बुधवार, २० डिसेंबर, २०२३

"बोल, अमोल !"

👍"बोल, अमोल !":👌 # 👍"दिशा आणि दशा, फक्त एका वेलांटीचा फरक ! पण तीच वेलांटी, बरोबर कां चूक ह्यावर परिणीती होणारी 'दशा' दयनीय की, वंदनीय हे ठरत असते !!":👌 #👍"प्राजक्ताची फुले !:👌 💐"शुभ प्रभाती, कोंबडा जसा न चुकता आरवतो, तसा सकाळी साडेसहा वाजता अस्मिता वाहिनी आकाशवाणी मुंबई वरील 'चिंतन' मी ऐकायला सुरुवात केल्यापासून, 'कल्पनेतल्या अकलेचे तारे' शब्दरूपात पकडत, जणु प्राजक्ताच्या लालचुटूक देठांचा पांढर्या शुभ्र फुलांचा स्वानंदाचा सडा सोशल मीडियावर विखुुरत जातो !":👌 #👍"नशा आणि नाश, फक्त एका कान्याची अदलाबदल ! पण किती अर्थपूूर्ण व समर्पक, घातक नशा अखेरीस नाश करते हे ध्यानात आणून देणारी !!":👌 #👍"तारतम्य व समजूतदारपणा ह्यांच्यामधील सीमारेषा धुसर असते. किंबहुना समजूतदारपणा हा तारतम्याकडे नेणारा मार्ग असतो. ह्यांच्या अभावी वादविवाद, मतभेद आणि अशांती संभवते !":👌 #👍"समजूतदारपणा आणि शहाणपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात खऱ्या पण थोडा फरक आहे समजूतदारपणा हा बहुत शहा संभाव्य किंवा प्राप्त परिस्थितीतील प्रतिकूलपणा किंवा प्रतिकूल परिणाम स्वीकारणे असते तर शहाणपणा संभाव्य परिस्थितीत प्रतिकूल परिणाम येऊच नये यासाठीचा घेतलेला पवित्रा असतो !!":👌 #👍"पहाटे तीन च्या आसपासच्या वेळेला अमृतवेळ कां म्हणतात, त्याचे कारण गवसले मला ! बहुदा त्याच सुमारास झोपेतून जाग येते आणि कशी कुणास ठाऊक, जीवनानुभवाच्या मुशीतून शाश्वत विचारलहरी उचंबळून येतात !":👌 #👍"स्मरण आणि विस्मरण यामध्ये धुुसर सीमारेषा असते. काल-परवा पाहिलेल्या मालिकेचे शीर्षक काही केल्या आठवत नाही, मात्र कित्येक वर्षांपूर्वीच्या शाळेतल्या दिवसांचे अनुभव मात्र ताजे होऊन लपकन समोर येतात. ह्याला काय म्हणायचं ?स्मरण आणि विस्मरण हे कालातीत असतं, काळावर अवलंबून नसतं हेच खरं !":👍 #👍"प्राजक्ताची फुले !:👌 👍"बोल, अमोल!":👌 👍"हवेहवेसे न वाटणे व नकोसे होणे ह्यांमध्ये फरक हा, की पहिल्यात भोगलेल्यामुळे विरक्ती, तर दुसर्यामागे त्यांच्यामुळे लाभलेली त्रुप्ती!":👌 👍"बोल, अमोल !":👌 👍"मॅनेजमेंट कोर्सला असताना मी ऐकले होते की, गृहिणी ह्या जगातील सर्वोत्तम मटेरियल मॅनेजर असतात, कारण त्यांना घरामध्ये कोणत्या गोष्टी केव्हा, कशा कुठून आणि किती किंमतीला घ्यायच्या, याचे उपजतच ज्ञान असते. त्याचप्रमाणे आपणही केव्हा, कुठे, काय कसे, कुणाशी बोलावयाचे किंवा नाही बोलावयाचे, याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे !":👌 👍"बोल मोल !":👌 👍"मराठी भाषा किती लवचिक तरीही किती समर्थ, किती सम्रुद्ध आहे ! शब्दातले एकच अक्षर जर बदलले, तर किती भिन्न अर्थ त्यामुळे निर्माण होतात!! बंड कंड दंड पुंड..... धींड खिंड धेंड खिंड..... पेंड...... शिवाय काही असांसदीय शब्दही!":👌 👍"सुुख पहाता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण Missing Tile Syndrome' हे होय. ते म्हणजे, जे 'देखणं ते न दिसणं' आणि 'जे खुपणं तेच बघणं' होय !":👌 👍"बोल, अमोल-!":👌 👍"पहाटे तीन च्या आसपासच्या वेळेला अमृतवेळ कां म्हणतात, त्याचे कारण गवसले मला ! बहुदा त्याच सुमारास झोपेतून जाग येते आणि कशी कुणास ठाऊक, जीवनानुभवाच्या मुशीतून शाश्वत विचारलहरी उचंबळून येतात !":👌 👍"बोल, अमोल!":👌 👍"आयुष्यात मनभावन क्षण मोजकेच येतात अन् ते तुमचे रोम रोम फुलवत आणि चित्त वृत्ती उजळवत प्रेरक उदात्ततेच्या महासागरात तुम्हाला चिंब चिंब करून जातात ! तो अनुभव अनोखा, न विसरण्याजोगा असतो. असे मनभावन क्षण येणे भाग्याचे !!":👌 धन्यवाद सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा