सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
" आशिया कप विजयानंतरचे कवित्व-बिंब/ प्रतिबिंब":
महाराष्ट्र टाइम्स मधील वाचकाचे हे पत्र बोलके आहे. ह्या स्पर्धेनंतर क्रीडाबाह्य जे काही कवित्व होत गेले ते बघता केवळ पाकिस्तान विरुद्ध नव्हे तर आशिया कप वरच बहिष्कार घालायला हवा होता असे वाटू शकते. त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान झाले नसते, ऑपरेशन सिंदूरच्या गरजेचे व वास्तवतेचे दर्शन झाले असते.
एकाच नाण्याला दुसरी बाजू असते याची जाण ठेवली तर चांगलेच.
सोशल मीडियावर याच विषयावर रंगलेली ही जुगलबंदी जरूर वाचा
B:
😂 *आज देशविघातक आणि भारतद्वेषी कोण हे सहज स्पष्ट उघड झाले. सोशल मीडियावर सतत कार्यरत असलेल्या राजकिय, समाजसेवी, विचारवंत, सर्व विषयांचे जाणकार टीकाकार यांनी भारतीय टीमच्या विजयाचा जयजयकार केला नाही. टाळ्या वाजवल्या नाहीत. उत्सव साजरा केला नाही. त्यात भाग घेतला नाही. अद्वितीय टीमचे अभिनंदन केले नाही. ही भारताची टीम होती आणि त्यांनी जिहादी विरोधकांचा एकदा नाही तर तीनदा निर्णायक पराभव केला. भारताच्या तरुणाईने मैदान मारले, गाजवले.*
*परंतु देशद्रोही चूप बसले. भारताचा विजय त्यांना पचला नाही, आवडला नाही. आता देशविघातक कोण हा प्रश्न विचारला जाणार नाही.* 😂
*जय भारत !*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
A:
मुळात या आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताने खेळणे हे नजीकच्या पाकच्या दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्णतया चुकीचेच होते हे विसरून चालणार नाही. खरे देशद्रोही कृत्य कोणी केले हे सांगणे न लगे
B:
: 🙋♂️😂😂😂😂😂😂
*यातल्या अर्ध्या विधानाशी मी सहमत आहे. भारत सरकारने आशिया कप मधे खेळायला नको होते असे तत्व म्हणुन मला आजही वाटते. परंतु शांतपणे विचार करता हे ध्यानात येते की ही समस्या एका स्पर्धेची नाही तर यापुढे विविध खेळांच्या ज्या आतंरराष्ट्रीय स्पर्धां होणार आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. येत्या काळात हॉकीच्या स्पर्धा आहेत. त्यात पाकिस्तान असणार आहे. मग त्यात भारताने खेळायचे की नाही, हा प्रश्न दूरगामी परिणाम करणारा आहे. आपण खेळता कामा नये ही तात्विक भूमिका झाली. परंतु काल जे घडले, ज्या तर्हेने पाकिस्तानची बेइज्जती झाली, ते पहाता हा चांगला पर्याय आहे असे वाटते. याने आपले खेळाडु जागतिक मंचावर बाजुला पडणार नाहीत. परंतु त्याचा भारतीय टीमचे अभिनंदन न करण्याशी सुतराम नाही. ते कृत्य देशद्रोहीच आहे.* ज्यांना हे चुकीचे वाटत असेल त्यांनी तसा ओरडा करत रहावा. त्याने काहीही फरक पडणार नाही. तसेच पाकिस्तानशी खेळणे म्हणजे देश तोडणे नाही की आतंकवादी कृत्ये करणे नाही. भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा द्वेष करणे, भारताचे वाईट चिंतीणे, भारताचे तुकडे करण्याची भाषा करणे, भारताच्या परदेशी शत्रूंशी हातमिळवणी करणे याला देशद्रोह म्हणतात. ते कोण करत आहेत ते देशभक्त भारतीयांना आता चांगले कळले आहे. देश त्यांना माफ करणार नाही. तसे बघितले तर भारताने चीन बरोबर व्यापारी वाटाघाटी करता कामा नये. पण भारत त्या करत आहे. भारताने चीनमधे SCO परिषदेत भाग घेतला. भारताने याआधी पण या परिषदेत भाग सातत्याने घेतला आहे. ब्रिक्स सारखाच हा एक आंतरराष्ट्रीय मंच आहे. त्याचा अर्थ भारत चीन जवळ जात आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय परराष्ट्रनीती काय असते ते समजत नाही. येत्या नजिकच्या काळात सीमेवर भारत चीन झडपा झाल्या तर आश्चर्य वाटुन नये. आपल्या सीमेवरील परिस्थिती नाजूक आहे. आजचा भारत मियां नेहरुंचा नांगी टाकणारा भारत नाही याची चीनला आधीपासून गलवान संघर्षापासुन जाणीव झाली आहे आणि ऑपरेशन सिंदुर दरम्यान निव्वळ एका तासात पाकिस्तान आणि अमेरिकेला जो मार पडला, त्यानंतर चीन थोडी सावध भूमिका घेतो आहे. भारतीय सैन्याबरोबर लढण्याची त्यांची कुवत नाही आणि हिम्मत पण नाही. परंतु शेवटी तो विषारी साप आहे हे भारताला चांगले माहीत आहे.
येणारा काळ कठीण आहे, देशभक्त भारतीय बाहेरी आणि देशांतर्गत शत्रूंशी लढण्यास सज्ज झाले आहेत. भारताला देशातल्या देशविघातकांपासुनच जास्त धोका आहे. त्यांचा एक प्रतिनिधी सोनम वांगचुक गजाआड गेला आहे. आता इतरही जातील. यापुढे सरकार ते सहन करणार नाही. लोकशाही आणि घटना यांच्या आड चाललेले हे थोतांड आहे.
*जय भारत, जय श्रीराम!*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
A
: या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध
खेळणे म्हणजे पैशासाठी केलेले एक दुक्रुत्य होते.
आपण म्हणू तीच पूर्व दिशा किंवा आपले तेच नेहमी खरे अशी वृत्ती असणे म्हणजे एक प्रकारे हुकूमशाहीच होय. या परिघाच्या बाहेर येऊन समतोल सजग दृष्टीने कोणत्याही गोष्टीकडे पाहणे गरजेचे असते.
नोबडी इज राईट ऑल द टाईम.
जे वर जाते ते केव्हा ना केव्हा खाली येऊ लागते..
बिगिनिंग ऑफ द एंड चालू झाले आहे
B:
🙋♂️😂 आपल्याकडे, आपल्या क्रिकेट संस्थांकडे भरपूर पैसे आहेत. मतभिन्नता असणे यात काहीच चूक नाही. पण भारताचे वाईट चिंतीणे याला काय म्हणतात? भारत संपावा अशी इच्छा बाळगणे याला काय म्हणतात ते सांगायला नको.
*आपल्याकडे नेहमी बोलले जाते की "शुभ बोल रे नाऱ्या!*
*जय भारत, जय श्रीराम !*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
A:
येथे उल्लेख केलेले विशिष्ट आपले तेच म्हणणे खरे म्हणणारे म्हणजे भारत नव्हे. त्यामुळे सोईस्कर गैरसमज करून घेणे चुकीचे.
B:
🙋♂️😂😂😂😂😂😂😂
*भारतद्वेषी या निमित्ताने उघड्यावर आले हे निश्चित. यांची आता सनातनी सुसंस्कृत सामर्थ्यवान भारतात गय केली जाणार नाही.*
A:
येथे भारत द्वेषाचा प्रश्न येतच नाही. एकांगी विचारधारा सोडून देणे हिताचे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा