"सोशल मिडीया":
"प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा!":
फेसबुक, whatsapp अशी माध्यमे, माणसांतील अंगभूत कल्पनाशक्तीला वाव देत लेखनकौशल्य सुधारण्यासाठी आहेत, असे मी सुरवातीपासून मानत आलो आहे. माझ्याप्रमाणेच, त्यांचा उपयोग अनेकजण आपल्या लेखनगुणांत उत्तरोत्तर उत्तम सुधारणा होण्यासाठीच करताना दिसतात.
माझ्यापुरते बोलायचे झाले## तर मी देखील स्वनिर्मित संदेशच शक्यतो तेथे प्रदर्शित करत आलो आहे. तीच विचारधारा उत्तरोत्तर विकसित होत माझा स्वतः चा ब्लॉग, अनेक डिजिटल विशेष अंक, माझ्या विडीओ चँनेलवर विडीओज् आणि ह्या वर्षीच्या गुढीपाडव्यापासून माहितीपूर्ण मार्गदर्शक ध्वनीफिती आणि आँनलाईन Self Motivational Development Platform अशी प्रगती गेल्या चार वर्षांत मी करू शकलो आहे. ते मी सोशल मिडीया, म्हणजे
प्रतिभाशक्तीची व्यायामशाळाच आहे असे मानत आल्या मुळेच.
अचानक सहज कल्पना आली की, सोशल मिडीयावर जे विचारगर्भ व कल्पकतेचा आविष्कार असलेले व संवेदनशील व्यक्तींना अंतर्मुख करणारे, संदेश असतात त्यातील निवडक संग्रहीत करत जावेत. ते ज्यांचे ज्यांचे आहेत, त्यांचे मी प्रथम अभिनंदन करतो व हा सिलसिला त्यांनी असाच सुरू ठेवावा म्हणून त्या सर्वांना शुभेच्छा देतो.
ती निवडक कल्पक विचारपुष्पे अशी आहेत:
# *सगळेच खेळ प्रकृतीसाठी चांगले असतील असे नाही. खासकरून मनाचे खेळ प्रकृतीला अपायच करतात...!*
*त्याहीपुढे जाऊन जर एखाद्याच्या आयुष्याचाच खेळ झाला असेल तर त्याच्या निव्वळ प्रकृतीचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो...!
# "गतम् न शोच्यम्"!:
मागे वळून पहा आणि त्याच त्या चुका पुन्हा न करता, आपल्यात सुधारणा करत नेहमी
पुढे पहा, पुढे जात रहा.
# स्वतःच्या सुखाचं कारण स्वतःला बनता आलं की त्या सुखाचे मालक देखील सर्वस्वी आपणच होतो...!*
# स्वप्न बघणं ही आयुष्यात काही मिळवण्यासाठी करावी लागणारी पहिली गुंतवणूक आहे...!*
# *जेव्हा तुम्ही इतरांना दोष देता तेव्हा खरं पाहता तुम्ही स्वतःला बदलण्याचे सामर्थ्य आणि संधी गमावता...!
# *यशस्वी व्हायचं असेल तर,*
*सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!*
*जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
*तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.....!!!*
# *चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर*
*बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते*
*त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माणकरण्याची देखील धमक असते.*
*एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते...*
# भूतकाळ जास्त काळ घासला की त्याचे ओरखडे मात्र वर्तमानकाळावरच पडतात...!*
# आपुलकीच्या नात्याला कधी*
*दुरावा माहित नसतो,*
*कारण---*
*कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील*
*मनाचा संपर्क असतो.*
# *आनंदावर जसं विरजण घालायला जमतं तसं आनंदाला फोडणी द्यायलाही जमलं पाहिजे. आयुष्यात शेवटी बॅलन्स महत्वाचा...!*
# *पुढे काय लिहून ठेवलंय हे पुढे गेल्याशिवाय कळत नाही. कधी कधी पुढे काहीच लिहिलेलं नसतं. अशावेळी मग जो धीर करून पुढे गेलेला असतो तोच कुठलातरी नवा इतिहास लिहून आणखी पुढे निघून जातो...!*
# *स्वप्न बघणं आणि स्वप्न पडणं यात मोठं अंतर आहे..!*
*स्वप्न बघणारे आयुष्यात जास्त पुढे जातात..!*
# *ज्या गोष्टी धरून ठेवल्यावर त्रास होतो; त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात.*
*"सुखी" राहण्याचा मार्ग एवढा सोपा आहे.*
# *पावसाशी मैत्री केल्यावर भिजण्याची, आगीशी मैत्री केल्यावर भाजण्याची आणि आयुष्याशी मैत्री केल्यावर जगण्याची तयारी ठेवावीच लागते...!*
# *जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ....*
*कारण तुम्ही अशा जगामध्ये राहता,.जिथे 'तेल आणि वात' जळते...*
*पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..*
# *चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देतं...!*
*काही माणसं अशीच भली असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ते समोरच्याचं चांगलंच चिंतितात...!*
# "खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
# *पुस्तकी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणारे अनेक असतील...!*
*पण*
*आयुष्याचं गणित पूर्णपणे सुटलेला अजून कुणीच नाही...!*
# *नशीबाकडून जितकी मोठी अपेक्षा कराल तितका मोठा अपेक्षाभंग होईल...!*
*मात्र*
*कर्म आणि कर्तृत्वावर जोर दयाल तर तुम्हाला नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल...!*
# *तुमची खरी लढाई ही केवळ तुमच्याशीच असते. जर तुम्ही स्वतःला कालच्या पेक्षा आज अधिक चांगले बदल झालेले मानता तर हा तुमचा सर्वात मोठा विजय आहे...!*
.................
.......... ..................
ही विचार गंगा अशीच अव्याहत वहात राहू दे आणि आम्हाला बदलत्या जगाकडे अधिक सजगपणे पहायची द्रुष्टी देत, येणाऱ्या आव्हानांचा समर्थपणे सामना करावयाची ताकद देऊ दे.....
धन्यवाद
संग्राहक,
सुधाकर नातू
ता.क.
## माझा ब्लॉग असून त्यावर असेच शंभराहून अधिक विविध विषयांवरील लेख आपण जरुर वाचा.
For that
Please Open this link
and share it too in your whatsapp grp:
http//moonsungrandson.blogspot.com
शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनलची लिंक आहे:
https://www.youtube.com/user/SDNatu
सदर लिंक उघडून चाळीसहूनही अधिक उपयुक्त विडीओज् जरुर पहावेत. अभिप्राय कळवावा.
धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा