गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 3":

"बिंंब प्रतिबिंब किंवा प्रतिसाद 3": "बिंब": मूळ संदेश: "आई कुठे काय करते" मालिकेत काही नव्यानं सांगण्यासारखं काहीही घडत नाही व तोच तोपणा आला आहे. ती बंद करणे श्रेयस्कर. "प्रतिबिंब किंवा प्रतिसाद": या संदेशाला उत्स्फूर्त अनेक प्रतिसाद आले त्यातील काही निवडक येथे सादर करीत आहोत: 1 बहुतेक सर्व मालिका अति लांबवून कंटाळवाण्या केल्या आहेत. 2 मालिकानांही आता भागांची मर्यादा घालयला हवी. एखाद प्राधीकरण नेमायला हवे 3 सर्वच्या सर्व मालिका छुपा अजेंडा म्हणून चालवल्या जात आहेत. 4 आम्ही एक सुद्धा मालिका बघत नाही, किती ही महिन्याने बघीतले तरी तिथेच फिरत aste 5 केबल कनेक्शन घेऊ नका बहुसंख्येने जर हे झाले तर होईल,मग जाहिराती कोण बघणार मग बंद होतील आपोआप,पण आधी केलेची पाहिजे 6 मालिका बघतच नाही हो आम्ही 7 केबलचे पैसे भरून आपण हा अन्याय का सहन करायचा? 8 ती मालिका आपल्या घरी कुणी बघत नाही पण चुकून कधी तो चॅनल लावला आणि दर्शन झालेच तरी एपिसोड लगेच कळून येतो कारण कुणी ना कुणी काहीतरी लफडे केलेले असते.. आता फक्त आप्पा आणि आजी यांचे बाहेर काही उद्योग दाखवले की मालिका बंद करतील बहुतेक.. त्या दोघांचे उद्योग pending आहेत आता.. किंवा अरुंधती ने तरी तिसरे लग्न करावे.. असाच कधीतरी चुकून चॅनल लावल्यावर कळेल.. 9 Bhikardi malika 10 पिंडे पिंडे मतीर्भिना:| 11 जवळपास सगळ्या मालिकांचे हेच झाले आहे. म्हणून तर ग्रूप काढलाय! 12 इतके दिवस चालणाऱ्या मालीकाच नकोत 14 Tya malike madhe day 1 pasun kahich sangnya sarkhe navte😂😂 15 प्रायोजकांनी स्पाँसर केलय तितके दिवस ते दाखवतील ते बघावच लागेल.बाकी श्रोत्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही. 16 अजून आजी अप्पा यांचा divorce आणि सुलेखा ताईचं लग्न, नितीन च्या न दाखवलेल्या बायको बरोबर divorce. खूप खूप राहिलंय. 17 करा बंद. आमची काहीही हरकत नाही तुमचा टिव्ही तुमचा रिमोट.... 18 इतकी irrelevant serial चालली आहे. बघूच शकत नाही 19 Tich kai...saglya band kelya tari chalel. Pithachya girni sarkhe Dhalan dalat rahtat. Rojgar Hami yojna.. 20 म्हणजे आपण अजून बघताय? 21 ईशा सुधारली दाखवा आणि मालिका संपवा. एवढी मूर्ख मुलगी कुठे असेल? 22 You have option to stop watching. But if you wish to watch Madhurani then she is not working any other serial 23 😜😜अनेक आहेत अशा serials 24 बघूच नयेत त्यापेक्षा योगासन करा 25 बरोबर आहे. 26 नाव आई कुठे काय करते आणि त्या मध्ये तर सगळं आईच करतेय जे अशक्य आहे ते पण आई करताना दिसते 27 तुमच्या सहनशीलतेला दंडवत. किती अत्याचार सहन करता. आमच्यावर हे अत्याचार होत नाही कारण आमच्याकडे टि.व्ही च नाही..... 28 Don't waste your time in watching Marathi serials. Language, crime, Superstition are presented & we as most wise personal wasting our time as well as peace of mind. Read some books, it will give a stability & many more. ITS MY PERSONAL VIEW, U PEOPLE MAY NOT AGREE 🙏🏽 29 ती व अशा मालिका बघणे बंद करणे जास्त श्रेयस्कर! मनोरंजनाला अनेक पर्याय असतात! 30 त्या मालिकेत अरुंधती, अप्पासाहेब, यशगंधार, अनघा एवढीच पात्र आहेत की ज्यांचा आदर्श घ्यावा. बाकी सगळे अनादर्शक आहेत. त्यातही कांचन, ईशा, अभिषेक हे कधीही न सुधारणारे आहेत. त्यातही अनघा एवढी समजूतदार कोणी सापडणार नाही. आता कांचचा हत्ती स्वभाव ईशाने उचलला असावा. आरोही पण छान भूमिका आहे. यशगंधार सर्वांनाच आवडावा असाच आहे. मालिका संपवा नाहीतर त्यालाही बाधा होईल. 31 तुम्ही बघणे थांबवा, TRP घसरेलंआणि मालिकाआपोआप बंद होईल. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की, हीच मालिका नव्हे तर बहुतेक सर्व टीव्हीवरील मराठी मालिका या कशाही बरकटत चाललेल्या आहेत आणि हा प्रकार खरोखर कधी ना कधी थांबायला हवा. t20 सामन्याप्रमाणे मालिकादेखील 13 26 जास्तीत जास्त 52 इतक्याच भागांच्या असाव्यात. अर्थात हे कोण ऐकणार आणि कसं होणार हा ही प्रश्न आहेच. पण इतक्या भरघोस प्रतिसादाचा अर्थ एवढाच की, सुरुवातीच्या काळात जितके उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मालिका दूरदर्शनच्या पडद्यावर येत होत्या, ते सारे आता पूर्ण बंद झाले आहेत आणि प्रगतीपेक्षा अधोगतीच वेगाने होत आहे. धन्यवाद सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा