बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

"मल्लीनाथी-2 !":

"मल्लीनाथी-2 !": ""ते" तसे, तर "हे" असेतसेच!: प्रादेशिक पक्ष असलेल्या, चंद्राबाबूंना आंध्रात, नंतर "केसीआर"ना तेलंगणात तसेच DMK वा AIDMK च्या नेत्यांना तामिळनाडूमध्ये अथवा नवीन पटनाईक ह्यांना ओरिसात जर स्वबळावर सत्ता मिळविता येते, तर मराठी मातीचा अभिमान बाळगत प्रारंभ केलेल्या, शिवसेनेला गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रात काही केल्या ते जमू नये, ह्यातच त्या पक्षाच्या स्वयंघोषित "स्वबळा"चा अंदाज यावा. गेले चार वर्षे त्यांना दुय्यम भूमिका स्विकारायला लागल्यापासून त्यांनी जो धरसोडीचा तमाशा मांडला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता रसातळाला जात आहे, हे वास्तव आहे. मागील खेपेस जसे मनसेचे पानीपत झाले, तसेच ह्यांचे आगामी निवडणूकीत होण्याचा रास्त धोका आहे. गुणवत्ता, धोरणांतील व प्रयत्नांतील सातत्य व सुसुत्रता, बदलत्या स्थितीबद्दलचा चाणाक्षपणा ह्या सार्यांचा सत्ताकारण हा मेळ व खेळ असतो. शेवटी पाणी, आपल्या ठराविक पातळीवरच येते, हा नैसर्गिक नियम आहे, असेच म्हणावयाचे !" (फेसबुक संदेश 5 वर्षांपूर्वी ) @ "यक्ष प्रश्न": अटीतटीच्या लढतीत भूषणावह विजय मिळविल्यानंतर, शीर्षस्थ पदासाठी होणारा जबर संघर्ष पाहून दु:ख करावे की, आपल्याकडे सक्षम नेत्रुत्वाची वाण बिलकुल नाही, ह्याचे समाधान मानावे?" # "चिरंतन": क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा, नसा नसांतूनी तो चंग करा, मना मनांतूनी ते प्रेम बहरा, चरा चरांतूनी हा नाद खरा! # 😄"तत्त्वज्ञानी योगी !":😄 👍"आपली कुणीच दखल घेत नाही, ना आपली कुणी आठवण काढतं, जणु आपल्याला बेदखल केल्यासारखं, इतरांनी किंवा आपल्या वर्तुळात असणाऱ्यांनी वागणं अशामुळे खंत करत राहणं स्वतःलाच दोष देत राहणं, मनाचा कमकुवतपणा होय. याचं कारण म्हणजे आपण समजूनच घेत नाही की, इतरांच्या भावविश्वाच्या भवतालांत आपले कुठलेच प्राधान्य नाही किंवा स्थान नाही हे ! तसे असले तरी नाऊमेद न होता, श्रेयस्कर हेच आहे की, आपण आपल्यातच गुंतून जाणं, रमणं आणि ते होण्यासाठी जे जे आपल्याला योग्य वाटतं, आवडतं, चांगलं जमतं ते ते मनापासून करत, आत्मसमाधान मिळवत आपल्याच भावविश्वात आपण विरघळत जाणं ! असं ज्यांना जमत, ते आणि तेच खरे तत्त्वज्ञानी योगी !!":👌 # 👍"ह्याला जीवन ऐसे नांव......"👍 💐मनाची द्विधा मनस्थिती पदोपदी होत असते, त्या त्या वेळेस घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे परिणाम वेगवेगळे होतात आणि आयुष्याला भिन्न वळणे संभवतात. म्हणूनच लहान वा महान थोर, प्रत्येकाचे आयुष्य हे कल्पिताहूनही अगम्य असे सुरस अन् चमत्कारिक असते..........💐 # # बदलते वास्तव हे आहे की, विविध भाषी, विविध धर्मी, विविध जाती जमाती, विविध संस्क्रुती अशा विविधतेने बनलेल्या आजच्या भारताला, एकांगी एककल्ली, दुही दुफळी-प्राधान्य पुरस्कर्ता आणि विरोधकच नको असलेला संकुचित व्रुत्तीचा मार्ग नको आहे. सर्वधर्मसमभाव सहिष्णुता व सगळ्यांना सामावून घेत सलोखा वाढवणारा, भावनिक प्रश्नांपेक्षा व्यावहारिक गरजपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा, मार्गच असणे अंतिमतः त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. धन्यवाद सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा