बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

" तूळ ते मीन राशीचे एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 संपूर्ण राशिभविष्य

७ तुळा: आनंदाचे डोही आनंदतरंग!: चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण व विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुला रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा व रवि नीचीचा होतो, त्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाही. तराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी व सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असते. टापटीप छान दिसण्याची हौस व मौज-मजा तुम्हाला आवडते. वयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होते. नाट्य-चित्रपट व प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळते. विवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबर, तुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितात. मात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते. तुळा राशीने गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी 1279 अनुकूल गुण मिळवले होते. आता त्यात चांगली उत्साहवर्धक वाढ होऊन 1455 गुणांसाठी सर्व बारा राशींमध्ये सर्वोत्तम असा पहिला क्रमांक मिळवणार आहे. जणू हात लावेल तिथे सोनं अशा तऱ्हेचे घवघवीत यश तुम्हाला मिळू शकेल व नवनव्या संधी प्राप्त होतील. नशीब फळफळणार आहे उत्साह वाढणार आहे प्रयत्नांना यश येणार आहे. सहाजिकच यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना आणि परदेशगमनाची संधी तुम्ही हस्तगत करू शकाल. तसेच अधिकार पद मिळू शकेल, तर व्यवसायात आर्थिक भरभराट होईल. विवाहोत्सुकांना अनुरूप जोडीदार निवडण्यात यश मिळेल. विद्यार्थी परीक्षांमध्ये आघाडीवर राहून त्यांचे कौतुक होईल. आर्थिक गुंतवणूक हुशारीने कराल. स्थावर विषयक समस्या दूर होतील. पुढील भवितव्यासाठी योग्य ते निर्णय आत्ताच दूरदृष्टीने घेऊन मजबूत पाया घालू शकणारे  हे वर्ष आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही पहिला क्रमांक मिळवला असल्याने आगामी कालखंडात तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने करा. माझे शुभ आशीर्वाद तुम्हाला आहेत. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल. जिंदगी एक सफर, है सुहाना ! ######## ८ व्रुश्चिक: अंधे जहाँके, अंधे रास्ते, जाए तो जाए कहाँ!: सगळ्यात गुढ व आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रास, शक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असते. चंद्र नीचीचा होतो. अतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकते. महत्त्वाकांक्षी, आपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात व इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवता. मात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतो, कारण तुमची सहनशक्ती मर्यादित असते. विवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्य. वृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतात. येथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीत. विशाखा एक चरण पूर्ण अनुराधा व जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते. व्रुश्चिक राशीला मागील वर्षी 11 व्या स्थानी 770 गुण तुम्हाला मिळाले होते. या आगामी वर्षी किंचित सुधारणा होऊन तुमचा 10 वा क्रमांक व 857 अनुकूल गुण मिळतील. चढ उतार करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचे असून, अधून मधून अपेक्षाभंगाचे चटके व विरोधकांच्या कारवाया वाढतील. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत दिवस काढायचे आहेत कालचक्राचा महिमा अगाध व तर के असतो वाढत्या जबाबदाऱ्या आजारपण व चुकलेले आर्थिक निर्णय यामुळे आर्थिक बाजू सावरता ना तुमची दमछाक होईल नोकरी व्यवसायात कामात मन न लागणे नको ते काम नको त्या ठिकाणी बदली अशी प्रतिकूल स्थिती असेल ंसारात जोडीदाराशी मतभेद वडीलधार्‍या तब्येतीची काळजी संतती विषयक समस्या यांनी आगामी वर्ष कसोटी पाहणारे आहे मनःशांती झाल्यामुळे डोकेदुखी पोटदुखी प्रवासात विलंब होऊ शकतात विद्यार्थीवर्गाला प्रयत्न अधिक वाढवायला लागतील तरी अपेक्षा पूर्ण होतील याची खात्री नाही थोडक्यात रखरखीत वाळवंटात तळपत्या उन्हात तुम्हाला वाटचाल करायचे आहे. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल.  विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. अनुकूल गुणांचा विचार करता हे महिने नशीबाच्या रखरखीत उन्हाळ्यात ओअँसीस भासतील. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा. ########### ९. धनु: ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा व नीचीचा होत नाही. मूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण व उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनते. मूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागते. सोशिकता चांगुलपणा व कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवता. मेष व सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देतात. तर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही. धनु राशीची 4 स्थानी मिळालेल्या मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. काय कारण यंदा सातव्या क्रमांकावर घसरण होऊन 903 गुण मिळणार आहेत. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न वाढवायला लागतील त्यामुळे समाधानाचा मार्ग मिळेल. अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची खप्पामर्जी होईल व बाजारामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या नफ्यात घट होऊन तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाला प्रयत्न वाढवावे लागतील, तेव्हा कुठे कसेबसे यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मात्र जास्त अपेक्षा ठेवू नये. विवाहोत्सुकांना हा कालखंड प्रतिकूल आहे, त्यातल्या त्यात पर्यंत काही काळ गुरू व्रुषभ राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात असल्यामुळे त्या काळात कदाचित अपेक्षापूर्ती होऊ शकेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे, तसेच छोटे-मोठे अपघात होऊ शकतात. संसारामध्ये अभिमन्यूसारखी चक्रव्यूहात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. जोडीदार नाराज असेल आणि संततीचे बाबतीत आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सारांश कठीण काळ लौकरच जाणार आहे, हे मनात घोकत कष्ट व सहन शक्ती वाढवणे, हेच गरजेचे आहे. ######### १०. मकर: चली, चलीरे पतंग मेरी चलीरे...होके बादलोंके पार.... उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण व धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनते. मकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हाला, त्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाही. तिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतो. ध्येय गाठेपर्यंत चिवटपणा, त्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होते. आपली फुशारकी तुम्ही मारत नाही. कर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतात. सिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्य. तर नव पंचमातील व्रुषभ व कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात. मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने मागील वर्षी 3 रे स्थानी 1235 गुण मिळवून पहिल्या गटात वर्ष चांगले गेले होते. सुदैवाने आताही नशिबाला तुमच्यावर कृपा करावयाची आहे त्यामुळे आगामी वर्षी दुसरा क्रमांक पटकावून 47 गुण मिळवणारा आहात, यामुळे नशीब अधिक फळफळलेले दिसेल. तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये काय करू आणि काय नको असा उत्साह निर्माण होऊ शकतो. संपूर्ण कालखंड प्रगतीपथावर नेणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी गुरु तुमच्या नवपंचम योगात असल्यामुळे, नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे,  मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो! ####### = ११.कुंभ: मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहे. ज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असते. काहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहे. येथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाही. कुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाही. संसाराबाबतीत आपण उदास असता व एकंदर निरीच्छ.  संशोधन अभ्यास वृत्ती व ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्ये. कर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावी. मिथुन व तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात. कुंभ राशी मागील वर्षी 6 व्या स्थानी नशीब आजमावत तारेवरची कसरत करत तोल सांभाळत होती. यंदा 1054 गुण मिळून 5 व्या क्रमांकावर उजव्या दुसऱ्या गटात आला आहात. आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करत, अडचणी संकटांवर मात करत समाधानाचा मार्ग शोधत कामाला लागायचे आहे. परिस्थितीवर नियंत्रण अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा. परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकणाऱ्या पाचव्या क्रमांकावर आपली जागा निश्चित केली आहे. सहाजिकच यावर्षीही तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्न अधिक करावे लागतील जागरूकता ठेवावी लागेल आणि विरोधकांच्या कारवायांवर मात करावी लागेल त्यासाठी सहकाऱ्यांचे मदतीची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी धंद्यामध्ये तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे आर्थिक भरभराट संभवते. काही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेल. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. मात्र काही काळ पुन्हा षडाष्टक योगात जात असल्यामुळे तुम्हाला सावधानतेने निर्णय घ्या असे सांगतो. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल. ########### १२. मीन: दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता व धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क व कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात. मीन राशीच्या वाट्याला मागील वर्षी 718 गुण मिळून तळ गाठला होता व कष्टकारक दिवस अनुभवले होते. आता किंचित गुण वाढत 869 गुणांवर नवव्या क्रमांकावर तुम्ही स्थानापन्न होणार आहात. अर्थातच होते तशाच परीक्षा पाहणाऱ्या अपेक्षाभंग करणाऱ्या प्रसंगांना तोंड देत राहायचे आहे. ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतात, त्याचा अनुभव या वर्षी घ्यायचा आहे. नोकरी-व्यवसायात प्रतिकुल घटना व विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यांत अडथळे निर्माण करेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेल अधिक नेटाने अभ्यास करायला हवा. घरातील वडीलधारी तुमच्याशी वाद घालून मनस्ताप वाढवतील. प्रवास तसेच नवीन गुंतवणूक सांभाळून करा नाहीतर फसवणूक होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणीचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. विवाहोत्सुकांना विलंब स्विकारावा लागेल, घाई गर्दी नको. सगळेच फासे उलटे पडत आहेत असे म्हणायची वेळ आली, तरी धीर सोडू नका, केवळ श्रद्धा संयम आणि सबुरी या जोरावर दिवस काढायचे आहे. ####### सारांश, सर्वच राशींचा एकत्रित विचार करता मागील वर्षी बारा हजार 67 गुण मिळाले होते त्यात केवळ 313 गुणांची वाढ होऊन या वर्षी 12380 झाले आहेत याचाच अर्थ येरे मागल्या मागच्या वर्षी सारखेच हेही वर्ष जाईल असे मानावयाला हवे. सर्व लोकांना विशेषतः या भविष्याच्या वाचकांना आगामी वर्ष सुख समाधानाचे शांतीचे जावो ही सदिच्छा व्यक्त करून हे ग्रह बदलानुसार अनुकूल गुणांवर आधारित जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असे संपूर्ण राशी भविष्य पूर्ण करतो. धन्यवाद श्री सुधाकर नातू Mb 9820632655 II शुभम भवतु II

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा