बुधवार, २७ डिसेंबर, २०२३
"रंग-बेरंग !":
"रंग-बेरंग !":
प्रत्येक कल्पना ही वेगळी असते, नवीन असते तसेच तिचे प्रयोजनही आगळे वेगळे असते. साहजिकच त्या कल्पनेचे मूर्त स्वरूप काय आहे, हे समजण्यासाठी त्याला शीर्षकही चपखल द्यावे अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे आता माझ्या मनात, जे घडतं, जे वाचतो वा पहातो किंवा ऐकतो, आपण जे अनुभवतो त्यामधलं काळं गोरं किंवा खट्टा मीठा काय असू शकेल, याचा उहापोह करणारा ऐवज आपण लेखाच्या स्वरूपात सादर करावा, अशी कल्पना माझ्या मनात आली. बघता बघता पहिलं स्फूट तयार झाल्यावर त्याला नांवही अचूक असं मिळालं 'रंग-बेरंग' ते चपखल
कां, ते तुम्हाला पुढील पहिल्या पुढील नोंदीवरून लक्षात येईल:
# "अती तिथे माती !"
एका नामवंत अभिनेत्याची धावपळ आणि त्यासाठी त्याने केलेले प्रवास व घेतलेले श्रम याचे वृत्त नुकतेच वाचायला मिळाले. सध्या गाजत असलेली एक टीवी मालिकेचे चित्रण, व्यावसायिक नाटकाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रयोग आणि त्या जोडीला नव्या प्रायोगिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असे त्रिस्थळी कलाविष्काराचे क्षण खरोखर त्याचे कौतुक करावे असेच निश्चित होते.
पण यश मिळत असतं त्या वेळेला, आपल्याला भान राहत नाही आणि आपण ते यश प्रसिद्धी आणि त्यातून होणारी आर्थिक समृद्धी यामागे धावत सुटतो. अर्थात कोणी किती धावायचे याचा विचार ज्याचा त्याने करावा असेच या वृत्तावरून वाटले. त्याचे कारणही तसेच होते, नुकताच तसा तरुण असलेल्या श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्याचे वृत्त ताजेच होते. त्यामुळे कुठे धावायचे, किती धावायचे याचे भान सर्वांनीच विशेषत: कलावंतांनी ठेवायला हवे असेच मनात आले,
अखेरीस 'मॉडरेशन इज द की' हे सर्वांनी लक्षात ठेवले, तर चांगले. कारण नाही तर अति तेथे माती होऊ शकते. शेवटी यश आणि प्रसिद्धी ही कायम टिकत नाही ती क्षणभंगुर असते. म्हणूनच त्याची किती हाव ठेवायची आणि स्वतःला विसरून हे असे आपल्या शरीरारोग्याचे हाल करणाऱ्या किंवा हानी करणाऱ्या गोष्टींमध्ये किती गुंतायचे, हे ज्याने त्याने ठरवणे गरजेचे आहे !
# "कोण बरोबर कोण चूक !":
त्याच पुरवणीत दुसरे एक वृत्त वाचले, तेही असेच मन व्यथित करणारे आणि संभ्रमात पाडणारे होते. मुंबईमध्ये आधीच हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विविध प्रकारचे असे त्रास आणि रोग होत आहेत. त्यातून आता कोरोनाचा नव्या वेरियंटचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांचा आणि त्रासाचा आधीच त्यांना मनस्ताप होत आहे. अशा वेळेला वाढत्या कबुतरांच्या संख्येचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. भूतदया प्रेमी मंडळी मुंंबईत विविध ठिकाणी कबूतरखाने आहेत, तिथे कबुतरांना दाणे घालतात आणि त्यामुळे कशा समस्या निर्माण होताा, त्याचे ते वृत्त होते. कबूतर जेव्हा उडतात त्यावेळेला हवेमध्ये त्यांची विश्टा आणि पिसे उडून श्वसन विषयक रोग निर्माण होतात, हा सध्याचा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे दाणे घालणारे, काहीतरी पुण्याचे काम करतोय, म्हणून रंगात येतात, तर दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाल्यामुळे सारा बेरंग होत आहे. बिचारे प्रशासकीय अधिकारी, धावून धावून किती कुठे धावणार असाही तो प्रश्न आहे. शेवटी काय बरोबर, काय चूक याचे तारतम्य ज्याचे त्याने ठेवायला हवे, एवढेच म्हणावयाचे. पण हाही एक रंग बेरंगाचाच नमुना !
# "किती, ही भटकंती, कशासाठी ?":
तिसरा मुद्दा जो नजरेसमोर आला, तो म्हणजे मुंबईकरांसारख्या शहरी मंडळींची भटकंती ! कोकणातले सगळे किनारे आणि गाव फुल्ल आहेत आणि मुंबई एक्स्प्रेस रोडवर पाच पाच, सहा किलोमीटरच्या रांगा लागून ट्रॅफिक जॅम आहे. अशा तऱ्हेच्या बातम्या आपल्याला बहुतेक वीकेंडला वाचायला मिळत आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर खरंच वाटतं की, एवढा सोस कशाला ? सुखाचा जीव प्रवासामध्ये, जो प्रवास खरं म्हणजे तीन साडेतीन तासात होईल तो सहा आठ तास करत घाावाायचा? हे कशा करतात, त्याच्यापेक्षा एवढा आपण स्वतःचे ब्लॉक घेतले आहेत, ई एम आय भरतोय, तर उठ सूट अशी भटकंती करण्यापेक्षा, वीकेंडला आपल्या सुह्रुुदांबरोबर, निवडक मित्रांबरोबर एकत्र काळ घरातच मजेत घालवायला काय हरकत आहे?
म्हणजे एकीकडे पण भटकंतीची रंगत तर हवी, पण त्यामुळे हा जो त्रासाचा मुद्दा आहे आणि उगाचच भटकत राहायचं दर वीकेंडला हे कितपत योग्य आहे ? तीच गोष्ट हॉटेलिंग बद्दल हल्ली झाली आहे. कुठल्याही शहरांमध्ये विशेषत: पुणे मुंबई येथे मंडळी वीकेंडला हॉटेलमध्ये जाऊन हजारो रुपये उडवतात. आता आरोग्याच्या दृष्टीने कुठे स्वयंपाक केला जातोय, कोणत्या अवस्थेत केला जातोय, काय स्वच्छता आहे कोण ते करतोय हे काही बघितलं जात नाही. पण क्षणिक आनंदासाठी आपण पैसे तर उडवतोच पण आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो हे लक्षात कोण घेणार म्हणजे रंगबेरंगचा हा ही एक मुद्दा !
धन्यवाद
सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा