"नियतीचा संकेत-२":
सर्वात भाग्यवान कोण?":
प्रत्येकाचे जीवन चक्र वेगळे असते किंवा सुरुवात केव्हा अंत केव्हा व कसा याची कल्पना आपल्याला नसते. हा जणू एका गाडीचा प्रवास आहे आणि तो प्रवास नऊ ग्रहांच्या महादशा पार करत आपण करत असतो. अर्थात सहसा कोणालाच या नऊच्या नऊ महादशा जीवनात येतातच असे नाही. त्यापैकी अनिष्ट ग्रहांच्या महादशा तुम्हाला अनिष्ट फळे देतात. शनि मंगळ राहू केतू हे अनिष्ट ग्रह मानले आहेत. बुध शुक्र गुरू यांच्या महादशा त्यामानाने चांगली फळे देतात. रवीची महादशा तो कोणत्या स्थानाचा अधिपती आहे त्यावरून तिचा दर्जा कळू शकतो.
पत्रिकेमध्ये ६, ८, १२ ही अनिष्ट स्थाने.
सहावे म्हणजे रोग स्थान, शत्रू स्थान आठवे स्थान म्हणजे मृत्यू स्थान किंवा एखाद्या गोष्टीचा अंत होणे, बारावे व्ययस्थान अशी ही तीन अनिष्ट स्थाने आहेत. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा येत असतात. प्रत्येक स्थानाचे एक विशिष्ट फळ असते. ६, ८, १२ या स्थानांचे मालक त्यांच्या महादशा ज्या मंडळींच्या पत्रिकेत सर्वात कमी येतील, ते जास्त भाग्यवान. याउलट ज्यांच्या आयुष्यात या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा जास्त येतील ते त्यामानाने तेवढे नशीबवान नाहीत.
ही कल्पना या लेखात मांडली आहे. तुमचे जन्मलग्न कोणते आहे, त्यावरून अर्थातच सहा आठ बारा स्थाने कोणत्या ग्रहांच्या राशींची, येऊ शकतील, ते ग्रह शुभ की अशुभ असतील, ते समजेल. त्यादृष्टीने एकूण बारा जन्म लग्नाचा नशिबाचा क्रम ही संकल्पना या लेखात मांडली आहे.
आपले जन्मलग्न कोणते आहे, ते पाहून तुम्ही आपल्या नशिबाची परीक्षा त्या दृष्टीने पाहू शकता. एकंदर आयुष्याची गोळाबेरीज हे अर्थातच एवढ्याच एका गोष्टीवर अवलंबून असणार नाही, तर एकूण पत्रिकेतले ग्रहयोग यांचाही विचार करावा लागेल. मात्र महादशा मूलभूत धरून आपल्या पत्रिकेप्रमाणे आपल्या नशिबाचा दर्जा कसा असू शकेल ते, या उपयुक्त लेखावरून समजेल.
तुमची उत्सुकता न ताणता, ह्या अभ्यासाचा निकालच आधी येथे देतो.
जन्मलग्नांची भाग्याची क्रमवारी अशी आहे:
१ कन्या २ धनु ३ मेष ४ मकर ५ व्रुषभ
६ सिंह, व्रुश्चिक व मीन
७ मिथून व कुंभ
८ कर्क ९ तुळा
ती कशी ते पुढे विस्ताराने मांडले आहे.
राशी/ १२ स्थानराशी /६ स्थानराशी/८ स्थानराशी/
एकूण वर्षे/नशिबाचा क्रमांक
अशा क्रमाने प्रत्येक लग्न राशीच्या पुढील आकडे वाचावेत:
१ मेष १२/६/ ८/४०/४ अशातर्हेने...
२ वृषभ १ ७ ९ ४३ ५
३ मिथुन २ ८ १० ४६ ७
४ कर्क ३/ ९ /११/ ५२ /८
५ सिंह ४ १० १२ ४५ ६
६ कन्या ५ ११ १ ३२ १
७ तूळ ६ १२ २ ५३ ९
८ वृश्चिक ७ १ ३ ४४ ५
९ धनु ८/ २/ ४/ ३७ /२
१० मकर ९ ३ ५ ३९ ३
११ कुंभ १० ४ ६ ४६ ७
१२ मीन ११ /५ /७/ ४५ /६
नमुना विश्लेषण:
मेष लग्न असेल तर..
बारावे स्थान गुरुचे मीन रास/सहावे स्थान कन्या रास बुधाचे/ आणि आठवे स्थान मंगळाचे वृश्चिक रास- म्हणून त्रासदायक वर्षे महादशा स्थानांच्या अनिष्टतेमुळे अशी सोळा वर्षे गुरुची महादशा +सतरा वर्षे बुधाची महादशा + सात वर्षे मंगळाची महादशा
एकूण जास्तीत जास्त ४० वर्षे.
अजून एक उदाहरण:
कुंभ लग्न
बारावे स्थान शनीच्या मकर राशीचे/सहावे स्थान कर्क चंद्राची रास/आणि आठवे स्थान बुधाच्या कन्या राशीचे असेल.
म्हणून शनीच्या महादशेची १९वर्षे + चंद्राच्या कर्क राशीसाठी १० वर्षे + बुधाच्या महालशेची १७ वर्षे.
एकूण जास्तीत जास्त ४६ वर्षे.
प्रत्येक जन्मा लग्नाला वेगवेगळी त्रासदायक वर्षे येणार आणि त्यामुळे प्रत्येक राशीचे नशीब हे वेगळे असणार. त्यामध्ये कन्या लग्न हे सगळ्यात नशिबवान म्हणायला हवे, कारण त्यांच्या आयुष्यात पापस्थानांच्या महादशा एकूण जास्तीत जास्त बत्तीस वर्षे येतील. तर सगळ्यात त्रासदायक नशीब तुळा लग्नाचे, जिला 53 वर्षांचा कठीण काळ असू शकणार.
ह्या प्रमाणे अभ्यास आणि संशोधन करून सर्वसाधारण जन्म लग्नावरून नशिबाची परीक्षा कशी करता येईल ते समजेल. अर्थातच सर्वसाधारण पत्रिके मधील इतर ग्रहयोग यांचा अभ्यास करून संपूर्ण आयुष्याचे भवितव्य हे अधिक सखोलपणे मांडता येईल.
ज्योतिष संशोधनाला गणिताच्या साह्याने एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये, मी केला आहे. तो तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरू शकेल, अशी आशा आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वैविध्यपूर्ण व अनेक विषयांचा उहापोह करणारे शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....आपल्या संग्रही ठेवा....
http//moonsungrandson.blogspot.com
आणि
आपल्या whatsapp grps
वर शेअरही करा...।।....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा