शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

" सोशल मीडियावरील माजी मुजाफेरी भाग 9 !"::

1 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल अमोल 325 !":👌 😀 " कर्म की भाग्य महत्त्वाचं ?":😀 2 💐II " नवीन वर्षाचा नवा संकल्प-6 II💐 👍" शारदोत्सव!":👌 'नटखट नट-खट मोहन जोशी': एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी! --–👌--------------👌--------------👌--------- 'नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली. अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते. गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे. अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ.भा.नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर थक्क करणारी आहे. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत. ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो. कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी व-त्यांचे शुभचिंतन. 3 😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇 😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल. विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे: झोपण्यात गेलेला वेळ सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे, सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत. एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो. त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !" आता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील # "अलिप्तपण दे रे राम, मजविण तू मज दे रे राम !" # " मनी आणावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄 4 💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐 👍 कथाकथन-अंनोखी समस्यापूर्ती !":👌 "अभिवाचन क्रमांक 338 !": 😝 "ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते. त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर थोड्याशा व्यत्ययानंतर लवकरच ! आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे. आमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा !"🥵 5 💐II मंगल प्रभात II💐 👍"मल्लिनाथी !":👌 😀 "वाकडे, तिडके, इकडे, तिकडे. उघडे, बोडके, इकडे, तिकडे. थापाडे, खोटार्डे, इकडे, तिकडे, खादाडे, माजोर्डे, इकडे, तिकडे. सब घोडे, बाराटक्के, इकडे, तिकडे चोहीकडे!! करावी, कशी निवड? कुणाला, आहे सवड!!":😀 6 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-89 !":👌 💐 " जवळजवळ महिन्याभराने स्वरानंद हा उपक्रम पुन्हा प्रारंभ करत आहे. त्यासाठी निमित्तही यथोचित अशा मंगलमय निवडक प्रार्थनांच्या रूपाने येथे सादर करत आहे. माणसाच्या शरीराला आहार जसा पोषक, तसाच आत्म्याला प्रार्थना अत्यावश्यक ! पुढील लिंकस् उघडून त्या ऐका.... 1 सर्वात्मका सर्वेश्वरा...... https://youtu.be/L36_XB7x3IU?si=K_8pI61X4rHGZEg2 2 करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..... https://youtu.be/Wbv8wJagKEg?si=t1S9o8y_xKh9yebu 3 गगन सदन तेजोमय...... https://youtu.be/TiexOdP5ZzQ?si=OtN7HF-49EqmCU6V धन्यवाद श्री सुधाकर नातू 😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇 😀 'आपण आपल्या जागतेकपणीचा वेळ कसा घालवतो, हा प्रश्न वैयक्तिक आवश्यक व्यवधाने व व्यावसायिक जबाबदारी सोडून किंवा प्रवासाचा वेळ सोडून आपण कसा उपयोगात आणतो ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने निदान दर महिन्यात एकदा तरी शोधले पाहिजे. एक प्रकारचा असा आत्मसंवाद केला पाहिजे, त्यामुळे आपण कसे जगतो, कां जगतो याचे उत्तर मिळू शकेल. विशेषत: जेष्ठ नागरिकांना काही सन्मानानीय अपवाद वगळता, हा तर मोठा यक्षप्रश्नच असतो की वेळ कसा घालवायचा? त्यासंबंधीचा आमचा गमतीशीर अणुुकथेचा भाग आपण ऐकला असेलच. आपल्याला विविध प्रश्नांची प्राथमिक उत्तरे देण्याची गरज आहे, ते प्रश्न असे किंवा मुद्दे असे: झोपण्यात गेलेला वेळ सकाळी व सायंकाळी फिरण्यातला वेळ लिहिणे, वाचन करणे, टीव्ही बघणे, सिनेमा व नाटकाला जाणे इत्यादी इत्यादी, अनेक गोष्टी आपण नेहमी करत असतो त्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहिले पाहिजे. त्याशिवाय वेळे व्यतिरिक्त आपण प्रश्न असा केला पाहिजे की, या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण त्या त्या गोष्टी का करतो, त्या नाही केल्या तर आपले काही नुकसान होणार असते कां? त्या गोष्टीचा फायदा काय ? इत्यादी इत्यादी सर्वंकष व्यापक दृष्टिकोनातून आपण गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळेविषयी जागृत राहून प्रश्न विचारले पाहिजेत. एक ध्यानात ठेवा, वरीलपैकी कुठलीही गोष्ट आपण जरी केली नाही तरी वेळ कुणासाठी थांबत नसतो. त्यामुळे तो आपोआप तर जाणारच असतो. तर आपण हे सगळं कां करतो? खरोखर त्याची गरज आहे कां? थोडक्यात आपल्या वेळेचा व आपल्या भावविश्वाचा परस्पर संबंध काय असतो, काय असावा? याचा सखोल शोध घेण्यासाठी हा सारा खटाटोप ! त्यामुळे मूलभूत योग्य वा अयोग्य गोष्टी आपल्यासमोर येतील आणि त्यातून आपल्याला आपला वेळ अधिक सकारात्मक अधिक योगदान देण्याजोगा व आत्मसमाधान देण्याजोगा वापरता येईल, असे मला वाटते !":😄 जाता जाता श्री स्वामी समर्थ रामदास यांचे हे विचार ध्यानात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय ते चांगले लक्षात राहील # "अलिप्तपण दे रे राम, मजविण तू मज दे रे राम !" # " मनी आणावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते !":😄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा