"ह्रदयसंवाद-२९": "नव्या दिशा नवे मार्ग आणि प्रेरणादायी स्फूर्ती!":
चालता चालता आपण एकटेच जेव्हा असतो, तेव्हा नव्या दिशा नवे मार्ग आणि ताजेतवाने विचार कसे निर्माण होऊ शकतात, याचा आपण ह्या खास सदरातील पहिल्या लेखात अनुभव घेतला. आज अचानक whatsapp grp वरचा एक विडीओ पाहता-पाहता आपल्याला आपणही असंच काहीतरी जगावेगळं, जगासाठी योगदान आपल्या शक्याशक्यतेतील जे असेल, ते करून दाखवायची, प्रेरणादायी स्फूर्ती निर्माण कशी होते ते उमजले.
आज मोबाईल तर लहान थोरापासून सगळ्यांच्याच हातातले एक खेळणे झाले आहे. त्यावर आपल्याला जसे काही ऐकायला मिळते, किंवा वाचायला मिळते, तसेच पहायलाही मिळते. Whatsapp ग्रुपवर आलेला तो व्हिडिओ पाहिला मात्र, तो वेगळीच प्रेरणा मनामध्ये उत्पन्न करून गेला.
त्यातील प्रसंग प्रमोशनचा होता, प्रचाराचा होता हे नंतर लक्षात आले. एक नविन चित्रपट "अनटोल्ड स्टोरी ऑफ अँन अनसंग हिरो "हवाईजादा" या चित्रपटाचे ते प्रमोशन होते. परंतु त्यासाठी अभिनेता आयुष्मान खुराणा याने केलेले सहजसुंदर स्फूर्तीदायी भाषण, भाषण नव्हे तर समोरच्या प्रेक्षकांबरोबर केलेला सहजसंवाद, कुठल्याकुठे सगळ्यांना घेऊन गेला, वेगळ्याच काळात, वेगळ्याच इतिहासात......
या व्हिडीओमध्ये जे पहाता पहाता ऐकलं, ते थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्याचा मतितार्थ वा सारांश असा होता:
'आपण विमानाने आता सहजगत्या जगभर सैर करून येतो. पण एखाद्या पक्षाप्रमाणे भरारी घेणारे हे विमान शोधले कोणी? असा जर प्रश्न केला तर अगदी कोणालाही 1903 हे साल आणि राइट ब्रदर्स यांचेच नाव लक्षात येते. पण जर इतिहासाचा मागोवा आपण घेतला, तर लक्षात येते की हे काही खरे नव्हे. त्याच्याही आधी 1895 मध्ये शंकर बापूजी तळपदे या अवलिया भारतीयाने विमानाचा शोध लावला, विमान निर्माण करून त्याचे चक्क १८ मिनिटे गिरगाव चौपाटीवर, ५०० प्रेक्षकांच्या उपस्थितात प्रत्यक्ष करून दाखवले गेले होते आणि नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे, त्यावेळी स्वतः माननीय लोकमान्य टिळक या रोमहर्षक प्रसंगाचे साक्षी म्हणून तेथे उपस्थित होते!
त्यावेळेला आजच्यासारखे सोशल मीडिया फोन व जनसंपर्काची साधने कुठलीही नव्हती. त्यामुळे अशी अत्यंत आश्चर्यकारक व महत्वाची बातमी जगभर माहित होणे, केवळ अशक्य होते. आज कुठे कोणी हुं केले की, त्याचे सारे पडसाद सोशल मीडियाच्या रूपाने जगभर सहज पसरले जातात. पण त्यावेळेस ब्रिटिशराज असल्यामुळे तळपदेंना पेटंट काही घेता आले नाही आणि इतिहासात मात्र त्यांची विमानाचा शोध प्रथम लावणारा शास्त्रज्ञ म्हणून नोंदही झाली नाही. हे खरोखर दु्ःखदच. पण असा भारतीय ज्याने विमानाचा जगामध्ये प्रथम शोध लावला, तो धडपड्या माणूस आपल्या मुंबईचाच होता. त्यांचीच "हवाईजादा" ही कहाणी आहे.
आपल्या प्रेरणादायी इतिहासाच्या
पाऊलखुणा शोधता शोधता त्या भाषणांमध्ये तिथे गीता ग्रंथाचाही उल्लेख झाला.
हसत हसत बोलणार्या आयुष्मान खुराणाने असे पुढे आणले गेले, की त्याच्या खिशात नेहमी "पॉकेट गीताबुक" असते. गीताबुक असते. त्याने पुढे प्रतिपादित केले की, जगामधील आपल्या जीवनामधील, कुठल्याही समस्येला वा प्रश्नाला उत्तर हवे असेल, तर 'गीताबुक' उघडा. त्यामध्ये तुम्हाला उत्तर आणि मार्ग सापडेल.
खरंच, या छोट्याशा दोनच पण न विसरण्याजोग्या गोष्टी, त्या व्हिडीओमधून समोर उभ्या राहिल्या आणि आपल्याला जाणवले की, खरंच आपणही कधीही कमी नव्हतो. आपलेही पूर्वज असेच
जगावेगळ्या कितीतरी गोष्टी दुनियेला देऊन गेले.
निदान केव्हा तरी, आपण या सार्या महान योगदानांची जाणीव ठेवली पाहिजे. त्यापासून स्फूर्ती घेऊन प्रत्येकाने आपल्याला जे शक्य असेल, ते काही ना काही तरी उपयुक्त आणि जगावेगळे करून दाखवले पाहिजे. ही प्रेरणा पाहता पाहता त्या व्हिडिओने दिली आणि ती फक्त मी इथे ह्या ह्रदयसंवादात तुमच्या पुढे मांडली
इतकेच.
कशी वाटली? ते जमल्यास प्रतिसादात सांगा.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu

Sir, I need your consultation.
उत्तर द्याहटवाPlease share your whatsapp number.
My name is Suresh Kurnekar, Pune
उत्तर द्याहटवा9960766196