मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

" सोशल मीडियावरील माझी मुशाफिरी- भाग 11 !":

😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇 😭 # आता 'काहीही हं हं 'नाही, तर 'इडियट बॉक्स'चे नांव सार्थक करण्याची अहमहीका !": # 'घरोघरी मातीच्या चुली' ' मुलगी पसंत आहे' ' नवीन जन्मेन मी'.... सारख्या पोरखेळ करत लांबत जाणाऱ्या अनेक मालिका ! # 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्' आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल' प्रमाणे प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम.... # रोज सगळीकडे त्याच त्याच, कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या.... # प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ... अन् निखळ करमणुकीचे मृगजळ ! # आता दर्शकांनी कीव करावी, की दया दाखवावी, करमणुकीचा बाजार उठवणाऱ्याची !":😭 # बहुजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये आदर्श हे कोणत्यातरी ते उभे राहत आहेत याचा सगळ्यांनी विचार करायला हवा दुर्दैव हे की याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही अंधकारमय समाज रास नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल असेच सध्या दिसते शेवटी हेच खरे What goes up goes down !" 1 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल अमोल 326 !":👌 💐 " ओंकार हा विश्वातील पहिला स्वर ! त्यामधून निर्माण झालेलीआवाजाची दुनियाच न्यारी ! मानवाने मानवाला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी कुठली असेल तर ते म्हणजे गीत संगीत कसे ते समजण्यासाठी पुढील लिंक उघडा 2 💐II " नवीन वर्षाचा नवा संकल्प-6 II💐 👍" शारदोत्सव!":👌 'नटखट नट-खट मोहन जोशी': एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी! --–👌--------------👌--------------👌--------- 'नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली. अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते. गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे. अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ.भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत. ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो. कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी व-त्यांचे शुभचिंतन. 3 😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇 😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल. विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे: झोपण्यात गेलेला वेळ सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे, सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत. एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो. त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !" आता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील # "अलिप्तपण दे रे राम, मजविण तू मज दे रे राम !" # " मनी आणावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄 4 💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐 👍 " मुक्तसंवाद- कल्पनांची दखल उपक्रमांची उकल !":👌 "अभिवाचन क्रमांक 340 !": 😝 " माणसाला बुद्धी बरोबर जर अजून एक शक्ती दिली असेल, तर ती म्हणजे कल्पना करण्याची ! केवळ निवांतपणे आपणच आपल्याशी संवाद साधावा लागतो. श्री सुधाकर नातू हे 'वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री !' या रूपात सोशल मीडियावर अनेक उपक्रम गेली काही वर्षे सादर करत आहेत. त्यांच्या ह्या अभिवाचनात, त्यांना अनेकांनी कल्पना कशा सुचत गेल्या आणि त्यातून 'छाप पडलेले शब्द' सारख्या उपक्रमाचा प्रारंभ कसा झाला ते उघडले आहे. 'वाचता वाचता वेचलेले' असे 'छाप पडलेले शब्द' आपल्यालाही अधून मधून विचार प्रवृत्त करून व्यक्त व्हायला लावू शकतात !":😝 ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते. त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर थोड्याशा व्यत्ययानंतर लवकरच ! आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे. आमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा !"🥵 5 💐II मंगल प्रभात II💐 👍" बोल अमोल 330 !":👌 😀 " जगात जे घडतं त्यामागे काही ना काही कारण असतं यासाठी कार्यकारण भाव प्रत्येक वेळेला शोधला पाहिजे छातीत कफ होतो त्याचं कारण या माणसाला रात्री दूध हळद पिताना फ्रीजमधून दूध काढल्यावर त्याच्यावरची साय खाण्याची सवय होती दिवसेंदिवस या सवयीमुळे त्याला कफ झाला हा शोध त्याला त्याने जेव्हा कार्यकारण भाव यावर विचार केला तेव्हा समजले तसे करणे सोडून दिल्यावर त्याचा कफ हळूहळू कमी होत नाहीसाही झाला लक्षात ठेवा काहीही आपोआप घडत नाही कारण शोधा उपाय काढा !":😀 वाकडे, तिडके, इकडे, तिकडे. उघडे, बोडके, इकडे, तिकडे. थापाडे, खोटार्डे, इकडे, तिकडे, खादाडे, माजोर्डे, इकडे, तिकडे. सब घोडे, बाराटक्के, इकडे, तिकडे चोहीकडे!! करावी, कशी निवड? कुणाला, आहे सवड!!":😀 6 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-90 !":👌 💐 " गीत संगीताची स्वरबहार म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जणू पारिजातकाच्या फुलांचा सडाच सुरेल संगीताचे वरदान सुनील स्वराचे वरदान ज्यांना लाभते ते खरंच भाग्यवान बाकी तुम्हा आम्हा सारखे बाथरूम सिंगरच ! पुढील लिंकस् उघडून.... 3 सुरेल गाणी ऐका....... 1 गाना आये ना आये गाना चाहिए... 2 तू कहे अगर, जीवनभर ..... 3 झूम झूम कर नाचो आज.... धन्यवाद श्री सुधाकर नातू /== 7 👍 "छाप डलेले शब्द !":👍 💐"कर्तृत्ववान माणसांचे व मुंबईचे जीवाभावाचे नाते !":💐 😀 "सोबतच्या वृत्तात आत्मसंवाद करणारे श्री सुहास पेडणेकर हे प्रथम रुईयाचे प्राचार्य आणि नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत एवढीच फक्त माहिती मला होती पण या मुक्त संवादामुळे आत्मसंवादामुळे त्यांची कोकणातील खेड्यात असलेली शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि तेथून मुंबईत येऊन त्यांनी स्वतःच्या गुणांवर व कष्टांवर की गरुड भरारी घेतली हे समजून मन भरून आले गुणवत्ता त्या जोडीला जर जिद्दीने कष्ट घ्यायची तयारी असेल तर ही मुंबापुरी तुम्हाला कोणतीही स्वप्न साकार करायची संधी देते हेच या साऱ्या निवेदनावरून उमजले. कुणालाही विलक्षण प्रेरणादायी वाटणारी ही कहाणी खरोखर कौतुकास्पदच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन. जाता जाता माझ्याही रुईया आणि त्यांच्या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या कारण आम्ही सारी भावंडे रिया कॉलेजचेच विद्यार्थी आणि मी तर जवळच असलेल्या किंग जॉर्ज मध्ये जोडीला माझे वडील रुईया कॉलेजच्या स्थापनेपासून ते रजिस्टर होऊन निवृत्त होईपर्यंत रुहयामध्येच खरंच हे राम नारायण रुईया कॉलेज आणि मुंबईत येऊन विविध क्षेत्रात कीर्तिमान होणाऱ्या व्यक्तींचे यांचे नाते खरंच जीवाभावाचे आहे!":😀 कर्तृत्ववान गुणी व्यक्तिमत्त्वे !":💐 विख्यात पत्रकार श्री दिनकर गांगल यांच्या सोबतच्या महाराष्ट्र टाइम्समधील लेखांत बाळासाहेब सांडू यांनी चेंबूर मध्ये केलेले समाजोपयोगी कार्य आणि व्यावसायिक योगदान वाचून मन भरून आले. सध्या खा खा सुटलेल्या या जगात अशी माणसे दुर्मिळ म्हणायची. एक मात्र मनामध्ये किंतु निर्माण झाला आणि वाईटही वाटले यासाठी की, आपल्यामध्ये ही अशी अनेक माणसे आपापल्या परीने आपल्या क्षेत्रामध्ये हितकारक आणि दखल घ्यावी अशी कार्य करून गेलेली असतात. त्यांची आठवण मात्र सार्वजनिक रित्या समाजाला ही अशी ती आदर्शवत माणसे निवर्तल्यावरच होते, ही ती रुख रुख. सगळीकडे घोटाळे, गुन्हेगारी भ्रष्टाचार अप्पलपोटेपणा सायबर क्राईम अशा तऱ्हेचीच त्रासदायक वृत्ते सार्वजनिक विविध मीडियावरून नजरेस येत असताना, ही अशी आपल्यातल्या असलेल्या पूर्वी चांगले काम करून गेलेल्या माणसांची देखील ओळख माध्यमांनी करून दिली पाहिजे. विशेषत: वर्तमानपत्रांनी त्याची योग्य ती दखल घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावेत. आजच्या काळाची ती गरज आहे,असे मला या वृत्तामुळे वाटले जे वाटले ते पारदर्शकपणे मांडले. धन्यवाद श्री सुधाकर नातू "रंगारंग रंंगदर्शन https://drive.google.com/file/d/17xWTJqNbxe-0G4ovx17SGu-Ihfuc3Alz/view?usp=drivesdk सोबतच्या वृत्तात आत्मसंवाद करणारे श्री सुहास पेडणेकर हे प्रथम रुईयाचे प्राचार्य आणि नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत एवढीच फक्त माहिती मला होती पण या मुक्त संवादामुळे आत्मसंवादामुळे त्यांची कोकणातील खेड्यात असलेली शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि तेथून मुंबईत येऊन त्यांनी स्वतःच्या गुणांवर व कष्टांवर की गरुड भरारी घेतली हे समजून मन भरून आले गुणवत्ता त्या जोडीला जर जिद्दीने कष्ट घ्यायची तयारी असेल तर ही मुंबापुरी तुम्हाला कोणतीही स्वप्न साकार करायची संधी देते हेच या साऱ्या निवेदनावरून उमजले. कुणालाही विलक्षण प्रेरणादायी वाटणारी ही कहाणी खरोखर कौतुकास्पदच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन. जाता जाता माझ्याही रुईया आणि त्यांच्या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या कारण आम्ही सारी भावंडे रिया कॉलेजचेच विद्यार्थी आणि मी तर जवळच असलेल्या किंग जॉर्ज मध्ये जोडीला माझे वडील रुईया कॉलेजच्या स्थापनेपासून ते रजिस्टर होऊन निवृत्त होईपर्यंत रुहयामध्येच खरंच हे राम नारायण रुईया कॉलेज आणि मुंबईत येऊन विविध क्षेत्रात कीर्तिमान होणाऱ्या व्यक्तींचे यांचे नाते खरंच जीवाभावाचे आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा