शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५
' अनुभवाचे बोल-1 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍" अनुभवाचे बोल-1 !":👌
😄 "आतापर्यंत 'बोल अमोल' या स्वरूपात मी 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत असे. मध्यंतरी त्याच्यामध्ये अधून मधून खंड पडत गेला. तसे कदाचित माझ्या इतरही काही उपक्रमांचे झाले हेही खरे. आज अचानक नव्या रूपात आपण पुनश्च 'अनुभवाचे बोल' चा प्रारंभ करावा असे वाटण्याचे कारणही तसेच होते.
थोडक्यात जे घडले ते असे- मी पुष्कळ दिवसांनी पुन्हा लोकाग्रहास्तव वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे उत्साहाने सुरू केले आणि त्यात मला चांगल्यापैकी यशही येत गेले. अशा वेळेला अचानक असे काही घडले की ज्यामुळे मला एक प्रकारचे डिप्रेशन आले. ज्योतिष सल्ल्याचे मी प्रत्येकी मानधन 500 रुपये घेत असे आणि सविस्तर पत्रिका बनवून त्याचे विश्लेषण करणे यात माझा अक्षरशः दोन-तीन तासांचा वेळ जात असे. नुकतीच जेव्हा घरामध्ये पत्नीने ब्युटी पार्लर सेवा देणाऱ्या स्त्रीला बोलावले, साधारण तासभरानंतर ती गेली. नंतर मी पत्नीला विचारले की किती मानधन दिले? उत्तर रु 2000, हे ऐकले आणि मला एक प्रकारचा कमीपणा आल्यासारखे आणि माझे ज्ञान परिश्रम आणि अनुभव ह्यांना किंमत नाही असे वाटून निराश व्हायला झाले. त्या अनुभवावरती मी माझा एक मुक्तसंवादही रेकॉर्ड केला. ज्ञान अनुभव श्रम आणि वेळ या गोष्टींचा विचार करता दोन सेवांमध्ये इतका फरक असावा इतका विरोधाभास असावा याचा मला विषाद वाटला. हे डिप्रेशन किंवा नैराश्याचे पर्व दोन-तीन दिवस चालले.
अचानक मला 'तू भेटशी नव्याने' च्या धरतीवर 'मीच मला नव्याने भेटून गेलो' ! काल पहाटे (मी आधी सांगितले आहे की, अमृत काळात पहाटे मला जे सुचते ते 'बोल अंमोल !') मला साक्षात्कार झाला आणि मी अक्षरशः बॅक टू द वॉल सारखा डिप्रेशन मधून मोटिवेशनच्या प्रांगणात कधी उडी घेतली ते कळलेच नाही !
मला जाणवले मी गेल्या पाच सहा वर्षात 'वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री !' या रूपाने जे करत आहे, ते म्हणजे खरोखर काय ? तर नव्याने उमजले...
'World Class Management Guru Peter Drucker' Famous Sayings:
"In business you must answer these 2 questions;
1 What is the 'Theory of Business ? and
2 What Business you are in?"^
This made me to bounce back from Depression to Self Motivation because I introspected and felt:
'Whatever I have been doing as 'One Man Communication Industry', through my various 'Idea based Products ' ever since my my son give me a Smartphone !* surely and certainly, I am in the Business of Transforming & Developing Paeople to become competent progressive Good Human Beings ! &
I am in the Business of imbibing Hope and Self Confidence into the People !
There cannot be any doubt that this is a Noble Mission and Profession.
So this then has been my journey from Depression to Self Motivation & and now I am bound to do justice to the same.
All the Best & Continue to be a part of My Noble Mission !
*PS
For those who are interested to understand how this Transformation came about, please do click following Link & Do see the relevant Video from my YouTube channel:
'moonsun grandson'
https://youtu.be/zU1brIETOj4?si=G0FMA6n3O2-XFJcn
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा