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले 
आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील 
गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ 
गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: कन्या, धनु व मेष
  राशी
२.उजवा दुसरा गट: तुळ, मिथुन आणि सिंह
राशी
३.मध्यम तिसरा गट: मकर , कर्क व कुंभ
 राशी.
४.डावा चौथा गट:  व्रुश्चिक
रास
५.त्रासदायक पाचवा गट: मीन व व्रुषभ
रास.
नित्य बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्रहमाला देखील हाच नियम पाळत सातत्याने मार्गक्रमणा करत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येकाचे नशीब हे सातत्याने बदलत असलेले दिसून येईल. अनुकूल गुणांच्या खास अशा पद्धतीमुळे आपल्याला त्या बदलाची अचूक अशी जाणीव होऊ शकेल.

सोबतचे माहवर राशीवार अनुकूल गुणांचे कोष्टक जर बघितले तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक महिन्यात आपल्या राशीला किती गुण मिळाले आहेत. हल्ली जसे शालांत परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेत सध्या  गुणांचा पाऊस पडला जातो, तसा पूर्वी मात्र सत्तर ते ऐंशी टक्के एवढेच गुण सर्वोच्च असत. आपल्याला सोबतच्या अनुकूल गुणांच्या तक्त्यावरून हेच लक्षात येईल की नशीबाच्या परिक्षेत कन्या ह्या प्रथम क्रमांकाच्या राशीला एकूण 1355 इतकेच गुण जास्तीत जास्त अशा ह्या चौदा महिन्यांंच्या कालखंडाचे 2556 गुणांच्या तुलनेत मिळून ही सर्वोच्च टक्केवारी 53.01% इतकीच आहे !
👍"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":👌
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

मेष: मागच्या वर्षी सहावा नंबर होता आता  5 आहे म्हणजे प्रगती आहे.
वृषभ: बरोबर उलटं झालंय मागच्या वर्षी नववावा क्रमांक होता बारा राशींमध्ये तो आता शेवटचा 12वा झालाय. कठीण परिस्थितीतून संयमाने वाटचाल करावी लागेल.
मिथुन: राशीची प्रगती आहे कारण गेल्यावर्षी 8 वा क्रमांक होता तो आता उडी मारून  5 झाला आहे.
तर कर्क रास चौथ्या क्रमांकावरून घसरत 8व्या  क्रमांकावर पोचली आहे. अपेक्षित फळे मिळण्यासाठी प्रतिक्षा ठेवावी लागेल.
सिंह: रास गेल्यावर्षी ती पाचव्या
नंबरवर होती, ती आता
कन्या: रती मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर ह्या वेळेला किंचित खाली
6 व्या क्रमांकावर जाणार आहे म्हणजे यंदा विशेष सुधारणा नसेल.
तुळ: गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर कठीण दिवस होते, आता परिस्थितींत आमुलाग्र सुधारणा होत, चक्क 4 क्रमांकावर आनंद मिळेल.
वृश्चिक रास मागच्या वर्षी दिमाखात पहिल्या क्रमांकावर होती ती आता कमालीची घसरून दहाव्या क्रमांकावर वाढत्या अडचणी, कटकटी पाहणार आहे.
धनु: त्याउलट मागच्या वर्षी पहिल्या क्रमांकावरून थोढीच खाली 2 क्रमांंक मिळवणार आहे. सहाजिकच आलबेल परिस्थिती.
मकर : तुुमची रास बिचारी बाराव्या तळाच्या क्रमांकावरून यावर्षी आशावादी ग्रहबदलानुसार 7 वा क्रमांकावर विसावा
घेऊ शकणार आहे.
कुंभ: तुमच्या राशीची मागील 11 क्रमांंकाारुन मामुली घसरगुंडी होऊन ती यंंदा 9 नंबरवर असणार आहे. जैसे थे हा अनुभव घ्याल.
मीन: तुमची रास मागील उत्साही परिस्थितीतील तिसऱ्या क्रमांकावरून जवळ जवळ तळाच्या 11व्या नंबरवर प्रतिकूल वातावरणात धडपडत राहील.

अशा तऱ्हेने राशींचे नशिबाचे आगामी वर्षांतील चढउतार तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

"विशेष संशोधन-ग्रह बदल व अनुकूल गुण":

महत्त्वाच्या सहा ग्रहांच्या बदलामुळे जे अनुकूल गुण काढले जातात, त्यामधील प्रत्येक ग्रह हा विशिष्ट राशीला ज्या स्थानाचा अधिपती असतो त्याबद्दलची फळे ही त्या ग्रहाला अनुकूल गुण संपूर्ण कालखंडात किती मिळाले आहेत त्यावरून वर्तवता येऊ शकेल. अशी याच संदर्भातली पुढची संशोधनात्मक निरीक्षणे आहे मेष राशीचे एक उदाहरण म्हणून पुढे त्यासंबंधी प्रत्येक ग्रह किती अनुकूल आहे यावरून ज्या स्थानाबद्दल फळ वर्तवायचे ते दाखवत आहे.

"हा आमच्या नवीन संशोधनाचा आणि अभ्यासाचा भाग आहे आणि अनुकूल
गुण पद्धत ही अधिकाधिक वस्तूनिष्ठ आणि व्यक्तिसापेक्ष अशी असल्यामुळे अशा प्रकारचे भविष्य हे अधिक वास्तववादी असू शकेल असे आम्हाला वाटते. येथे प्रत्येक राशीला आणि अर्थातच जन्मलग्नराशी असा दोन्ही बाजूचा अभ्यास करून प्रमाणे या सहा ग्रहांचे अधिपतींसंबंधी अभ्यासून प्रत्येक राशीची संबंधित पुढच्या 14 महिन्याच्या कालखंडाची परिस्थिती मांडता येईल.

ही या वर्षीच्या वार्षिक राशिभविष्य लेखाची वैशिष्टय़पूर्ण बाजू आम्ही मांडू शकत आहोत, याचा आनंद आहे.
1 रवी: पंचमेेश म्हणून मेष राशीला अनुकूल गुणांवरून शिक्षण संतती यासंबंधीचे फळ वर्तवता येईल.
2 मंगळ: हा मेष राशीचा अधिपती आणि प्रथम व अट्टम स्थानाचा देखील मालक म्हणून मंगळाच्या गुणांवरून आरोग्य अचानक अडचणी आणि एकंदर मानसिक स्थिती याचे निदान करता येईल
3 बुध: हा मेष राशीला तृतीय स्थानाचा व षष्ठ स्थानाचा मालक असल्यामुळे बुधाच्या गुणांवरून मेष राशीला बहिण-भावंडे, प्रवास आणि एकंदर उत्साह कर्तृत्व आणि शत्रू आरोग्य याविषयी अनुकूल गुणांवरून भविष्य वर्तवता येईल.
4 गुरु: हा मेष राशीला भाग्य आणि जयेश त्यामुळे दूरचे प्रवास नवीन संधी भाग्य त्याचप्रमाणे अचानक खर्च अडचणी असे अनुकूल गुणांवरून व्यक्त करता येईल
5. शुक्र: मेष राशीला द्वितीय स्थानाचा अधिपती तसेच सप्तम स्थानाचाही या महत्त्वाच्या स्थानांवरून शुक्राच्या गुणांवरून मेष राशीला आर्थिक स्थिती कौटुंबिक सौख्य भागीदारी जोडीदारा बरोबरचे संबंध याबद्दल होरा व्यक्त करता येऊ शकेल
अनुकूल गुणांवरून शेवटी,
6 शनि: हा मेष राशीला दशम आणि लाभस्थानात असल्यामुळे वडिलांचे आरोग्य व्यवसाय आणि त्यामधील प्रगती नवीन संधी लाभाचे योग यावरही आपल्याला अनुकूल गुण मार्गदर्शक ठरतील.

मेष राशीला चंद्र चतुर्थाचा स्वामी आहे. त्यामुळे मेष राशीच्या सर्व ग्रहबदलांवरुन मिळणार्या एकूण अनुकूल गुणांवरुन मातृसौख्य, स्थावर आणि एकंदर मानसिक सौख्य यासंबंधीचे आगामी दिवस कसे असतील ते वर्तवता येईल.
इतर राशींच्या बाबतीत अशी समस्या बहुदा येणार नाही, कारण तिथे चतुर्थ स्वामींचे जे ग्रह असतील त्यांचे गृह बदलावरून गुण पाहून ते भविष्य वर्तवता येईल.
👍"शनीची साडेसाती":

साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि 
जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व  तुमच्या 
राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते.
उदा: 
सध्या कुंभ राशींत शनी आहे, म्हणून आता 
मकर,कुंभ मीन राशींना साडेसाती आहे. शनी मीनेत
२९ मार्च २०२५ रोजी जेव्हा प्रवेश  करेल, तेव्हा मकर राशीची साडेसाती 
संपेल, मात्र तेव्हा मेष राशीला सुरू होणार.
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी  सुरु झालेली असून दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.​
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.
१२ मीन: शनीची साडेसाती २९ एप्रिल'२२ ते १२ जुलै'२२ होती व नंतर पुन्हा १७ जाने'२३ ते 7 aug'29  पर्यंत ती राहील.

👍वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

👍सर्व वाचकांना आगामी कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.
।। शुभम् भवतु ।।

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
1 राशीनिहाय माहवार अनुकुलगुण कोष्टके:'२३/24
सोबत वरील चार प्रकारची गोष्ट ते जोगी आहेत:
# कोष्टक 1: प्रत्येक राशीचे प्रत्येक महिन्याचे प्रथम माहवार अनुकूल गुण त्यानंतर त्या त्या महिन्यात त्या राशीचा बारा राशींमध्ये क्रमांक.
# कोष्टक 2 व 3: वरील माहिती सुलभ करून दोन कोष्टकामध्ये दाखवली आहे पहिल्या मध्ये महावार, राशीवार अनुकूल गुण; दुसऱ्यामध्ये माहवार त्या त्या महिन्याचा राशींचा क्रमांक.
# कोष्टक 4: या कोष्टकामध्ये महावार राशीवार अनुकूल गुणांची टक्केवारी दिली आहे ही अधिक स्पष्ट प्रत्येक राशीची स्थिती दाखवेल.
2 राशीनिहाय माहवार अनुकुलगुण कोष्टके:'२३/24
ज्यांना हवे असेल त्यांनी आपल्या नांव, गांवात whatsapp mb number प्रतिसादाा द्यावा अथवा 9820632655
ह्या नंबरवर whatsapp msg ने पाठवावा.