मंगळवार, २० मे, २०२५

"मुक्तसंवा-'कावाकामि' :काय वाचले काय मिळाले !":

😄 "मुक्तसंवा-'कावाकामि' :काय वाचले काय मिळाले !":😄 आता 'कावाकामि' इथे कुठलाही कावा नाही आणि त्याचा अर्थ एवढाच काय वाचलं आणि काय मिळालं हा आहे. आज सहज 'आपलेसे' हे पुस्तक वाचत असताना लेखक डॉक्टर अनिल अवचट, मला अचानक काही सुचलं आणि वाटलं की आता हे आपण व्यक्त करावं. आता व्यक्त करत लिहून करावं का बोलून करावं मग सगळ्यात सोपा उपाय सुचला तो म्हणजे बोलून करावं. बोलण्यामुळे आपल्याला जास्त वेगाने विचार व्यक्त करता येतात. त्या उलट वाचलेलं लिहिताना किंवा सुचलेलं लिहिताना आपल्याला दोन-तीन वेगवेगळ्या प्रक्रिया करायला लागताा. साहजिकच त्यासाठी वेळही जास्त जातो आणि दुसरं असं की जरी मी लिहीत असलो तरी ते केवळ बोलून ऑडिओ टू टेक्स्ट अशाच प्रकारचं मी लिहू शकतो. हाताने लिहिण्याची सवय गेलेलीच आहे. त्यामुळे वाटलं की आपण सरळ जे वाटलं सुचलं ते लिहून न काढता बोलत जावं आणि तेच मी आता करतोय. काय वाचलं आणि कसं सुचलं तर पहिलं सांगतो. 'आपलेसे' हे डॉक्टर अनिल पुस्तक जे आहे ते जवळजवळ वीस बावीस अशी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची कार्यकर्तृत्वे, ज्यांचं अगदी विभिन्न क्षेत्रात आहे. काही माहितीचे आहेत काही बिलकुल माहितीचे पण नाहीत. पण माणूस म्हणून ते कशी आहेत, ते मांडणार आहे अतिशय साध्या सोप्या भाषेतलं पुस्तक मी वाचतोय आता हे वाचताना मला लक्षात आलं की, वाचनालयांचा आणि माझा संबंध गेली 40 वर्ष वेगवेगळ्या वाचनालयामध्ये येत गेलाय. प्रथम पारस लायब्ररी, त्यानंतर दादर सार्वजनिक वाचनालयाची लायब्ररी आणि आता गेल्या दोन वर्षात वसंत वाचनालय हे जवळजवळ 66 का 67 वर्ष जुना असलेलं प्रसिद्ध वाचनालय, तिथे मी सभासद म्हणून सुरुवात करून केवळ दोनच वर्ष झाली, पण मला लक्षात आलं की आधीच्या दोन लायब्ररीज् मधून मला जे काही मिळालं नाही किंवा मिळालं त्यापेक्षा कितीतरी वेगळं मन समृद्ध करणार, जाणीवा समृद्ध करणारं असं खूप खूप काही या वसंत वाचनालयामधून मला मिळून गेलं. आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या दोन अडीच वर्षात मी मासिक आणि पुस्तक मिळून 175 साहित्यकृती वाचू शकलो. आपलेसे हे माझं 175व साजरा करणार पुस्तक आहे ! या कालखंडात मी कितीतरी विविध प्रकारचं असं वाचन केलं अर्थात त्यामध्ये मला शक्यतोवर व्यक्तिचित्रात्मक आत्मवृत्त असलेली व ललित लेख व कुतुहूल वाढवणारी नवीन माहिती देणारी अशीच साहित्य संपदा आवडते. किती वेगवेगळी माणसं किती वेगवेगळी त्यांची कार्यक्षेत्र आणि जीवनातले बरे वाईट उंच सखल सुखदुःख व्यक्त करणारे प्रसंग आणि अनुभव ! यावरून माणूस म्हणून जगताना आयुष्य किती अनाकलनी असतं, ते समजलं. जे काही वाचलं त्यातून मला जे काही मिळालं, त्यावरून मला सुचलं की माणसाचा आयुष्य हे वेगवेगळ्या कप्प्यांध्ये विभागलेलं असतं. कुणाचं बाल्य तर कुणाचं तारुण्य तर कुणाचं प्रॉडक्ट व वृद्धापकाळ चांगला किंवा वाईट असा असू शकतो. प्रत्येक काळाचा वेगळा कप्पा असतो एखादा कप्पा कुणाची परीक्षा पाहणारा, तर एखाद्याचा कप्पा असा असतो की ज्यामध्ये त्याला खूप खूप काही करावसं वाटतं. तो जो कप्पा असतो तो खरोखर अगदी वेगळा असतो आनंद देणारा असतो. त्याहून आपल्याला काही काळ असा येतो की काय करावं कसं करावं, संकटे बघणारा असतो. तर काळे गोरे, चांगले वाईट असे हे कप्पे आयुष्य घडवत जातात. आता सध्याचा माझा ज्येष्ठ नागरिकत्व अनुभवणारा उत्तरा आयुष्यातला काळ मागील काळापेक्षा कितीतरी सकस अनुभव देणारा कुतुल जागृत करून नवनवीन योगदान वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्रीच्या रूपाने या हृदयीचे त्या हृदयी करणारा लाभला आहे याची जाणीव झाली. डाॅ अनिल अवचटांचे आपलेसे हे पुस्तक वाचताना वेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे जीवन त्यांचे योगदान वेग अनुभवायला मिळाले डॉक्टर सरोजिनी वैद्य या मराठीच्या प्राध्यापिका त्यांची मराठी साहित्याची सखोल संशोधन करणारी प्रवृत्ती त्यासाठी वाटेल तितकी धडपड बटाटोप करणारी जीवनशैली. तर सत्यकथेचे संपादक असलेले राम पटवर्धन चोखंदळ वृत्तीने निरक्षर विवेक करत प्रत्येक साहित्याचे विश्लेषण करून उत्तम उत्तम अशी निवड करणारे व्यक्तिमत्व. तर त्या उलट दत्ता सराफ हे मनमोकळ्या स्वभावाचे नवनवीन काहीतरी देण्याच्या दिशेने लेखकांना प्रोत्साहन देणारे संपादक. त्यांनी मला सुप्रसिद्ध नाटककार साहित्यिक प्राध्यापक असं कानिटकरांची मुलाखत घेण्याची संधी दिली होती नाशिकला जाऊन मी त्यांच्या बंगल्यामध्ये मुलाखत घेतली होती, वर आधारित माझा लेख आवर्जून यावेळी तरुणाई मध्ये विलक्षण आवडत्या 'मनोहर' साप्ताहिकात छापली होती. तर असे ते दत्ता सरााफ.! त्या उलट निळूभाऊ म्हणजे आपले निळू फुले, येथे काळी माळी म्हणून नोकरी करणारे जातिवंत कलाकार. नेहमी चुरगळलेल्या अशा पोशाखामध्ये असणारे हे व्यक्तिमत्व परिणामकारक अभिनयाच्या बाबतीत किंवा इंग्रजी चित्रपटांच्या बाबतीत दर्दी होते, हे वाचून देखील मला थक्क व्हायला झालं. तर अशा तऱ्हेची वेगळ्या क्षेत्रातली अगदी भिन्न असे अनुभव असणारी माणसं आपल्याला अशा तऱ्हेची पुस्तकं वाचून अनुभवायला मिळतात. आपल्याला काही त्यातून शिकायला मिळतं की, आपण देखील कसं व्हावं वा कसं होऊ नये आणि म्हणूनच मला वाटतं की वाचनासारखा आनंद नाही, अनुभव देणारा नाही म्हणून मी आज या सहज अशा मुक्तसंवादात 'कावाकामि' या शीर्षकाखाली काही लिहिलं, त्यामधून तुम्हाला काय मिळालं मला माहित नाही. पण मला ते द्यावसं वाटलं ते मी इथे दिलं, ते गोड मानून घ्या ! धन्यवाद श्री सुधाकर नातू ##@############ 😀 "वाचाल, तरच वाचाल !":😀 "काय वाचले आणि काय जाणवले !": # महाराष्ट्र टाइम्सची संवाद पुरवणी नेहमीच वाचनीय असते. त्यातील 'वाघांच्या कुटुंबातला माणूस' हा श्री सुनील करकरे यांचा लेख भारतीय व्याघ्र संरक्षणातील महत्त्वाचे नांव असलेले वाल्मीक खापर यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा विशाल पट आपल्याला थक्क करतो. रणथंभोर मधील वाघांच्या कुटुंबाचा भाग होऊन आयुष्याच्या अखेरपर्यंत व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या ह्या असामान्य वन्यजीव कार्यकर्त्याचे हे हृदयस्पर्शी स्मरण आपल्या मनात घर करून जाते. # तंबी दुराई यांची 'दीड दमडी' -'गैरसमज दूर व्हावे म्हणून' एक कॉलमी स्फूट खरोखर चटका लावणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे ठरावे ! 'बार' आणि तेथे चालणारे उपद्रव तसेच जुगाराचे अड्डे आणि एकंदरच व्यवस्थेतील देवाणघेवाण जिला भ्रष्टाचार असे पॉलिटिकली करेक्ट नांव दिले जाते त्यासंबंधी वास्तवाचे रोचक बोच बोचणारे दर्शन ही 'दीड दमडी' आपल्याला देऊन जाते आणि अंतर्मुख करते. # त्याच 'तंबी दुराई' अर्थात श्रीकांत भोजेवार यांचा 'सामना' तेव्हा आणि आता" लेख हा बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा आणि पन्नास वर्षांपूर्वी घडूून गेलेला दुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील 'सामना' या कालातीत चित्रपटाची ओळख 'तेव्हा आणि आता' ह्यांचा अतूट संबंध खुबीने मांडतो. 'सत्ता आणि मत्ता' यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते आज पन्नास वर्षे उलटूनही तसेच राहिले आहे आणि म्हणूनच सामना चित्रपटातील मास्तर आणि हिंदुराव यांच्यातला संघर्ष आजही नव्याने थैमान घालत असल्याचे आपल्याला दिसून येते. चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि द्रष्टे लेखक विजय तेंडुलकर या त्रिकुटाचे असे एकत्र येणे हे 'सामना' विलक्षण प्रभावी आणि परिणामकारक होण्याचे कारण होते हेही आपल्याला या लेखावरून समजून येते. धन्यवाद श्री सुधाकर नातू ####@@########

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा