गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

""वेचक, वेधक पाऊलखुणा !":👌

 👍"रंगांची दुनिया !"👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

👍"वेचक, वेधक पाऊलखुणा !":👌

दररोज सकाळी आपल्यापैकी बहुतेक जण वर्तमानपत्र वाचतात किंवा चाळतात, त्याशिवाय बहुधा कोणाचाच दिवस सुरू होत नाही. मी गेली सहा दशके न चुकता, महाराष्ट्र टाइम्स वाचत आलो आहे. आजच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मध्ये, मी काय वाचलं, वा काय माझ्या नजरेत भरलं त्याचा हा धावता लेखाजोखा !

'श्रावण क्वीन'चा बोलबाला'

पहिल्याच पानावर, पहिलं लक्ष वेधलं गेलं ते गेली कित्येक वर्ष तरुणींमध्ये विलक्षण लोकप्रिय असलेला श्रावण क्वीन स्पर्धेचा वृत्तांत ! सौंदर्याबरोबर बुद्धिमत्तेचीही आणि सामान्य ज्ञानाची चाचणी घेणारा हा उपक्रम करमणूक क्षेत्रासाठी खूपच उपयोगी आणि संधीचे नवीन द्वारे उघडणारा असतो. 

'सिझेरियन प्रसुती'

त्या पाठोपाठ लक्ष वेधते, प्रसुती दरम्यान वाढती सिजेरियनची शस्त्रक्रिया, बहुदा शहरी भागात अधिक, ग्रामीण भागापेक्षा पसंंत कां केली जाते त्याचे कारण: नैसर्गिक प्रसुतीमधील गुंतागुंत अथवा वेदना टाळण्यासाठी बहुदा हा मार्ग स्वीकारला जातो.

'फ्लाईंग किस'

पुुरवणीचे चौथे पान हे बहुदा रंगभूमी, चित्रपट वा टीवी मालिका व तत्सम क्षेत्रातील घटना, व्यक्ती यासाठी राखलेला असतो. सध्या चर्चेत असलेला फ्लाईंग किसचा विषय आणि बॉलीवूडच्या कलाकारांना त्यामुळे निर्माण होणारा संभ्रम आपले लक्ष वेधून घेतो.

'श्रावण खाद्य संस्कृती'

ऋतूबदलाप्रमाणे आपले खाद्य आपण बदलत जातो, तशी आपली परंपरा आहे आणि सणवार देखील त्याच प्रमाणे साजरे केले जातात. श्रावणाला आणि चातुर्मासाला सुुरूवात झाली की, वेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती कशी उपजतच आपलीशी केली जाते, त्याबद्दल देखील चविष्ट मनोरंजक उलगडा आहे.

'उघडलेली पाने'

पान उघडलं की, दुसऱ्या पानावर संपूर्ण व तिसऱ्या पानावर जवळजवळ अर्ध्या भागातील अनेक नाटकांच्या जाहिराती आपल्यासमोर आ वासून असतात. आपल्याला हे लक्षात येते की, मराठी रंगभूमी पुनश्च जोमात आली आहे. उरलेल्या भागात लक्ष वेधलं ते सारखी डोकेदुखी कां होते, यासंबंधीची उपयुक्त माहिती...

आणि आणि....

'कॅन्सर मुक्त रुग्णांचा मेळावा'

संपूर्ण वर्तमानपत्रात व पुरवणीमध्ये, मनात घर करून जाणारा व्रुत्तांंत म्हणजे कॅन्सर मुक्त रुग्णांचा मेळावा हा ! निश्चितच प्रेरणादायी तो उपक्रम तर आहेच, परंतु त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोनच दुर्धर आजारातून आपल्याला जीवनाचा नवा अर्थ व मार्ग कसा दाखवतो हेच मनावर बिंबवले गेले. 

तर अशी आहे ही म.टा. पुरवणीची  साठा उत्तराची कहाणी !

'उपसंहार':

आज सकाळी चहा नाश्ता झाल्यावर, बिछान्यावर पडून आरामशीरपणे म.टा. पुरवणी वाचता वाचता ही संकल्पना सुचली आणि लगेच ती प्रत्यक्षातही अशी आणलीही गेली ! अर्थात हा उपक्रम कितपत चालू राहील कल्पना नाही, परंतु त्यामुळे ज्यांनी वाचले नाही, त्यांना वाचावेसे वाटेल आणि ज्यांनी वाचले आहे त्यांना पुन्हा प्रत्ययाचा आनंद होईल असे मनोमन वाटते !":

धन्यवाद .                                                                  सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा