"पहिल्यात पहिले: माहितीचा खजिना":
"पहिल्यात पहिले":
कपाटाची साफसफाई करताना अचानक मला काही जुने कागद गंवसले. खूप वर्षापूर्वी मी काही अनमोल नोंदी केलेले ते कागद होते. कशी केव्हा कुठून मी त्यातील चित्तथरारक माहिती गोळा केली होती काहीच मला आठवत नाही. गेल्या शतका दीडशतकात भारताच्या इतिहासात ज्या घडामोडी, शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक उन्नयन झाले, त्याची आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांची दखल घेतली होती. तेव्हा आपण कुठे होतो आणि आता विविध क्षेत्रात केव्हढी गरुडझेप घेतली आहे, ते पाहिले तर थक्क व्हायला होते. जीवनाच्या अशा सर्वांगीण स्तरांवर कुणीतरी प्रारंभ केला म्हणून तर आज ही मजल मारली. ते सारे दिग्गज कोण हे ह्या माहितीच्या खजिन्याच्या शिर्षकावरूनच मी काय म्हणतोय, ते ध्यानात येईल.
सर्वसामान्याच्या जीवनाला कलाटणी देणारे, सहसा ज्या वाटेवरून मार्गक्रमणा करणार नाहीत, असे रस्ते शोधून आपले ईप्सित ध्येय साधणार्या ह्या दिग्गजांना लाख लाख सलाम.
हा माझा प्रयत्न मनोरंजक व वाचकांच्या जाणीवा विस्तारणारा वाटेल, अशी आशा आहे:
येथे व्यक्तिच्या नावाबरोबर ती कोणत्या क्षेत्रातील पहिली ते क्षेत्र दिले आहे:
१अन्नपूर्णा तर्खड १८५५-१८९२: उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणारी पहिली स्री.
२ कार्नेलिया सोराबजी १८६६-१९५४: स्रियांना विद्यापीठात कोणत्याही विषयांत मुक्त प्रवेश मिळवून देणारी पहिली महिला-Oxford मध्ये कायदा बदलला.
३ जमशेटजी टाटा १८३९-१९०४: भारतीय औद्योगिकरणाची मूहूर्तमेढ.
४ सत्येंद्रनाथ टागोर १८४२-१९२३: पहिले ICS-१८६३
५ मँडम कामा १८६१-१९३६: सार्वजनिक कार्य करणारी पहिली महिला-पहिला तिरंगा झेंडा केला.
६ अवंतिकाबाई गोखले १८८२-१९४९: पहिल्या प्रसूतीतज्ञ महिला
७ अर्देसर करसेटजी १८०८-१८७७: इंजिनिअरिंग उद्योगाची मूहूर्तमेढ
८ राँयल एशियाटिक सोसायटी १८२०- पहिली लायब्ररी-भारतातील सर्वात जुनी संस्था
९ डाँ ईरावतीबाई कर्वे १९०५-१९७०: पहिल्या मानववंश संशोधक, इतिहासकार
१० न्या. महादेव गोविंद रानडे १८४२-१९०१: मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर व अर्थशास्त्राचे जनक
११ बाळशास्त्री जांभेकर १८१२-१८४६: पहिले मराठी वर्तमानपत्र 'दर्पण' काढले.
१२ आचार्य प्रफुल्लचंद्र रे १८६१-१९४४: पहिले रसायनशास्त्रज्ञ
१३ राजा रवि वर्मा १८४८-१९०६: पहिले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार
१४ पंडिता रमाबाई १८५८-१९२२: पहिल्या समाजसुधारक महिला
१५ राजा राममोहन राँय १७७२-१८३३: सामाजिक सुधारणांची मूहूर्तमेढ
१६ रघुनाथ धोंडो कर्वे १८८२-१९५३: पहिले संततीनियमन पुरस्कर्ते
१७ वि.का.राजवाडे १८६३-१९२६: पहिले मराठी इतिहास संशोधक
१८ शरदचंद्र राँय १८७१-१९४२: पहिले मानववंशशास्त्रज्ञ
१९ रामचंद्र गोपाळ भांडारकर १८३७-१९२५: पहिले भारतीय कुलगुरू-मुंबई विद्यापीठ
२० ईश्वरचंद्र विद्यासागर १८२०-१८९१: पहिले शिक्षण प्रसारक
२१ परशुराम बल्लाळ गोडबोले: १७९९-१८७४: पहिला मराठी कविता संग्रह
२२ गणेश वासुदेव जोशी १८२८-१८८०: सार्वजनिक काका-पहिले स्वदेशीचे पुरस्कर्ते
२३ डाँ भाऊ दाजी लाड १८२२-१८७४: सुधारक स्रीयांचा उद्धार
२४ गोपाळ हरी देशमुख १८२३-१८९३: लोकहितवादी समाज प्रबोधक
२५ जगन्नाथ-नाना शंकरशेट १८०३-१८६५: आधुनिक मुंबईचे जनक-पहिली रेल्वेगाडी सुरू करण्यात पुढे
२६ डॉ आनंदी गोपाळ जोशी १८६५-१८८७: पहिली महिला डॉक्टर
२७ चंद्रकिरण सारडा १८८८-१९५७: शारदा कायदा मांडणारे विधीज्ञ
२८ काशिनाथ त्र्यंबक तेलंग १८५०-१८९३: मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय उपकुलगुरू
२९ डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर
१८८४-१९३७ : पहिले मराठी ज्ञानकोषकार
३० परमहंस सभा १८४९-- ;):धर्माच्या जातकतेविरूद्ध पहिले बंड
३१ कँप्टन सौदामिनी देशमुख १९५२-- : आशियातील पहिली स्री वैमानिक
३२ रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे १८७६-१९६६: पहिले रँग्लर
३३ झुक झुक अगिनगाडी १८५३-- : पहिली भारतीय रेल्वे
३४ कावसजी दावर १८१५-१८७३: पहिली भारतीय कापड गिरणी स्थापली.
३५ बाबा पदमनजी १८३१-१९०६: पहिले मराठी कादंबरीकार
३६ हरी नारायण आपटे १८६४-१९०६: पहिले ऐतिहासिक कादंबरीकार
३७ प्रार्थना समाज १८६७-- : धर्माचे आधुनिकीकरण
३८ दादोबा पांडुरंग तर्खडकर १८१४-१८८२: पहिले मराठी व्याकरणकार
३९ बळवंत पांडुरंग किर्लोस्कर १८४३-१८८५: पहिले मराठी उद्योजक
४० स्टुडंटस् लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी १८४८-- : ज्ञानप्रसारक सभा
४१ गोविंद विठ्ठल महाजन १८१५-१८९०: पत्रकारिता
४२ मेजर सोमनाथ शर्मा ३-११-१९४७ वीरगती: पहिले परमवीरचक्र
४३ दादाभाई नवरोजी १८२५-१९२७:पहिले प्राध्यापक, इंग्लंडमध्ये भारताचे पहिले वकील
४४ ज्योतिबा गोविंदराव फुले १८२७-१८९०: पहिले स्रीशिक्षण पुरस्कर्ते
४५ चंद्रशेखर व्यंकट रामन १८८८-१९७०: पहिले नोबल पारितोषिक विजेते भारतीय
४६ विष्णुबुवा ब्राम्हचारी १८२५-१८७१: नामवंत विचारवंत
४७ उज्वला पाटील-धर १९५५-- : शिडाच्या जहाजांतून पहिल्यांदा प्रुथ्वी प्रदक्षिणा
४८ फिरोजशहा मेहता १८४५-१९१५ मुंबईचे शिल्पकार
४९ विष्णु दिगंबर पलुस्कर १८७२-१९३०: पहिले संगीत शिक्षण प्रसारक
५० लेफ्टनंट रामा राघोबा राणे : ११ एप्रिल १८४८ वीरगती: पहिले मराठी परमवीर चक्र विजेते
५१ रविंद्रनाथ टागोर १८६१-१९४१: पहिले साहित्याचे नोबल पारितोषिक विजेते भारतीय
५२ भाऊराव पायगोंडा पाटील १८८७-१९५९: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
५३ भगिनी निवेदिता १८६७-१९११:भारतीय संस्कृतीचा यशस्वी पाठपुरावा
५४ अँनी बेझंट १८४७-१९३३: थियाँसाँफिकल सोसायटीच्या संस्थापक, बनारस हिंदु विद्यापीठाची मूहूर्तमेढ
५५ ई. श्रीधरन १९३२-- : कोकण रेल्वेचे शिल्पकार
५६ ताराबाई मोडक १८९२-१९७३: माँटेसरी बालशिक्षण प्रसारक पहिल्या महिला
५७ जमशेदजी जिजीभाँय १७८३-१८५९: JJ आर्कीटेक्चरल काँलेज व हाँस्पिटल
५८ विष्णुशास्री चिपळूणकर १८५०-१८८२: निबंधमालाकार आणि शिक्षण प्रसारक
५९ नारायण महादेव परमानंद १८३८-१८९३: थोर समाज सुधारक
६० स्वामी दयानंद सरस्वती १८२४-१८८३: आर्य समाज संस्थापक
६१ अनंत वामन बर्वे १८६६-१९२३: मराठी नाट्यसंमेलन संकल्पना
६२ डॉ इंदिरा हिंदुजा १९४४-- : भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबी निर्मितीच्या डॉक्टर
६३ चिंतामणराव वैद्य १८६१-१९३८: वेदान्ती तत्त्वज्ञानी
६४ विठ्ठल रामजी शिंदे १८७३-१९४४: समाजसुधारक
६५ डॉ शांतीस्वरुप भटनागर १८९४-१९५५: CSIR ची स्थापना करणारे संशोधक
६६ वामन शिवराम आपटे १८५६-१८९२: साहित्यिक
६७ रुपाळी रेपाळे १९८२-- : इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला
६८ डेव्हीड ससून १७९२-१८६४: यशस्वी उद्योजक
६९ डॉ प्रशांतचंद्र महालनोविस १८९३-१९७२: संख्याशास्त्रज्ञ, पंचवार्षिक योजनांचे आधारस्तंभ
७० डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या १८६१-१९६२: क्रुष्णासागर धरण आदि महत्वाचे प्रकल्प पूर्ण करणारे कीर्तीवंत इंजिनिअर
७१ दादासाहेब फाळके पहिला भारतीय चित्रपट निर्माते-१९१३
७२ बाबूराव पेंटर १८९०-१९५४: चित्रकार व चित्रपट निर्माते
७३ गोपाळ क्रुष्ण गोखले १८६६-१९१५: नेमस्त राष्ट्रीय नेते, भारत सेवक समाज संस्थापक
७४ गोपाळ गणेश आगरकर १८५६-१८९५: समाज सुधारक, फर्ग्युसन काँलेजचे प्राचार्य
७५ किरण बेदी १९४०-- : पहिली महिला पोलीस उच्चाधिकारी
७६ जे आर डी टाटा १९०४-१९९३: टाटा उद्योगाचे चेअरमन, पहिली भारतीय विमानसेवा संस्थापक व वैमानिक
७७ यदुनाथ सरकार १८७०-१९५८: कीर्तीमंत इतिहासकार संशोधक
७८ प्रेमचंद रायचंद १८३१-१९०६: राजाबाई टाँवरचे निर्माते
७९ मदर टेरेसा १९१०-१९९६: शांततेचे नोबल पारितोषिक विजेती संत, समाजसेविका
८० नेल्ली सेनगुप्ता १८८६-१९७३: काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष
(चुकभूल द्यावी, घ्यावी)
सर्वसामान्याच्या जीवनाला कलाटणी देणारे, सहसा ज्या वाटेवरून मार्गक्रमणा करणार नाहीत, असे रस्ते शोधून आपले ईप्सित ध्येय साधणार्या ह्या दिग्गजांना लाख लाख सलाम.
हा माझा प्रयत्न मनोरंजक व वाचकांच्या जाणीवा विस्तारणारा वाटेल, अशी आशा आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू