"नियतीचा संकेत-३":
सर्वात नशिबवान कोण?":
प्रत्येकाचे जीवन चक्र वेगळे असते किंवा सुरुवात केव्हा अंत केव्हा व कसा याची कल्पना आपल्याला नसते. हा जणू एका गाडीचा प्रवास आहे आणि तो प्रवास नऊ ग्रहांच्या महादशा पार करत आपण करत असतो. अर्थात्
सहसा कोणालाच या नऊच्या नऊ महादशा जीवनात अनुभवता येतातच असे नाही. त्यापैकी अनिष्ट ग्रहांच्या महादशा, तुम्हाला अनिष्ट फळे देतात. शनि, मंगळ राहू व केतू हे अनिष्ट ग्रह मानले आहेत. बुध, शुक्र व गुरू यांच्या महादशा त्यामानाने चांगली फळे देतात. रवीची महादशा तो कोणत्या स्थानाचा अधिपती आहे, त्यावरून तिचा दर्जा कळू शकतो.
पत्रिकेमध्ये ६, ८, १२ ही अनिष्ट स्थाने.
तुमचे जन्मलग्न कोणते आहे, त्यावरून अर्थातच सहा आठ बारा स्थाने कोणत्या ग्रहांच्या राशींची, येऊ शकतील, ते ग्रह शुभ की अशुभ असतील, ते समजेल. त्यादृष्टीने एकूण बारा जन्म लग्नाचा नशिबाचा क्रम ही संकल्पना या आधीच्या लेखात मांडली होती. भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे
आता हा एक वेगळी दिशा दाखवणारा लेख मुद्दामून संशोधन करून लिहिला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा येत असतात.
पत्रिकेमध्ये तीन, पाच, नऊ आणि अकरा ही त्रिकोण स्थाने, अत्यंत महत्त्वाची आणि जीवनाला यशाकडे नेणारे समृद्धीकडे व प्रगतीकडे नेणारी असतात. या स्थानांच्या महादशा प्रत्येक जन्मलग्नाला किती वर्ष येतात, याचे गणित करून सगळ्यात जास्त वर्ष ज्या लग्नाला मिळू शकतील, तो सगळ्यात नशीबवान असं म्हणता येईल. तेव्हा गणित करून सगळ्यात नशीबवान लग्नरास कोणती आणि सगळ्यातला तळाची लग्नरास कोणती हे या लेखात मांडले आहे.
त्याचे उत्तर आत्ताच सुरुवातीला देऊन तुमची उत्सुकता ताणत नाही. सर्वात नशीबवान जन्मलग्ने, व्रुषभ व व्रुश्चिक ही आहेत, तर सगळ्यात काळाला जन्मलग्ने मिथून व धनु ही आहेत.
आपले जन्मलग्न कोणते आहे, ते पाहून तुम्ही आपल्या नशिबाची परीक्षा त्या दृष्टीने पाहू शकता. एकंदर आयुष्याची गोळाबेरीज हे अर्थातच एवढ्याच एका गोष्टीवर अवलंबून असणार नाही, तर एकूण पत्रिकेतले ग्रहयोग यांचाही विचार करावा लागेल. मात्र महादशा मूलभूत धरून आपल्या पत्रिकेप्रमाणे आपल्या नशिबाचा दर्जा कसा असू शकेल ते एका अजून भिन्न द्रुष्टीने, या उपयुक्त लेखावरून समजेल.
ती कशी ते पुढे विस्ताराने मांडले आहे. क्रम असा पहा:
राशी/ ३वे स्थानराशी /५वे स्थानराशी/९वे स्थानराशी/११वे स्थानराशी/एकूण वर्षे/नशिबाचा क्रमांक
अशा क्रमाने प्रत्येक लग्न राशीच्या पुढील आकडे वाचावेत:
१ मेष ३/५/ ९/११/५८/ ३/अशातर्हेने...
२ वृषभ ४/ ६ /१०/१२/६२/१/
३ मिथुन ५/७/११/ १/ ५२/५/
४ कर्क ६/ ८ /१२/ २/६०/२/
५ सिंह ७/ ९/ १/ ३/ ६० /२/
६ कन्या ८/१०/ २/ ४/५६/४/
७ तूळ ९ / ११/ ३/५ /५८/३/
८ वृश्चिक १०/ १२/ ४/६ /६२ /१/
९ धनु ११/ १/ ५/ ७ / ५२ /५/
१० मकर १२/ २/ ६/८ / ६०/२/
११ कुंभ १/ ३/ ७/९ /६०/२/
१२ मीन २ /४ / ८/ १०/ ५६/४/
नमुना विश्लेषण:
मेष लग्न असेल तर..
तिसरे स्थान बुधाचे मिथून रास/पाचवे स्थान रविचे सिंह रास /नववे स्थान गुरुचे धनु रास/ अकरावे स्थान शनीचेचे कुंभ रास- म्हणून शुभफलदायी वर्षे महादशा वरील स्थानांच्या अशा:
१७ + ६ + १६ +१९ एकूण जास्तीत जास्त ५८
अजून एक उदाहरण:
कुंभ लग्न
तिसरे स्थान मेष मंगळ राशीचे/ पाचवे स्थान बुधाची मिथून रास/नववे स्थान शुक्राच्या तुळ राशीचे/ अकरावे स्थान गुरूच्या धनु राशीचे असेल.
म्हणून मंगळाच्या महादशेची ७ वर्षे + १७ बुधाची +२० शुक्राच्या राशीसाठी +गुरुच्या १६वर्षे महादशेची: एकूण जास्तीत जास्त ६० वर्षे.
प्रत्येक जन्मा लग्नाला वेगवेगळी शुभफलदायी वर्षे येणार आणि त्यामुळे प्रत्येक राशीचे नशीब हे वेगळे असणार. त्यामध्ये व्रुषभ लग्न व व्रुश्चिक लग्न ही ६२ वर्षगुण मिळाल्याने सगळ्यात नशिबवान म्हणायला हवीत, मात्र एक महत्वाची बाब अशी की, त्या व्यक्तींचा जन्म कोणत्या राशी नक्षत्री व चरणावर झाला, त्यावरुन जन्मानंतर
त्यांना कोणत्या ग्रहाची किती काळ महादशा उपभोगणे सुरु करेल त्यावर ह्या शुभस्थानराशींच्या ग्रहांच्या किती येतील व किती येणे अशक्य ठरेल ते समजेल. सगळ्यात कमी शुभमहादशाकाळ मिथून व धनु लग्नाला येतो असे हा अभ्यास दर्शवितो. बाकी बहुतेक राशींना ६० वा त्याच्याच जवळपास शुभफल वर्षे
मिळू शकतात असे दिसते.
ह्या प्रमाणे अभ्यास आणि संशोधन करून सर्वसाधारण जन्म लग्नावरून नशिबाची परीक्षा कशी करता येईल ते समजेल. अर्थातच सर्वसाधारण पत्रिकेमधील इतर ग्रहयोग यांचा अभ्यास करून संपूर्ण आयुष्याचे भवितव्य हे अधिक सखोलपणे मांडता येईल.
ज्योतिष संशोधनाला गणिताच्या साह्याने अजून एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये, मी केला आहे. तो तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरू शकेल, अशी आशा आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वैविध्यपूर्ण व अनेक विषयांचा उहापोह करणारे शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....आपल्या संग्रही ठेवा....
http//moonsungrandson.blogspot.com
आणि
आपल्या whatsapp grps
वर शेअरही करा.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा