मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-२६" : "आजचा दिवस माझा !":

 "ह्रदयसंवाद-२६" : "आजचा दिवस माझा !":


# "जेव्हा जेव्हा मला एखादा मूलभूत मूलगामी असा नवविचार माझ्याप्रमाणे इतरांनाही अंतर्मुख करून विचार करून नवी दिशा नवा मार्ग दाखवणारा सुचतो तो क्षण माझ्यासाठी असतो आणि तो दिवस हा माझा असतो.
त्याची ही झलक':

# "यश मिळवून जेवढं कठीण असतं त्यापेक्षा यश पचवणं हे अधिक कठीण असतं याउलट अपयश मिळवणं सोप असतं मात्र पदरी आलेलं अपयश पचवणं कठीण असतं अर्थात यश पथक अपयश पचवणं यापैकी कोणता महाकठीण या प्रश्नाला कदाचित उत्तर नाही."

# "वास्तव":
"पोट संभाळता आलं,
तर अर्धी लढाई जिंकली, अन् मनं संभाळता आली, तर जीवनात सार्थकता आलीच, आली!"

# "जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित."

# जो तो म्हणतो,
माझंच खरं,
हा हट्टीपणा, ना करे कुणाचंच भलं, बरं!"
"ह्रदयसंवाद-२६" : "आजचा दिवस माझा !":

# "एक खोटं, दहादा खरं म्हणून ठोकणारेच,
डोळ्यांवर झापड बांधून,
स्वत:चेच ढोल, स्वत:च बडव बडव बडवतात!

# "मनाचे कोडे":
आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.
पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही.

शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!

# "योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी "संयम" असणे हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे...!*

# "चंचल लक्ष्मी":
लक्ष्मी चंचल असते, तिची देवाण घेवाण सतत चालू असते. हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून, प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही; अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसर्ग नियम आहे, जो Newton च्या पहिल्या नियमानुसार आहे.

सध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या मार्गांनी येत असलेल्या लक्ष्मीचा परिणाम आहे. कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क्त हाव असते, तर दुसर्या बाजूला अगतिकता असते.

कोण, कसा केव्हां, थांबवणार भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर?

# "समीक्षेची समीक्षा":
समीक्षा करताना समीक्षक ते काम केवळ आपल्यापुरते करत नसतो, तर तो प्रेक्षंकांचा दिशादर्शक असतो. सहाजिकच त्याला सर्वसाधारण प्रेक्षकांची आवडनिवड माहीत असणे गरजेचे असते. जो हे नीट जाणून आपले परीक्षण लिहितो, त्याच्यावर सहसा टीका होत नाही. समीक्षक जसा निर्मात्या भाट नसावा, तसाच तो प्रेक्षकांचा शत्रुही नसावा, तर हितचिंतक असावा. प्रेक्षकांची नस ज्यांना जाणता येत नाही, अशांनी परीक्षणे न लिहीणे हेच चांगले!
'What 'classes' like, more often than not, masses reject And vice versa' appears unfortunately to be a reality.
-----------------------------------------------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा