गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
" सोशल मीडियावरील माजी मुसाफिर भाग 10 !":
💐"अनुकूल गुणांनुसार '24/'25 साठी
राशि निहाय गटवारी !":💐
संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: व्रुषभ, कन्या व मकर
राशी.
२.उजवा दुसरा गट: धनु कन्या राशी
राशी.
३.मध्यम तिसरा गट: कुंंभ व मेष राशी.
४.डावा चौथा गट: सिंह मिथुन व कर्क
५.त्रासदायक पाचवा गट: व्रुश्चिक व मीन राशी.
💐"Think Tank !":💐
Haste makes waste;
Listen, See thru' then Act;
Don't react but respond;
Beauty lies in the eyes' of the beholder; Think, not to Sink.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 326 !":👍
💐" प्रत्येकाच्या कर्तृत्वाला
मर्यादा असतात.
जो आपल्या मर्यादा जाणतो,
त्यालाच अधिक समाधान
मिळण्याची शक्यता असते !":💐
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍"मुुक्तसंंवाद-'समाधानाची सप्तपदी":👍
"अभिवाचन क्रमांक 339 !":
😀 "कसोटी पहाणार्या स्पर्धात्मक वेगवान जीवनशैली आज अपरिहार्य होत असताना, आपण समाधान व मनःशांती कशी मिळवावयाची ते सुलभ उपाय उलगडणारा हा विडीओ पहायला विसरू नका..
ही लिंक ताबडतोब उघडा.......
https://youtu.be/g_OqskZbfxg
विडीओ नक्की आवडेलच......
लिंक म्हणून शेअरही करा..........😀
💐II आकाशातील पाळणे अभिवाचन समूह II💐
👍 कथाकथन-अंनोखी समस्यापूर्ती !":👌
"अभिवाचन क्रमांक 339 !":
😝 "ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते.
त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर थोड्याशा व्यत्ययानंतर लवकरच !
आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे.
आमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा !"🥵
अशी ही सोय व असा हा शोध !":💐
"स्मार्ट फोनमध्ये बोललेले लगेच शब्दात रुपांतर करण्याची सोय आहे. मी विस्रुत लेखन ह्याच पद्धतीने करत होतो. वेळ जसा वाचतो, तसंच मनातले बरोब्बर कागदावर अवतरते आणि तेही तत्परतेने !
माझ्या सवयीचा अतिरेक होऊन मी अनेक videos audios बनवणे व बोलून लेखांमागूश लेख लिहीण्यात अतोनात माझ्या आवाजाचा वापर केला. त्याचा विचित्र दुष्परिणाम माझा आवाज, जवळ जवळ बोलताच न येण्याइतका बसण्यात झाला.
ती चूक मी टाळणे नितांत आवश्यक आहे. अशा वेळी मला "बोलणे ते मजकूर" ही सोय वापरता येणे अशक्य व अयोग्य आहे. तेव्हा एक असा अनोखा शोध लागावा की, मला स्फूर्ती आल्यावर मनातले बोल जणु एखाद्या प्रगत Blue tooth द्वारे मोबाईल स्क्रीनवर मजकूर रूपाने अवतारावे ! कधीकधी मला झोपेतही पहाटे नवनव्या कल्पना व विचार सुचतात, त्यावेळी तर असा शोध म्हणजे
"सोनेपे सुहागा !"
"गरज, ही शोधांची जननी असते", त्यामुळे कुणास ठाऊक असा शोध कधी ना कधी लागेलही !":👌
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 326 !":👍
😀 " कर्म की भाग्य महत्त्वाचं ?":😀
कल्पनेपलिकडची शब्दशिल्पे!":
मानव निर्मित दगड विटा सिमेंटची शिल्पे पहाणे, अथवा निसर्ग निर्मित स्रुष्टीशिल्पे अवलोकणे असो, त्यासाठी प्रवासपर्यटनाचा प्रयास करायला लागतो; परंतु प्रतिभावान माणसाने कल्पिलेली शब्दशिल्पे मनांत रुजविण्यासाठी ध्रुवबाळासारखे अढळजागी बसणे पुरेसे असते.
एवढेच पुरे नाही म्हणून की काय, आधीच्या त्या दोन शिल्पांची हुबेहुब अनुभूती ही शब्दशिल्पे तर देऊ शकतातच,
त्याशिवाय विश्वरूप जीवनानुभवांचे रंगबेरंगी इंद्रधनुष्य देखील आपल्यासमोर पेश करु शकतात !":😀
😬 "Different Strokes !":😬
"The Secret of Two 'Lives'!":
There are Two 'Lives' for every one; the first is after the birth and the second is after the death. How long and how you ''LIVE'' in the memory of others, after your death, is your second 'Life after the death which shearly depends on what you did in your 'factual First Life'.
If you struggle, toil, sacrifice
for the welbeing of the society, for the beneficial advancement of the human World, in the factual first Life, then only you get and live year after year in the Second Life. Ordinary, common mortals hence, have virtually no 'Second Life' after the death but Idols / Icons live in the memory of the World for ever !":😁
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल अमोल 324 !":👍
💐 "असा 'हा' रोजचा "जमा'खर्च"!:💐
दररोजचा "जमा'खर्च", रूपयांत मांडायचे दिवस पहाता पहाता सरून जातात अन् निव्रुत्तीनंतर दररोजचा "जमा'खर्च" हा, रोज काय 'पाहिले', काय 'वाचले', काय 'ऐकले' वा 'बोलले', ह्यासोबतच (काही भाग्यवंतांसाठी) काय लिहीले असा बनत, त्या 'उलाढाली'मधून आपण काय 'मिळविले, काय 'घालवले' तसेच आपण इतरांना काय 'दिले' असा बनून जातो. हे असे, ज्यांना लौकर भान येते, ते अन् तेच खरोखर धन्य होत!":😀
काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते !":😀
💐," मल्लिनाथी !":💐
वाकडे, तिडके,
इकडे, तिकडे.
उघडे, बोडके,
इकडे, तिकडे.
थापाडे, खोटार्डे,
इकडे, तिकडे,
खादाडे, माजोर्डे,
इकडे, तिकडे.
सब घोडे, बाराटक्के,
इकडे, तिकडे चोहीकडे!!
करावी, कशी निवड?
कुणाला, आहे सवड!!":😀
😀 "आत्मसमाधानाचे रहस्य":😀
👍 "जे आपल्याला आवडते, जे आपण चांगले करू शकतो, ते करायला मिळणे हे भाग्यच. अशा भाग्यामुळे, जे आत्मसमाधान लाभते ते अद्भुतरम्यच!
"पसंद अपनी अपनी" प्रमाणे ज्याने त्याने वरीलप्रमाणे आत्मपरीक्षण करून
आपआपला मार्ग निवडावा, म्हणजे श्रेयस व प्रेयस एका समयीच लाभते. !": 👌
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-89 !":👌
💐 " जवळजवळ महिन्याभराने स्वरानंद हा उपक्रम पुन्हा प्रारंभ करत आहे. त्यासाठी निमित्तही यथोचित अशा मंगलमय निवडक प्रार्थनांच्या रूपाने येथे सादर करत आहे. माणसाच्या शरीराला आहार जसा पोषक, तसाच आत्म्याला प्रार्थना अत्यावश्यक !
पुढील लिंकस् उघडून त्या ऐका....
1 सर्वात्मका सर्वेश्वरा......
https://youtu.be/L36_XB7x3IU?si=K_8pI61X4rHGZEg2
2 करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....
https://youtu.be/Wbv8wJagKEg?si=t1S9o8y_xKh9yebu
3 गगन सदन तेजोमय......
https://youtu.be/TiexOdP5ZzQ?si=OtN7HF-49EqmCU6V
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
💐" वैयक्तिक ज्योतिष सल्ला !":💐
1 विशेषतः विवाह जुळवताना वा विवाह विषयक सल्ला, मी अधिक प्रामुख्याने देऊ इच्छितो.
2 त्या व्यतिरिक्त जीवनामध्ये आगामी काळ कसा जाऊ शकतो आणि तुमच्या सध्याच्या वैयक्तिक समस्यांंविषयी पत्रिकेवरुन मार्गदर्शन करु शकतो.
" जीवन व्यवस्थापन सल्ला !":
माझ्या 32 वर्षांच्या कॉर्पोरेट मॅनेजमेंटच्या अनुभवावरून आणि विजिटिंग मॅनेजमेंट फॅकल्टी तसेच सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून असलेल्या वीस वर्षांच्या पार्श्वभूमीवर तुमच्या आयुष्याचे व्यवस्थापन कसे करायचे हा अभिनव उपक्रम आपल्या फायद्याचा ठरू शकतो.
आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याला योग्य दिशा दाखविण्यासाठी
मी प्रदीर्घ संशोधनातून निर्माण केलेले Job Satisafaction Index & Life Achievement Index या अभिनव कल्पना द्वारे प्रगती करत सुख समाधान कसे मिळवायचे याविषयीचा सल्ला
विशेष उपयोगी पडू शकेल असे मला वाटते.
इच्छुकानी मला येथे वा fb messenger वर तुमचे नाव गाव कोणत्या प्रकारचा सल्ला हवा आहे, ते कळवणे अपेक्षित आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू.
"तुम्हीच तुमच्या जीवनातील प्रगतीचे शिल्पकार !"
प्रत्येकाला जीवनामध्ये आपण यश मिळवावे आपली मना जोगती प्रगती व्हावी असे वाटत असते परंतु त्यासाठी परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात त्यामुळे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे बनू असतो ते
उलगडून दाखवले आहे....
https://youtu.be/btZZHsUexkw?si=ymrwq4gQKj2nIEF2
सादर वंदन
मी सुधाकर नातू सुमित अतुल्यम् A1603 विंग मध्ये माझा मुलगा श्री समीर नातू याच्या सदनिकेत A1603 येथे वास्तव्य करत आहे.
मी खास नव्याने स्थापन केलेल्या आपल्या
'Atulaniy', हा फक्त Sumit Atulyam सोसायटी मधील सर्व रहिवाशांचा हा व्हाट्सअप ग्रुप आहे.
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!...
एकाच वेळी श्री सुधाकर नातूंचे अनेकांना संदेश पाठविण्याच्या सोयीसाठी प्रामुख्याने हा समूह एक व्हॅल्यू इंजीनियरिंग अशा स्वरूपात निर्माण केला आहे.
मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या सोयीसाठी,
माझी थोडक्यात ओळख पुढे देत आहे:
One Man Communication Industry !":
Mr. Sudhakar Natu ":
# 'प्रगतीची क्षितीजे' ह्या महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक...
# रंगांची दुनिया-फेसबुकवरील समुह: संस्थापक व Admin 2 years +
1 moonsun grandson blog:
565 articles
2 मुक्तसंवाद channel on you tube:
147 videos
3 आकाशातील पाळणे whatsapp अभिवाचन मंच: 314
4 स्वरानंद: 77
5 बोल अमोल: 285
6 छाप (पड)लेले शब्द: 71 +
7 माझी कथा: आठवड्यात 2/3
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!...
Moonsun Grandson !":
"One Man Communication Industry !":
Mr. Sudhakar Natu ":
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!...
एकाच वेळी माझे अनेकांना संदेश पाठविण्याच्या सोयीसाठी प्रामुख्याने हा समूह एक व्हॅल्यू इंजीनियरिंग अशा स्वरूपात निर्माण केला आहे.
माझ्या संदेशांवरती आपल्या प्रतिसादआपण माझ्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावेत अशी विनंती आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
9820632655
💐"दैनंदिनीतील पाऊलखुणा भाग 1 !":💐
"अभिवाचन क्रमांक 338 !":
😀 "दिवस येतात दिवस जातात, आपण आपला जीवनक्रम तसाच पुढे ढकलत असतो. अशावेळी दररोज काय घडले याची नोंद जर कोणी घेत असला तर त्याचे कौतुकच करायला हवे. या अभिवाचनामध्ये देखील असेच दैनंदिनीतील पाऊलखुणांची मार्गदर्शन करणारी नोंद आपल्यालाही अंतर्मुुख करेल हे निश्चित....😀
पहाण्यासाठी ही लिंक उघडा..
https://youtu.be/qyw4WUVVaW4?si=yUBwPm-Po3NAPEqQ
.
💐II नववर्षाचा नवा संकल्प-4 II💐
👍 कथाकथन-अंनोखी समस्यापूर्ती !":👌
😝 "ह्या कथाकथनात एकाकी असलेल्या जेष्ठ नागरिकासंबंधी, छोटीशी 'अणुकथा' उलगडली आहे. त्यामध्ये, त्याची वेळ कसा घालवायचा, ही समस्या आपल्यासमोर येते.
त्यासाठी त्याने खरोखर काय केले असावे, ह्याचे उत्तर प्रतिसादात आज दुपारी चार पर्यंत तुम्ही द्यायचे आहे.
आपल्याही कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वाव देणारी ही नवी संकल्पना आपल्याला रुचेल अशी आशा आहे.
आमचा प्रतिसाद आपल्याला त्यानंतर येथेच मिळेल !"🥵
भावलेल्या पुस्तकाचा रसास्वाद !":👌
1."अबीर गुलाल":
कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती.
मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण!
हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते.
त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले व गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. भ. बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही व इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे व तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे.
खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे!
मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा