बुधवार, २७ जुलै, २०२२

👍"शारदोत्सव !":👌 ☺️"वेचलेले आजही तपासावे असे !":💐

 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍"शारदोत्सव !":👌

☺️"वेचलेले आजही तपासावे असे !":💐

☺️ दररोज वर्तमानपत्र वाचल्यानंतर व्यवस्थित जबाबदाऱ्या थोड्याफार पूर्ण केल्यानंतर, मोबाईलवर माझा हात चालवला जातो. त्यामध्ये व्हाट्सअप आणि फेसबुक हे अनिवार्य असतात. फेसबुकमध्ये "माझी कथा" हा भाग मी नेहमी आवर्जून पाहतो. माझ्यातर्फे देखील त्यामध्ये काही ना काही नवनिर्मिती व जुने आठवणीतले फोटो प्रदर्शित करतो. त्यामुळे त्याचा जो प्रतिसाद मिळतो, त्यावरून आपल्या नवनिर्मितीची किती दखल घेतली आहे ते कळते.👌

💐फेसबुकवर त्या व्यक्तीरिक्त "आठवणी" म्हणून एक भाग छान असतो. दररोजच्या तारखेला पूर्वी फेसबुकवर आपण काय काय मांडले होते, कुठले संदेश प्रदर्शित केले होते त्याचा एक पटच आपल्यासमोर मांडला जातो. दररोज मी ते नक्कीच पुन्हा अवलोकन करत असतो. पण कधी कधी एखादा संदेश असा येतो की, ज्याला काय प्रतिक्रिया आल्या होत्या, असे मनामध्ये कुतुहूल निर्माण होते

त्या दिवशी, तसेच झाले. एक जुना संदेश त्या तारखेचा-सहा वर्षापूर्वीचा-२६ जुलै २०१६, मी मांडला होता आणि त्याला आलेल्या, प्रतिसादांमुळे मला हा लेख तयार करावासा वाटला.आधी तो संदेश देतो, नंतर त्यावरील प्रतिक्रिया देतो. मनापासून विचार करायला लावणारा ऐवज, तुम्हाला या लेखाद्वारे मिळेल असा विश्वास आहे.👌


😊 "माझा तो संदेश !:👌

"मुक्त अथॅकारणामुळे ऐहिक भरभराट होत राहिली हे ज़री खरे असले, तरी नैतिक अधःपतन वेगाने घडत आहे हे चांगले नाही. आत्मकेंद्रीपणा भयावहपणे वाढत आहे, भ्रष्टाचार तर वरपासून ख़ाली खोलवर पसरला आहे, माणसातली माणूसकी संपत चालली आहे असे एकंदर चित्र भासत आहे.

'आहे रे' आणि 'नाही रे' हयांंमधली दरी भयानक वाढली आहे. शांतता आणि संमजसपणा भंगत चाललेला दिसतो आहे. २५ वर्षानी मागे वळून पहाताना 'हेची फळ काय मम तपाला ?' असे वाटले तर ते चूक नाहीं !😢😢😢

पैशापेक्षा भावना व परंपराना आणि मूल्य महनीय मानणारा, मध्यम वर्ग, जो समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे, पण आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आहे 😷😷😷😢😢😢

👍( दुर्दैवाने आजही कुठलाही फरक नाही उलट अधिकाधिक अधोगती होत चालली आहे की काय अशी चिंता वाटावी !) 😢

👍ह्यावरील तेव्हाचे निवडक प्रतिसाद !:😊

# "सहनशीलतेची जागा आक्रमक/हिंसाचार घेत आहे."

# "75% society is focused on money, fun, and power. increased corruption and competition has put value based education behind. Both parent and politicians have failed instilling values. Parent have succeeded in giving monetary education but have failed in life oriented education. 

Lack of spiritual aspect in life and when I said spiritual aspect doesn't mean karmakand like standing in line for 2 hrs to pray siddhi vinayak or doing rudrabhishek with fearful mentality, but instead I meant accepting God intellectually and knowing that this supreme power is with us 24×7. 

Today's generation has forgotten greatfulness, good relations, and selflessness. Wish education system had incorporated the Bhagvad Geeta a "jeevan granth" and yoga along with other subjects. That would have resulted better society."

# "Very appropriate observation. In Education system Ethics and Home Science shld b made mandatory considering the need of the Gen.Next."

# "There is no comment on cash for vote. So many flimsy theories on other noble aspects. Let apart cash for education. Why do we go back only twenty five years? The misery is persistent from time as and when these hypocrites came to power. Curse them no end!"

#"Those who did not qualify in merit had to pay price! This practice enabled persons' to demerit, compromise,the quality and then it deteriorated to such an extent that there was no holds bar!"

सारांश सोशल मीडियावर विचाराला चालना देणारे जर काही मांडले, तर त्यामधून एकंदर वातावरणाचे सुष्पष्टचरित्र चित्र प्रतिसादामधून मिळत जाते असंच मला आता या सगळ्या प्रतिसादाकडे पाहताना वाटले. त्यामुळेच जणू एक नवीन संधी मिळाल्यासारखा हा नवा लेख त्यामधून तयार करता आला. आपणही त्यावर विचार करा, प्रतिसाद द्या.

धन्यवाद 

सुधाकर नातू

👍"जुने ते सोने-१ !": "चारचौघी ":👌



 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍"चारचौघी-काळाच्या पुढची कलाक्रुती !":👌

👍 "माझ्या "जुने ते सोने" या मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ उलगडणाऱ्या लेखसंग्रहातील लख मी आता नियमितपणे प्रकाशित करणार आहे. त्यातील काळाच्या पुढचे अंतर्मुख करणाऱ्या चारचौघी ह्या गाजलेल्या, रंगभूमीच्या इतिहासातील एक Miles Stone असलेल्या नाटकाचा हा रसास्वाद आहे.



👍"चारचौघी-१":👌




👍"चारचौघी-२":👌




धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, २५ जुलै, २०२२

👍"दैनंदिनीतील पाउलखुणा !":👌

 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

☺️ "दैनंदिनीतील पाऊलखुणा !":👌

काही चांगल्या सवयी कशा लागतात, ते काही कळत नाही. आज पुनश्च माझी दैनंदिनी चाळताना महत्त्वाच्या नोंदी करण्याची माझी सवय खरोखरच चांगली जशी होती, तशीच ती उपयुक्त देखील होती, हे उमजले. कारण त्यामधून नवनवीन माहिती आणि कुतुहूल जागृत करणारे असे विचार मिळत होते, हे आता लक्षात येते.

अशा चांगल्या सवयी लागणं हे भाग्याचं. "गुण गाईन आवडी" या पु ल देशपांडे लिखित पुस्तकाची मी रसास्वाद स्वरूपात तेव्हा नोंद घेतली होती. ती ह्या विडीओद्वारे उलगडण्यात मला विलक्षण आनंद होत आहे. गुणी माणसं आपल्यातील गुणांचा विकास करून, नामवंत कलावंत कसे होतात त्याचे विश्लेषण येथे केले आहे. त्याद्वारे अहर्निश कष्ट आणि विवक्षित ध्येय याचा मागोवा घेतला की, आपल्याला समाजाला देण्यासाठी चांगले योगदान निर्माण करण्याची सिद्धी कशी प्राप्त होते हे सांगितले आहे. 

त्यासाठी... ही लिंक उघडा...

https://youtu.be/ZxhQkmzwuwc

आपल्याला देखील ती आगळीवेगळी वाटेल आणि आवडेल अशी आशा आहे.

विडीओ आवडला तर...

वरील लिंक शेअरही करा....

धन्यवाद

सुधाकर नातू

👍"आकाशातील पाळणे-१ !":👌💐

 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍"आकाशातील पाळणे-१ !":👌💐

आपल्या समूहाला विविधता येण्यासाठी मी प्रयत्न करत असतो "रंगदर्शन" "चित्रदर्शन" "शारदोत्सव" अथवा "नियतीचा संकेत" व "मॅनेजमेंट म्युझिंगज्" या लेखमाला हे प्रयत्न उत्तरोत्तर योग्य दिशेने चालले आहेत. 

अशा वेळेला मला आज एक नवीन कल्पना सुचली. मी दररोजच्या अनुभवातून निर्माण केलेल्या ध्वनिफिती येथे लिंकच्या स्वरूपात आपल्याबरोबर शेअर करणे, ही. त्यामुळे नवीन वेगळे विचार आणि अनुभव तुम्हाला नव्या दिशा दाखवतील अशी माझी इच्छा व आशा आहे. आज या अभिनव संकल्पनेचा प्रारंभ करत आहे.

आपण योग्य ती प्रतिक्रिया नोंदवावी अशी प्रामाणिक इच्छा व विनंती आहे.

👍"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार !"👌💐

ही ध्वनिफीत, आपल्याला कायम विद्यार्थी राहण्याचे फायदे आणि आत्मप्रेरणेद्वारे आत्मविकास करत आयुष्यामध्ये विविध प्रकारचे योगदान यशस्वीपणे कसे देता येते ते सांगेल. त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्न आणि अपेक्षांचा समतोल साधला की, आयुष्याची गाडी योग्य दिशेला कशी नेता येते तेही तुम्हाला जाणवून देईल. थोडक्यात आपल्या जाणीवांचा आणि आकलनांचा भवताल विस्तारित करणारी ही ध्वनिफीत आपण शेवटपर्यंत जरूर ऐका. 

त्यासाठी ही लिंक उघडा.....

https://drive.google.com/file/d/1GtT720IJWy5dprmKb-Hp8E6eptaCDnT_/view?usp=drivesdk

आपला प्रतिसाद यावर जरूर द्या. 

धन्यवाद.

सुधाकर नातू

ता.क.

😊 "जास्तीत जास्त सदस्यांनी आपल्या आवडीच्या विषयांवर येथे सहभाग उचित योगदानाने करावा, अशी माझी पुनश्च विनंती आहे. तसेच आपल्या समूहाला भेट देणाऱ्या सदस्य संख्येतही उत्तरोत्तर वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे आपल्या सहकार्यावर ते अवलंबून आहे. धन्यवाद.

👍"शारदोत्सव !":👌💐👍"चिरतरुण वसंत !":👌💐💐

 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍"शारदोत्सव !":👌💐

👍💐"चिरतरुण वसंत !":👌💐💐

सदाबहार प्राध्यापक वसंत बापट यांचा आज २५ जुलै हा जन्मदिवस. बरोबर शंभर वर्ष त्याला होऊन गेली. या बहुआयामी आणि जातिवंत कलावंत कवीची थोरवी गावी तेवढी थोडीच आहे. आज त्यांना ही आदराची सुमनांजली वाहताना माझ्या भावना उचंबळून आल्या आहेत. 

कारण त्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा अगदी जवळचा संबंध होता. माझे पिताश्री आणि ते रुईया कॉलेजमध्येच असल्यामुळे आणि दोघेही कवी असल्यामुळे आमच्या घरी ते आलेले आहेत. त्यांच्याबद्दल पुष्कळ वेळा आम्ही कुटुंबियांनी गप्पा मारल्या आहेत.

त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी पार्क दादर येथे झालेल्या "चिरस्मरणीय मव्य शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना"तील त्यांचे भाषण प्रत्यक्ष अनुभवायला देखील आम्हाला मिळाले होते आणि ते त्यांचे विचार तेव्हा गाजलेही होते.

आज स्मृतीची पाने चाळताना मला लक्षात आले की, माझ्या "जुने ते सोने" ह्या डिजिटल लेखसंग्रहात त्यांच्याबद्दल माझा "मेनका" मासिकात ऑक्टोबर 1991 मध्ये प्रसिद्ध झालेला लेख आहे. तोच मी येथे तुम्हाला पेश करत आहे. 

तो काळ व ते क्षण मोठे मनोहारी होते आणि पुन्हा कधीही असे योग येणार नाहीत. कारण त्या वेळेला स्वतः प्रा वसंत बापट, कविवर्य मंगेश पाडगावकर आणि संगीतकार कवी यशवंत देव ही गुणवंत कवींची त्रिमूर्ती एकाच व्यासपीठावर त्यांचे कलागुण सादर करण्याला मौजूद होती. आमचे महाभाग्य असे की, त्या मनभवान क्षणांचे आम्ही साक्षीदार होतो. त्याचाच हा घेतलेला एक रसास्वाद, पुढील दोन पानांमध्ये आहे त्यासाठी लिंकस् उघडा आणि जरूर वाचा. हा मजकूर तुम्हालाही त्या बहारदार काळात घेऊन जाईल.


👍💐"चिरतरुण वसंत !":👌💐

https://drive.google.com/file/d/1KF4RuCn57pia2KxlW2Gzdx0BRR9ONjkW/view?usp=drivesdk

👍"अविस्मरणीय मनभावन क्षण !:👌

https://drive.google.com/file/d/1KQ4VTbxG6oSwhFLOGbrYvF8ejvpYuP-V/view?usp=drivesdk

आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

धन्यवाद 

सुधाकर नातू

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-३ !":👌💐

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-३ !":👌💐

आता ह्या अभिनव संकल्पनेचा पुढील भाग म्हणून, माझ्या २०१० ह्या वर्षाच्या डायरीतील १७ व १८ मे  ह्या दोन दिवसांच्या नोंदी पुढे देत आहे:

17 मे सोमवार 2010

# दिनविशेष:
* वाढदिवस-गझल गायक पंकज उदास
* 17 मे 17 मे 1749 देवीची लस शोधणारे एडवर्ड जेन्नर यांचा जन्म
* 17 मे 1846 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन
* 17 मे 1865 रियासतकार गोविंद सरदेसाईंचा जन्म
* 17 मे 1914 नामवंत गणितज्ञ प्राध्यापक नानासाहेब चाफेकरांचा जन्म
17 मे 1949 भारताचा राष्ट्रकुल मध्ये राहण्याचा संकल्प
17 मे 1972 महाराष्ट्राचे नामवंत शिल्पकार र क्रु फडके यांचा मृत्यू
* 17 मे 1994 पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ डॉक्टर एम आर भिडे यांचा मृत्यू
* 17 मे 1996 कसोटीपटू रूसी मोदीचे निधन.
* 17 मे 2009 जंजीर चित्रपटाचे निर्माते प्रकाश मेहरांचा मृत्यू

# विशेष नोंद:
* इजिप्त चे पूर्वीचे नाव केमेट (काळी माती )
* जावा सॉफ्टवेअर जेम्स गोसलिंग ने शोधले
* FTP- फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल

# विचार विशेष:
* "अध्यात्म म्हणजे सुखी होणे.
सुखी होण्याच्या तीन पायऱ्या आहेत:
पहिली स्वतःचा कुणालाही कंटाळा नसणे,
दुसरी स्वतःचा स्वतःला कंटाळा न येणे,
तिसरी स्वतः दुसऱ्या कुणावरही अवलंबून न राहता मनापासून जगू शकणे"
(👍"माझे अध्यात्म": श्री संजय जोशी मटा 17 मे 1910)
* आज विनायकी चतुर्थीला उद्यानगणेशाचे दर्शन घरापासून चालत जाऊन घेतले. उन्हात चालणे व जास्त वेळ उन्हात वावरणे कष्टकारक व तब्येतीला अनिष्टच. परंतु ठरविलेले काही न चुकता पाळण्यासाठी असे कष्ट घेणे मात्र केव्हाही चांगलेच. इतर वेळी अनावश्यक असेल, तर उन्हातील प्रवास हालचाल टाळावी. यावर्षी खरोखर सर्वात प्रखर उन्हाळ्याचा ताप होत आहे हे ध्यानात ठेवावे.
----------------------------

18 मे 2010 मंगळवार
# वाढदिवस:
* क्रिकेटपटू संदीप पाटील
* अभिनेत्री फरीदा जलाल
* 18 मे 1982 संभाजी राजे व येसुबाई यांचे पुत्र शाहूराजे यांचा जन्म
* 18 मे 1872 तत्त्वज्ञ नोबल पारितोषक विजेते बर्ट्रांड रसेल यांचा जन्म
* 18 मे 1885 कथा कादंबरीकार वि सी गुर्जर यांचा जन्म
* 18 मे 1910 फास्टर फेणेकार भा रा भागवत यांचा जन्म
* 18 मे 1933 भारताचे बारावे पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जन्म
* 18 मे 1962 विलायतखाँ-प्रख्यात सतारवादक यांचा मृत्यू
* 18 मे 1972 कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना. 
* 18 मे 1974 पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी केली
* 18 मे 1997 पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा मृत्यू
*18 मे 1999 पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ पटू रामचंद्र सप्रे यांचे निधन.
*18 मे 2009 एलटीटीईचा सर्वेसर्वा व्ही प्रभाकरन लंकेच्या लष्कराच्या कारवाईत मारला गेला

# विशेष नोंद:
* गोल्फ खेळ प्रथम स्कॉटलंडमध्ये खेळला गेला.
* जगातील सर्वात मोठा महामार्ग एक्सप्रेस वे ट्रान्स कॅनडा.
* झांबिया देश तांब्याचा देश म्हणून ओळखला जातो तर दक्षिण आफ्रिका सोन्याचा देश.
* ऑस्ट्रेलियाचा शोध जेम्स कूकने तर अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
* अँडाँल्फ हिटलरचा जन्म ऑस्ट्रियात झाला.

# विशेष विचार:
* आजच्या एक अनुभवावरून हे लक्षात आले की, आपल्याला जी आवश्यक माहिती असते ती जर नसली आणि आपण त्या माहितीशिवाय काही कृती केली, तर पुष्कळदा गोंधळ तर होतोच पण नुकसानही होते कष्टही पडू शकतात. म्हणून कोणत्याही कामासाठी जी माहिती आवश्यक आहे, ती गोळा करावी आणि नंतरच पुढे कृती करावी असा अनुभव आला.

* "जुने ते सोने !":
असेच माहितीपूर्ण लेख या लेखमालेत वाचण्यासाठी, आपण हा ब्लॉग पाहत जा आणि लेख वाचत जा. आपल्या ज्ञानात भर पडेल आणि जाणीव विस्तारत जातील.
हा प्रयत्न कसा वाटला, त्याची प्रतिक्रिया जरूर प्रतिसादात द्यावी.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क. चूकभूल द्यावी, घ्यावी.

बुधवार, २० जुलै, २०२२

👍"शारदोत्सव-वाचा, फुला आणि फुलवा !":👌

 👍💐"वाचताना, वेचलेले !":👍💐

महाराष्ट्र टाइम्स मधले 'सगुण निर्गुण' हे सदर कधीकधी मी वाचत असतो. आज 'विवेक, वैराग्य आणि तितिक्षा' यावरील सद्गुरुदास महाराज यांचे विचार वाचले आणि ते तुमच्या बरोबर शेअर करावे असे वाटले.

अतिशय सोप्या भाषेमध्ये परमार्थासाठी आवश्यक अशा वैराग्य विवेक आणि तितिक्षा या गुणांची ओळख येथै त्यांनी करून दिली आहे.

"विवेक" म्हणजे योग्य निवड. आत्मानात्माविवेक, सारासार विवेक, निरक्षीर विवेक, द्रष्टादृश्य विवेक असे त्याचे प्रकार आहेत.

"वैराग्य" म्हणजे मनाने कुठेही न गुंतणे. भोगांचा त्याग असा वैराग्याचा अर्थ नाही. जे प्रारब्ध मिळाले मिळेल ते आनंदाने स्वीकारायचे म्हणजे वैराग्य.

तर "तितिक्षा" म्हणजे आपल्यावर एखादे संकट येऊ पाहत आहे, अथवा आले आहे, तरी त्यापासून आपला बचाव करण्याचा अजिबात प्रयत्न न करणे. सर्व कर्तृत्व त्या भगवंताकडे देणे व त्याची लीला आनंदाने बघणे म्हणजे तितिक्षा. संकट निवारण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत, तर परमेश्वर कोणाला कशी प्रेरणा देतो व कार्य करून घेतो ते शांतपणे बघावे. कधी संकट टळेल, कधी भोगावे लागेल या दोन्ही परमेश्वराच्या इच्छा आहेत, हे समजून शांत राहणे म्हणजे तितिक्षा!

आता...
☺️"फेसबुकवरील माझी मुशाफिरी !:👍💐
😊 "विमुक्ताफळे !": 👌💐
😢 "न सुटणारे प्रश्न !":😢
१. बायकांना पुरुषांपेक्षा शॉपिंगची हौस जास्त कां असते?
२. एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्माला येणारी भावंडे, स्वभावाने, नशिबाने
व कर्तृत्वाने वेगवेगळी कां असतात?
३. कालप्रवाहाच्या ओघात,
सांस्कृतिक बदल, चांगल्याकडून वाईटाकडेच
कां होतात?
४ फक्त दोन्ही मुलगेच असतात तेव्हा,
दोघेही हुशार निपजण्याचे प्रमाण,
हे त्यातील एक मुलगा गौण असण्यापेक्षा, नेहमी कमी असते?
५ केव्हाही, कोणताही चॅनेल लावावा,
तेव्हा कायम जाहिरातींचा पाऊसच कसा असतो?
६ प्रश्न, रिमोट वापरण्याचा नसून, निर्मित्यांना, वाहिन्यांना, काय अर्थहीन वा दिशाहीन
हे न उमजून घेण्याचा आहे.
म्हणजे
"आशय थोडा, सोंगे फार"!

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, १८ जुलै, २०२२

☺️"सारे प्रवासी, एका घडीचे !":😊

 ☺️ "सारे प्रवासी, एका घडीचे !": 😊

👍"जीवनाचे गुढ ना कुणा समजले !":😢
दररोज अनेक घटना घडत जातात आणि पुष्कळदा आपण त्या घटनांचे वा प्रसंगांचे अपरोक्ष वा परोक्ष साक्षी असतो. त्याच त्याच प्रकारच्या घटना जर एखादेवेळी एकामागोमाग घडत गेल्या तर त्यांना योगायोग असे म्हणावे लागते. जीवनामध्ये योगायोगांची कमाल आपल्याला अधून मधून प्रत्ययास येत असते. माझेही असेच नुकतेच झाले. कसे ते ह्या मुक्तसंवादात मी सांगत आहे....

दररोज चहा प्यायच्या वेळेला मी काही ना काही वाचत असतो. "पद्मगंधा" दिवाळी अंक'२१ हा वाचायला घेतला आणि त्यामध्ये जी ए कुलकर्णी ह्यांच्या मौलिक साहित्य सेवेसंबंधी अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख वाचायचा योग आला. तोही आत्मचरित्र ह्या विषयावर "जी एं"चे चपखल विचार मांडणारा होता.

मला देखील सर्वात अधिक कशाची आवड असेल वाचना बाबतीत, तर ती म्हणजे आत्मचरित्रांची. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिचे जीवन हे एक गुढ नाट्यमय कादंबरी असते आणि प्रत्येक व्यक्तीला वेगळा असा भवताल आणि त्याच्या आयुष्यात येणारी माणसेही अगदी वेगळीच असतात. त्यामुळे मोठी माणसे वा सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य माणसे, प्रत्येकाचे आयुष्य ही एक रोमांचक कहाणी असते.

आत्मचरित्रामुळे वेगवेगळ्या व्यक्तींचे जीवन कसे वेगळे असते त्याचा प्रत्यय दुसरा एक हृदयस्पर्शी लेख त्याच अंकात वाचताना आला. स्वतः संपादक अरुण जाखडे यांनी त्यांच्या दोन मित्रांसंबंधित आदरांजली वाहिलेली ती हृदयस्पर्शी शब्दपुष्पे होती. त्यांचे ते दोन्ही मित्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पार पडले, ही ती कहाणी मनाला चटका लावणारी होती आणि त्या दोन्ही माणसांचे जीवन आणि त्यांचा जाखडे यांच्याशी आलेला भावबंध हा खरोखर अंतर्मुख करणारा होता.

प्रत्येकाचे जीवन कसे आगळे वेगळे असते, म्रुत्यु देखील कसा विचित्र असतो, त्याचाच हा योगायोगाने प्रत्यय होता. यापुढची योगायोगाची बाब म्हणजे, मला त्याक्षणी आठवले, ते काही दिवसांपूर्वी "मणीपुष्पक" हा आरोग्य आणि ज्योतिष यांना वाहिलेला वाचनीय दिवाळी अंक काढणारे रमाकांत बर्डे यांचे झालेले अकाली निधन. मी स्वतः "मणिपुष्पक" मध्ये गेले काही वर्षे त्यांच्या आग्रहामुळे ग्रहबदलानुसार अनुकूल गुणांवर आधारित "संपूर्ण वार्षिक राशी भविष्य" लिहीत आलो आहे. त्या संपादकांचा असा अचानक मृत्यू हा मला भयानक धक्का होता.

कदाचित कुयोग म्हणा किंवा काही जर माझ्या माहितीत तथ्य असेल, कारण अशा बातम्या सहसा खोट्या नसतात. तर "पद्मगंधा"चे संपादक अरुण जाखडे यांचेही निधन झाले आहे आणि तेही आता आपल्यात नाहीत. त्यामुळे हे दोन दिवाळी अंक कदाचित यापुढे निघणारही नाहीत, याची रुखरुख मनाला तर लागलीच. परंतु आत्मचरित्र, माणसांची विविधांगी जीवने या विषयाच्या घटना कशा एका मागोमाग समोर घडत गेल्या, याचे मला कमालीचे आश्चर्य वाटले. ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे इतका मी दिग्मुढ होऊन गेलो.

पण योगा योगांची ही मालिका इथेच थांबली नाही. सकाळी "वाफारे" घेताना, मी सर्वसाधारणपणे काही गीते ऐकतो अथवा माझ्या ध्वनीफिती अथवा माझ्या "मूनसन ग्रँडसन" या युट्युब चॅनेल वरील माझा व्हिडिओ ऐकत राहतो. योगायोगाने आज माझ्याकडून व्हिडिओ जो लावला गेला, तो "जीवन मृत्यूचे गुढ" व्यक्त करणारा आणि मानवी जीवनाच्या रहस्याचा मागोवा घेणारा व्हिडिओ होता.

त्या व्हिडिओची लिंक मी पुढे देतच आहे पण योगायोग असा की हे झाल्यानंतर हा लेख लिहिण्यासाठी मी जेव्हा बसलो, तेव्हा बाजूला जुना वर्तमानपत्राचा एक कागद नजरेत आला आणि योगायोगांची मालिका विचित्रपणे पूर्ण झाली. जवळच्याच केमिस्टकडून मागवलेल्या आमच्या औषधांना गुंडाळणारा ते वर्तमानपत्राचे एक पान होते. ते जेव्हा मी चाळले, तेव्हा माझ्या नजरेस "जीएं'चे साहित्य जगभरात पोहोचणे आवश्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे मत" असे शीर्षक असलेला वृत्तांत नजरेसमोर अचानक आला.

"मानवी दुःखाचे मूळ जीए कुलकर्णी नियतीमध्ये शोधतात मराठी कथाविश्वाला अनोखी अशी देणगी या श्रेष्ठ कथाकाराने दिली आहे आणि त्यांच्या साहित्याचा अनुवाद करून त्यांचे लेखनाचे श्रेष्ठत्व जगापुढे सांगितले पाहिजे." असेही मत श्री भारत सासणे यांनी सांगितले होते. तो प्रसंग होता जी ए कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद व अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीने आयोजित जीए कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन, श्री भारत सासण्यांच्या हस्ते होण्याचे आणि त्यासंबंधीचा हा वृत्तांत मला वाचायला मिळणे ! या लेखाची सुरुवात जीएंच्या साहित्यकार्य कर्तृत्वासंबंधी विशेषतः समीक्षा आत्मचरित्र विषयीचे विचार यावर व्हावी हा एक विलक्षण योगायोग नव्हे हवे कां?

पण योगायोगांच्या या विचित्र मालिकेचा क्लायमॅक्स हा की, ते औषधे गुंडाळणारे वर्तमानपत्राचे पान ज्या केमिस्टच्या दुकानातून आले होते, आमच्या परिसरातील तो लोकप्रिय केमिस्ट गेल्या वर्षी कोरोना साथीतच दुर्दैवाने अकाली निधन पावला होता 😢 पद्मगंधा मधील आदरांजली देखील ज्यांना वाहिली गेली ते दोघे देखील असेच कोरोनाच्या लाटेत मृत्युमुखी पावले होते 😢😢

इतके सारे चित्रविचित्र नमनाला सांगितल्यानंतर मी जीवनाचे गुढ उलगडणार्‍या माझ्या व्हिडिओची- "सारे प्रवासी एका घडीचे !" लिंक पुढे देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अंतर्मुख होऊन जीवनाविषयी अधिक गांभीर्याने आपण विचार कराल अशी मला खात्री आहे.

https://youtu.be/lDtEsVumVXo

हा व्हिडिओ आवडला तर.....
त्याची लिंक शेअरही करा....

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १६ जुलै, २०२२

👍"प्रतिभेची द्रुष्टी व स्रुष्टी !":👌💐


👍"प्रतिभेची द्रुष्टी व स्रुष्टी !":👌💐

☺️ 'ऋतुरंग' दिवाळी अंक'२० 'संघर्ष' या विषयाला वाहिलेला आहे. त्यामधून मानवी जीवनाची काही ना काही तरी आयुष्यात ध्येय गाठण्याची अथवा जगण्याची धडपड यांचा उहापोह आहे. विविध व्यक्तींच्या उदाहरणांवरून मानवी जीवनाचे आणि त्यातील अंतरंगातील संघर्षाचे चित्र, या अंकातून उभे केले गेले आहे. त्या उलट 'पद्मगंधा' दिवाळी अंक वाचताना लक्षात आले की या अंकामध्ये अतिशय मूलभूत आणि गहन अशा प्रतिभा आणि नवनिर्मिती या संकल्पनेचा उलगडा विविध तज्ञांकडून वैचारिक, तार्किक मनाला पटेल अशा अभ्यासू भाषेत व्यक्त केला आहे. हा एक खरोखर साहित्यातला आणि मराठी विचार विश्वातला एक अनमोल ठेवा आहे असे मला वाटते.

प्रतिभा म्हणजे काय याचा उहापोह करताना मला लक्षात आले की, हे जे काही मी आत्ता मांडतो आहे, तीही एक प्रतिभेतून निर्माण झालेली नवनिर्मितीच आहे. कारण प्रतिभा प्रतिभा म्हणजे दुसरे काही नसून आपल्या सभोवतालच्या घटनांचे अथवा जे जे काही अनुभवांचे आविष्कार आपल्या भोवती घडत असतात, घडून गेलेले असतात, त्यांचे आकलन करून त्या आकलनाचा अर्थ व्यक्त करणे, आपल्या कृतीनुसार आपल्या क्षमतेनुसार, ही प्रतिभासंपन्न नवनिर्मितीचीच प्रक्रिया होय. दुसरे असे की केवळ साहित्य कथा कविता व त्याचे प्रकार म्हणजेच प्रतिभा नव्हे, तर जे जे काही सभोवती आपल्या भोवती विविध रूपात आहे, त्यामध्ये देखील प्रतिभेचा अविष्कार आहे. 👌

👍चौसष्ट कला यादेखील प्रतिभेची मनोहारी विविध रूपे आहेत. नृत्य नाट्य संगीत फोटोग्राफी चित्रकला आर्किटेक्चर अशा विविध माध्यमांमधून प्रतिभा आपल्यासमोर उभी राहत असते आणि तेच या अंकांमध्ये त्या त्या क्षेत्रातील योग्य त्या व्यक्तींकडून खास लेख लिहून मांडले गेले आहे. वाचताना कठीण वाटतं असा हा अंक खरोखर दुर्मिळ आणि archive value चा आहे असे मला वाटते. अर्थात हे वाटण्याला कदाचित दोन वर्ष जायला लागली कारण 2020 चा हा अंक मला समजायला आज वेळ आली.💐

☺️ जिज्ञासा, कुतूहूल त्यातून घेतलेला मागोवा आणि त्या मागोव्याचे आपल्या मनःपटलावर व्यक्त झालेले चित्र, ते चित्र समजून घेताना ते काय आहे हे व्यक्त करण्याची कल्पना, अशा विविध अंगांनी नवनिर्मितीचा प्रवास चालू असतो. आपल्याला जे व्यक्त करायचे आहे ते आपल्या विचारशक्तीवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे आपल्या शब्दभांडारावर ! शब्दांना जो अर्थ, तो आपल्या व्यक्त करण्याच्या भावनेशी जर बरोबर जोडला गेला तर कदाचित प्रतिभासंपन्न अशी नवनिर्मिती होऊ शकते. अर्थात इथे शब्द ही प्रक्रिया विविध रूपात कलेच्याद्वारे मांडली जाते. मग ती चित्रकला असो नृत्य असो नाट्य असो संगीत असो. प्रत्येकाला त्या त्या प्रकारचा अर्थ आहे हे ध्यानात घेतले की, नवनिर्मितीची ही जी शक्ती आहे ती काय कशी असते, याचे आकलन होईल. 👌

👍प्रत्येकातच कुठली ना कुठली तरी, कोणत्या ना कोणत्या दर्जाची प्रतिभा असते आणि जो तो आपल्या जीवनाला त्याप्रमाणे योग्य त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असतो, असे आपल्याला मानायला हरकत नाही. आज अथांग निसर्गाच्या पार्श्वभूमीवर ध्यानात येते की, निसर्ग हाच सर्वोच्च अशा प्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार आहे. निसर्गाच्या जितके तुम्ही जवळ जाऊन आकलन करायचा प्रयत्न कराल, तेवढे तेवढे तुमच्या कल्पनेचे भांडार खुले होत जाईल आणि विविध रूपामध्ये नवनिर्मिती होत जाईल ! जे मला कळून चुकले, जे मला उमजले, ते इथे मी मांडले. ही देखील एक प्रतिभा कल्पना आकलन आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया यांचेच मूर्त स्वरूप आहे.👌💐

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, १३ जुलै, २०२२

☺️ "अंधारातून प्रकाशाकडे !":👌💐

 ☺️ "अंधारातून प्रकाशाकडे !":👌💐

सकाळी चहा पिण्याच्या वेळेला काही ना काही हाताशी येईल ते वाचण्याचा माझा प्रभात आहे. आज अचानक दिवाळी अंक दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळातला ऋतुरंग हा दिवाळी अंक वाचायला मिळाला. "संघर्ष" या संकल्पनेवर आधारित असा हा वाचनीय अंक खूप खूप काही सांगून व देऊन जातो.

जीवनामध्ये संघर्षाचे महत्व आणि संघर्षातूनच माणसाच्या योग्यतेची परीक्षा होऊन तो तावून सुलाखून स्वतःचे असे अस्तित्व कसे निर्माण करतो, त्याच्या विविध स्तरांवरील आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या या कहाण्या मुळातच वाचण्याजोग्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अनेक संघर्षाची वळणे येत असतात आणि जो तो आपापल्या परीने त्यांना तोंड देऊन स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो, हा आपला अनुभव आहे.

पण मला जे इथे सांगायचे आहे ते अजून वेगळे आहे. ते काय आहे, ते विशद करण्यासाठी एक कथा त्यामधील संघर्षाची वाचली. तिची पार्श्वभूमी देणं आवश्यक आहे. ज्याचे व्यक्तिमत्व रूढ अर्थाने चित्रपटात नायक होण्यास लायक नाही, अशा एका जातिवंत नैसर्गिक अभिनय क्षमतेने ठासून भरलेल्या एका प्रसिद्ध कलाकाराची आणि त्याच्या संघर्षाची ती कहाणी खरोखर रोमहर्षक आहे. त्यामध्ये मांडलेला मुद्दा असा होता की, तो जेव्हा येथे मुंबईत आला, त्यावेळेला ज्या तऱ्हेने चित्रपटसृष्टीने नवे वळण घेऊन केवळ करमणूक, धंदा एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता कला आणि आगळावेगळे विचार, प्रवृत्ती दर्शविणार्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागली होती. प्रेक्षकही अधिक चोखंदळ होत अशा समांतर आगळ्यावेगळ्या चित्रपटांना दाद देऊ लागला होता. 

अशा वेळेला त्याच्या अभिनय क्षमतेला लायक असे वातावरण आपोआपच हळूहळू निर्माण होत होते. मुद्दा असा की, चित्रपटसृष्टीने जर असे वळण घेतले नसते, तर त्याच्यातील अभिनय क्षमतेला न्याय मिळाला नसता आणि तो केवळ फुटकळ भूमिका करणारा एखादा कलाकार एवढाच राहिला असता. पण काळ आणि तुमच्यातील क्षमता यांचा जर अचूक मेळ जुळून आला, तर तुम्ही खूप काही करू शकता, यश मिळवू शकता, हा तो मुद्दा मला मांडायचा आहे. खरंच हे सत्य आहे कालातीत सत्य आहे !

हे मूलभूत तत्व अथवा शाश्वत सत्य आपल्याला काळाच्या उदरात डोकावल्यावर पडताळून पाहता येते. ज्या तऱ्हेच वातावरण त्या तऱ्हेचे लेखक निर्माण झालेले आपण पाहतो. मग ते नवकथाकार असो अथवा खेळकर अशा विनोदाला वाहिलेले लाडके व्यक्तिमत्व असो. जे साहित्य क्षेत्राबाबत किंवा कलाक्षेत्राबाबत तेही इतर सर्वच क्षेत्राबाबत, सत्य असलेले आपल्याला आढळून येईल. काळ जसा, तशी तुमच्यातील गुणवत्ता जर असेल तर तुम्हाला यश मिळू शकते, हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे. 

काही वेळा काळाच्या पुढची माणसे जन्माला येतात आणि त्यामुळे त्यांचे असामान्य कर्तृत्व हे ते गेल्यानंतर प्रत्ययास येते. याचेही कारण हे तत्व असावे. विचार करा आणि पडताळून पहा आपापल्या विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या अनुभवांवरून त्या त्या काळाच्या इतिहासावरून.

धन्यवाद

सुधाकर नातू

👍"आत्माविष्काराचा अट्टाहास !":👌

 👍"आत्माविष्काराचा अट्टाहास !":😢

☺️ प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वाच्या मर्यादा जाणून असतो. परंतु तरीही आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असे गुण आहेत कला आहेत, कौशल्य आहे असे वाटणे साहजिक असते. त्यामुळे प्रत्येक जण आपण जसे आहोत तसे सिद्ध करण्यासाठी आणि त्यातून समाधान मिळवण्यासाठी कटिबद्ध असतो.👌

😢 आपल्यावरील टीका सहसा सहन होत नाही कारण आपण बरोबर नाही, आपल्यात काही कमतरता आहेत, हे मान्य करणे कठीण असते. त्यामुळे आपण जे करतो त्याचे इतरांनी कौतुक करावे, निदान त्याची दखल घेतली जावी, असे वाटत राहते. 😊

👍परंतु तसे नेहमी होतेच असं नाही, कारण इतरांचा दृष्टिकोन हा संपूर्ण तया वेगळा असतो. अशा वेळेला जे द्वंद्व मनामध्ये निर्माण होते, त्यामधून संघर्ष निर्माण होऊन बऱ्याच वेळेला मनस्तापाची ही वेळ येते. पण आत्मसिद्ध असल्याचे सिद्ध करण्यासाठी माणूस कायम धडपडत राहतो मग तो कोणत्याही पातळीवरचा असो.😊

👍समाज माध्यमांच्या आगमनानंतर तर प्रत्येकाला व्यक्त होण्याचे एक सहज सुलभ साधन मिळाले आहे आणि त्यामुळे आपल्याला जे वाटते ते व्यक्त करण्याची सांगण्याची दाखवण्याची विविध प्रकारची अहमाहिका आपण समाज माध्यमातील संदेशांच्या महापुरातून अनुभवू शकतो. त्यामुळे आपल्यातील गुणावगुणांचा तपास होत जातो आणि आपल्याला सिद्ध करण्याचा एक नवाच प्रवास अविरत चालूच रहातो.👌💐💐

ह्या पार्श्वभूमीवर.......

👍"माझी फेसबुकवरील मुशाफिरी !:👌

# "असूं द्यावे:
शब्द, फुलणार्या कळीसारखे
विचार, बहरणार्या फुलांसारखे
उच्चार, ध्यानस्थ व्रुक्षासारखे
आणि
आचार, निष्कलंक स्फटिकासारखे !"

# "आपल्या काही करण्यामुळे, त्याचा दुसर्याला कोणताही त्रास होतो कां, हा साधा, सोपा प्रश्न प्रत्येकाने, ती क्रिया करण्यापूर्वी न चुकता विचारावा आणि जर उत्तर नाही, असे असेल, तर आणि तरच ती क्रिया करावी. इतरांचे भले करता येणे, जरी आपल्याला जमत नसले, तरी इतरांना पीडा होणार नाही, एवढे तरी, ह्यामुळे आपल्याला शक्य होईल."

# "अपेक्षा,कमीत कमी,
ध्येय,जमेल तितकेच
प्रयत्न,जास्तीत जास्त
फळ,पदरी पडेल ते!"

# "सद्यस्थितीतील वास्तवता व्यक्त करणे हे सर्वच जागरुक नागरिकांचे कर्तव्य आहे.
आपला कशाशीच संबंध नाही, असे म्हणणे हा पळपुटेपणा होय."

# दुर्घटनांमागून जेव्हा दुर्घटना घडत रहातात, तेव्हा यंत्रणा जशी खिळखिळी झालेली असते, तशीच ती संभाळणारे कारभारीही बेफिकीर व दूरद्रुष्टी नसणारे व अकार्यक्षम असतात."

# "सत्ता मिळविणं जितकं सोपं असतं,
त्यापेक्षा ती विहीत जबाबदारीनं संभाळणं महाकर्मकठीण असतं!""

# "एकमेकावर जबाबदारी ढकलण्यात
हे मग्न,
नागरिक मात्र
सून्न सून्न!"

#" कै. शास्रीजीनी रेल्वेमंत्री
असताना, अपघाताबद्दल नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. आता खुर्चीवर चिकटून रहाणे हाच नैतिक पराक्रम."

# "ज्याला त्याला,
त्याने त्याची जबाबदारी तंतोतंत पाळण्यात खराखुरा आत्मानंद मिळत असतो,
ही उमज जर आली तर समस्यांना पूर्णविराम मिळेल."

👍"माणसाच्या सहवासामुळे माणूस कसा आहे ते कळते. त्या माणसाचे गुण वा अवगुण जितका सहवास अधिक तितके प्रकर्षाने कळतात. कष्टाळूपणा हा मोठा गुण अविरत काही ना काही तरी कामात मग्न रहाणार्याचा. ते गृहिणींना उपजतच जमतं. त्या आपल्या घरामध्ये दिवसभरात, सगळी आवश्यक ती कामे योग्य वेळी योग्य प्रकारे करून संसाराला अधिक सुखी समाधानी करण्यासाठी, त्या अविरत मनापासून धडपड करत असतात. सहाजिकच त्यांना Home Maker असं संबोधलं जातं, हे किती रास्त आहे."👌💐

# "आघाड्या काय दिवेच लावतात, बहुमताचा कारभार तर,
बेपर्वाई किंवा एकाधिकारशाही गाजवतो. Benevolent,
good Governance हे एक म्रुगजळच!""

👍"विदारक सद्यस्थिती पहाता, नाईलाजाने एक कटू सत्य सांगावेसे वाटते:
"कारणही आम्ही, करणारेही आम्ही आणि सार्याचे विचित्र परिणाम भोगणारेही आम्हीच !"😢

# "स्वातंत्र्यपूर्व राजकारण आणि उत्तरोत्तर विशेषतः एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस राजकारणाचा पोत पूर्ण बदलून गेलेला आपल्याला पहायला मिळाला. केवळ सत्तेसाठी आणि आपल्या स्वतःच्या कुटुंब व निकटवर्तीय गटाच्या संपन्नतेसाठी राजकारण करण्याचा प्रघात सुरु झाला. या पद्धतीचा माहोल पाहता-पाहता उजाडला. स्वातंत्र्या पूर्वी देश स्वतंत्र व्हावा म्हणून जी माणसं स्वतःच्या स्वार्थाचा त्याग एवढंच काय पण संसारिक सुखाचाही त्याग करून केवळ देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचायचे आणि साधी राहणी उच्च विचार अशा जीवनशैलीला, त्याकाळात मानसन्मान होता. कष्ट आणि शक्यतोवर आपला व्यक्तीगत फायदा राजकारणातून न करणे, अशा प्रवृत्तीच्या माणसांची मोठी मांदियाळी त्या वेळेला होती. त्यामुळे लोकोत्तर असे अनेक नेते आपल्याला मिळाले."

# "कार्यतत्परता, सामंजस्य, परस्परावलंबन, क्रुतार्थता आणि चिरंतरता ह्या पंचसूत्री मूल्यांवरच, मानवतेचा हा प्रवाह अव्याहत रहाणार आहे."

# "वाढती गुन्हेगारी घातपात,
जीवघेणे अपघात, संपता संपतच नाहीत. ह्यामागची प्रमुख कारणे:
अवाजवी अभिलाषा, घाई आणि वेग!"

"# "नितीमत्ता, सदाचार प्रामाणिकपणा
दुर्मिळ झालेत.
भावी पिढीचे भवितव्य अंध:कारमय आहे. "

धन्यवाद                                                               सुधाकर नातू

बुधवार, ६ जुलै, २०२२

☺️"टेलिरंजन-कुछ 'पट्टया' नही !":😊:

 ☺️ "टेलिरंजन-कुछ 'पट्टया' नही !":😊

😊" डोक्याला शॉट !"😢
इतकं वय जरी वाढत असलं, तरी आता माझ्या लक्षात येतंय की, जागेपणीचा जवळजवळ सर्व वेळ मी डोक्याला काही ना काहीतरी "शॉट" देण्यात घालवत असतो ! त्याला कारण म्हणजे 'इंडियट बॉक्स' 'ओटीटी' आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे 'स्मार्टफोन' ! साहजिकच वाचन आणि ही तीन खुळे, एक झाला की दुसरा, दुसर्यानंतर तिसरा मग चौथ्यांत व्यस्त रहात, प्रत्येक क्षण जात असतो. काहीही न करता कुठलाही विचार न करता स्वस्थ रहाणेच, मला आता अशक्य झाले आहे. डोक्याला
शॉट, कसा ते पुढे सांगतो.

दूरदर्शन मालिकांमध्ये मनाला न पटणाऱ्या गोष्टी कां दाखवतात कळत नाही ! काहीतरी तर्क वा सुसंगतविचार त्यामागे असावा की नको ? मनाला येईल तसं काहीही दाखवायचं आणि कुठल्याही पात्राची मध्येच कशीही स्वभाव रचना करायची हा फंडा न समजण्याजोगा आहे.

👍"इंद्रा इतका फद्या?":😢
झी मराठीवरील "मन उडू उडू" मधला इंद्रा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक, पण त्याचं वसुली एजंट असल्याचं बिंग फुटल्यावर दीपिकाच्या वडिलांकडून देशपांडे मास्तरांनी आणि आपल्या आईकडून तो अव्हेरला जाणं इतपत आपण समजू शकतो. परंतु जो काहीही उद्योग न करणारा बेपर्वा असा धाकटा भाऊ कार्तिक त्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक होणे आणि ते इंद्राने स्वीकारणे, हेही पुरेसे नाही म्हणून तिथे इंटरव्यूला जाणे हा म्हणजे मूर्खपणाचा अतिरेक होय न पटण्याजोगा ! एवढे पुरेसे नाही म्हणून की काय नंतर हा तडफदार झुंजार इंद्रा एका हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मागायला जाणे, म्हणजे डोक्याला शॉटच शॉट ! आता या अशा इंद्राचं आणि दीपिका च लग्न झालं काय आणि नाही झालं काय असे वाटून साहजिकच आपल्याला मालिकेत रस उरत नाही.

😊 "अनाकलनीय अनामिका !"😢
तोच प्रकार "तू तेव्हा तशी"मध्ये अनामिकाची आई कावेरी कजाग आहे, वाटेल तशी वागणारी आहे आणि तीच बहुतेक प्रवृत्ती तिच्या नातीमध्ये राधामध्ये आली आहे हे आपण समजू शकतो. पण आधुनिक युगातली माँडर्न राधा जी लग्न न करता प्रियकराबरोबर लिव ईन रिलेशनला तयार आहे, आग्रही आहे, ती आपल्या आईचा कोणी मित्र असावा आणि त्याच्याशी त्याचा विवाह व्हावा असं तिला बिलकुल कां वाटत नाही, तिला काय अडथळा यावा आईचा मित्र असला, तर त्याच्याबरोबर तिने लग्न केलं तर ? खरंच काही न समजण्याजोगं आणि अनाकलनीय. शिवाय जी अनामिका पुढारलेल्या विचारांची, कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारी आहे, जीची मुलगी बिनधास्त आहे, ती इतक्या वर्षांनी तोंड दाखविणार्या आईपुढे -कावेरी पुढे कां नमतं घेते ? हेही न पटण्याजोगं ! त्यामुळे या तिची प्रीतीकथा उगाचच लांबवत नेण्यासाठी हा धेडगुजरी प्रकार चालू आहे. अर्थात साहजिकच अनामिका आणि पट्याचं लग्न झालं काय वा नाही, तरी आता कोणताही इंटरेस्ट या मालिकेत त्यामुळे राहत नाही.

टीव्ही मालिका लांबवण्यासाठी, नको इतकं पाणी घालणं म्हणजे काय, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल ! तुमच्या डोक्याला आणखी शॉटस् नकोत, म्हणून वानगीदाखल ही दोनच उदाहरणे पुरेत.
आपला काय अनुभव ? प्रतिसादात जरूर लिहा.

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, २ जुलै, २०२२

#👍"काळाचा महिमा, दुसरं काय !!😊

 👍"काळाचा महिमा, दुसरं काय !!"😊


"पडू आजारी मौज वाटते भारी !" अशी लहानपणी मला आठवतंय एक कविता होती. ती मला
खूप छान वाटायची. कारण एक आठवण तशी आहे त्याच संबंधित. लहानपणी तिसरीपर्यंत मी सारखा आजारी असायचो, काही ना काहीतरी होत असायचं, ताप सर्दी खोकला वगैरे वगैरे. आई किंवा बाबा आपोआपच मला फॅमिली डॉक्टरांकडे नेऊन औषध आणायचे. मला इंजेक्शनची तर खूप भीती वाटायची. एकदा तर मांडीवर इंजेक्शन देताना सुईच मोडली. त्याची खूण अजून आहे !

त्यावेळेला मला आठवतंय, आम्ही बैठ्या बरँक्समध्ये रहायचो. मधल्या खोलीत, गादीवर मी आडवा पडलेला असायचो आणि वरती आमच्या इथे काचेचे एक कौल लावलं होतं, प्रकाश येण्यासाठी. त्या कौलातून मी आपला वर बघत असे आणि ही कविता मनातल्या मनात मला आळवत असे. कारण आजारामुळे शाळेत मला जायला काही लागायचं नाही, अशी ती आठवण.

आज ती आठवण, आठवली की, लक्षात येतंं ज्येष्ठ नागरिक झाल्यावर ह्या कवितेला खरंच काही अर्थ नाही. कारण आजारी पडणं, शरीर विकलांग होणं रोजच्या ज्या काही हालचाली आवश्यक आहेत, त्या मंदावणे म्हणजे शरीराला आणि मनाला किती त्रासदायक असतं ते. त्यामुळे आता ही कविता निदान जेष्ठ नागरिकांसाठी तरी बदलायला हवी, "अस्सं आजारपण नको ग बाई" असं आता म्हणायला हवं.

कायम सगळे आरोग्याचे नियम पाळून काटेकोरपणे जगत आजारपण येणार नाही याची काळजी सर्वांनीच विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायलाच हवी. कारण आता आपल्याच्यानं काही होत नाही आणि घरामध्ये बहुतांश दोनच जणं, पती पत्नी हे ज्येष्ठ नागरिक, मुलं वेगळी झालेली वा परदेशात. ती त्यांच्या संसारात मग्न. त्यामुळे कितीही झालं तरी त्यांना आपल्याला मदत करायला येणं हे तसं कठीण व त्रासदायकच.

परंतु याकडे नुकतच दुर्लक्ष झालं आणि काही कामानिमित्त बाहेर गेल्यावर पावसात भिजायचा प्रसंग आला, उत्साहाच्या भरात तेव्हा लक्षात आलं नाही की, याचा दुष्परिणाम काय होणार ते. कारण नंतर त्यामुळे आजारपण आलं, अंग थकलं, दररोजच्या हालचाली आणि विहीत कार्यक्रम करता येईनासे झाले. तेव्हा जाणवलं की, चांगलं धडधाकट असणं आणि दररोजचे कार्यक्रम आपले आपण उत्साहाने पार पडता येणं, यात किती सुख आहे ते.

म्हणूनच "पडू आजारी मौज वाटते भारी" ऐवजी
मी आता धडा घेतला आहे की,
"अस्सं आजारपण नको ग बाई" !
हा सारा काळाचा महिमा, दुसरं काय !!

धन्यवाद
सुधाकर नातू