शनिवार, २७ जून, २०२०

"मालिकांचे 'महाभारत":





"मालिकांचे 'महाभारत":

लॉकडाऊनच्या विश्रांती वा विसाव्यानंतर मालिकांचे पुनश्च हरिओम आता लवकरच चालू होईल. तेव्हा......
१ जुन्या चावून चोथा झालेल्या आणि कथानकात काहीही नाविन्य न उरलेल्या मालिका पुढे दाखविल्या जाऊ नयेत.

२ ह्या पुढे तरी शक्यतोवर टी-20 सामन्यांप्रमाणे मर्यादित भागांच्या आणि निश्चित कथानकाचा शेवट असलेल्या मालिकाच दाखविल्या जाव्यात.

३ त्या अनुषंगाने कुठल्याही मालिकेत प्रचलित कायद्यांच्या विपरीत असे काहीही दाखवले जाणार नाही ना, असे यापुढे तरी त्यांच्यावर सेन्सॉर नियंत्रण ठेवले जावे.

४ ज्याप्रमाणे महाभारत मालिकेमध्ये प्रत्येक भागाच्या शेवटी त्या त्या भागातील कलाकारांचा सहभाग असे, त्यांच्या नावाची श्रेयनामावली दाखवली जायची, तीच पद्धत यापुढे मालिकांमध्ये सुरू केली जावी.

याशिवाय
काय?....काय?... काय?...
जे तुम्हाला वाटते ते प्रतिसादात जरूर लिहा.

ह्या संदेशाला आलेले....
निवडक प्रतिसाद:

१ गंगाधर टिपरे ही शेवटची सीरियल पहिली नंतर एकही नाही.
Daily soap serial बघणे ही मानसिक विकृती वाटते मला जेवढ्या सीरियल झाल्या त्याप्रमाणे घराघरात कोण वागते हो ?

सासू,नणंद,दीर,भावजय असे खलनायक असतात. वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि संगनमत करून त्रास देण्याचे काम सद्गुणांचा पुतळा असलेल्या सुनेला किंवा मुलाला छळतात आणि त्यात एखादे पात्र माझा जीव तुझ्यावर आणि तुझा त्या गाढवीवर असे असते.

असे नसलेली एखादी सीरियल दाखवा.
दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे ते बघणे आणि गॉसिप ला पर्याय म्हणजे मालिका.

ह्या मालिकांत काही नवीन शिकणे, एखाद्या व्यक्तीचा सामाजिक काम करणाऱ्या संघर्ष , एखादी नवीन गोष्ट शिकणे,पर्यटन स्थळाची माहिती, विज्ञानाची माहिती, बौद्धिक पात्रता उंचावण्यासाठी असे कधी काय असते कां?

कसेतरी जेवण उकडायचे आणि टीव्ही समोर थान मांडायचे , मुलांचा गृहपाठ ,जेवण हे सगळे ब्रेक मध्ये होते घरातल्या व्यक्तींचा ,मुलांचा संवाद साधला जातो का ? किती मुलांकडून पाढे , पलाखे, स्तोत्रे म्हणून घेतली जातात पालकांकडून ? संस्कार नाहीत आणि संस्कृती च्या गप्पा मोठ्या मोठ्या करणार संध्याकाळी सात ते दहा सर्व चॅनल वर धुडगूस असतो

आणि हे काही कमी नाही, म्हणूश ३० मिनिटांच्या सीरियल मध्ये ७ मिनिटांचे ३ advertisement break असतात.

२ There should be no serials after 9.00 pm. So that people can have dinner in peace and some time for talks among family members.

३ मी १९९९ ला दूरदर्शन संच एकाला दिला.२१ वर्षात काही अडले नाही!

४ सर्व ‌निर्मात्यांना एकत्र ‌यैऊन‌ करमणुकीबरोबर
लोकशिक्षण करणार्या व काही‌ मेसेज‌ देणार्या
कथा असतील‌ अशा compact मालिका दाखविता येतील का‌ं, याचा विचार व्हायला हवा ना!

नातेसंबंधातील कुरघोडी करणार्या अवास्तव मालिका पाहून केवळ जाहिरात उत्पन्न मिळते म्हणून लांबण लावू नये, ही नम्र विनंती.

५ जोपर्यंत भैय्या दुधात पाणी टाकत राहील, सोन्यात तांबे भेसळ होत राहिल,माणसांच्या वागण्यात भेसळ होत राहील, तोपर्यत......
ह्या अशाच मालिका माथी मारल्या जातील.

६ प्रत्येक मालिकेला १३/२६मध्ये संपवण्यासाठी बंधन असावे. म्हणजे पणजोबा, आजा, बाबा, नातू आणि पणतू एकच मालिका एकाच वेळी पाहात आहेत असे होणार नाही.....

हे आणि असेच प्रतिसाद......
.........

धन्यवाद.
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा