सोमवार, १२ मे, २०२५
" एक मनभावन शारदोत्सव विपुलश्री मे 25 चा अंक
😄" एक मनभावन शारदोत्सव":😄
'विपुलश्री' मासिकाचा मे'25 महिन्याचा अंक वाचून मला जो
समाधानाचा खजिना आणि जाणीवांच्या महासागराचा स्पर्श झाला, तो खरोखर शब्दात वर्णन
करण्यासञ मी समर्थ आहे. ह्या मासिकाच्या वाचनाने भारावून गेलो आहे. दोनच वानगीदाखल
'छाप पडलेले शब्द' म्हणून येथे संपादकीय आणि कथास्पर्धेच्या परीक्षकांचे मनोगत
scanned स्वरूपात मांडत आहे. तसेच विपुलश्री मासिकाच्या मे25 च्या अंकाचा रसास्वाद
मी येथे मांडत आहे. पहिली गोष्ट मला मान्य करावीशी वाटते ती म्हणजे, आतापर्यंत माझे
वाचन किती मर्यादित होते, त्याची मला या मासिकातील कथास्पर्धेच्या संबंधीच्या
परीक्षक नीलिमा बोरवणकर यांच्या मनोगतामुळे कळले आहे. आतापर्यंत मी व्यक्तीचित्र
किंवा एखादी नवीन माहिती असलेले किंवा किंवा आत्मचरित्र एवढेच माझे वाचन मर्यादित
होते परंतु कथा म्हणजे नुसती गोष्ट नव्हे तर अजून बरंच काही असतं असं या निवेदनात
म्हटले आहे कथा म्हणजे केवळ गोष्ट नव्हे तर आर्थिक गोष्ट कुणाच्या आयुष्यात घडणार
त्या व्यक्तीरेखा हव्यात गोष्ट नक्कीच हवी कथाबीजव पण ज्या व्यक्तींच्या मध्ये ती
गोष्ट केव्हा घडला घडते त्यामधील आपसातले संवाद हवेत घटना प्रसंग हवेत आणि कथा
म्हणजे या सगळ्याच योग्य मिश्रण हे जे निवेदन माझ्या आतापर्यंतच्या अपेक्षांना
पूर्ण छेद देणारे होते मला वाटायचे की कथेमध्ये उगाचच भराभर संवाद आणि बरंच काही
पालाळीत लिहिलेलं असतं आणि शेवटी थोडक्यात जे काय घडतंय किंवा घडणार आहे किंवा घडून
गेलंय ते थोडक्यात का सांगितलं जात नाही असं मला वाटायचं. पण आता मला पूर्ण कळून
चुकलं की, ती चूक होती. या मनात घट्ट बसलेल्या समजूती पायी मी साहित्यातील एका
मोठ्या क्षेत्राला मुकलो कारण कथा असलेले मी काही जास्त वाचत नसे.
कथा स्पर्धेमध्ये
ज्या दिन कथा बक्षीस पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या वाचनाने मला समजून आले की लघुकथा
कथा म्हणजे काय तर एक विषय नक्कीच असतो, पण तो विषय कुणाच्या बाबतीत घडतो कसा घडतो
आणि परिणती काय होते याचे जे काही रसायन ते म्हणजे लघुकथा. आता या तिन्ही पारितोषक
पात्र लघुकथा देखील खरोखर प्रत्येक विषय वेगळा असणाऱ्या आहेत 'युथ इन एशिया' ही कथा
इच्छा मरणावरती आहे- लेखक डॉक्टर शुभंकर कुलकर्णी. इच्छामरण अपेक्षणारी या कथेतील
नायिका शेवटी कशी त्यापासून दूर जाते आणि जीवन चवीने जगाव यासाठी उद्युक्त होते हा
तो धक्का आहे. दुसरी जी पारितोषकपात्र कथा धिंड' आहे लेखिका डॉक्टर स्वरूप भागवत.
कथेमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यासाठी धडपडणारी आंदोलन करणारी जी
स्त्री आहे तिच्याच आयुष्यात एका घटनेमुळे केवढी भयानक अशी भूकंपा सारखी घटना घडते
कारण एका मुलीवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच मुलगा निघतो. तिसरी
पारितोषक पात्रकथा निल चित्र आहे लेखक डॉक्टर अभय वळसंकर. एकल ज्येष्ठ नागरिक आणि
त्यांच्या मनोव्यथा व्यक्त करताना ब्लू फिल्मचा विषय मोठ्या खुबीने हाताळला आहे.
वडील आणि मुलगी यांच्या मतभेदांमधील ताणतणाव व्यक्त करता करता, शेवटी प्रत्येकाला
आपलं मन असतं आणि त्याप्रमाणे त्याला आपल्या मनाप्रमाणे वागण्याची उभा असते हा
मुद्दा मांडला आहे.
# डॉक्टर शिरीन वळवडे यांचा तिसरी जी पारितोषक पात्र कथा आहे
तिच्यामध्ये एकल ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मनोव्याता व्यक्त करताना ब्लू फिल्म
चा विषय मोठ्या खुबीने हाताळला आहे आणि शेवटी प्रत्येकाला आपलं मन असतं आणि
त्याप्रमाणे त्याला तेवार्तालाप आपल्याला जगामधल्या चित्र विचित्र सुरत अशी माहिती
पेश करतो त्यामध्ये एम एम मधलं एक गाव असा आहे की जिथे कधीच पाऊस पडत नाही. # एक
स्त्री म्हणून तिलाही एक स्वतंत्र अस्तित्व असतं हे अधोरेखित करीत स्त्री
विकासावरच्या काही स्त्रियांची माहिती देणारं सदर म्हणजे तू चाल पुढे मंगला गोखले
यांनी जिद्दी प्रेमाताई पुरव यांच्या आयुष्याची संघर्षमय आणि थरारक अशी कहाणी सादर
केली आहे. ती बघून आपल्याला या स्त्रीच्या कर्तृत्वाचं आश्चर्य मिश्रित कौतुक
वाटते. # अगदी आगळा वेगळा विषय म्हणजे 'संस्कृत साहित्यातील कवीसंकेत' डॉक्टर लिली
जोशी यांचा लेख वाचनीय आहे. देव देवता दैवी शस्त्रे वाहने इत्यादी संबंधित जी
माहिती आपल्याला संस्कृत साहित्यातून आणि तेथील कवींच्या रचनांमधून आढळून येते की
किती चित्तथरारक आणि रोमहर्षक असते हेच आपल्याला या लेखावरून कळून येत आणि आपल्या
देव-देवतांच्या अप्सरांच्या ज्या प्रतिमा आपल्या मनात निर्माण आहेत, त्यामागचं
मीमांसा येथे आपल्याला समजून येते.
# 'आठवले तसे' या सदरामध्ये डॉक्टर विजया फडणीस
यांनी निसटलेले जे आपल्याला हवे असते त्यासंबंधी विविध उदाहरणांवरून उहापोह केला
आहे. आपला अपेक्षाभंग आयुष्यामध्ये अनेक वेळा होत असतो हे जरी खरे असले तरी,
त्यामधूनही वेगळा असा मार्ग निघतो संधी प्राप्त होते.
💐" Take Risks in your life"
If you win, you can lead. If you lose, you can guide !":💐 # Swami Vivekanand.
आज संदेशही त्याने येथे दिला आहे. त्यांना स्वतःला अपेक्षित नोकरी न मिळाल्यामुळे
त्यांनी त्या अपेक्षाभंगामुळे नाऊमेद न होता, स्वतःचा असा मानसशास्त्रीय कन्सल्टिंग
व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये त्यांना कसे यश आले हे सांगितले आहे. परिस्थितीशी
जुळवून घ्यावे निराश होऊ नये, हेच खरे. # सगळ्यात कुठली आगळीवेगळी अशी गोष्ट या
अंकात असेल तर ती म्हणजे अंध व्यक्तींना चित्र पाहू शकण्याची अशी जी काही किमया आहे
ती साध्य करणारे ठिजल्या डोळ्यांना पाहायला शिकवणारा चित्रकार चिंतामणी हसबनीस
यांची सुप्रिया जोगदेव यांनी ओळख करून दिली आहे. एकदा रस्त्याने जाताना अनुभव असा
आला की, लाल सिग्नल लागला, गाडी थांबवली. समोरून एक अंध मुलगी जात होती त्यावेळेला
त्यांना वाटलं 'अरे आपली चित्रे ही दुर्दैवी अंधमंडळी कशी बघू शकतील? त्यांना आपण
ते बघता यावं असा प्रयत्न करायला हवा आणि त्याच्या मागे लागून त्यांनी जे पुढे यश
मिळवलं ते खरोखर कमालीचं जगावेगळ अद्वितीयच होतं. ब्रेल लिपी शिकून त्यांनी अशी
काही प्रदर्शना भरवली की जी अंधमंडळीसुद्धा बघू शकतात. खरोखर एकाच अंकात इतक्या
वैविध्यपूर्ण साहित्याचा अनमोल खजिना आपल्याला मिळावा, हा एक भाग्ययोग होय. # खगोल
विश्वातील विलक्षण परग्रह याची माहिती लीना दामले यांनी दिली आहे. जेम्स वेब
दुर्बिणीमुळे एक आपल्या नेपच्यून असा ग्रह सापडला आहे की जो एका बाजूलाच नेहमी असतो
आणि तो त्याच्याच सूर्याच्या अगदी जवळ आहे. एका बाजूला प्रचंड तापमान तर दुसऱ्या
बाजूला थंड असा तो परग्रह Cuancoa हा आहे. तो खरोखर आश्चर्यकारक आहे, तू
सूर्याभोवती 19 तासात फिरतो त्याचे वस्तुमान आपल्या पृथ्वीच्या 29 पट जास्त आहे.
त्या लेखामध्ये असेही समजते की, 128 चंद्रांचा शोध लागला आणि शेवटी आपल्याला लक्षात
आलं की शक्तिमान दुर्बिणी मुळे काय नवल घडू शकते. सूर्यमालेतील चंद्रांची संख्या
181 होती ती आता 274 झाली आहे. एवढेच नव्हे तर शनिभोवती देखील 62 चंद्रांचा शोध
लागला. आहे ! या विश्वाचे गुढ खरोखर अनाकलनीय आहे आणि विश्व अनंत अथांग आहे हेच
यावरून समजायचे.
# 'केल्याने देशाटन' या सदरामध्ये नीलिमा बोरवणकर यांनी मध्ये
आपल्याला एक वेगळीच माहिती उलगडली आहे. बुद्ध धर्माचा प्रसार जितका बाहेरच्या
देशामध्ये झाला आणि तितका आपल्या भारतात झाला नाही थायलंड वेतनाम अशा अनेक
देशांमध्ये बौद्ध लोक आहेत. तिथे माहिती कळली की सिद्धार्थ बुद्ध कसा झाला तर गया
शहरामधील बोधिवृक्षाच्या खाली तो बसला आणि त्या वृक्षांच्या खाली बसल्यावर त्याला
साक्षात्कार होऊन तो बुद्ध धर्म स्थापन करता झाला. त्याचमुळे जगामध्ये शांतीचा
प्रसार करण्याचा योग आला. तर याच गयेमध्ये आणि नालंदा विद्यापीठाची स्थापना एक शांत
काम पूर्वी झाली आणि जीचे आता पुनर्जीवन होत आहे त्याची माहिती देखील या लेखांमध्ये
आपल्याला होते. बौद्ध धर्माचा प्रसार थायलंड कांबोडिया इंडोनेशिया, जपान अशा 18
देशात बुद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बुद्ध जगाला शांतीचा संदेश देतो. नालंदा
विद्यापीठाचे कार्य काय हे शोधताना तेथून बुद्ध धर्माचा प्रसार त्यामुळेच कसा झाला
त्याची माहिती आहे.
मराठी मासिकांची संख्या आता केविलवाणी म्हणावी अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच झालेली आहे तीच गोष्ट मराठी माध्यमांच्या शाळांची ही आहे अभिजात मराठी भाषा असा अभिमान बाळगत असताना हे वास्तव पचायला कठीण आहे या पार्श्वभूमीवर विपुल श्री सारखे मासिक गेली 25 वर्षे साहित्य क्षेत्रात सन्मानाने सुरू आहे आणि उत्तर उत्तर एखादा वस्तू पाठ असावा अशा तऱ्हेचे साहित्य त्यातून दिले जाते आहे ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे.
असा अंक हाती येणे हे माझे भाग्य तसेच हा असा रसास्वाद तुमच्यासमोर उलगडताना मला होणारा आनंद वेगळ्याच प्रतीचा आहे म्हणूनच म्हणतो
हा मनभावन शारदोत्सव !"
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा