रविवार, १० ऑगस्ट, २०२५

" सहज जाता जाता सुचलं म्हणून !":

👍"सहज जाता जाता, सुचलं म्हणून !":👌 💐 "कोणती कल्पना कधी सुचेल ते काही कळत नाही. पण आज मला ही शीर्षकातली कल्पना सुचली, ती वर्तमानपत्रातील नाटकांच्या जाहिराती बघून ! हल्ली मराठी चित्रपटांपेक्षा मराठी नाटकं अधिक जोमाने चालू आहेत. मराठी चित्रपट कधीही पाहायला गेलं, तर चित्रपटगृह जवळजवळ रिकामाच असलेलं दिसतं, तशी नाटकांची आज परिस्थिती नाही हे समाधानाची बाब आहे. वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये म्हणा किंवा रविवारच्या अंकात म्हणा पानंपान नाटकांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. तिथे चित्रपटांची जाहिरात नसतेच जवळजवळ. कदाचित आर्थिक कारणामुळे चित्रपटांची जाहिरात करणं परवडतही नसेल. आज सहज पुरवणीतलं पान पाहिलं तर बऱ्याच नाटकांची जाहिराती समोर दिसत होत्या. सहज नीट निरीक्षण करून पाहिलं तर त्यातील कोणती नाटकं मी बघितले आहेत हा हिशोब केला, तर लक्षात आलं की पुढील सात नाटकं आम्ही बघितली आहेत आणि जवळजवळ त्यातील प्रत्येक नाटक हे पुढे अत्यंत लोकप्रिय झालं आहे आणि धडाक्याने चालत आहे. ती नाटकं अशी असेन मी नसेन मी जर तर ची गोष्ट The दमयंती दामले आमने सामने दोन वाजून 22 मिनिटानी ही नवीन नाटकं आणि जुनी पुरुष आणि ऑल द बेस्ट नवीन नाटक जरी लोकप्रिय होत असली, तरी जुन्या नाटकांचेही पुन्हा प्रयोग सुरू आहेत हे अजून दोन बातम्यांनी त्याच पुरवणी मधून समजले. एक म्हणजे सतीश आळेकर यांचं 'महापूर' हे एकेकाळी पुरुषोत्तम करंडक आणि पुण्यामध्ये प्रचंड गाजलेलं नाटक व विजय तेंडुलकर लिखित, सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेलं 'सखाराम बाईंडर' ही नाटक पुनश्च रंगभूमीवर येत आहे. थोडक्यात मराठी माणसाला मनापासून जिव्हाळ्याचं असलेलं मर्मबंधातलं स्थान मराठी नाटकांनी घेतलं तर आहेच आणि त्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत हे आज जाणवलं. तीच ही... "जाता जाता सुचलं म्हणून नोंद !":💐 ---------- 2 😄 "जाता जाता सहज सुचलं म्हणून !":😄 😀 "हे माझे मुक्त विचार सादर करत आहे, त्यामध्ये मला आलेले अनुभव आणि त्या अनुभवांवरती माझी जी काही निरीक्षणं आहेत, ती येथे व्यक्त करणार आहे. अगदी मनमोकळा मनापासून प्रामाणिकपणे केलेला हा आत्मसंवाद आहे ! काय झालं, आत्तापर्यंत मी शॉवरखाली कधीही आंघोळ करत नसे आणि त्याला कारणही असे: बरेच वेळेला काय व्हायचं बाहेरून आल्यावर मी हातपाय धुवायला म्हणून नळाखाली ती तोटी उघडायचो, तर त्या वेळेला मला तिथून पाणी न येता शॉवर मधून पाणी यायचं. कारण कोणीतरी ती शॉवरची जी काही क्लिप आहे ती बंद केलेली नव्हती. माझे चांगले कपडे त्यामुळे ओले व्हायचे आणि ते बदलायचा त्रास झाला. त्यामुळे तेव्हापासून मला शॉवर म्हणजे नको बाबा, असं वाटत आलं आणि अक्षरश: कोणाचा विश्वासही बसणार नाही, मी आयुष्यभर कधी शाॅवरखाली आंघोळच केली नाही. नुकतीच अशी गंमत झाली. मी माझ्या पत्नीला विचारलं की असं कां होतं? तर तिने मला प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्यामुळे मला कळलं की शाॅवर कसा वापरायचा ! आता हा खरोखर मूर्खपणा म्हणा बालीशपणा म्हणा, काहीही म्हणा पण झालंय खरं. तेव्हापासून मी अगदी मनसोक्तपणे बरोबर शॉवर चालू करतो. त्यावेळेला योग्य तऱ्हेच गरम पाणी पाहिजे तर तेही मला मिळतं. नॉर्मली मी गरम पाण्याने आंघोळ करतो, गिझर चालू करायचा जी काही नेहमीचा नळ आहे तोही योग्य लेवलला चालू करायचा. जेवढं काही टेंपरेचर आपल्याला पाहिजे ते पहायचं अन् मग ती जी काही शॉवरची टोपी आहे ती खेचायची की नळाखालील पाणी बंद होतं आणि शाॅवर मधून ते चालू होतं. त्यामुळे होतं काय की, वरून सतत पाणी येतं आणि आपल्या अंगावर आपण ते कुठेही कसंही घेऊ शकतो. त्यामुळे आंघोळ करायला गंमत तर वाटतेच पण ज्याला आपण सिमलेस म्हणतो एफर्टलेस म्हणतो तशी आंघोळ होऊ शकते. कारण आपले दोन्ही हात रिकामे असतात, आपण आपला सगळं शरीर गोल फिरून कुठेही ते पाणी आपल्याला पडायला पाहिजे तिथे आपण घेऊ शकतो. त्या दिवसापासून मला आंघोळ करणे ही गंमत वाटायला लागली आहे ! पूर्वी नाही तर काय व्हायचं खाली बसायचं आता वयोमानाप्रमाणे एखादं स्टूल घ्यायचं बादलीतील पाणी योग्य टेंपरेचरला येतय ना ते पाहायचं आणि मग तांब्याने उचलायचा, पाणी आपल्याला जिथे पाहिजे अंगावर तिथे टाकायचं. मग खसखस अंग चोळायचं. म्हणजे ह्यामध्ये श्रम जातात, सगळ्या ठिकाणी पाणी जाईल ह्याची खात्री नाही. कारण पाठीवर आपल्याला इतके सहजासहजी पाणी सगळीकडे टाकता येत नाही पोहोचत नाही.समजा ते गेलं तरी हाताने अंग चोळता वगैरे येत नाही. डाउनलोड शॉवरची धार तेच काम जिथे पाहिजे तिथे टाकता येते. त्यामुळे मला तेव्हापासून समजलं, साध्या साध्या गोष्टी असतात पण आपण त्या टाळत असतो. कुठल्यातरी अनामिक अशा अनुभवामुळे-भीतीमुळे आपण हे असं शॉवरचं प्रकरण मी टाळत आलो. किती मोठी चूक केली, किती मोठ्या आनंदाला, सुखासमाधानाला मी मुकलो असं मला त्या वेळेला वाटून गेलं. पण तेव्हापासून मी न चुकता कधी केव्हाही कुठे गेलो तर शांवरनेच गरम पाण्याने योग्य त्या टेंपरेचरचे पाण्याने आंघोळ करतो, प्रसन्न वाटतं, समाधानही वाटतं आणि त्यामानाने लवकरही आंघोळ होते आपल्याला पाहिजे तितकं आपण पाण्यात डुंबूही शकतो. अशी ती गंमत, मला आज अनुभवातसाठी सांगावीशी वाटली. कदाचित प्रत्येकालाही कुठला ना कुठला तरी असाच अनुभव येतच असतो. चूक भूल द्यावी घ्यावी, कुठे मर्यादा ओलांडली गेली असली तर क्षमस्व. पण एक मुक्तसंवाद म्हणून हा गोड मानून घ्या !":😀 धन्यवाद ----------- 3 सहज जाता जाता सुचलं म्हणून !": " कोंडमारा करणारी रस्ते वाहतूक !" मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्याने प्रवास करणे हे किती दयनीय आणि त्रासदायक झाले आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मडगार्ड टू मडगार्ड अशा तऱ्हेने गाड्या एकमेकांना भिडलेल्या, त्यात टू व्हीलर, थ्री व्हीलर यांची भाऊगर्दी आणि बेशिस्तीने चालणारे पादचारी, अशा अवस्थेत कोणत्याही चालकाने गाडी कशी चालवायची, हा एक खरोखर गहन प्रश्न आहे. रस्त्यात पडलेले खड्डे, कुठल्याही गल्लीबोळात दोन्ही बाजूला पार्किंग केलेली वाहने आणि कुठेही कुठल्याही दिशेने मनमानीपणे वेळ पडली तर सिग्नल तोडून जाणारे दुचाकीस्वार, त्याशिवाय 'हीट & रन' च्या वाढत्या केसेस यामुळे सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे हे सत्य आहे. दुर्दैवाने कोणत्याही प्रकारची ठोस कृती केली जात नाही आणि 'जाने दो चालसे कल्चर' वर्षानुवर्षे चालू आहे. पूर्वी ज्या प्रवासाला पंधरा मिनिटे लागायची, त्याला आता रस्त्याने जी काही कोंडी होते त्यामुळे कधी कधी पाऊण तास एक तास ही लागू शकतो. गंभीर आजारी माणूस असला, तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना काय ताण-तणाव निर्माण होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. सोबतच्या वृत्तामध्ये वाहने वाढली आणि एकंदर धोरण कोलमडले याचे वृत्त आहे. जी मुंबई शहराची अवस्था त्याहून कदाचित अधिक त्रासदायक इतर शहरांच्याही रस्ते वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा ! याला विकास म्हणायचे? याला नियोजन म्हणायचे ? दुर्दैव असे की कुणालाच त्याचे काहीही वाटत नाही. जिथे फूटपाथ वर फेरीवाले नाहीत, तिथेही फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालणारे नागरिक, तसेच सिग्नल जिथे आहे तिथेच खरं म्हणजे रस्ता क्रॉस करणे अत्यावश्यक आहे. परंतु आपल्या इथे कोणीही कुठेही केव्हाही रस्ता क्रॉस करतो. त्यामुळे वाहन चालकाची त्रेधातिरपीट न झाली तरच नवल ! प्रगत देशात किती काटेखोरपणे सारे कायदे पाळले जातात आणि नागरीकही शिस्तीने वागून त्यांना साथ कशी देतात ते आता वेगळी सांगायची गरज नाही. सुरुवात प्रथम नागरिकांपासून सुरू झाली पाहिजे, त्याचप्रमाणे टू व्हीलर चालवणारे यांनी अधिक जबाबदारीने आणि शिस्त पाळून प्रवास केला पाहिजे. चार चाकीवाला कुठे चुकला, सिग्नल मोडला व इतर काही, तर त्याला जशी दंडाची शिक्षा होते, त्याचप्रमाणे शिस्त न पाळणाऱ्या पादचार्‍यांवरही आणि टू व्हीलर वाल्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. नागरिकशास्त्र फक्त शाळेत विकून नंतर विसरले जाते हे देखील एक दुर्दैवच. साहजिकच घरातून बाहेर पडलेला सुखरूप घरी येईल की नाही याची चिंता सर्वांनाच होत असते. ही परिस्थिती खरोखर आणीबाणीची आहे. वेळीच त्यावर काही ना काहीतरी ठोस कृती केलीच पाहिजे. वेळ पडल्यास जसे 'घरगुती गॅस' वर पुरवठ्याबद्दल नियंत्रण आहे, त्याचप्रमाणे नव्या वाहनांची परवानगी देतानाही नियंत्रण ठेवले गेले तरच काही सुधारणा होण्याची आशा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा