सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५
सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग तीन
सोशल मीडियावर सर्फिंग करणे आणि त्यातून आपल्यालाा
भावणारे रुचणारे असे काही संदेश वेचणं ही देखील एक कला आहे.
मी देखील अधून मधून हा उद्योग करत असतो त्यामधून गवसलेले हे दोन संदेश तुमच्याही जााणीवा विस्तारित करतील व अंतर्मुख करून जातील अशी आशा आहे...
1
*ट्रीप खूप लहान आहे*...
......*समजून घ्यारे मित्रांनो*
🥰😂🥰😂🥰😂😆🤣😁😄
# Policy driven by votes rather than merit is Penny wise Pound foolish .
# Beggaring ourselves by unsustainable inflation thru idiotic policies and rent seeking state.
Three monkeys policy.
China laughs while India stutters.
🥰😂🥰😂🥰😂😆🤣😁😄
एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला...परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही.,
तो माणूस गप्प बसल्यावर, त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली, तेव्हा त्याने तक्रार का केली नाही ??
त्या माणसाने हसून उत्तर दिले:
"एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण "आपला 'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे....कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे"..!
या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला....तिने त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटले की *ट्रिप खूप लहान आहे..!* हे शब्द सोन्याने लिहावेत..!
आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने काळोख करणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे..!
तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का ?? शांत राहणे.,.
*ट्रिप खूप लहान आहे..!*
कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला ??
आराम करा - तणावग्रस्त होऊ नका.,
*ट्रिप खूप लहान आहे..!*
कोणी विनाकारण तुमचा अपमान केला का ??वाईट बोलले का? शांत राहणे... दुर्लक्ष करा...
*ट्रिप खूप लहान आहे..!*
तुम्हाला 'न आवडलेली' टिप्पणी कोणी केली आहे का ?? शांत राहणे...दुर्लक्ष करा...क्षमा करा, त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि विनाकारण त्यांच्यावर प्रेम करा.,.
*ट्रिप खूप लहान आहे..!*
काहींनी आपल्यासमोर कितीही समस्या आणल्या, त्याचा विचार केला, लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होते की आमचा *'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे..!*
*आमच्या सहलीची लांबी कोणालाच माहीत नाही... उद्या कोणी पाहिला नाही तो कधी थांबेल हे कोणालाच माहीत नाही..!*
आपली एकत्र सहल खूप लहान आहे....चला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाचे कौतुक करूया...त्यांचा आदर करा... आपण आदरणीय, दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील होऊ या....कारण आम्ही कृतज्ञता आणि आनंदाने भरून जाऊ, *आपली एकत्र सहल खूप लहान आहे..!*
तुमचे हास्य सगळ्यांसोबत शेअर करा....तुमचे जीवन सुंदर व आनंदी बनण्यासाठी....... तुम्हाला हवा तसा तुमचा मार्ग निवडा....कारण...आपला ग्रुप जरी मोठा झाला असला तरी *आपली सहल खूप छोटी आहे..* कुणाला कुठल्या स्टाॅपवर कधी उतरायचं आहे हे आपल्या स्वतःला देखील माहिती नाही !!
🙏🌹🌹🙏
2
*आशा भोसले*
*वाढदिवस जन्म :८ सप्टेंबर,१९३३*
आशाताई ९२ वर्षांच्या झाल्या असे म्हटले की मनाला पटतच नाही कारण त्यांचा चिरतरुण आवाज आजही त्यांना सोबत करतो आहे.
आशा भोसले यांचा जन्म *सांगलीला* मंगेशकर कुटुंबात झाला. त्यांना गाण्याचा वारसा वडील मास्टर दीनानाथांचा मिळाला. लता मंगेशकर,मीना मंगेशकर-खडीकर,उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांची साथ मिळाली आणि सगळ्यांतून आशाताई घडत गेल्या.
त्यांची मराठी गाणी ऐकताना त्या मागचे परिश्रम आणि सर्वोत्तम तेच देण्याची भावना देखील लक्षात येते. प्रत्येक माणसाचा स्वतःच्या मनाशी संवाद सुरु असतो. कधी हा संवाद मनाला व्याकुळ करतो तर कधी अधीर तर कधी उदास तर कधी आनंदी. त्या आशयानुरूप वेगवेगळ्या गीतकारांची त्यांनी गायलेली काही गाणी आठवली.
मुंबईचा जावई मधले *आज कुणीतरी यावे* गाणे ऐकताना तारुण्य सुलभ भावना प्रकट करणारी तरुणी लगेच डोळ्यापुढे येते.
*सहज सख्या एकटाच येई सांजवेळी* हे सूर्यकांत खांडेकरांचे गाणे म्हणून भावी आयुष्याचे चित्र रेखाटणारी तरुणी डोळ्यापुढे येते.
लग्न झाल्यावर पतीला आपले भाव व्यक्त करताना ती म्हणते,*गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले जन्मजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले.*
मुलीची सासरी पाठवणी करताना *ओटीत घातली मुलगी विहीणबाई* म्हणताना त्यातल्या शब्दांनी आईची व्याकुळता जाणवत रहाते.
लग्नानंतरच्या नव्या नवतीच्या मंतरलेल्या दिवसात *मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे* ऐकताना आपल्या अंगावर देखील शिरशिरी येते.
युद्धात परागंदा झालेल्या नवऱ्याची असोशीने वाट पाहणारी सुवासिनी चित्रपटातली पत्नी,जेंव्हा *जिवलगा कधी रे येशील तू म्हणते* तेंव्हा तिची कासाविशी आपल्याला देखील अस्वस्थ करते.
संसारात तृप्त झाल्यामुळे ती म्हणते, *सुख आले माझ्या दारी ,मग काय उणे त्या संसारी*
बाळासाठी साऱ्या आयुष्याची कुरवंडी करायला तयार असणारी मोलकरीण चित्रपटातली आई, *देव जरी मज कधी भेटला* हे गाणे म्हणते तेंव्हा तिची ममता लक्षात येते.
*भरजरी ग पिताम्बर दिला फाडून* ही अंगाई गाणारी शामची आई आठवते.
*मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ? तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !* असं कवी सुधीर मोघे लिहितात त्या वेळी त्याचा उत्कट अर्थ आर्तपणे गाऊन आशाताईंनीच आपल्यापर्यन्त पोचवला आहे.
कधी कधी मन देखील आपल्याशी अबोला धरत. आपल्या विचारांना थोपवून ठेवत अशावेळी कवी सौमित्र म्हणतात *माझिया मना जरा थांबना* त्यातुन त्यांना मनाला उद्देशून काय म्हणायचं आहे ते आशाताईंच्या आवाजातच ऐकायला पाहिजे.
*ऋतू हिरवा अल्बम* हा आठ गाण्यांचा अल्बम न ऐकलेली व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही.त्यातली सगळीच गाणी खूपच लोकप्रिय आहेत .
१)सांज ये गोकुळी २) भोगले जे दुःख त्याला ३) ऋतू हिरवा ४) जय शारदे वागेश्वरी ५) घन राणी ६) झिनी झिनी वाजे बिन ७) फुलले रे क्षण माझे ८) माझिया मना जरा थांबना
ही तर मराठी गाण्यांमधली नुसती वरवरची झलक आहे लिहायच म्हटल तर अजून कितीतरी बाकी आहे.
आता थोडंसं हिंदी गाण्यांबद्दल, त्यांची सगळीच गाणी ऐकताना आपणही लगेच ती गुणगुणायला लागतो, ही त्या आवाजाची जादू म्हणावी लागेल. त्या पैकी काही गाणी
निगाहे मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है)रोशन
झुमका गिरा रे (मेरा साया) मदन मोहन
छोड दो आचल जमाना क्या कहेगा (पेइंग गेस्ट) एस.डी.बर्मन
दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण)आर.डी.बर्मन
पिया तू अब तो आजा (कारवॉं)आर.डी.बर्मन
ओ.पी.नय्यर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून आशा भोसले यांचा मदभरा आवाज ऐकू आला.
चैन से हमको कभी (प्राण जाये पर वचन ना जाये)ओ.पी.नय्यर
वो हसीन दर्द दे दो (हम साया) ओ.पी.नय्यर
आओ हुजूर तुमको(किस्मत)ओ.पी.नय्यर
जाइये आप कहॉं (मेरे सनम) ओ.पी.नय्यर
१९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्ती सारखी शब्द रचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
*मिराज ए गझल*
गुलाम अली आणि अशा भोसले यांचा मिराज ए गझल या अल्बमने जगभरातल्या गझलप्रेमींना अक्षरश: गुंगवून टाकले होते.आजही या गझल्स प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातल्या काही
दर्द जब तेरी आता है तो गिला किससे करू
दिल धडकने का सबब याद आया
रात जो तुने दीप बुझाये मेरे थे
सलोना सा सजन है
हैरतों के सिलसिले
आशा भोसले यांना १८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांना पुरस्कार मिळाला.१९७९ मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी यापुढे पार्श्वगायनाच्या पुरस्कारासाठी आपला विचार करु नये, अशी विनंती केली. आशा भोसले यांना २००१ मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होत.
आशा भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा