"मन वढाय वढाय !":
😀👍🏽"कालचा दिवस आजच्यापेक्षा चांगला होता असे म्हणण्याची वेळ उद्या येऊ नये म्हणून आजच जागे होऊन आजचा दिवस माझा असे मनोमन समजून उत्साहाने सामोरे जा. चिंतन या कार्यक्रमात आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या समाजोपयोगी विविध कार्य कर्तृत्वाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा तसेच खंबीर व्यक्तिमत्त्वाचा जो आलेख समोर उभा राहिला.
त्याने नवीनच प्रेरणा मिळाली त्या पाठोपाठ मटा पुरवणीमध्ये भानू काळे यांचा अत्यंत कार्यक्षम आणि प्रशासकीय कार्यात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याच्या कार्याचा आढावा घेतला आणि गेला आहे आणि तो वाचून खरंच वाटलं दोन वेगळ्या शतकात जन्माला आलेली ही माणसं समाजासाठी पुढच्या कित्येक वर्षात उपयोगी पडेल असे चिरंतन कार्य करून जातात आणि आपल्या आयुष्याचे सार्थक बावन्नकशी सोन्याप्रमाणे जळाळून टाकतात असं काही ऐकायला आणि वाचायला मिळणं हे एक भाग्यच !"
😀👍🏽"आधुनिक वैद्यक शास्त्राने शरीराची पूर्ण रचना कार्यपद्धती आणि त्याद्वारे त्यामध्ये निर्माण होणारी गुंतागुंत व विविध दुर्धर रोगांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण याबाबतीत गरुडभरारी घेतली आहे. जवळ जवळ कुठल्याही अवयवाचे प्रत्यारोपण
व कृत्रिम अवयव बसवणे शक्य झाले आहे पण त्या मानाने मनाचा आणि त्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास मागेच आहे मनाचा ठाण पत्ता कुणाला लागलेला नाही अदृश्य असे मनच
माणसाच्या जीवनाला घडवणारे किंवा बिघडवणारे असते मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हटलेलं आहे. असं कां म्हटलं जाते, ते उगाच नाही !"
😀👍🏽 आपले आयुष्य हेच मुळी प्रवाही आहे. आपण ना त्याची गती वाढवु शकतो, ना कमी करू शकतो, ना ते तात्पुरते थांबवु शकतो. आत्महत्या करून ते संपवण्याचा पर्याय मात्र आपल्याकडे आहे. त्यामुळे त्या प्रवाहातुन विचारपूर्वक योग्य निवड करुन सुरक्षित आपल्या *निश्चित केलेल्या ध्येयाकडे* प्रवास करणे एव्हढेच आपल्या हातात असते. खरेतर सुरवातीला आपल्यापुढे २/३ च ढोबळ पर्याय असतात. त्यातुन आपण एकाची निवड केल्यावर त्यातुन विस्तृत पर्यायांची मालिका आपल्यापुढे येते आणि ती वाढतच जाते. यात *आपले अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय निश्चित आणि सुस्पष्ट असेल तर पर्यायाची निवड कठीण नसते.*
आपल्या वेळेला इंग्रजी माध्यमाचे एव्हढे स्तोम नव्हते. म्हणुन मी आपसुक शिरस्त्याप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळेत गेलो आणि abcd ७वीत शिकलो. कॉलेजच्या सुरवातीच्या काळात धडपडलो पण पुढे सावरलो. त्याने माझे काहीच अडले नाही की माझ्या पुढच्या कारकिर्दीवर त्याचा काहीही विपरीत परिणाम झाला नाही. मी फक्त शेक्सपीयर वाचला नाही एव्हढेच. पर्याय निवड ही एकाअर्थी इनाॅरगॅनिक केमेस्ट्रीच्या क्वाॅलिटेटीव्ह अनालिसीससारखी असते. पण *आपले विचार सुस्पष्ट नसतील तर समस्यांची मालिका, साखळी सुरु होते.*
जी व्यक्ती आयुष्यात काही करते ती निश्चितच केव्हातरी चुका करते, त्यातुनच शिकते, सावरते आणि आपल्या उद्दिष्टाकडे मार्गक्रमणा चालुच ठेवते. रडत कुढत बसत नाही. आपण नेहमी म्हणतो न कि "केल्याने होते आहे, आधी केलेच पाहिजे ".
या प्रवासात त्या व्यक्तीला असंख्य माणसे भेटतात आणि आपापले योगदान देऊन हातभार लावतात. यात अनेक विध्वंसक वृत्तीचे पण असतात. त्यांना ओळखुन, त्यांच्या पासुन दूर राहुन कौशल्याने प्रवास चालु ठेवावा लागतो. म्हणुनच *कोणाच्याही दैदिप्यमान कर्तृत्वाचे सादरीकरण करताना आधीच्या कलंकित काळ्या कॅनव्हासचा इतिहास वारंवार सांगावाच लागतो. नाहीतर नव्याने हे चित्र पाहाणार्याला त्याची किंमत कळत नाही.* यावर खरेतर खुप लिहिण्यासारखे आहे. ✌🏽✌🏽
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा