बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

" जाता जाता सहज सुचलं, म्हणून भाग 2!":

1 "नकोरे मनोरे, मनोरे नकोरे": (नोईडामधील twin tower उध्वस्त, ह्या घटनेमुळे, माझ्या ब्लॉगवरील ९ जुलै २०१८ रोजीच्या ह्या लेखाची आज आठवण येत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या व आर्थिक विकासाच्या गरजा एका बाजूला आणि दुसर्या बाजूला नागरी सेवा सुविधा, पर्यावरणावरचा ताण ह्यांचा गांभीर्याने विचार करून सुवर्णमध्य काढला पाहिजे, त्यासाठी आता तरी जागे व्हा !) सध्या टोलेजंग इमारती बांधण्याच्या हव्यासामुळे जमीन खचून शेजारच्या कुटुंबांवर कष्टाने घेतलेली घरे सोडण्याची वेळ येत आहे. तसेच अचानक लागणार्या आगींमुळे वित्तहानी व जीवितहानी असे धोके निर्माण होत आहेत. नागरी सेवा सुविधा व वहातूकव्यवस्थेचे बोजवारे उडत आहेत. मुंबई सारख्या बेटावर अशा संभाव्य धोक्याचा विचार न करता, नियोजनशून्य धोरणांपायी ह्या चांगल्या शहराची दुरावस्था होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. म्हणूनच...... "नकोरे मनोरे, मनोरे नकोरे", हे आग्रहाने मांडणारा माझ्या ब्लॉगवरील हा लेख आहेे. मुंबई शहरातील नागरी सेवा सुविधांचा किती बट्टयाबोळ झाला आहे त्याचे दर्शन वर्तमानपत्रातील तक्रारींच्या पाढ्यांवरून ध्यानांत येईल. काही उदाहरणे: ➡पाण्याची पाईपलाईन फुटलेली व अतोनात पाणी वाया चाललेले ➡रस्तोरस्तीचे खड्डे, ➡रस्तेदुरूस्थीचा ठेकेदार गायब आणि खडी, रेतीचा ढीग रस्त्यावर पडलेला ➡रेल्वेस्टेशनखाली अंधार ➡टोल फ्री क्रमांक बिनकामाचा ➡रस्त्याचा दुभाजक वाईट अवस्थेत, अपघाताचा धोका ➡कचरापेटी नादुरुस्त, कचर्याचे ढीग तसेच पडलेले ➡केबलवायरचे मोठे जाळे रस्त्यावर पडलेले, अपघाताचा धोका ➡गटार तुंबलेले किंवा गटाराचे झाकण गायब ➡स्टेशनात छप्पर नाही, किंवा स्टेशनांत अस्वच्छता, शौचालये वाईट स्थितीत ➡बसस्टापवर छप्पर नाही किंवा गर्दुचल्यांचा मुक्काम ➡मुलांना खेळायला मोकळ्या जागा नाहीत ➡बागांमध्ये स्वच्छता नाही, झोपाळे आदि मोडकळीस आलेले ➡लोकलगाड्या म्हणजे दररोजचे यमदूत ➡रस्तोरस्ती गल्लीबोळांमध्ये दोनही बाजूंना वहानांचे पार्कींग आणि त्यामुळे ट्रँफिक जँम, वेळेचा इंधनाचा अपव्यय ➡शहरामध्ये स्वच्छताग्रुहांची कमतरता, आहेत ती नीट देखभाली अभावी गलीच्छ. इ.इ. इ.इ. ……… हया तर्हेच्या तक्रारी मारूतीच्या शेपटाएवढ्या लांबच लांब असूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा नाही आणि एके काळी शांत सुंदर असलेली ही मुंबापुरी आज झोपडपट्यांनी वेढलेली, अजस्त्र लोकसंख्येच्या आणि जीवघेण्या प्रदुषणापायी गुदमरत चाललेली एक बकाल नगरी झालेली सगळे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. अशी दारुण अवस्था शहराची असताना गगनचुंबी उंचच उंच मनोरे झोपडपट्टी निर्मुलन अथवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास अशा गोंडस नावाखाली, तिचे लौकरांत लौकर, नरकपुरींत रूपांतर केले जात आहे. म्हणूनच आज सुंदर मुंबई, हरित मुंबई ही घोषणा इतिहासजमा जमा झालेली आहे. म्हणूनच आता घोषणा हवी: नकोरे मनोरे, मनोरे नकोरे! मुंबईत उंच मनोर्यांच्या इमारती बांधत रहाण्याच्या हव्यासामुळे, आधीच नागरी सुविधांचा बट्टयाबोळ आणि बजबजपुरी झालेल्या शहराची काय भयानक अवस्था होईल ह्याचा कोणी विचारच करत नाहीये. ह्या गदारोळांत मूळचे भूमीपुत्र विस्थापीत होऊन पहाता पहाता त्यांचा मागमूस रहाणार नाही, ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकासाचे गाजर दाखवून अर्धवट अवस्थेतील इमारतींमधील मूळचे कितीतरी नागरिक ना घर, ना घरभाडे अशा दारुण स्थितीत जवळ जवळ देशोधडीला लागून पस्तावत आहेत. त्यांच्या दु:खाला, वेदनांना तुलना नाही. 70 ते 100 वर्षांहून जुन्या चाळी, इमारतींबद्दल पुनर्विकासाची आवश्यकता समजता येऊ शकतो. परंतु सार्याच नागरी सेवा सुविधांची दारुण विदारक अवस्था, आताच कडेलोट झालेली मुंबईची लोकसंख्या आणि प्रदुषणाचा पडलेला विळखा ह्यांचा विचार करता कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सात (ते बारा ) मजल्यापर्यंतच नव्या इमारती बांधल्या जाणे योग्य ठरेल. 70/80 वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे एक वेळ समजू शकतो. परंतु आता ही लाट केवळ ३०/४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचेही पुनर्विकासाचे लोण आले आहे. ह्याचा अर्थ ह्या इमारती योग्य ती काळजी व सामूग्री वापरुन बनविल्या गेल्या नव्हत्या. अशा कमकुवत कामाकडे संबधीतांनी, यंत्रणांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. आता उत्तुंग मनोरे न बांधता अशा इमारतींचे मजबूतीकरणच करणे हाच उपाय शहाणपणाचा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जावून मुंबईची धुळधाण लावण्याचा उद्योग चालूच राहील, हे भावी पिढ्ढ्यांचे दुर्दैवच ठरणार आहे. 30 ते 40 टक्के झोपडपट्टयांनी वेढलेल्या मुंबई शहराची अशी लाज वाटावी अशी भयानक अवस्था कोणी केली? कां, कशी झाली आणि त्या करता जे जबाबदार असतील त्यांच्या अशा अक्षम्य अपराधांबद्दल काहीही न करता, झोपडपट्टी निर्मुलन योजना असे गोंडस नांव देऊन आंधळेपणाने उंच मनोर्यांमागून मनोरे बांधणे हे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणेच नव्हे, तर शहराला खड्यांत गाडणे नव्हे कां? झोपडपट्ट्यांना वर्षांमागुन वर्षे अधिक्रुत करत रहाणे हा सत्तेचा दुरुपयोगच नव्हे कां? एक विनवणी निश्चित, जरा फक्त स्वत:कडेच न पहाता, भावी पिढ्यांसाठी आपण खेळण्यातल्या सारखी कुरकुर करणार्या खुळखुळ्यासारख्या शहराचा वारसा क्रुपया सोडून जावू नका. बाबांनो, ‘नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!! सुधाकर नातू -------------- 2 पर्यावरण ऱ्हासासाठी प्रयत्न करणाऱ्या चिपळूण येथील श्री प्रमोद जोशी यांचे विचार सोशल मीडियावर नजरेत आले ते असे पर्यावरण रक्षणासाठी माझ्याकडून केल्या जाणाऱ्या काही कृती पर्यावरण रक्षण करणे, प्रदुषण कमी करणे, उर्जा वाचविणे यासाठी आपण काही करु शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर हो असे आहे. आपण छोट्या मोठ्या कृतींतुन ही गोष्ट करु शकतो. पर्यावरण रक्षणासाठी माझ्याकडून केल्या जाणाऱ्या काही छोट्या कृतींचा उल्लेख येथे करत आहे. यातून मला मानसिक समाधान मिळते. वृक्ष लागवडीच्या कृतींमध्ये सहभाग, यामध्ये रोपे पुरविणे आणि प्रत्यक्ष वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतो. जुन्या वापरता येणार्‍या वस्तू दुरूस्त करून वापरण्याकडे कल आहे. घरातील गळणारे पाण्याचे नळ वेळच्यावेळी रिपेअर करतो. घरी येणाऱ्या लोकांना तांब्याभांड्यातून पाणी प्यायला देतो. (वैयक्तिक मत) यातुन लागेल तेवढ्याच पाण्याचा वापर होतो उरलेले वाया जात नाही. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून देत नाही. शुभेच्छा तोंडी देतो. गरज नसेल त्या खोलीतला लाईट आठवणीने बंद करतो. मी स्वतः अनेक वर्षे फटाके वाजविणे बंद केले. फटाक्यांपासुन होणार्‍या हवेचे, आवाजाचे प्रदुषण, होणारे धोके ( आग लागणे वगैरे) याविषयीची जमेल तेवढी जन-जाग्रुती करत असतो. घरी तसेच कंपनीमध्ये पाठकोऱ्या कागदांचा वापर करतो. कागद तयार करायला झाडांची कत्तल केली जाते ही भावना. बाजारात जाताना कापडी पिशवी जवळ बाळगतो. त्यामुळे भाजीवाल्याकडुन वगैरे प्लास्टिकची पिशवी घेणे नाकारतो. आता काही वस्तू आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतून मिळतात उदाहरणार्थ किराणा च्या लागणाऱ्या वस्तू वगैरे.अशा पिशव्या नुसत्या पाण्याने स्वच्छ होतात त्यांचा मी पुनर्वापर करतो. बाजारातून आपण ज्या वस्तू विकत आणतो त्यामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या बऱ्याचशा लहान मोठ्या वस्तू येत असतात त्या प्लास्टिकच्या वस्तू रिसायकल करणे गरजेचे आहे म्हणजेच त्याचा पुनर्वापर जर केला गेला तर शहरातल्या कचऱ्याच्या नियोजनावर येणारा जो ताण असेल तो कमी होईल. त्यासाठी बारीक सारीक वस्तू म्हणजेच औषधांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, त्यांची बूचं, भांडी घासण्यासाठी आपण काथ्या वापरतो त्याच्या बाहेरील पुठ्ठा किंवा प्लास्टिक, प्लास्टिकचे खराब झालेले डबे, त्याची झाकणे,चमचे use and throw pens, प्लास्टिकच्या बॉटल्स, ग्लास अशा कितीतरी वस्तू आपण कचऱ्यामध्ये फेकून देत असतो तसं न करता एका पिशवीमध्ये त्या साठवून ठेवून जर आपण भंगारवाल्याला परत केल्या तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला एक मोठी पिशवी घेऊन ती गॅलरीत वगैरे ठेवून द्यायची. आठ दहा दिवसांनी ज्या काही वस्तू साठतील त्या प्लास्टिकच्या वस्तू पुनर्वापराकरता देऊ शकतो. मी असे करतो. जुने सेल ( wall clock, रिमोट, गॅस गीझर इत्यादींचे) ,काही metal scrap, कपड्यांचे, चपलांचे तसेच इतर काही वस्तूंचे रीकामे बॉक्स,वेगवेगळ्या प्रकारची पत्रके, दुकानदारांकडुन मिळणारी बीले वगैरे एका पिशवीत साठवून ती recycling साठी देतो. भंगार गोळा करणारी माणसे एकप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी मदतच करतात या भावनेने मी अनेकदा या साठविलेल्या वस्तू recycling साठी मोफतच देतो. हल्ली बर्‍याच शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू (पाण्याच्या बॉटल्स वगैरे टाकण्यासाठी) पिंजरे उभारलेले असतात त्याचा वापर आपण करू शकतो. आपणही अनेकजण पर्यावरणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काही कृती करत असाल तर एकमेकांना share करा त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. आपली प्रत्येक कृती पर्यावरणीय राहील, संसाधनांचा अपव्यय होणार नाही असे वागण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपली वसुंधरा प्रदूषित होणार नाही याची काळजी घेउया. संसाधनांची बचत आणि पर्यावरणाची जाण मनापासून घेऊया वसुंधरा रक्षणाची आण Nature is a beautiful creation Save it everyone by devotion प्रमोद य. जोशी चिपळूण ☘️☘️🌹🌷🍁🍁 --------☆-- 3 👍"बोल, अमोल-272 !":👌 💐💐 "प्रत्येकाच्या जीवनात अनेक माणसं येत असतात, त्यांच्याबरोबरच्या संपर्कामुळे व सहवासामुळे आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वभावाबद्दल आपल्या पुरते बरे वाईट समज करून घेत असतो. पण एखादा माणूस खरोखर अंतर्बाह्य कसा आहे, ते समजण्यासाठी माणसं वाचता यायला हवीत. माणसं वाचणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, आकलन आणि तर्कशुद्ध विश्लेषणक्षमता असावी लागते. केवळ प्रतिभावान लेखकांनाच हे सारे जमते असं मला वाटतं. याकरताच व्यक्तिचित्रात्मक ललित लेखसंग्रह जितके वाचाल, तेवढी माणसांची अनेकानेक इंद्रधनुषी रूपं तुमच्यासमोर साकार होतील. 'गणगोत' हे 'पुलं'च पुस्तक वा डॉ अंजली कीर्तने यांचं 'आठवणीचा पायरव' जर वाचलंत, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. आपल्याला देखील अशी माणसं वाचायची किमया साधता यावी. त्यामुळे अगम्य अशा जीवनातील आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक प्रकाशमान होईल !":💐💐 ---------- 5 "सजग संमजसपणाची त्रिसूत्री": "विचारी व्यक्त व्हा मुक्त व्हा !": या मुक्त संवादात आपले मनःपूर्वक स्वागत मला सर्वसाधारणपणे अमृत काळात म्हणजे पहाटे तीन ते साडेतीनच्या आसपास अचानक कधीकधी जाग येते आणि कुठून करते कुणास ठाऊक माझ्या मनात कल्पना विचार व्यक्त होत असतात पुष्कळदा त्या नंतर झोपते ना विसरण्याचे कारण थांबतोय अमृता काळी पहाटे विचार सुचला जे बोल अमोल या माझ्या नेहमीच्या उपक्रमात यथातच्य वाटतील असे होते ते म्हणजे सजग संमजसपणाची त्रिसूत्री विचारी व्यक्त व्हा मुक्त व्हा मी सोशल मीडियावर प्रकाशित केल्यावर नंतर मला हा संवाद साधताना असे सुचले की ज्यांना आपण ग्रुपला हे पाठवले आहे त्यांना जणू एखाद्या मराठीच्या परीक्षेमध्ये कल्पनाविस्तार करा असा प्रश्न येतो त्याप्रमाणे मुक्त व्हा याचा कल्पनाविस्तार करा अशी देखील मी संदेशांची मालिका त्या त्या ग्रुप वर टाकली आणि मला सुचले की आता हे आव्हान मी पण स्वीकारले पाहिजे पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे विचारी व्हा सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात वाचनांमधून बघण्यामधून ज्ञानेंद्रियांच्या विविध प्रक्रिया मधून आपल्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळे प्रसंग अनुभव दातेसंबंध व्यावसायिक संबंध असे विविध प्रकारचे असे जाणीवांचे परिप्रेक्ष विस्तारित होत असते सर्वसाधारणपणे आपोआपच काही माणसांच्या मनात त्याच्या बऱ्या वाईट कल्पना विचार निर्माण होऊ शकतात तर पहिला मुद्दा जो आहे पहिले सूत्र ते म्हणजे तुम्ही अशा तऱ्हेच्या या साऱ्या जीवनात अनुभवावर हार करा धीरक्षर विवेकाने विचार करा काय बरोबर काय चूक कोणतं योग्य कोणता अयोग्य कोणतं केव्हा योग्य इत्यादी इत्यादी बऱ्याच वेळेला तुमच्या मनाविरुद्ध देखील ते घडू शकत असेल त्या तऱ्हेचे तुम्हाला मनात विचार येत असतील अशा तऱ्हेच नातेसंबंध किंवा व्यावसायिक संबंधात होऊ शकतो अशा वेळेला जर तुम्ही व्यक्त नाही झाला जे जे वाटतं ते सुसूत्रपणे ताबडतो त्या त्या व्यक्तीला तुम्ही व्यक्त केलं तर तुमच्या मनात त्याच्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक असा परिणाम होणार नाही जर सकारात्मक अशा सूचना असल्या तर देखील त्यासमोरच्या व्यक्तीचा किंवा जे काही पुढे त्यामधून घडणारे त्याचं प्रगतीकरणच होईल त्यामुळे तुम्ही आपल्या मनात न ठेवता जर कोणाचे बोलणं नकोच वाटत असेल, तर हे असं मुक्तपणे संवाद स्वतःची साधत व्यक्त व्हा म्हणजे तुम्हाला कुठल्याही तऱ्हेनं त्रास होणार नाही !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा