शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५
" मल्लीनाथी -टेलीरंजन !":
😇 "मल्लिनाथी- टेलीरंजन !":😇
😭 # आता 'काहीही हं हं 'नाही,
तर
'इडियट बॉक्स'चे नांव
सार्थक करण्याची अहमहीका !":
# 'घरोघरी मातीच्या चुली'
' मुलगी पसंत आहे'
' नवीन जन्मेन मी'....
सारख्या पोरखेळ करत लांबत
जाणाऱ्या अनेक मालिका !
# 'लॉ ऑफ डिमिनिशिंंग रिटर्नस्'
आणि 'प्रॉडक्ट लाइफ सायकल'
प्रमाणे
प्रारंभ दमदार, पण नंतर सुमार
हे सिद्ध करणाऱे कार्यक्रम....
# रोज सगळीकडे त्याच त्याच,
कणभर बातम्या आणि मणभर जाहिराती. पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या वाहिन्या....
# प्रतिभा, कल्पकतेचा दुष्काळ...
अन्
निखळ करमणुकीचे मृगजळ !
# आता दर्शकांनी
कीव करावी,
की दया दाखवावी,
करमणुकीचा बाजार उठवणाऱ्याची !":😭
# बहुजगत्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग जवळजवळ सगळ्याच समाज माध्यमांवर वाढत चालला आहे हे दृश्य खरोखर चिंताजनक आहे कारण त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञान आणि संसाधने यांचा इतका दुरुपयोग होत असताना समाजामध्ये आदर्श हे कोणत्यातरी ते उभे राहत आहेत याचा सगळ्यांनी विचार करायला हवा दुर्दैव हे की याला आळा घालायला कोणालाच सध्या तरी शक्य नाही अंधकारमय समाज रास नीतिमत्ता हरवलेला गमावलेला समाज हे उद्याचे कदाचित वास्तव असेल असेच सध्या दिसते शेवटी हेच खरे
What goes up goes down !"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा