शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

"टेलिरंजन-३": "काहीही, नाही ही हं'!:

 "टेलिरंजन-३": "काहीही, नाही ही हं'!:

"सत्ताधीश कसा असावा? कसा नसावा?":

छोट्या पडद्यावर टेलिरंजन करता करता, 'काही ही हं', असा भास पुष्कळ पाणी टाकत गेलेल्या कधीही बघू नयेत,अशा मालिका लांबण लावत कशा जातात, ते आपण मागच्या लेखात बघितले.

बिघडलेल्या, बेताल अशा गुरुनाथसारख्या बनेल रंगेल, माणसामुळे "माझ्या नवऱ्याची बायको" सारखी, मालिका समाजाला काय काय दिवे लावायचे, ते अजून दाखवतच आहे. पण कधी कधी, आपल्याला वेगळा अनुभव येऊ शकतो. मात्र त्यासाठी तशी छोट्या पडद्याकडे बघायची, त्यावरील कार्यक्रमातून काहीतरी वेचायची बुद्धी, मात्र आपल्याजवळ हवी.

ह्या लेखात तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कधी कधी, नवल घडू शकते आणि आपल्याला छोट्या पडद्यावरील एखादा चित्रपट वा मालिका खूप काही ना काही शिकवून जाऊ शकतात, असं लक्षात येतं.

काही दिवसांपूर्वी, मी टेलिव्हिजनवर 'महाभारत' मालिका आणि 'रमा माधव' हा चित्रपट बघितला. त्यामधून योगायोगाने मला राजा कसा असावा आणि कसा नसावा, हे सांगणार्या, अत्यंत परिणामकारक व नाट्यमय दोन परस्पर विरोधी चित्रकथा पहायला मिळाल्या.

"सत्ताधीश कसा नसावा"?:
जेव्हा पांडवांना कौरव, द्यूताध्ये दुसऱ्याही वेळी हरवून बारा वर्षांच्या वनवासात पाठवतात, तेव्हाची ही गोष्ट. त्यापूर्वी पहिल्या द्यूत सामन्यात पांडव हरतात आणि नंतर दुर्योधनाच्या पापी, सूडभावनेने प्रेरीत इच्छेपोटी, भर दरबारात, कुलस्वामिनी द्रौपदीचं अतिशय लांच्छनास्पद असं वस्त्रहरण घडतं.

त्यामुळे महाराज धृतराष्ट्राची कान उघडणी करण्याकरता, प्रत्यक्ष योगीराज व्यासऋषी दरबारात रागारागाने येतात. ते ध्रुतराष्ट्राला म्हणतात" दुर्योधनासारख्या
नालायक अशा तुझ्या पुत्रामुळे, साध्वी द्रौपदी सारख्या, आपल्या घराण्याची सून असलेल्या स्त्रीचे भर दरबारात वस्त्रहरण करण्यात आलं. त्यावेळेला तू दुर्योधनाला, ते होण्यापूर्वीच कां नाही खडसावलंस, निक्षून कां नाही थांबवलंस? शिवाय हे सारे घडल्यानंतर तरी, त्याला कठोरांत कठोर अशी शिक्षा कां तू दिली नाहीस? राजा, हे तू लक्षात ठेव की, राजा हा जनतेचे रक्षण व हित करण्यासाठी असतो, न्यायाने वागण्यासाठी असतो. तुझं कुटुंब वेगळं आणि तू राजा म्हणून वेगळा. राजा म्हणून विहीत कर्तव्य बजावण्यात, तू तुझ्या आंधळ्या पुत्रप्रेमापोटी, संपूर्ण अपयशी ठरला आहेस, तू घोर अपराध केला आहेस. अखेर तू आपल्या कुळाचा नाश ओढवून घेणार आहेस." सत्ताधीश आंधळ्या ध्रुतराष्ट्रासारखा मतलबी स्वार्थी आणि न्यायाला पायदळी तुडविणारा नसावा, हेच ह्या चित्तथरारक गोष्टीतून आपल्याला उमजते.
👍👍
"स्वतःच्याच करणीने, बेताल सत्ताधीश स्वतःच खड्ड्यात पडतात आणि आपल्या बरोबर बिचार्या रयतेलाही खड्ड्यात ढकलतात, त्याचा हा इतिहास आहे."

"सत्ताधीश कसा असावा"?:
त्यानंतर 'रमा माधव'' चित्रपट छोट्या पडद्यावर पाहायचा योग मला आला आणि त्यामध्ये पेशवा माधवरावांच्या रूपाने, खरोखर राजा कसा असावा सत्ताधीश कसा असावा ते कळलं.
चित्रपटातील ही गोष्ट पेशवा असलेल्या माधवरावांची आहे. त्यांचे मामा, रास्ते मामा निजामाला मिळून जातात आणि त्यामुळे पुण्यावर संकट येते, ते दूर करण्यात येतं. त्यानंतर रास्ते मामांना रामशास्त्री प्रभुणे दंड करतात, शिक्षा ठोठावतात.

अशा वेळेला माधवरावांची आई- गोपिकाबाई, माधवरावांकडे येते आणि म्हणते " तुझ्या मामाला शिक्षा झाली, आहे ती, माधवा, तू माफ कर, तो तुझा मामा आहे आणि माझा भाऊ आहे. त्यावर माधवराव पेशवे, जे बोलतात ते खरोखर विचारात घेण्यासारखा आहे. ते सांगतात " आई, ज्याने गुन्हा केला की, त्याला शिक्षा ही आलीच व ती झालीच पाहिजे. मग तिथे कोणतेही आपले नाते होते, ते विचारात घेणे, ही न्यायाची अतिशय भयानक पायमल्ली आहे आणि म्हणून मी मामाला कदापिही माफ करणार नाही. त्याने गुन्हा केलाय, तो सिद्ध झालाय, म्हणून त्याला शिक्षा दिली आहे, ती त्याने ती शिक्षा भोगलीच पाहिजे." 

माधवरावांचे हे करारी उद्गार ऐकून त्याची आई गोपिकाबाई म्हणते "हे बघ माधवा, शेवटचं सांगते, तू माझ्या भावाला, तुझ्या मामाला माफ कर, नाहीतर मी हा शनिवारवाडा सोडून जाईन!" हे सारे ऐकूनही माधवराव  शांतचित्ताने म्हणतात "आई मी तुझा मनापासून आदर करतो, पण तू लक्षात ठेव. माझं पेशवा म्हणून कर्तव्य वेगळं आणि नातं वेगळं, इथे मला पेशवा ह्या नात्याने, मला सारे काही न्यायाने वागावे लागेल. त्यामुळे तू तुझा विचार आहे तो सोडून दे. मी काही झालं तरी माफ करणार नाही कारण माझं ते कर्तव्य आहे."

बघा किती दोन वेगवेगळे चित्र आहेत ही-एक आहे, महाभारत मालिकेतील पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्रासारख्या स्वार्थी अन्यायी सत्ताधीशांची आणि त्याउलट दुसरे चित्र, पेशवा माधवराव यांच्या न्यायबुद्धीची. यावरुन आपल्याला लक्षात हे येतं की आपली स्वतःची नाती गोती बाजूला ठेवून, कोणत्याही चांगल्या सत्ताधीशाने जनतेचे हित साधले पाहिजे, योग्य तो न्याय नेहमीच केला पाहिजे. तरच काही ना काही तरी चांगले घडेल. समाज हा नेहमी शांत सुखी असा होत असतो. पुढे महाभारत युद्ध झालं त्या मागे आंधळ्या धृतराष्ट्राच्या, अन्यायी, नालायक दुष्ट अशा दुर्योधन ह्या पुत्रावरील प्रेमामुळे.

सारांश काय, तर छोट्या पडद्यावरदेखील आपल्याला काही ना काही तरी शिकायला मिळतं. नवे विचार आपल्याला मिळू शकतात आणि हाच तो फायदा या छोट्याशा मंथनातून आपल्याला आता लक्षात आलं असेल की सत्ताधीश कसा असावा व कसा नसावा, ते.

धन्यवाद
सुधाकर नातू
P.S.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा