सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५
" बिंब प्रतिबिंब- सोशल मीडियावरील जुगलबंदी !":
 मला व्हाट्सअप वर एक मेसेज आला. मी सहसा असे रााजकीय मेसेज वाचतो आणि भविष्य डिलीट करून टाकतो. पण मला काय वाटले कुणास ठाऊक हा मेसेज आपण या तऱ्हेची पोस्ट किंवा मेसेजेस आपल्याकडे जो पाठवतो, त्याला हा पाठवून बघूया. यांना आपण ए आणि बी असे समजूया. त्याप्रमाणे मी ए चा मेसेज बी ला पाठवून दिला आणि काही उत्तर येते का बघत राहिलो. तर त्यानंतर छोटी मोठी जी जुगलबंदी झाली, ती या लेखात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला या विषयावर जास्त काही माहिती नाही, कळतही नाही. पण दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्या विचारांची ही देवाणघेवाण आपण एका लेखात मांडावी अशी कल्पना आली आणि मी हा प्रयत्न केला. पहा, वाचा आणि ठरवा ही idea कशी वाटते, ते !,,,
A: China unveils worlds first offshore oil production vessel with carbon capture on board.
Meanwhile we are busy with the Kumbh Mela, temple convention in Tirupati & forced to buy unnecessary F35.
👆🏽👆🏽👆🏽👆🏽 B ला पाठवला...
B: "आपल्याला ह्या क्षेत्राची माहिती दिसत नाही.*
*आपल्याला भारताचे तेल आणि गॅस संबंधीचे प्रकल्प तसेच या क्षेत्रात होत असलेले प्रयत्न माहिती दिसत नाहीत. भारताची उर्जेची गरज प्रचंड आहे. ती ह्या तेलाने भरुन निघणारी नाही. म्हणुनच आपल्या सरकारने पॅरिस करारावर सह्या केल्या आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. आपण २०३० साठी ठरवलेले उद्दीष्ट आणि परिषदेला दिलेले आश्वासन २०२४ सालीच पुरे केले आहे. यापुढे जाऊन आपण सौरऊर्जा, अणुऊर्जा आणि हैड्रोजन गॅस इंधनावर विशेष लक्ष केंद्रित करुन त्यावर खास संशोधन करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सरकारने अनेक शिक्षणसंस्था आणि खाजगी कंपन्यांना अनुदान दिले आहे. या महीन्यात आपली हैड्रोजनवर चालणारी गाडी लवकरच धावणार आहे. बस आधीच धावली आहे आणि तीच्या पुढील चाचण्या घेतल्या जात आहेत. आपण या क्षेत्रात जगात खुपच पुढे आहोत. खरेतर ही संशोधने अनेक दशकांपूर्वीच सुरु व्हायला पाहिजे होती. चीन खडबडून जागा होऊन धावत होता तर आपण भ्रष्टाचारात गुंतुन झोपलो होतो. हे सर्वच क्षेत्रात घडले.*
Also...
B  *आपली सनातनी हिंदू सांस्कृतीक विरासत, आपला वारसा, आपली राष्ट्रीय ओळख पूर्नस्थापित करणे अत्यावश्यक आहे. सर्वांगीण विकासावर भर देताना याकडे पण लक्ष ठेवणे ही राष्ट्राचीच नाही तर जगाची गरज आहे. जगाला जिहादी इस्लामीक विचारसरणीला तोंड देऊन नेस्तनाबूत करायचे असेल तर हे करावेच लागेल. म्हणुनच जगातुन विविध धर्मांच्या लाखो लोकांनी महाकुंभ मेळ्याला आस्थेने हजेरी लावली. जय श्रीराम!*
👆🏽👆🏽👆🏽👆🏽 A ला पाठवला...
A: "विचारांचे आणि माहितीचे स्वागत आहे.
बलाढ्य बनण्याचे विचार, कृती आणि प्रगती ही जुळायला हवी. कोणा 2 टाकल्याचे ते काम नसावे & राष्ट्रीय थिंक tank हवी.
अति जलद, निस्वार्थ आणि फोकस्ड प्रगती करावी लागेल.
अनेक ज्ञानी, गुणी, कर्तबगार, न आवडणाऱ्या & वेगळ्या विचारसरणीच्या मंडळींना देखील हाताशी घेऊन प्रकल्प राबवावे लागतील.
नाहीतर इतर देशांच्या वेगवान सायन्स & टेक (STEM) प्रकल्पांचे आपण परत गुलाम बनुं.
/_/ 👆🏽👆🏽👆🏽👆🏽 B ला पाठवला...
=// 🙋♂️ *मी मागे अनेकवेळा म्हटल्याप्रमाणे हे विचार अज्ञानावर आणि अनभिज्ञतेवर आधारित आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. देशाला बल्याढ्य आणि विकसीत बनविण्यासाठी अनेक आघाड्यांवर सतत लक्ष केंद्रित करुन योजनाबद्ध रितीने काम चालु आहे. यावेळचे बजेट बारकाईने वाचले आणि त्याची नीती आयोगाच्या कार्यक्रमांशी सांगड घातली तर बरेच काही स्पष्ट होईल. सरकार कसे चालते आणि निर्णय कसे आणि कोण घेते याची आपल्याला माहीती नसली की आपण दोन व्यक्ती सरकार चालवतात अशी बेभान वक्तव्ये करायला लागतो. प्रत्येक मंत्रालयाचे एक मोठे सचिवालय असते. त्यात अनेक उच्च शिक्षित,  कार्यकुशल, विद्वान नोकरशहा असतात. तसेच प्रत्येक मंत्रालयासाठी संसदीय समित्या असतात, ज्यात सर्व पक्षीय खासदार असतात. त्या समित्यांमध्ये त्या त्या मंत्रालयाच्या संबंधित सर्व विषयांवर साधकबाधक चर्चा सतत होतात. तसेच या प्रत्येक मंत्रालयांसाठी कॅबिनेटच्या कमिट्या असतात. सर्व निर्णय बहुतेक यांच्या अहलावर होतात. पंतप्रधान आणि त्यांचे कार्यालय त्यावर शिक्कामोर्तब करते. क्वचित प्रसंगी पंतप्रधान आपला निर्णय घेतात. तो त्यांचा संविधानीक अधिकार आहे. पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या अनेक कमिट्या पंतप्रधानांच्या कार्यालयात असतात. त्यात भारतातले अनेक ज्ञानी, उच्चशिक्षित, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते असे विविध विचारसरणीचे लोक सामिल असतात. अर्थात मोदी सरकारच्या राज्यात देशविघातक, गजवा-ए-हिंद इस्लामीक राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट असलेले, भारताची अधोगती चिंतणारे आणि सनातन हिंदु विरोधी अशा मंडळींना स्थान असणार नाही हे समजायला फार विचार करावा लागणार नाही. मनमोहनसिंग यांच्या युपीएच्या राज्यात अतिमहान विदेशी सोनिया गांधी यांनी एक असंविधानीक "NAC" नॅशनल ऍडव्हायजरी कौन्सिल स्थापन केले होते. त्यात जयराम रमेश, हर्ष मंदेर यासारखे डाव्या विचारसरणीचे चीन धार्जिणे भारत विरोधक ठासुन भरले होते. ही सर्व मंडळी मनमोहनसिंग यांच्या अपरोक्ष महत्वाचे निर्णय घेत होते, जे भारत विरोधी होते. आणि हे आपले महान अकार्यक्षम पंतप्रधान मूग गिळून उघड्या डोळ्यांनी पहात खुर्चीला चिकटून बसले होते. देवानेच यातुन देशाची सुटका केली. यापुढे देश परत कधीही गुलाम होणार नाही. जय भारत, जय श्रीराम!*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 आलेला प्रतिसाद:
B: "
B: "*F35 ची कहाणी आणि पार्श्वभूमी आपण समजुन घेणे आणि अभ्यासणे गरजेचे आहे. याची सुरुवात १९८० च्या दशकातली आहे. वेळ मिळेल तेव्हा सांगीन. देशविघातक काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या धोकादायक प्रचारावर आपली मते बनवु नयेत. याबाबत स्वतः संशोधन करावे. स्वतः माहीती गोळा करावी. सातत्याने या विषयाचा मागोवा घ्यावा. हा विषय सर्वोच्च न्यायालयात पण आधी गाजला आहे आणि त्यावेळी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेले माहीती आणि पुरावे धक्कादायक होते. सुरवात ऐकल्यावर न्यायालयाने ते सार्वजनिक न करता बंद लिफाफ्यात देण्याचा आदेश दिला होता. नंतर त्यातले पुरावे वाचल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ती काँग्रेसची याचिका फेटाळली होती आणि प्रकरण बंद केले होते.*
Also...
B: "*हे आंतरराष्ट्रीय स्कॅम समजुन घ्या.*
*हे एक धोकादायक कारस्थान आहे, एक घोटाळा आहे. यावर भारताला अतिसावधान राहाणे गरजेचे आहे. देशातले आंतरीक देशविघातक अमेरिकेला यात मदत करत आहेत.*
ही लिंक उघडा..
https://youtu.be/bX1T6zCnx6I?si=9ZKLI91dGf_m8S93
A:"वास्तवाचा विचार समोर आला की आपल्याला असे हिर्मुसल्यासे आणि आक्रमक का व्हावे से वाटते?
श्रेष्ठ व्यक्ती कधीही सत्यास सामोरे जाऊ शकतो.
ह्याला आलेला प्रतिसाद
B:
😂🙆🏼♂️🤷🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️🤦🏼♂️
*आज कोणीही हिरमुसलेला नाही की आक्रमक झालेला नाही. सर्व योजनेप्रमाणे बिनदिक्कत चालु आहे. आज देश खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीला आपल्या हितांचे रक्षण करुन सामोरा जातो आहे. जय भारत!*
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
_// A:"असा आक्रमक प्रतिसादच-@ स्वताची ओळख देतो. असो ! 
✈️✈️✈️
शोले सिनेमा सारखे गावे....
यह भक्ति,
हम नहीं छोड़ेंगे,
छोड़ेंगे सदसद विचार मगर,
तेरी भक्ति नहीं छोड़ेंगे।
-------
या साऱ्यावर माझा प्रतिसाद: @ असे प्रतिसाद देणारी व्यक्ती अर्थातच (अंध)भक्त असणार यात शंका नसावी !"
ही जुगलबंदी येथेच थांबवतो
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा