"नियतीचा संकेत-५":
"संख्याशास्त्र उपयुक्त माहिती":
ह्या खास लेखात, संख्याशास्त्रासंबंधी काही विशेष उपयुक्त मजकूर मी माझ्या डायरीत नोंदवून ठेवला आहे, तो तुम्हाला सांगणार आहे.
जन्मतारखेवरून तुमचा मुलांक आणि भाग्यांक काढला जातो. मुलांक म्हणजे फक्त तुमची जन्मतारीख, तर भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेच्या अंकातील बेरीज होय.
आता प्रत्येक मुलांकाची विशेषता बघू.
१-शिस्तबद्ध स्वतंत्र मनोवृत्तीची, नेतृत्वगुण
२- हळवी संवेदनशील बौद्धिक काम
3-स्पष्टवक्ता, त्वरित निर्णय घेणे
४-मोकळ्या विचारांच्या प्रामाणिक आणि आग्रही ५-बुद्धिमान मानसिक ताणात, कर्तृत्ववान
६-सुंदर उत्तम आरोग्य मात्र व्यसनाधीनतेची शक्यता
७-शांत प्रसन्न बुद्धिमान व भावविवशता
८-दयाळू निराश दुर्बलता कृतीशील साहसी त्वरित निर्णय घेणे.
९-आग्रही, धडाडीचे, काहीसा तापट स्वभाव
हे पाहिल्यानंतर प्रत्येक मुलांकाचे मित्र कुठले व शत्रू अंक कुठले ते बघू: मित्र अंक शत्रु अंंक
मुलांक 1: 1 4 9 6 8
मुलांक 2: 1 2 7 6 9 8
मुलांक 3: 3 6 9 4 5
मुलांक 4: 4 1 5 6 8
मूलांक 5: 5 6 3 8
मुलांक 6: 6 3 2 4 1 8
मुलांक 7: 2 7 1 8 9
मुलांक 8: 8 3 6 4 1 5
मुलांक 9: 9 3 6 1 8 2 7
असा प्रत्येक अंकाला इंग्रजी अक्षर/अक्षरे देखील वाटून दिली आहेत:
नंबर 1: a i q j y
नंबर 2: b k r
नंबर 3: c g l s
नंबर 4: d m t
नंबर 5: e h n x
नंबर 6: k v w
नंबर 7: o z
नंबर: 8: f p
ह्या प्रमाणे इंग्रजी अक्षरांना क्रमांक दिले आहेत. आपल्या नावाची स्पेलिंग जे असेल, त्यावरून मूळ नांव आणि संपूर्ण नांव यावरून मूलांक आणि भाग्यांक, तसेच काढता येतील.
मानवी जीवनाचा गुढार्थ व भवितव्य हे माणसाने वेगवेगळ्या अभ्यासावरुन काढण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यापैकी आधीच्या लेखातील जन्मपत्रिका व हा संख्याशास्त्र हे दोन भाग होत. याशिवाय चेहऱ्यावरून भविष्य किंवा विशिष्ट प्रश्नावरुन भविष्य किंवा टॅरो कार्डवरून भविष्य, अशा अनेक भविष्याच्या पद्धती रुढ आहेत आणि त्यांचा अभ्यास आतापर्यंत होत आला आहे.
आपले पुढे काय होणार याचे कुतूहूल जसे प्रत्येक माणसाला असते, त्याचप्रमाणे आपल्याला सुखाने आनंदाने जीवन भरभराटीचे काढता यावे अशी इच्छा ही प्रत्येकाचीच असते. अनेक संकटे समस्या येत असतात, त्यातूनही आपले पुढे काय होणार, याची चिंता माणसांना लागत असते. त्यामुळे प्रत्येकजण आयुष्यात केव्हां ना केव्हातरी आपले पाय ज्योतिषाकडे वळवतो आणि त्याचा सल्ला घेत असतो.
'निवडक उदाहरणे':
माझ्या जवळच्या संग्रहात लेखक व राजकीय नेते ह्यांच्या जन्मतारखा आहेत. त्यांचे मुलांक व भाग्यांक पुढे देत आहे. त्यावरून चिकीत्सक अभ्यासकांना संक्षिप्त निरीक्षणेही काढता येऊ शकतील. म्हणून ही माहिती संख्याशास्त्र अभ्यासकांना उपयुक्त व मनोरंजक वाटेल अशी आशा आहे. प्रसिद्ध व्यक्ती व त्यांच्या जन्मपत्रिका ह्यांचा ज्योतिषी जसा उहापोह करत असतात, तशीच ही एक झलक असे समजता येईल !
नामवंत लेखक व इतर:
नांव जन्मतारीख मुलांक भाग्यांक
अम्रुता प्रितम् ३१/८/१९१९ ४ ५
चिं वि जोशी १९/१/१८९२ १ ४
चंद्रा कर्नाटकी २६/४/१९०६ ८ १
रस्किन बाँड १०/५/१९३४ १ ५
पीटर ड्रकर ११/९/१९०९ २ ३
रणजित देसाई ८/४/१९२८ ८ ५
द श्री मराठे १३/२/१९०६ ४ ४
माधव गडकरी २५/९/१९२८ ७ ९
वा य गाडगीळ १८/१२/१९१८ ९ ४
राजा बढे १/२/१९१२ १ ७
रत्नाकर मतकरी १७/११/१९३८ ८ ४
द्वा भ कर्णिक १४/१/१९०८ ५ ६
वा रा ढवळे २/२/१९०८ २ ४
आशा भोसले ८/९/१९३३ ८ ६
भाई भगत ९/१/१९२६ ९ १
शांता बुद्धीसागर २०/१/१९२ २ ८
सुधांशू ६/४/१९१७ ६ १
प्रेमा कंटक १/७/१९०६ १ ६
केशव भिकाजी ढवळे११/७/१८८२ २ १
--------------------------------------------------------
नामवंत नेते जन्मतारीख मुलांक भाग्यांक
मुसोलिनी २९/७/१८८३ २ २
डेंग झिआओ पेंग २४/८/१९०४ ६ १
व्ही प्रभाकरन् २६/११/१९५४ ८ २
जयप्रकाश नारायण११/१०/१९०२ २ ६
परवेझ मुशर्र ११/८/१९४३ २ ९
जॉर्ज डब्ल्यू बुश ६/७/१९४६ ६ ६
लालकृष्ण अडवाणी ८/११/१९२९ ८ ४
पी व्ही नरसिंहराव २८/६/१९२१ १ २
नरेंद्र मोदी १७/९/१९५० ८ ५
रामविलास पासवान ५/७/१९४६ ५ ५
शरद पवार १२/१२/१९४ ३ २
जे जयललिता २४/२/१९४८ ६ ३
मायावती १५/१/१९५६ ६ १
राहुल गांधी १९/६/१९७० १ ६
विनोबा भावे ११/९/१८९५ २ ७
राजीव गांधी २०/८/१९४४ २ १
---------------------------------------------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
शोधा म्हणजे सापडेल, विचार करा, सुचेल":
जगप्रसिध्द मँनेजमेंट गुरुंच्या अनुभवी मार्गदर्शनाचे सार मांडणारे अभ्यासपूर्ण लेख असणारे 'Management Musings' व सोप्या भाषेत घरच्या घरी ज्योतिष शिकण्यासाठी 'नियतीचा संकेत' हे दोन खास डिजिटल अंक मी माझ्या ७६ व्या वाढदिवशी १६जून रोजी प्रकाशित केले आहेत.
ते ज्या इच्छूक वाचकांना हवे असतील त्यांना विनामूल्य पाठवले जातील. 9820632655 ह्या नं. वर आपले नांव, गांव देऊन, होकार whatsapp ने कळवावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा