गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

"नियतीचा संकेत-७": "माहितीचा खजिना":

 "नियतीचा संकेत-७": "माहितीचा खजिना":


माझं काय आहे, मला अधूनमधून नवीन नवीन कल्पना सुचतात, त्या नेहमी सकाळीच चहा पिताना! लाँकडाऊनचा फायदा काय झाला, तर मला माझ्या इतके दिवस अडगळीत पडलेल्या जुन्या डायऱ्या मला पुन्हा वाचायला मिळाल्या. त्यातील व्यवस्थापन शास्त्राच्या आणि इतर काही साहित्यिक नोंदी असलेल्या खास डायरीमधून मला खूप उपयुक्त माहिती आणि विचारांचे भांडार मिळालं आणि गेले काही महिने मी त्यातूनच निवडक असे व्यवस्थापन शास्त्रावर तर ललित लेख लिहू शकलो.

त्या दिवशी, जेव्हा मी सकाळी अशीच एक माझी डायरी मला सापडली, जिला काळी डायरी म्हणतो. कारण तिचे कव्हर काळ्या रंगाच्या पुठ्याचे आहे. कदाचित आपलं भविष्य जसं अज्ञात असत, आपल्याला दिसत नसतं, तसा जणु हा ज्योतिषाच्या डायरीला काळा रंग !

ती तशी खूप खूप जुनी डायरी आहे आणि मी ज्योतिषी झाल्यानंतर जसजसा माझा अभ्यास वाढू लागला, तसतसा मी पत्रिकांचा संग्रह त्या डायरीत न चुकता करु लागलो. प्रत्येक पानावर कॅलेंडरमधली जी तारीख असेल त्या तारखेला ज्यांचा जन्म असेल त्यांची पत्रिका तिथे मी नोंदवत असे. लौकरच जवळजवळ ती संपूर्ण डायरी भरून गेली आणि जागोजागी अनेक पत्रिका लिहीलेल्या मला आता दिसत असत. आज मी पुन्हा ती जवळून बघितली तेव्हा मला लक्षात आलं की मधून मधून मला महत्त्वाच्या अशा नोंदी-जन्मतारखा जन्मवेळा आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या यांची माहिती गोळा करून ती लिहिण्याची सवय होती, त्यामुळे अनेक विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या जन्मासंबंधी जन्म वेळ स्थळ जागा वगैरे बद्दल मला नोंदी आढळल्या.

बहुधा ह्या नोंदी मी खरं म्हणजे त्यांच्या त्यांच्या पत्रिका बनवण्यासाठी अभ्यास म्हणून ठेवल्या असाव्यात. पण कारणपरत्वे इतर अनेक गोष्टीत मी गुंतल्यामुळे मला त्यावरुन पत्रिका काही बनवता आल्या नाहीत. अभ्यास करून सल्ला देऊन, विविध दिवाळी अंकात लेख गेली चाळीस वर्षे लिहून झालेले असताना, आणि वयाची पंचाहत्तरी पार केली असताना, मला काही वाटत नाही की, आता त्यांच्या पत्रिका बनवाव्यात.

त्यामुळे मला कल्पना सुचली की, एका लेखामध्ये जर त्या सर्व विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या जन्मतारखांच्या ह्या नोंदी मांडल्या तर जे अभ्यासक ज्योतिषी त्या वाचतील, आपल्या ब्लॉगवर तसा लेख टाकल्यावर, तर त्यांना त्या त्या व्यक्तींच्या पत्रिका बनवता येऊ शकतील. म्हणून या लेखाचा प्रपंच.

प्रत्यक्ष भेटीतून असेल किंवा नसेल जसजशी अनेक संदर्भात माहीती मिळत गेली, ह्या जन्मतारिखांची त्या नोंदी मी आता पुढे मांडत आहे. त्या अचूक असाव्यात असा माझा समज आहे आणि अभ्यासकांना त्याचा फायदा व्हावा हाच केवळ उद्देश. मात्र चुक भूल द्यावी घ्यावी.

# निवडक प्रथितयश व्यक्तींच्या जन्मतारखा/वेळ
स्थळः

ग दि माडगूळकर ज. 1आँक्टोबर 1919
वेळ रात्री 11 शेटफळे जि. सातारा
मालतीबाई बेडेकर ज 1-10-1905
वेळ पहाटे 3-03 मुंबई
आशा पारेख ज 2-10-1942 वेळ दुपारी 12
मुंबई
लाल बहादूर शास्त्री ज 2/10/1904
वेळ स. 11/12 वाराणसी
राजकुमार ॲक्टर साऊथचा ज 8/9-10-1927
वेळ पहाटे 3/30
रेखा ज 11/10/1958 वेळ स.11/05 चेन्नई
अमिताभ बच्चन 11/1011942 वेळ सायं 4
अलाहाबाद
डॉक्टर विजय भटकर ज 11/10/1946
वेळ रात्री 11/30 अकोला
जयप्रकाश नारायण ज 11/12-10-1902
वेळ रात्री 3 पाटणा
अशोक कुमार ज 13/11/1911 वेळ दु.2/55
भागलपूर
व दा भट ज 16/11/1936 वेळ रात्री 1-30
पनवेल
सुभाष भेंडे ज 14/10/1936 वेळ फोंडा गोवा.
हेमा मालिनी ज 15/16-10-1948
वेळ रात्री 12/30 तिरुपती
श्रीकृष्ण जकातदार ज 17/10/1919
वेळ रात्री 12/45
गोपीनाथ मुंडे ज 18/10/1949 वेळ स 6
सातारा
शम्मी कपूर ज 21/10/1931 वेळ स 6/35
पुणे
डी वाय पाटील 21/22-10-1935
वेळ रात्री 1 कोल्हापूर
राम मराठे 23/10/1924 वेळ रात्री 9/48
पुणे
लक्ष्मीकांत बेर्डे ज 26/10/1954
वेळ सायन 6/15 मुंबई
बा भ बोरकर ज 30/11/1910 वेळ रात्री 12
गोवा
शरद तळवलकर ज 1/11/1918 वेळ रात्री 12
ऐश्वर्या राय ज 1/11/1973 वेळ स 7/20
हैद्राबाद
सोनाली कुलकर्णी ज 3/11/1973
वेळ रात्री 11/27 पुणे
पु ल देशपांडे ज 8/11/1919 वेळ दु 2/30
मुंबई
लालकृष्ण अडवाणी ज 8/11/1927
वेळ स 9-27 हैद्राबाद
माला सिन्हा ज 10-11-1936 वेळ रात्री 5/50
कलकत्ता
रोहिणी भाटे ज 14/11/1924 वेळ पहाटे 3
पाटणा
डॉक्टर श्रीराम लागू ज 16/11/1936
वेळ दु 12/10 सातारा
शिरीष पै ज 15/11/1929 वेळ स 9/15
पुणे
बेबी शकुंतला ज 17/11/1932 वेळ दु 2/30
व्ही. शांताराम ज 18/11/1901 वेळ स 9/30
कोल्हापूर
शिल्पा शिरोडकर ज 2011/1973
वेळ दु 11/16 मुंबई
प्रेमनाथ ज 20/11-11/1926 वेळ पहाटे 3/15
पेशावर.
शांता आपटे ज 25/26-11-1916
वेळ पहाटे 4/15 सोलापूर
यशवंतराव चव्हाण ज 12/03/1913
वेळ सायं 6/30 देवराष्ट्रे जि सातारा
धीरुभाई अंबानी ज 28/12/1932
वेळ स 6/37 चोरवाड
जे आर डी टाटा ज 29/7/1904
वेळ रात्री 12-29 पँरिस

मीनाकुमारी ज 1/8/1932 वेळ दु 11/56
मुंबई
किशोर कुमार ज 4/8/1929 वेळ सायं 4
खांडवा
दिलीप प्रभावळकर ज 4/8/1944
वेळ सायं 4/8/1944 मुंबई
दादा कोंडके ज 8/8/1932 वेळ दु 12 मुंबई
राखी ज 15/8/1943 वेळ रात्री 11/30
कलकत्ता
कीर्ती शिलेदार ज 16/8/1952 स 8/03
पुणे
सचिन पिळगावकर ज 17/8/1957
वेळ स 7/20 मुंबई
विजयालक्ष्मी पंडीत ज 18/8/1900
वेळ स 6/50
राजीव गांधी ज 20/8/1944 वेळ स 9/15
मुंबई
सुधाकरराव नाईक ज 21/8/1934
वेळ रात्री 9/15 पुसद
गंगाधर गाडगीळ ज 25/8/1923 वेळ स 9/55
मुंबई
शिवाजी सावंत ज 30/31-8-1940
वेळ रात्री 12/35

ज्योतिष अभ्यासकांनी ह्या मौलिक माहीतीवरुन जन्मलग्नपत्रिका बनविण्याचा सराव जरूर करावा.
त्यावरून पत्रिकेचे ग्रहयोग, महादशा आदिंवरुन विश्लेषण करून त्या व्यक्तीच्या कर्तृत्व व योगदानाची मीमांसा करावी. हा खास हेतू असा माहितीचा खजिना जिज्ञासू वाचकांपुढे खुला करण्याचा आहे.

माझ्या ह्या अनोख्या प्रयत्नाचे यथोचित स्वागत होईल अशी आशा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

https://www.youtube.com/user/SDNatu

शिवाय....
२०० हून अधिक असेच खुसखुशीत व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा