बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-२७ ": "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":

 "ह्रदयसंवाद-२७ ":                                                                                                                          "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":


आपणच, वेळोवेळी घेतलेले निर्णय व कृती ह्यामुळे, आपले चांगले वा वाईट करत असतो.

माझ्या एका मित्राची ही गोष्ट आहे. SSC नंतर Science ला पहिल्या वर्षाला ७७% गुण त्याने मिळवल्याने इंटरसाठी त्याचा अभ्यास अधिक चांगला व्हावा, म्हणून वडिलांनी त्याला हॅास्टेलवर ठेवले. पण तेथे तो अभ्यास न करता तासन् तास मित्रांशी गप्पा वा कुठला ना कुठला खेळ खेळणे ह्यात वेळ घालवाव़याचा. एवढे पुरे नाहीं म्हणून की काय, तो काॅलेजमधे गणिताचे तास बुडवायचा.

ह्या सार्याचा परिणाम ह्या हुशार मुलाला इंटरला जेमतेम दुसरा वर्ग मिळण्यात झाला. पुढे पदवीपरिक्षेत तर तिसरा वर्ग मिळून त्याच्यावर अखेर कारकुनी करायची वेळ आली. जे खरं म्हणजे, अंगभूत हुशारीने इंजिनिअरिंग पदवी मिळवून, त्याच्या लायकीचे उच्चस्तरीय जीवन त्याला मिळू शकले असते, ते जावून त्याचे जीवन खडतर बनले. वडिलांनी दिलेली सुवर्णसंधी त्याने आपल्या चुकीच्या वागण्याने मातीमोल केली, निराश होत नशिबाला बोल लावत तो दिवस ढकलत राहीला.

सिगरेट किंवा दारू अशा अनिष्ट व्यसनांमुळे अकाली मरण येऊन कुटुंबाची दुर्दशा करणारे अनेकजण आपण पहातो. पत्ते जुगार ह्यापा़यी सोऩ्यासारखे जीवन वाया घालवून, भीकेला गेलेली माणसेही दिसतात. वेळोवेळी आपल्या आरोग्याला न जपता, डाँक्टरकडे जाणे टाळल्यामुळे दुर्धर रोगाची शिकार झालेलीही उदाहरणे आपल्या माहितीची आहेत. तसेच नोकरीतही कामचुकारपणा वा आपल्या वागण्यामुळे करीयरचे नुक़सान करून घेणारे अशांचीही हीच कथा!

सारांश 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' # असे कुणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. आपला वर्तमानकाळच आपले भवितव्य घडवत असतो!
# लेखा शेवटी ह्यावरील एक प्रतिसाद वाचा.
---------------------------
"आपणच आता 'भीम' होऊ या!":
जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल उरलेला नाही, त्याच त्याच चाकोरीतल्या त्याच त्याच वेळच्या कृती आणि रोजचे दैनंदिन सोपस्कार यामुळे जीवन अळणी झाल्यासारखे वाटत असू शकते. बदल हा निसर्गाचा नियम आहे, ह्या या नियमालाच आता तडा गेला आहे की काय, असे वैयक्तिक जीवन, विशेषतः ज्येष्ठांचे बाबतीत म्हणावेसे वाटते.

आकाशातले रंग, ढगांचे आकार, झाडांवरील पानांची सळसळ, समुद्राच्या लाटा...मनामनातील भावना... प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत असतात आणि त्या बदला मध्येच माणसाच्या जीवनातील रंग-बिरंगी वैविध्य रहस्य दडलेले असते. पण आता सगळेच जणू चार भिंतीत ठप्प झाले आहे. रोज तेच तेच चेहरे आणि रोज त्याच त्याच गोष्टी यामुळे बदल हा शब्द खरोखर भूतकाळात जमा होतो की काय अशी भीती वाटत आहे. "The Change is the only Constant" असं मॅनेजमेंट कन्सल्टंटस् म्हणत असतात, त्याचे आता कुठलेही महत्त्व उरलेले नाही अशी स्थिती आहे. कधी बदलणार हे सारे?

महाभारतातील बकासुराला जसा रोज एकेका घरातला माणूस पाठवला जाऊन, तो त्याला भक्ष करायचा, त्याप्रमाणे कोरोना सारखा महान संकटाचा अद्रुश्य भस्मासूर आ वासून जगासमोर उभा आहे. आता महाभारतासारखा बलभीम कधी येणार आणि तो बकासुराचा, ह्या भस्मासूराचा नायनाट कधी करणार, याची प्रतिक्षा चातकासारखे सारे जण करत आहेत. शेवटी जेव्हा केव्हा हे घडेल, तो सगळ्यात मोठा महाबदल असेल.

अशावेळी जी मंडळी स्वतःचे आवश्यक दैनंदिन व्यवहार स्वतः करू शकत नाहीत असे एखाद्या दुर्धर रोगाने ग्रस्त असलेले, कोणत्याही वयाचे बहुदा ज्येष्ठ जास्तकरून ज्येष्ठ नागरिक,
त्यांच्या आयुष्यात कोणताही बदल नसतो. उलट दररोजचे विधी करण्यासाठी सुद्धा त्यांना इतरांकडे पाहावे लागते आणि त्यांच्या मदतीनंच त्यांचा दिवस पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यांच्या मनस्थितीचे काय? त्या तुलनेत आपण जर स्वतःचं स्वतः सगळं करू शकत असलो, आपल्याला जे आवडतं ते तेव्हा करू शकत असलो, तर आपण कोणताही बदल होत नाही, ह्याचे दुःख करायचे कारणच काय? त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी चांगल्या अवस्थेत आहोत याचे समाधान कां नाही मानायचे? शेवटी केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाला या अवस्थेतून जायचे असतेच हे विसरुन जाता कामा नये. शिवाय सध्याचे कोरोनासारखे महासंकट येणे आणि त्यामुळे कायम चलनवलन असलेले जग जवळजवळ ठप्प होणे हाही एक महाबदलच नव्हे कां?

अचानक अजून एक नकारात्मक विचार असा आला की, सध्या निदान प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यावरच, तो व्हायचा धोका आहे. परंतु विचार करा, जर असे घडले की टेलिफोनिक संपर्क जरी घडला तरी तरी कोरोनाचा धोका निर्माण झाला तर काय? सांगता येत नाही! निसर्गाचा चमत्कार -ज्या बाधीताला हा रोग झाला आहे त्याच्याशी टेलीफोन वरूनही संपर्क साधला गेला व त्या आवाजाच्या संपर्कातूनही तो ऐकणार्याला संक्रमित होईल तर काय होईल? हा खरोखरच अतिशय भीतीदायक विचार आहे. तसे काही घडेल, असे बिलकुल नाही. पण 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे म्हणतात ते असे.

अशा बिकट समयी, शक्यतोवर असे कोणतेही नकारात्मक विचार करू नयेत, तशा बातम्या ऐकू नयेत. शक्यतोवर 'हेही दिवस जातील' अशा तऱ्हेची सकारात्मक भावना आणि आत्मप्रेरणा व आत्मस्फूर्ती, ह्या जोरावर जे आपल्याला आवडेल त्या कार्यात कायम मग्न राहणे हेच उत्तम. आता कुठला 'भीम' कधी येणार ह्याची वाट न बघता, स्वतःच प्रत्येकाने 'भीम' व्हायचे, नेहमी आनंदी व प्रसन्न उत्साही रहायचे. शेवटी सभोवताली ज्या कसोटीच्या परिस्थितीतमध्ये राहावे लागते त्या परिस्थितीशी जे जुळवून घेतात, तेच टिकून राहू शकतात, हेच व हेच मनोमनी ध्यानी ठेवायचे. आपण त्या प्रमाणे जुळवून घ्यायलाच हवे, आपण सार्यांनीच आता 'भीम' व्हवयाचेच, हाच शेवटी या अम्रुतमंथनाचा मतितार्थ! 

"करावे तसे भरावे!": 
दुनियेतील अनंत पापांचा अखेर भरला घडा, 
शिकवितो, निसर्ग कोरोनारुपी भस्मासुराचा धडा! 
आता तरी व्हा शहाणे, अन् गिरवा मुल्यांचा पाढा, 
पाळा नियम, घ्या काळजी, सुटेल संकटाचा वेढा!


अंधाराच्या किनार्‍यावर ही अशी आशेच्या किरणांची लाट येणं, हाही एक हवाहवासा बदलच.

सुधाकर नातू
# ह्या लेखावर आलेला एक प्रतिसाद:
"😀 यावर मी काय प्रतिसाद देऊ? हे वास्तव आहे. याची पाळेमुळे आपल्या पैदाशीत आणि मुख्यतः वृत्तीत असतात. एकाच घरातले, त्याच वातावरणात वाढलेले सख्खे भाऊ वेगवेगळ्या मार्गाने गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. असे का घडते? आपल्याला वेळोवेळी मिळालेली संगत यात मोठे योगदान देऊन जाते. आजचेच उदाहरण द्यायचे तर अंबानी बंधूंचे देता येईल. एक जगातील पहिल्या पाच श्रीमंत व्यक्तीत समाविष्ट तर दूसरा साफ कर्जबाजारी. दोघांचे जन्मदाते एकच पण थोडे खोलात जाऊन दोघांची वेळोवेळची मित्रमंडळी तपासुन बघावी. दोघांच्या पत्नींच्या उद्योगाचा मागोवा घ्यावा म्हणजे परिस्थिती बर्‍यापैकी स्पष्ट होईल."

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा