मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५
" वाचता वाचता वेचलेले भावलेले!"
👍"वाचता वाचता, वेेचलेले !":👍
🤣 "हम कभी भी नही सुधरेंगे !":🤣
👍" लंडनचे सौंदर्य केवळ भव्य इमारतीमुळे किंवा फेमस नदीच्या दोन्ही काठावरील रमणीय लँडस्केपिंगमुळे नाही तर शिस्त, नियोजन, सार्वजनिक सहभाग आणि जबाबदार वर्तन यातून साकारलेले आहे. ब्रिटिशांनी जे सुंदर शहर वसवले ते तितक्याच चिकाटीने टिकवले. भारतात लंडन सारखे शहर उभे करणे अशक्य नाही. पण त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती, लोकशिक्षण, नागरी जबाबदारी, प्रदूषणमुक्ती नियोजनबद्ध वाहतूक, बॅनरमुक्त सार्वजनिक स्थळे आणि नागरिकांचा सकारात्मक सहभाग अशी पावले तातडीने उचलायला हवीत. त्याचप्रमाणे राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक दबाव या दोन बाबी कायमस्वरूपी बंद केल्या पाहिजेत. मुंबईचे लंडन होणे हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले आहे, पण ते प्रत्यक्ष आणायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी, सौजन्य आणि संवेदनशीलतेने योगदान दिले पाहिजे. लंडन केवळ इमारतींचे, अभियांत्रिकी शहर नसून मानसिकतेचे शहर आहे आणि लंडनची मानसिकता आपल्यात रुजवली तर मुंबईचे लंडन हे स्वप्न सत्यात उतरेल !":👍
# महादेव पंडित
2
एकूणच मानवी जीवनात तीर्थक्षेत्रांची भाषा ही सर्वकालिक महत्त्वाची मानली गेली आहे प्रवास आणि अध्यात्मिक विकास यांचा जवळचा संबंध सर्वच धर्मांनी अधोरेखित केला आहे तीर्थक्षेत्राकडे केलेला प्रवास म्हणजेच रूपकार्थाने आदर्श कडे केलेला प्रवास असे आदर्श हेच खचलेल्या पिचलेल्या समाजाला अर्थपूर्ण असे काही प्रदान करतात डोके टेकायला हवे कोणाचे तरी पाय माणसाला लागतातच आणि समाजात पराकोटीची आसामानता असूनही काही काळासाठी तरी एका पातळीवर आणणाऱ्या स्वप्नभूमीच्या दिशेने वाटेने जायला प्रवृत्त करणाऱ्या तीर्थयात्रा उपयुक्तच राहतील आणि दीर्घकाळ टिकतील वारीचेही तसेच आहे जुन्या परंपरेत कालानुरूप परिवर्तन म्हणजे व्हावे यासाठी प्रयत्न करत राहणे हे योग्यच असते पण परिवर्तनाची सुरुवात ही आपले मनापासून व्हावी लागते आणि त्या आपलेपणाची पायरी त्या समाजाचा गुणधर्मसकट स्वीकार ही असते आधी स्वीकार आणि मग परिवर्तनाचे प्रयत्न हीच प्रगतीच्या प्रवासाची दिशा असते पंढरपूरचे वास्तवयी आपल्याला आधी स्वीकारावे लागेल हा माझ्यापुरता मी काढलेला निष्कर्ष होता
# भानु काळे
3
"हा अप्रामाणिकपणा येतो कुठून ?
आपण पूर्वी अप्रमानिक होतो आणि आजही अपरामाने का होत असे म्हणायचे का? गेल्या 50 वर्षात आपण पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध झालो असो पण अधिक अप्रामाणिक होत आहोत का
ह्या पार्श्वभूमीवर जपानची एक गोष्ट आठवते. तिथे सुनामी आली असताना एका सुपर मार्केट मधला वीज प्रवाह अचानक खंडित झाला. सगळीकडे काढून झाला ग्राहकांनी घेतलेल्या मालाची मिले करण्याची यंत्रणाही ठप्प झाली अशावेळी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना आपापला माल घेऊन तसेच बाहेर पडण्याचा मोह झाला नाही त्या सर्वांनी आपापला माल दुकानातच ठेवला एवढेच नव्हे तर ज्या रॅक मधून त्याने घेतला होता त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो परत जागच्या जागी ठेवला त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत? हा अप्रामाणिकपणा कुठून येतो पिढ्यानुपिढ्या दारिद्र्यातून निर्माण झालेली मानसिकता असेल का? यामागे काही भौगोलिक ऐतिहासिक कारणे आहेत का ती आपल्या रक्तातच आहे का याला काही जनुकीय किंवा वार्षिक कारणे असतील का
# भानू काळे
4
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेही लक्षात घेतले पाहिजे की स्वातंत्र्य हे मुख्यतः व्यक्तिगत असे मूल्य असते तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुख्यतः एक सामाजिक मूल्य आहे ते मानवाच्या समाज म्हणून होत असलेल्या उत्क्रांतीच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर विकसित झाले आहे तसे ते तुलनेने नवे ही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ व्यक्तिगत पातळीवर नावे तर एकूण सर्व समाजाच्या पातळीवरील स्वीकृत मूल्य असावे लागते प्रत्येकाचा अंतरनात वेगळा आहे याची जाणीव एकूण समाजात रुजल्याशिवाय आणि सगळ्यांचे अंतरनात सामावून घेण्याइतके समाज मन विशाल झाल्याशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रस्थापित होत नाही
# भानु काळे
5
"मैत्र जीवाचे, सूत्र आपुलकीचे !":👍
💐 " मैत्री ही मोठी विलक्षण गोष्ट आहे घरांमध्ये जसं वार खेळत राहत एका दिशेने येतं घरात असणाऱ्यांना चुकावत दुसऱ्या दिशेने बाहेर जात अशी खेळती हवा मैत्रीत असते जगाचा अनुभव घ्यावा मैत्रीच्या दरवाजातून मोकळेपणाने वाहू द्यावा पुन्हा बाहेरचं जग पाहू लागावं मैत्री अशी निरंतर वाहती असते त्यात विश्वास असतो कौतुक असतं खरे पणाने केलेली टीका असते रसग्रहण असतं खेळत्या वाहत्या हवेत मुळीच प्रदूषण नसावं अशी मैत्री असते !":💐
# नीला भागवत
6
मी कलाकार म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणूनही जगताना, एका आस्वादकाच्या भूमिकेतूनच जगलो. तुम्हाला जगण्यातल्या निरनिराळ्या पैलू मध्ये रुची हवी, कुतुहूूल हवं. मला जुन्या हिंदी गाण्यांची आवड आहे. मी 60 /70 च्या दशकातील हिंदी गाणी कितीही वेळा ऐकू शकतो. मला क्रिकेटमध्ये त्यातही कसोटी मध्ये- आयपीएलची माझी जरा खुन्नस आहे, अतिशय रुची आहे. मी क्रिकेटवर खेळाडूंवर भरपूर लिहिलंही आहे. मी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडेच मी सोशल मीडियावर माझं अकाउंट सुरू केलं आहे. खरं तर मला त्यातलं तांत्रिक फारच काही कळत नाही. मात्र अलीकडच्या काळात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रभावी साधन आहे या शंका नाही. त्यामुळे मी आता तेही करून पाहतो आहे.
एकूण आयुष्याकडे आस्वादकाच्या दृष्टीतून पाहिलं आणि तसंच रसरशीतपणे जगलं तर एकूण माणसाचं जगणं आनंददायी होऊ शकेल, असं मला वाटतं !":💐अःरऔःङऐःङःङे
# लोकप्रिय हरहुन्नरी अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर
7
😇 " ही प्रगती की अधोगती ?":😇
🤣 " डॉक्टर विजय ढवळे यांचे 'कॅनडियन भेळ' हे माहितीपूर्ण व मनोज्ञ पुस्तक वाचत होतो. सहज लक्ष गेलं म्हणून समजलं ते पुस्तक 2008 साली प्रसिद्ध झाला होतं खाली किंमत बघितली दहा डॉलर किंवा रुपये 300 !
याचा अर्थ 2008 साली एका डॉलरची किंमत तीस रुपये होती. ताबडतोब आजचा दर बघितला तर एक डॉलर बरोबर 87.48 रुपये असा आढळला ! थोडी स्मरणशक्तीला चालना दिली आणि ध्यानात आले की गणिताच्या विनिमयाच्या उदाहरणात डॉलरची किंमत साडेसात रुपये अशी काही दशकांपूर्वी होती !
त्याचा अर्थ रुपयाचे किती चिंताजनक अवमूल्यन होत राहिले आणि तेवढेच डॉलरचे मूल्य मात्र कायम वाढतेच !!
सातत्याने विकासाचा ढोल वाजवला जात असताना, ही प्रगती म्हणावयाची की अधोगती ?
मी काही अर्थतज्ञ नाही हे ज्याचे त्याने ठरवावे !:😇
"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा