गुरुवार, २२ मे, २०२५

" 29 मे रोजी होणाऱ्या राहु व केतूच्या राश्यंतराचे परिणाम !"

"राहू व केतूच्या पाप कर्तरी योगाचे परिणाम !:" राहू व केतू हे दोन अत्यंत अनिष्ट ग्रह आहेत, त्यांच्या एका बाजूला जर सर्व ग्रह पत्रिकेत असतील तर कालसर्पयोग होतो आणि त्याचे त्या व्यक्तीला त्रासदायक परिणाम होतात हे आपणास ज्ञात आहे. कोरोना काळातही अशा राहू केतूच्या अनिष्ट योगामुळे सबंध जगावर संकट कोसळल्याचे आपण अनुभवले आहे. असे हे राहू केतू मूळ पत्रिकेत कुठे आहेत, हे पाहून, सध्याच्या राहू केतूच्या पाप कर्तरी योगात कोणती दोन स्थानं येतात, त्याचे निदर्शन व काय परिणाम संभवू शकतात त्याचा खुलासा ह्या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे. "राहू व केतू हे दोन पापग्रह दर दीड वर्षांनी राशी बदल करतात, ते उलटे मागच्या राशीत जातात. जसे आता राहू मीन राशीत व कन्या राशीत आहे. ते 29 मे25 रोजी अनुक्रमे कुंभ व सिंह राशीत प्रवेश करतील. अशा वेळेला मकर लग्नाच्या मूळ पत्रिकेमध्ये ज्यांच्या द्वादश स्थानात म्हणजे धनु राशीत केतू व षष्ठ स्थानात राहू मिथुुन राशीत असेल तर, त्या व्यक्तीच्या पत्रिकेत लग्नस्थान आणि सप्तम स्थान हे राहू व केतू यांच्या पापकर्तरी योगात येतील. ही दोन अत्यंत महत्त्वाची स्थाने आहेत, लग्नस्थान म्हणजे स्वतः, शरीरारोग्य मानसिक स्थिती तर लग्नस्थान म्हणजे जोडीदाराचे स्थान, वैवाहिक सौख्य भागीदारी विषयक फळे. साहजिकच या पापकर्तरी योगामुळे स्वतः त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदाराला त्रासदायक काळ, नुकसानकारक अशी फळे मिळण्याची शक्यता असू शकते. जन्मलग्न पत्रिकेमध्ये जर केतू आणि राहू यांच्या अनुक्रमे पुढच्या आणि मागच्या घरां मध्ये जर धनु आणि मिथुुन रास असेल ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू किंवा केतू हे तूळ आणि मेष राशीत असतील तर अशा पत्रिकांमध्ये सध्याच्या परिस्थितीत राहू केतूचा पापकर्तरी योग होऊ शकतो आणि त्याचे त्या त्या स्थानांबद्दल अनिष्ट परिणाम मिळू शकतात. अर्थात त्यामुळे जी दोन स्थाने ह्या अनिष्ट पापकर्तरी कुयोगात पत्रिकेमध्ये जन्म लग्न कोणते आहे, त्यानुसार त्या स्थानांचे कारकत्व असलेल्या गोष्टींची फळे क्लेशकारक संभवतील. तेव्हा प्रत्येकाने आपल्या जन्मलग्न पत्रिका तपासून पहाव्यात आणि जन्मलग्न कुंडली मध्ये राहू आणि केतू हे वरील प्रमाणे कुठे आहेत का? ते पहावे आणि तसे जर नसेल तर चिंता करायची कारण नाही. यावरून असे लक्षात येईल, जन्मलग्न पत्रिकेला हा असा अनिष्ट योग राहू केतूचा होऊ शकतो. मात्र ती बाधीत दोन स्थाने प्रत्येक जन्मलग्नाला वेगवेगळी असणार आहेत. धन्यवाद सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा