☺️ "टेलिरंजन-कुछ 'पट्टया' नही !":😊
😊" डोक्याला शॉट !"😢इतकं वय जरी वाढत असलं, तरी आता माझ्या लक्षात येतंय की, जागेपणीचा जवळजवळ सर्व वेळ मी डोक्याला काही ना काहीतरी "शॉट" देण्यात घालवत असतो ! त्याला कारण म्हणजे 'इंडियट बॉक्स' 'ओटीटी' आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे 'स्मार्टफोन' ! साहजिकच वाचन आणि ही तीन खुळे, एक झाला की दुसरा, दुसर्यानंतर तिसरा मग चौथ्यांत व्यस्त रहात, प्रत्येक क्षण जात असतो. काहीही न करता कुठलाही विचार न करता स्वस्थ रहाणेच, मला आता अशक्य झाले आहे. डोक्याला
शॉट, कसा ते पुढे सांगतो.
दूरदर्शन मालिकांमध्ये मनाला न पटणाऱ्या गोष्टी कां दाखवतात कळत नाही ! काहीतरी तर्क वा सुसंगतविचार त्यामागे असावा की नको ? मनाला येईल तसं काहीही दाखवायचं आणि कुठल्याही पात्राची मध्येच कशीही स्वभाव रचना करायची हा फंडा न समजण्याजोगा आहे.
👍"इंद्रा इतका फद्या?":😢
झी मराठीवरील "मन उडू उडू" मधला इंद्रा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक, पण त्याचं वसुली एजंट असल्याचं बिंग फुटल्यावर दीपिकाच्या वडिलांकडून देशपांडे मास्तरांनी आणि आपल्या आईकडून तो अव्हेरला जाणं इतपत आपण समजू शकतो. परंतु जो काहीही उद्योग न करणारा बेपर्वा असा धाकटा भाऊ कार्तिक त्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक होणे आणि ते इंद्राने स्वीकारणे, हेही पुरेसे नाही म्हणून तिथे इंटरव्यूला जाणे हा म्हणजे मूर्खपणाचा अतिरेक होय न पटण्याजोगा ! एवढे पुरेसे नाही म्हणून की काय नंतर हा तडफदार झुंजार इंद्रा एका हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मागायला जाणे, म्हणजे डोक्याला शॉटच शॉट ! आता या अशा इंद्राचं आणि दीपिका च लग्न झालं काय आणि नाही झालं काय असे वाटून साहजिकच आपल्याला मालिकेत रस उरत नाही.
😊 "अनाकलनीय अनामिका !"😢
तोच प्रकार "तू तेव्हा तशी"मध्ये अनामिकाची आई कावेरी कजाग आहे, वाटेल तशी वागणारी आहे आणि तीच बहुतेक प्रवृत्ती तिच्या नातीमध्ये राधामध्ये आली आहे हे आपण समजू शकतो. पण आधुनिक युगातली माँडर्न राधा जी लग्न न करता प्रियकराबरोबर लिव ईन रिलेशनला तयार आहे, आग्रही आहे, ती आपल्या आईचा कोणी मित्र असावा आणि त्याच्याशी त्याचा विवाह व्हावा असं तिला बिलकुल कां वाटत नाही, तिला काय अडथळा यावा आईचा मित्र असला, तर त्याच्याबरोबर तिने लग्न केलं तर ? खरंच काही न समजण्याजोगं आणि अनाकलनीय. शिवाय जी अनामिका पुढारलेल्या विचारांची, कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारी आहे, जीची मुलगी बिनधास्त आहे, ती इतक्या वर्षांनी तोंड दाखविणार्या आईपुढे -कावेरी पुढे कां नमतं घेते ? हेही न पटण्याजोगं ! त्यामुळे या तिची प्रीतीकथा उगाचच लांबवत नेण्यासाठी हा धेडगुजरी प्रकार चालू आहे. अर्थात साहजिकच अनामिका आणि पट्याचं लग्न झालं काय वा नाही, तरी आता कोणताही इंटरेस्ट या मालिकेत त्यामुळे राहत नाही.
टीव्ही मालिका लांबवण्यासाठी, नको इतकं पाणी घालणं म्हणजे काय, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल ! तुमच्या डोक्याला आणखी शॉटस् नकोत, म्हणून वानगीदाखल ही दोनच उदाहरणे पुरेत.
आपला काय अनुभव ? प्रतिसादात जरूर लिहा.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा