बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
पुढचं पाऊल- 1 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 चे संपूर्ण राशिभविष्य
💐"पुढचं पाऊल ! ":💐
अर्थात
"ग्रहबदलानुसार अनुकूूल गुणांवर राशीनिहाय एकमेवाद्वितीय संपूर्ण वार्षिक राशीभविष्य":
1 नोव्हेंबर '25 ते 31 डिसेंबर '26
"जीवनात समाधान मिळविण्यासाठी आपल्या राशीच्या अनुकूल गुणांप्रमाणे अपेक्षा आणि प्रयत्न यांचा समतोल राखा !":💐
💐"पुढचं पाऊल 2 ":💐
"अनुकूूल गुणांवर राशीनिहाय एकमेवाद्वितीय संपूर्ण वार्षिक राशीभविष्य":
1 नोव्हेंबर '25 ते 31 डिसेंबर '26
१. मेष: सुख दु:खा, समे क्रुत्वा, मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो. सतत उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो. येथे शनी नीचीचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो. वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे तुमचा भाग्योदय येतो. विवाह हे दृष्टीने तुला राशी तुमचे चांगले धागेदोरे जुुळतात, सिंह धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो,कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो. मात्र मृत्यू षडाष्टकातील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते.
१मेष रास 7 क्र. वरून चक्क तळाच्या 12 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1078 वरून 668 झाले आहेत. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा खुुप खुप कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न मात्र प्रचंड वाढवायला लागतील.
तळाच्या राशीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला आले आहे. एखाद्या अभिमन्यू सारखी चक्रव्यूहात सापडलेली स्थिती असू शकेल
त्या दृष्टीने संयम बाळगा, अपेक्षा ठेवू नका.
परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे मनस्थिती ठीक राहणार नाही. निर्णय वेळेत न घेणे वा चुकणे असा अनुभव घ्याल. नशिबाचे खेळ अव्याहत चालतात. त्याचाच क्लेशदायक अनुभव तुम्हाला यावर्षी घ्यायचा आहे. काळ कठीण आहे, रात्र वैऱ्याची आहे. तुम्हाला सुख शांती मिळवताना खूप धडपड करावी लागेल, तर दुःख तुम्हाला नेहमीच आपलंसं करेल अशी परिस्थिती आहे. प्रवास अडचणीचे तब्येतीची विशेष काळजी घ्या. प्रवासामध्ये अपघाताचा धोका. अचानक मनाविरुद्ध नुकसान करणारे वादाचे प्रसंग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. नोकरीधंद्यात प्रयत्नांचे फळ मनाप्रमाणे मिळणारे नाही तर व्यवसायात आडाखे चुकल्यामुळे एखादा मोठा नुकसानीचा फटका बसू शकतो. विवाहोत्सुकांना विलंब फसगत गैरसमज असे अनुभव येऊ शकतात. संसारात एकमेकांशी वाद विवाद अपेक्षाभंग पाहुण्यांची उगाचच वर्दळ यामुळे त्रस्त रहा तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करावेत अपेक्षा कमी ठेवाव्यात. एक लक्षात ठेवा कठीण काळ भविष्यात केव्हा तरी जाणारच आहे तोपर्यंत प्रयत्न कष्ट हाच मंत्र आपल्याला जपायला हवा.
################
२. व्रुषभ: मज काय कमी, सुख आले माझ्या दारी!:
क्रुत्तिका नक्षत्राचे तीन, पूर्ण रोहिणी व म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहे. चंद्र इथे उच्चीचा होतो व कुणीही ग्रह नीचीचा नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योग मग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहे. रसिकता विलासी व्रुत्ती व खिलाडूपणा असतो. नेहमी नीटनेटके व प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करता. आळस नसतो, तारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य व प्रगती साधता. म्रुत्युषडाष्टकातील धनु राशी, विवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो.
व्रुषभ राशी गेल्या वर्षी 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली होती. 1343 सर्वोच्च गुणसंख्येेवरून थोडी उडी घेऊन यंदा 1427 गुण मिळणार आहेत. तरीही यावर्षी तिसरा क्रमांक आहे. प्रगतीची गाडी तशीच अपेक्षेप्रमाणे चालत प्रयत्नांना यश येणार आहे.
यंंदाही पहिल्या गटात नशीब चांगले राहणार आहे. अडचणी दूर होऊन परिस्थिती मधले मळभ निघून जाऊन निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या.
ह्या कालखंडात उत्साहवर्धक घटना घडतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. लाभातील शनी तुमचा उत्साह वाढवेल व येणाऱ्या अडचणी व विरोध यांच्याशी यशस्वी मुकाबला करू शकाल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित बदली बढती व तुम्हाला आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळी खुश होतील अशी परिस्थिती आहे. अपत्यप्राप्तीची इच्छा असणाऱ्या दांपत्याची मनोकामना यंदा पुरी होईल. नोकरी-व्यवसायात आतापर्यंत जे अपमान सहन केले, कष्ट घेतले त्याचे आता चीज होईल. व्यवसायात तुमचे आडाखे योग्य ठरून आर्थिक घडी नीट बसू शकेल. स्थावर विषयक निर्णय व कृती वर्षाच्या मध्यंतरी करणे उत्तम असेल. घरामध्ये वडीलधाऱ्यांचा सल्ला घेत राहा,
प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा.
एकंदर काय परिस्थिती तुम्हाला अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली प्रगती करून घ्या. Best luck!
3 मिथून: "मन मनास उमगत नाही, आधार कसा हा शोधू?":
मिथुन रास हि विचारही बुद्धिमान बुद्धाची रास आहे. स्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता व तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असते. कोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाही. बोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडते. तूळ व कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतात, मात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागते. म्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते.
मिथून राशीच्या नशिबी मागील वर्षी 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली होती आणि 845 गुण मिळाले होते. तेव्हा स्थिती कठीण होती मात्र यंदा 874 गुण मिळून 8 क्रमांकावर समतोल साधणाऱ्या अवस्थेचा लाभ होणार आहे.
मागच्या वर्षी पेक्षा हे वर्ष किंचीत कमी कष्टकारक जाईल. थोडीशी कुठेतरी रुख रुख राहील.
प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. मागच्या वर्षीची मृगजळासारखी परिस्थिती संपली आणि आता खरोखर वाळवंट सुरू झाले आहे अपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. नोकरीधंद्यात त्रासाचे अडचणीचे असे प्रसंग येतील व्यवसायामध्ये अपेक्षापूर्तीचा शक्यता नाही तिथे पक्षपातीचा तुम्हाला मानसिक त्रास होईल. जोडीदाराच्या प्रकृती संबंधित नवीन काळजा निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये विस्मरण किंवा ऑप्शनला टाकलेला भाग येणे, असे अनुभव यावे. प्रवास संभाळून करावेत, त्यामध्ये विलंब व वाद-विवाद संभवतो.
'वक्त ने क्या किया क्या हसी सितम'अशी तुमची यावरची परिस्थिती झालेली आहे शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरे !
##########
4 कर्क रास: कठीण समय येता, कोण कामास येतो?:
कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक व प्रतिभा माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसे हवीहवीशी असतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्य, तर मीन व वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतात. पुनर्वसु चा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण व अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते.
कर्क राशीचे नशीब फारसे बदलणार नाही कारण मागच्या वर्षी 8 क्र.वरून घसरगुंडी होऊन अकरावा क्रमांक मिळाला आहे. गुण थोडेसे कमी होऊन 835 मिळाले आहेत.
एकंदर काळ हा प्रतिकूल आहे, हे विसरून चालणार नाही. मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल. त्यातले त्यात, आगामी वर्षी फेब्रुवारी एप्रिल सप्टेंबर काळ विस्कळित घडी काही अंशी सावरू शकेल. अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा.
##########
५ सिंह:
वनराज सिंहाची ही रास, सर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असते. मात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष व धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही, पूर्ण बघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य व भरभराट अनुभवास येते.
सिंह मंडळी मागील वर्षीच्या 8 क्रमांकावरून किंचित पुढे वर घसरून 6 व क्रमांक व अनुकूल गुण 971 झाल्यामुळे साहजिकच हे वर्ष थोडीशी मनाला उभारी देऊन जाईल.
मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे विस्कळीत घडी काही अंशी सावरू शकेल. अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळींना अधिक प्रयत्न करावे लागतील नीट चौकशी करून निर्णय घेतला तर चांगले. प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा.
थोडक्यात समतोल राखत संयम ठेवावा असे तुमचे नशीब आहे.
#########
६. कन्या:
अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी व आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात ही बुद्धाची रास असून बुद्ध येथे उच्चीचा होतो मात्र शुक्र येथे नीतीचा होतो शैक्षणिक यश वाद-विवादात तुम्ही छाप पाडतात मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात त्यामुळे कपाळावर कायमच्या असे हे माणसांचे स्वरूप असते निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते विवाह हे दृष्टीने मृत्यू षडाष्टक आतील मेष रास टाळावी तर बुद्ध व मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्या बरोबर संसार आनंदाचा करू शकतात उत्तरा नक्षत्रातील पूर्ण हस्त व चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते.
कन्या राशीसाठी यावर्षी परिस्थिती थोडी आलबेल अशी राहील व मागच्या वर्षीचा पाचव्या क्रमांकावरून आता 4 क्रमांक व 1086 अनुकूल गुण आहेत, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा, समाधान त्यामुळे वाढ होईल.
मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही.
काय करू आणि काय नको असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र एकंदर कालखंड प्रगतीपथावरच ठेवणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे, मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो !
########
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा