शनिवार, २७ जून, २०२०

"ह्रदयसंवाद-२४": "सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद-२":


"ह्रदयसंवाद-२४":
"सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद-२":

मला आलेल्या एका संदेशामुळे प्रेरणेतून माझी ही शब्दांची भरारी. ही प्रक्रिया मला आव्हान देते अन् नंतर आंतरिक समाधानही. मी whatsapp व फेसबुक हे सोशल मिडिया म्हणजे कल्पनाशक्ती व्रुद्धिंगत करणारा व्यायामशाळाच आहे, असं मानतो.

मी सहाजिकच अशा 'शक्तीशाली' संदेशांच्या शोधात असतो. सिग्रेटची तल्लफ आल्यावर सिग्रेट ओढणार्याला जसं क्रुतक्रुत्य झाल्यासारखं वाटत असेल तसं काही तरी मिळवत बसतो. हा पुढील 'शब्दच्छल' त्याच कक्षेतील:

# जसा काळ, तशी माणसं आणि त्यांच मोठेपण असतं. काळ जसा बदलतो, तद्वत माणसांचं मोठेपणाचं अपेक्षित चित्र बदलतं. म्हणूनच साने गुरुजींचं भाबडेपण विसरलं जाणं जसं खरं, तसंच 'पुलं' ची बहुशः शब्दनिष्ठ विनोदशैली हसवायला तोकडी पडू शकते.

पिढीबरोबर विचार अन् द्रुष्टी बदलणं स्वाभाविक असतं. कालातीत थोरवी प्राप्त करण्याचं भाग्य दुर्मिळातील दुर्मिळ असते, वैश्विक मूल्यांचा ढांढोळा व प्रसार करणार्या विवेकानंदांप्रमाणे.

# कोणी सर्वगुणसंपन्न नसतो. 
डोक्यावर घेतलेल्याचेही 
दोष जाणवण्याची वेळ, त्याच्या गुणांच्या योगदानाची चिकित्सा होते, तेव्हां येते.

# सूक्ष्म निरीक्षण, माहितीची समतोल चिकीत्सा 
ह्याजोडीला कल्पनाशक्तीमुळे, "शाश्वत वास्तववादी विचारसूत्रे"
(Concepts) निर्माण होतात.

# ज्या "चष्म्यां"तून आपण पहातो, 
तसे जग आपल्याला दिसते. 
पण खरोखर "ते" तसे असतेच असे नाही!

# "काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ "उद्या" ये😢ऊ नये!

# गौरवशाली इतिहासाचे नगारे पिटताना, 
तसा पराक्रम व कर्तृत्व वर्तमानात आणण्यासाठी सर्वंकष योगदान देताना दिसले, 
तरच त्याला काही अर्थ.

# "आजची फर्माईश":
'दररोज सकाळी, आज काय काय कामं करायची ह्याची नोंद घेण्यापेक्षा, काल आपण कोण कोणती कामं, पूर्ण केली त्याची, न चुकता नोंद ठेवणं, अधिक उपयुक्त असते. आपला वेळ आपण कसा वापरला हे त्यावरून समजून, सातत्याने आपल्यांत सुधारणा करण्याची प्रेरणा तर मिळतेच, पण त्याच बरोबर जी कामं झाली, त्यांची फळं व समाधानही मिळते. मी अशा तर्हेची नोंद दररोज घेतो. म्हणून हा अनुभव येथे शेअर करत आहे.

# सूक्ष्म निरीक्षण, माहितीची समतोल चिकीत्सा 
ह्याजोडीला कल्पनाशक्तीमुळे, "शाश्वत वास्तववादी विचारसूत्रे"
(Concepts) निर्माण होतात.

# ज्या "चष्म्यां"तून आपण पहातो, 
तसे जग आपल्याला दिसते. 
पण खरोखर "ते" तसे असतेच असे नाही!

# "काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ "उद्या" ये😢ऊ नये!

# गौरवशाली इतिहासाचे नगारे पिटताना, 
तसा पराक्रम व कर्तृत्व वर्तमानात आणण्यासाठी सर्वंकष योगदान देताना दिसले, 
तरच त्याला काही अर्थ.

# *देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातलीय...!*
*"जो झिजेल तोच चमकेल"*

# "लाँ आँफ डिमीनिशिंग रिटर्नस्":
एखादी गोष्ट जरी खूप आवडली तरी, 
तिच्या जास्त वापरामुळे, 
ती हळूहळू नकोशी होते.

# जो होता है, 
वो आखिर भले के लिए ही होता है. 
कौन कितने पानीमे और किसमे कितना दम है, यह समझता है.

# काय काय केलं, 
ते बाहेर येणं 
राहिले बाजूला,
पण काय काय नाही केलं, ते आता भसा भसा शेकतय अंगाला!

# "खेळखंडोबा बातम्यांचा?:
बहुतेक सर्वच व्रुत्तवाहिन्या दर अर्ध्या तासानंतर जवळजवळ त्याच त्याच बातम्या, नेहमी दाखवतात. आत्ताही जुनीच दुपारची टेप वाजवलेली पहायला मिळत आहे. फक्त बातम्या देणारे बदलले जातात. ताज्या बातम्या अपवादानेच दाखवल्या जातात. ( पूर्वी 
ई टीव्हीवर दर तासाभराने शक्यतो ताज्या घडामोडींचा परामर्ष घेतला जाई. ) त्यात मधे मधे जाहिरातींचा मारा तो वेगळाच.
अक्षरशः उबग येतो तेच तेच ऐकून व पाहून. कधी कोण कसे बदलणार हा खेळखंडोबा बातम्यांचा?

जाता जाता,
'यक्षप्रश्न': उत्तरे द्या:
१ 'स्वामिनी' मालिकेमधील रमाच्या माहेरचे गांव कोणते?
२ पाठीचा ताठ कणा या पुस्तकाचे लेखक कोण?
३ 'ऋणानुबंधाच्या ह्या, फिरून पडल्या गाठी' या गीताचे गीतकार व संगीतकार कोण?
४ 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिके च्या भावाचे नाव काय?
५ जयद्रथाचे पांडवांशी नाते काय? 
६ 'धुंद मधुमती नाच रे, नाच रे' गीताचा चित्रपट कुठला?
७ ' संकेत मिलनाचा नाटकाचे नाटककार कोण?
८ 'सारी सारी रात, तेरी याद सताये' या गीताचे गायक कोण? चित्रपट कोणता?
९ रामायणात लक्ष्मणाचा जीव वाचवण्याकरता हनुमान कोणता पर्वत आणि कोणती वनस्पती आणतो?
१० सात चिरंजीव पुरुष कोण?

धन्यवाद
सुधाकर नातू, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा