रविवार, २५ मे, २०२५

" मल्लिनाथी- जागते रहो !":

################# 😂 " मल्लिनाथी !":😂 👍" राजकारणाचा चिखल !":👌 "सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून पक्षीय राजकारणात मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी. कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल. After all one must remember: "When Character is Lost, Everything is Lost !" ################# 🤢" मल्लिनाथी- जागते रहो !":🤢 🤣 "केवळ राजकारणाचाच नव्हे, तर समाजाच्या नीतिमत्तेचाच चिखल झाल्याच्या घटना सातत्याने आपल्यासमोर घडत असताना, भौतिक विकासाचे ढोल पिटणे काय कामाचे? फक्त आहे रे वाले आणि त्यांची वाढती प्रगती पाहून उपयोग काय, जर नाही रे वाल्यांच्या पीडा कष्ट आपण कमी करू शकलेलो नाहीत. केवळ अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची झाली अशा वल्गना करून उपयोग नाही. कारण लोकसंख्या विचारात घेता दरडोई उत्पन्न इतर देशांच्या तुलनेत किती आहे? ते महत्त्वाचे नव्हे कां? तसेच प्रत्येक देशाची लोकसंख्या आकारमान आणि त्यांचा अर्थव्यवस्थेचा आकार या तुलनेत देखील आपण कुठे आहोत हा विचार व्हायला हवा का नको? वर्तमानपत्रातील वेगवेगळ्या बातम्या बघा: गलथान कारभार, जिकडे तिकडे भ्रष्टाचार, दिरंगाई किंवा एकंदरच व्यवस्थेचे दुर्लक्ष त्याचबरोबर गुन्हेगारी घोटाळे अशाच बातम्या येत असतात. उदाहरण म्हणून दैनिक वृत्तपत्रातील मथळे हे पहा: # कुपोषणाची समस्या कायम ! # ई बस संबंधित एसटीची कारवाईस टाळाटाळ # आपत्तींचा फटका सर्वाधिक # अकरावी परीक्षेच्या प्रवेशाच्या प्रक्रियेत उडालेला गोंधळ आणि लाखो विद्यार्थी पालकांना सोसावा लागलेला त्रास मनस्ताप # विक्रोळी उड्डाणपुलाची 'दिशा'भूल: त्या पायी चालकांना झालेली रखडपट्टी # तिसरी भाषा रद्दबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रश्न: घोषणा स्वागतार्ह, पण शासन निर्णय कधी ? # रांजणगाव जवळ आढळले अर्धवट जळालेले तीन मृतदेह # पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा खड्ड्यांसाठी पोर्टल उघडण्याची वेळ # गरजूंसाठी एक कोटी मोफत भोजन थाळ्या ! # शहर स्वच्छतेची जबाबदारी कोणाची ? शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर वणवण करायची वेळ कोणी घर देता का घर ? # कमावण्याच्या नादात 25 लाख गमावले # महिलेचे मंगळसूत्र खेचले # आरवलीत वाहतुकीची दैना . .... एक ताजी बातमी: # पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण मेट्रो एक्वा लाईनचे वरळी स्थानक पाण्यात... इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देखील दुसऱ्या कुठल्याच बातम्या नसतात. अपघात गुन्हेगार गोंधळ घोटाळे अशाच चिंताजनक बातम्यांची लाईन रांग लागलेली असते. हे कशाचे लक्षण आहे ? शिवाय दररोजच्या व्यावहारिक जीवनात कायदा न पाळता, वाटेल तशी वागणूक करणारे आणि त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा बडगा नसणारे असे प्रसंग बहुतेक कुठल्या ना कुठल्या तरी शहरात कायम घडत असतात. व्यवस्थेचे हे अपयश नव्हे कां? कोणत्याही व्यवस्थेचे नियम हे ती व्यवस्था सर्वांच्या हिताच्या दृष्टीने सुलभतेने कार्यरत राहावी यासाठी असतात. जर नियम पाळले गेले नाही तर काही दंड आकारला जाण्याची ही व्यवस्था असू शकते. सुबुद्ध सुसंस्कृत नागरिकांनी त्या व्यवस्थेच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. पण सध्या हम करे सो कायदा अशा तऱ्हेची प्रवृत्ती असलेली माणसेच जर समाजात अधिकाधिक निर्माण होत असली तर कोण काय करणार? अराजकाचे हे पहिले पाऊल असू शकते. कधी नव्हे इतकी सांस्कृतिक खालावलेली परिस्थिती अधिकच रसातळाला जात असलेली दिसताना,जागे व्हा ! सज्जन सुसंस्कृत समाज जेव्हा निर्माण होईल तेव्हाच खरे, चौथी अर्थव्यवस्थेचा जय जय कार व्यर्थ आहे, स्वतःचीच आत्मवंचना करणे आहे !":🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा