😊 "टेलिरंजन-काही ही हं हं !":😢
☺️ "अती तिथे माती !"😢
दूरदर्शन मालिकांमध्ये अतिशयोक्तीची हास्यास्पद परमावधी गाठली जाते आणि प्रेक्षकांना मूर्ख असल्याचे समजून आपले दृश्य रेटले जाते हा अनुभव सातत्याने येत असतो मनवा उडू मध्ये तर कहरच केला सानिकाचे स्वार्थी मतलबी आणि बिलकूल न पटण्याजोगे वागणे आणि कारणामुळे यांचा वीट आलेला असताना, ती तिचे गर्भवती नसल्याचे बिंग फुटल्यामुळे, धाकटी बहिण दीपुशी ज्या अमानुषपणे वाटते, ते अतर्क्य आहे. त्यातून तिला घराबाहेर ढकलून तिचा अपघात होतो त्यानंतर तर या मालिकेत अतिशयोक्तीचा परमावधी गाठला गेला आहे.
समोर आपली बहीण किंवा आणि मेहुणी गतप्राण अवस्था जणू असल्यासारखी पडलेली असताना कार्तिक आणि सानिका काहीही करत नाही अखेरीस कार्तिक मोठ्या भावाला इंद्राला फोन करतो आणि अपघाताची कल्पना देतो, त्यानंतर इंद्राने नुसती शिट्टी वाजवली तरी रिक्षा यायची, तो त्याची मोटरसायकल चालू न झाल्यामुळे, अक्षरशः धावत काय सुटतो ! ते म्हणजे कहर झाला. असे घडणे केवळ अशक्य आहे, हे कोणीही सांगू शकेल. पण मालिका वाल्यांना त्याची परवा नाही असेच दिसते अपघातानंतर बिचाऱ्या दिपूला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी काळ वाया जातो त्याचे काय ?
पुढचा अतिरेकी कळस, म्हणजे सानिकाने दीपूला ढकलले होते, हे मुक्ताकडून कळल्यानंतर तिला व कार्तिकला घरातून हाकलून दिल्यावर, ही दोघं निर्लज्जासारखी देशपांडे मास्तरांकडे येतात आणि तिथे आपले उरफाटे वागणे तसेच चालू ठेवतात ! इंद्रा किंवा त्याची आई दोघही देशपांड्यांना कुठलीही सानिकाच्या अपराधाबद्दल कल्पनाही देत नाहीत. त्यामुळे या नालायक जोडप्याचे संताप येईल असे देशपांड्याच्या घरी वागणे चालूच राहते, याला अमानुष अतिरेक नाही म्हणायचे तर काय ! त्यामुळे नको ही मालिका बघणे असे वाटू शकते.
असाच ऑफिस बॅक नको इतका लांबत जाणारा सुंदरी या मालिकेत केला जात आहे सुंदरी व आदित्यचे त्याच्या मनाविरुद्ध झाले लग्न आणि त्याचे अनु बरोबर प्रेम नंतर विवाह व तिला दिवस जाणे वगैरे सगळे मालिकेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत लपवणे हा कमालीचा अतिरेक ह्या मालिकेत झाला आहे अखेरीस सुंदरीला आदित्यचे कारनामे कळल्यावरही ही गोष्ट अनुला करणे वा न कळविली जाणे हेदेखील खरोखर विचित्र पण मालिका नाट्यमय होते अशा समजा खाली काहीही दाखवायचे ही सध्याची रित दिसते. त्यामुळे नको ही मालिका पहाणे असे वाटू लागते.
👍"आँप्शनला मालिकाच मालिका !":😊
"आई कुठे काय करते !";या मालिकेमध्ये आशुतोषचा एक्सीडेंट झाल्यापासून, जे काय चाललंय त्याला केवळ टाईमपास नाही तर काय म्हणायच ! कसही करून वेळ निभावायची अशा तर्हेने काहीही कसंही कंटिळवाणं दाखवलं जात आहे. त्यामुळे ही मालिका "सुंदरा मनामध्ये भरली", "जीव माझा गुंतला", "माझी तुझी रेशीमगाठ", "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं !" या पाणी घालून लांबवत मेलेल्या मालिकांप्रमाणे ऑप्शनला टाकायची वेळ आलेली आहे !
😢 "उद्धटपणाची स्पर्धा !":😢
उद्धट, नालायक, बेमूर्वतखोर आपलं तेच खरं इतर सगळे फुटकळ असे समजणारी माजखोर पात्रं व त्यांची बनेलपणे वागण्याची स्पर्धाच, जणु मराठी मालिकांमध्ये सुरू आहे असे दिसते. "लग्नाची बेडी" मधली वडील आप्पा आप्पांचे स्तोम माजवत, अक्षरशः कुण्णा कुण्णाचीही-चक्क तिला संकटात आधार देण्यार्या नवर्याचीही पर्वा न करणारी 'सिंधू', "तू तेव्हा तशी" मधील अनामिकाची मुलगी "राधा" आणि या दोघींवर कडी करणारी म्हणून "मन उडू उडू झालं !" मधली देशपांडे सरांची आक्रस्ताळी स्वार्थी मुलगी "सानिका" या तिघींमध्ये सगळ्यात नालायक व वाईट कोण, हे समजणं खरोखर कठीण आहे ! अशा तऱ्हेने ही तीनही पात्रं आपलंच घोडं कायम पुढे दामटताना दिसतात ! अक्षरशः त्यांच्या बेभान, बेताल वागण्यामुळे प्रेक्षकाचा संताप संताप होतो, परंतु आपल्या हातात रिमोट वापरून चॅनेल बदलणे किंवा मूग गिळून गप्प रहाणे हातात असते.
👍"आवडणारी निवड !":💐
💐"कन्यादान !":💐
आवर्जून पहाव्यात अशा अगदी हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच मालिका आता उरल्या आहेत. त्यामध्ये सन टीव्ही वरील "कन्यादान" ही मालिका अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत तरी उत्कंठावर्धक आणि नाट्यमय होत गेलेली आहे. पाच मुलींचे पितृत्व समर्थपणे सावरणारे अशोक वाडकर मास्तर आणि त्या मुलींच्या एक एकीच्या नशिबाच्या कहाण्या यामध्ये उलगडत जातात.
पहिल्या दोन मुलींचे विवाह तितकेसे यशस्वी होत नाहीत. कारण पहिली व्रुंदाचा नवरा भडक स्वभावाचा, कुठे कामकाजात स्थिर नाही आणि तर दुसरीचा नवरा समीर छुपा रूस्तुम विवाहापूर्वीच परस्रीशी अनैतिक संबंध ठेवणारा आणि त्याच्या विचित्र स्वभावाच्या, विघ्नसंतोषी आईवर अक्षरशः आंधळे प्रेम करणारा. त्यामुळे या दोन्ही संसारात नेहमीच काहीना काही असे त्रासदायक संकटांचे मारे होतच असतात. तिसऱ्या समंजस मुलीची- मुक्ताची व आकाशची अपयशी प्रेमाची करूण कहाणी, एवढे पुरे नाही म्हणून चौथ्या मुलीचे, वेधाचे भलतीकडेच वहावत जाणे, अशा प्रकारे "कन्यादान" ही मालिका रंगतदार करण्यात सारीच पात्रे आपल्या यथातथ्य अभिनयाने यशस्वी झालेली आहेत. विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आईविना पाच मुलींचा मायाळूपणाने संभाळ करणारे वडील वाडकर मास्तरांच्या रुपातले अविनाश नारकर ह्यांची !
👍स्वराज्य सौदामिनी ताराराणी":👌
या मालिके शिवाय "आई कुठे काय करते !" या कंटाळवाण्या मालिकेच्या वेळी सोनी मराठीवर असलेली "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" अभिमानास्पद इतिहासाला उजाळा देणारी आणि प्रेक्षकांची पकड घेणारी नाट्यमय मालिका, पाणीदार ध्येयवादी ताराराणीच्या रूपात समर्थपणे तोलून धरली जाते. सध्या "आई कुठे काय करते !" ट्रॅक सोडून कशीही भरकटत चाललेली असल्यामुळे तिच्या ऐवजी ही मालिका अधिक पसंतीची होत आहे.
😊" बॉस माझी लाडाची !"☺️
खुसखुशीत व रंगतदार गुंता असलेली प्रेमकहाणी सन मराठीवरील "बॉस माझी लाडाची ! " ही मालिका देखील न चुकता बघण्यासारखी आहे. त्यामधील कडक स्वभावाची, फॅमिली नको असलेली बॉसच्या रूपातील राजेश्वरी आणि तिचा आर्किटेक असिस्टंट, यांच्या दिलकी ही कहाणी, त्यांच्या लग्नात रुपांतर होणार की नाही, याची उत्कंठा वाढवणारी असल्यामुळे कदाचित सर्वोत्तम मालिका अशीच म्हणावी लागेल, अर्थात सध्यातरी !
😊"जे जे चांगले आहे, वा अनुकरणीय आहे, ते ते जसे कळेल, उमजेल, दिसेल अनुभव येईल त्याप्रमाणे नीरक्षीरविवेकाने गोळा करून त्याला दाद देणे म्हणजे रसिकता होय असे मी मानतो. म्हणून छोट्या पडद्यावर नजर ठेवणार्या रसिकांसाठी माझे वरील योगदान !
धन्यवाद
सुधाकर नातू