शनिवार, ३० मे, २०२०

"आजोबांचा बटवा-६": "हे प्रणयगंध किती अनंत-१:


"आजोबांचा बटवा-६":
"हे प्रणयगंध किती अनंत-१"

विश्वाच्या संक्रमणातून मानव उत्पन्न झाल्यानंतर, शरीराबरोबर त्याला देण्यात आलेले तरल मन हा त्या विश्वंभराच्या सामर्थ्याचा परमोच्च बिंदू होय. स्त्री-पुरुषांच्या मनाच्या अनंत संवेदनांपासून चित्रविचित्र प्रणयगंध फुलत राहिले. संस्कृतीच्या विकासातून निर्माण झालेल्या विवाह रूढीने या प्रणयगंधांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला, इतके हे पाश अतिविशाल आणि गूढ रम्य आहेत. त्यांना स्थळ-काळ, वय, जात-पात नातीगोती कशाकशाचे म्हणून बंधन मान्य नाही.
दोन व्यक्ती एकमेकांना कां आणि कधी आवडाव्यात कराव्यात, हा एक अनाकलनीय प्रश्न आहे.

मनाच्या गाभार्‍यात त्यामुळे अनेक कल्लोळ जन्मतात. जितक्या व्यक्ती, तितक्या मनोहारी त्यांच्या अभिव्यक्ती. दोन व्यक्ती एकमेकांना कां कधी आवडाव्यात याला उत्तर नाही. कुणाला एखादीचे हास्य मोहित करते, तर कुणाचे बालिश डोळे, एखादीचा ठाव घेतात, कुणाचा भोळाभाबडा स्वभाव एखादीला आवडतो, तर एखादीच्या अनुकंप अवस्थेतून सहानुभूती मधून प्रणय भावना फुलत जाते. किती किती म्हणून हे प्रणयगंध आठवायचे ! शोभादर्शकासारख्या बदलत्या रंगसंगतीचे ही काही चित्तथरारक शब्दचित्रे:

"जगावेगळे, हे सगळे!":

नशिबाच्या फरफटीचे खरोखर मला आश्चर्यच वाटते. पुरुषाचे सुख नशिबात पुढे कधी नसावे की काय अशाच माझ्या संसाराच्या पाऊलखुणा आहेत. खूप विचित्र अशी ही जीवन कहाणी आहे.

माझे पहिले लग्न झाले, नीट बघून चिकित्सकपणे निवड करून. दुर्दैवाने लवकरच लक्षात आले की, आपला नवरा आहे षंढ ! स्त्री शरीराविषयी कुठली म्हणून आसक्तीच त्याला नाही. म्हणून उमलू पाहणारी एक कळी फुलायच्या, आतच कोमेजू लागली. सरळ घटस्पोट घेण्याशिवाय मला पर्याय नव्हता आणि त्याप्रमाणे मी तो घेतला. नंतर एक नोकरी धरणे आणि काही वर्षे गेली नको नको वाटत असताना, मी दुसऱ्या लग्नाच्या फंदात पडले. अनिलचा पण माझा परिचय बस स्टॉपवर झाला. तोही घटस्फोटित होता. त्याला घाई नव्हती अन पेन्शनर वडिलांबरोबर तो रहात होता.

अनिलने मला मागणी घातली अन् मी सौभाग्याची लेणी चढवून या घरात आले. पण हाय ! लग्नाच्या पहिल्या रात्रीची गोष्ट. आम्ही आमच्या खोलीत आलो, अनिलने दूध घेतले अन् कोपऱ्यातील स्टुलावर ग्लास ठेवायला तो गेला आणि अचानक एकदम किंचाळलाच. मी चमकले, वर भिंतीवर एक पाल होती, खूप मोठी पाल होती. तिला हा पुरुषासारखा पुरुष घाबरला होता. थरथर कापत स्वयंपाकघरात जो गेला, तो पुन्हा यायचे नाव नाही. ती पाल माझ्याकडे बघून जणू चुकचुकत होती.

ते किंचाळणे ऐकून आमच्या खोलीत माझे सासरे आले तात्यासाहेब. मी पालीकडे बोट दाखवले त्यांनी कोपर्‍यातली काठी उचलली, धाडकन जो फटका मारला पालीवर, ती खल्लास. त्यानंतर तिची शेपटी हाताने उचलून गॅलरीतून तिला बाहेर फेकणारे, साठी उलटूनही तगडे असलेले तात्या कुठे आणि हा माझा भित्रट नवरा अनिल कुठे? या पहिल्याच रात्री काही वेगळे अनुबंध माझ्या मनात तात्यासाहेबांविषयी निर्माण करून गेले.

आमचा संसार सुरू झाला. एक मुलगीही झाली. पण पदोपदी माझ्या लक्षात यायचे, अनिल एक खुळचट भित्रा कसलीही धमक नसलेला माणूस आहे. मनाने आणि शरीराने खुलावे असे त्याच्या संसारात सहवासात मला कधी वाटलेच नाही. साध्या साध्या गोष्टीत तात्यांची धडाडी प्रकर्षाने दिसायची. एकदा चोरांचा सुळसुळाट झाला असताना आमच्या वाडीत रात्री प्रत्येकावर गस्त ठेवायची पाळी असायची. राखण करायची रात्री ११ ते पहाटे ४ अशी प्रत्येकाची गस्त घालायची ड्युटी होती. कॉलनीतले साधारण आठ-दहा पुरुष गस्त घालायचे या दोन-तीन महिन्यांच्या भीतीदायक काळात. तेव्हाची अनिलची तारांबळ मला बघवत नसे.

आमच्या घराची पाळी आली की, तो मुद्दाम आजारी पडायचा. तात्या मात्र स्वतः इतर तरुणाबरोबर गस्त घालायला जायचे. त्यांच्या धडाडीने अखेर चोरांच्या टोळीला पकडण्यात यश आले होते. असे किती प्रसंग आठवायचे आणि हाय, दुर्दैवाने आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच अनिल एका मोटर अपघातात अचानक मरण पावला.

मी पूर्ण उन्मळून गेले. माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले, काय करावे काही सुचेना. ती बातमी आल्यावर कानावर अशा वेळेला तात्यासाहेब पुढे सरसावले. सारे सोपस्कार धीरोदात्तपणे करून सारे पुढचे निस्तरले ते त्यांनीच. आता एक मोठी विचित्र अशी पोकळी घरामध्ये निर्माण झाली होती. मला सावरायला तात्यांनी मदत केली. हा माणूस बायकोशिवाय स्वतःचे तारुण्य जाळून ज्याच्या करता बसला होता, तो एकुलता एक मुलगा, अनिल मरण पावला होता. परंतु हा माणूस तरीही डगमगला नव्हता.

काही दिवस गेले आणि आता त्यांचा जीवनक्रम नियमितपणे पहाटे उठणे फिरायला जाणे, नंतर 11 ते चार एका पेढीवर हिशोब लिहायला जाणे असे चालू होते. पुन्हा नोकरीवर जायला मला त्यांनीच परावृत्त केले. छोट्या मुलीला-त्यांच्या नातीला, पाळणाघरात ठेवायला लागू नये, म्हणून ते घरीच राहून त्या पिढीचे हिशोबाचे काम पाहू लागले. मला घरकामात मदत करता येईल तेवढे करायचे. काहीसा रापलेला असला तरी चेहरा करारी, भरदार छाती बलदंड बाहू तितकेच खंबीर मनाचे तात्या माझ्या मनावर कुठलीतरी मोहिनी घालत होते, हेच खरे.

सारा कारभार आता विचित्र होत जाणार होता. हळू मी पुन्हा सावरले. नोकरीवर जाऊ लागले. अजूनही तिशीतच तर होते. त्यामुळे माझे मन व शरीर अजूनही उमलत होते. माझ्यासारख्या, एकाकी तरूण स्त्रीच्या मागे विखारी नजरेने काही जण येऊ लागले. काय करावे मला काहीच सुचेना.

एकदा मी बस स्टॉपवर मी उभी असताना काही मवाली नेहमीप्रमाणे माझी चेष्टा करू लागले, छेड काढू लागले. मात्र तोच तात्या कुठूनसे एखाद्या चित्त्यासारखे धावत आले आणि त्यांनी त्यातील एकाला धरून अक्षरशः चोपला. हा अनपेक्षित हल्ला पाहून बाकीचे पळाले. पुन्हा कधीही हिच्या वाटेला जाल, तर माझ्याशी गाठ आहे याद राखा, अशी तंबी त्यांनी दिली. मला एक वेगळाच रुपगंध जाणवला त्यांच्या त्या रुपात.

आम्ही घरी आलो. तात्यांच्या कुशीत जाऊन जेव्हा मी मनसोक्तपणे रडले तेव्हाच शांत झाले.
त्यांनी हळुवारपणे माझ्या केसांवरून हात फिरवला तो स्पर्श माझ्या शरीरात उरी एक नवे चैतन्य निर्माण करून गेला. माझ्याहून तीस वर्षांनी मोठा असलेला माझ्या स्त्रीत्वाची खरीखुरी कदर करणारा हा माणूस, एक विचित्र भावबंध माझ्या मनात निर्माण करून गेला.

नाते, वय यांची कुंपणे तोडणारा एक नवाच झंझावात सुरू झाला होता. इतका जवळ असूनही, इतके दिवस दूर असणारा एक पुरुष माझ्या हृदयात घर करून बसला. पण समाजाच्या दृष्टीने आम्हाला दोन जीवांचे मिलन अशक्य होते. माझ्या नशिबाची फरफट किती विचित्र म्हणते, ते ह्यामुळेच. त्या क्षणापासून आम्ही दोघेही तळमळत आहोत, तडफडत आहोत. एका अनाहूत भीती पोटी, हा अनोखा कुठल्या रंगाचा प्रणयगंध?
ह्याची अखेर काय होणार कोण जाणे !

सुधाकर नातू
# रोहिणी मासिक, जून १९८३
मधील माझी कथा.

ता.क.
"शोधा म्हणजे सापडेल, विचार करा, सुचेल":

जगप्रसिध्द मँनेजमेंट गुरुंच्या अनुभवी मार्गदर्शनाचे सार मांडणारे अभ्यासपूर्ण लेख असणारे 'Management Musings' व सोप्या भाषेत घरच्या घरी ज्योतिष शिकण्यासाठी 'नियतीचा संकेत' हे दोन खास डिजिटल अंक मी माझ्या ७६ व्या वाढदिवशी १६जून रोजी प्रकाशित केले आहेत.

ते ज्या इच्छूक वाचकांना हवे असतील त्यांना विनामूल्य पाठवले जातील. 9820632655 ह्या नं. वर आपले नांव, गांव देऊन, होकार whatsapp ने कळवावा.

गुरुवार, २८ मे, २०२०

""सोशल मिडीया": "प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा!":


"सोशल मिडीया":
"प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा!":

फेसबुक, whatsapp अशी माध्यमे, माणसांतील अंगभूत कल्पनाशक्तीला वाव देत लेखनकौशल्य सुधारण्यासाठी आहेत, असे मी सुरवातीपासून मानत आलो आहे. माझ्याप्रमाणेच, त्यांचा उपयोग अनेकजण आपल्या लेखनगुणांत उत्तरोत्तर उत्तम सुधारणा होण्यासाठीच करताना दिसतात.

माझ्यापुरते बोलायचे झाले## तर मी देखील स्वनिर्मित संदेशच शक्यतो तेथे प्रदर्शित करत आलो आहे. तीच विचारधारा उत्तरोत्तर विकसित होत माझा स्वतः चा ब्लॉग, अनेक डिजिटल विशेष अंक, माझ्या विडीओ चँनेलवर विडीओज् आणि ह्या वर्षीच्या गुढीपाडव्यापासून माहितीपूर्ण मार्गदर्शक ध्वनीफिती आणि आँनलाईन Self Motivational Development Platform अशी प्रगती गेल्या चार वर्षांत मी करू शकलो आहे. ते मी सोशल मिडीया, म्हणजे
प्रतिभाशक्तीची व्यायामशाळाच आहे असे मानत आल्या मुळेच.

अचानक सहज कल्पना आली की, सोशल मिडीयावर जे विचारगर्भ व कल्पकतेचा आविष्कार असलेले व संवेदनशील व्यक्तींना अंतर्मुख करणारे, संदेश असतात त्यातील निवडक संग्रहीत करत जावेत. ते ज्यांचे ज्यांचे आहेत, त्यांचे मी प्रथम अभिनंदन करतो व हा सिलसिला त्यांनी असाच सुरू ठेवावा म्हणून त्या सर्वांना शुभेच्छा देतो.

ती निवडक कल्पक विचारपुष्पे अशी आहेत:

# *सगळेच खेळ प्रकृतीसाठी चांगले असतील असे नाही. खासकरून मनाचे खेळ प्रकृतीला अपायच करतात...!*
*त्याहीपुढे जाऊन जर एखाद्याच्या आयुष्याचाच खेळ झाला असेल तर त्याच्या निव्वळ प्रकृतीचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो...!

# "गतम् न शोच्यम्"!:
मागे वळून पहा आणि त्याच त्या चुका पुन्हा न करता, आपल्यात सुधारणा करत नेहमी
पुढे पहा, पुढे जात रहा.

# स्वतःच्या सुखाचं कारण स्वतःला बनता आलं की त्या सुखाचे मालक देखील सर्वस्वी आपणच होतो...!*

# स्वप्न बघणं ही आयुष्यात काही मिळवण्यासाठी करावी लागणारी पहिली गुंतवणूक आहे...!*

# *जेव्हा तुम्ही इतरांना दोष देता तेव्हा खरं पाहता तुम्ही स्वतःला बदलण्याचे सामर्थ्य आणि संधी गमावता...!

# *यशस्वी व्हायचं असेल तर,*
*सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!*
*जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
*तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.....!!!*

# *चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर*
*बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते*
*त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माणकरण्याची देखील धमक असते.*
*एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते...*

# भूतकाळ जास्त काळ घासला की त्याचे ओरखडे मात्र वर्तमानकाळावरच पडतात...!*

# आपुलकीच्या नात्याला कधी*
*दुरावा माहित नसतो,*
*कारण---*
*कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील*
*मनाचा संपर्क असतो.*

# *आनंदावर जसं विरजण घालायला जमतं तसं आनंदाला फोडणी द्यायलाही जमलं पाहिजे. आयुष्यात शेवटी बॅलन्स महत्वाचा...!*

# *पुढे काय लिहून ठेवलंय हे पुढे गेल्याशिवाय कळत नाही. कधी कधी पुढे काहीच लिहिलेलं नसतं. अशावेळी मग जो धीर करून पुढे गेलेला असतो तोच कुठलातरी नवा इतिहास लिहून आणखी पुढे निघून जातो...!*

# *स्वप्न बघणं आणि स्वप्न पडणं यात मोठं अंतर आहे..!*
*स्वप्न बघणारे आयुष्यात जास्त पुढे जातात..!*

# *ज्या गोष्टी धरून ठेवल्यावर त्रास होतो; त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात.*
*"सुखी" राहण्याचा मार्ग एवढा सोपा आहे.*

# *पावसाशी मैत्री केल्यावर भिजण्याची, आगीशी मैत्री केल्यावर भाजण्याची आणि आयुष्याशी मैत्री केल्यावर जगण्याची तयारी ठेवावीच लागते...!*

# *जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ....*
*कारण तुम्ही अशा जगामध्ये राहता,.जिथे 'तेल आणि वात' जळते...*
*पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..*

# *चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देतं...!*
*काही माणसं अशीच भली असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ते समोरच्याचं चांगलंच चिंतितात...!*

# "खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..

# *पुस्तकी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणारे अनेक असतील...!*
*पण*
*आयुष्याचं गणित पूर्णपणे सुटलेला अजून कुणीच नाही...!*

# *नशीबाकडून जितकी मोठी अपेक्षा कराल तितका मोठा अपेक्षाभंग होईल...!*
*मात्र*
*कर्म आणि कर्तृत्वावर जोर दयाल तर तुम्हाला नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल...!*

# *तुमची खरी लढाई ही केवळ तुमच्याशीच असते. जर तुम्ही स्वतःला कालच्या पेक्षा आज अधिक चांगले बदल झालेले मानता तर हा तुमचा सर्वात मोठा विजय आहे...!*
.................
.......... ..................

ही विचार गंगा अशीच अव्याहत वहात राहू दे आणि आम्हाला बदलत्या जगाकडे अधिक सजगपणे पहायची द्रुष्टी देत, येणाऱ्या आव्हानांचा समर्थपणे सामना करावयाची ताकद देऊ दे.....

धन्यवाद

संग्राहक,
सुधाकर नातू

ता.क.
## माझा ब्लॉग असून त्यावर असेच शंभराहून अधिक विविध विषयांवरील लेख आपण जरुर वाचा.

For that
Please Open this link
and share it too in your whatsapp grp:

http//moonsungrandson.blogspot.com

शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनलची लिंक आहे:

https://www.youtube.com/user/SDNatu

सदर लिंक उघडून चाळीसहूनही अधिक उपयुक्त विडीओज् जरुर पहावेत. अभिप्राय कळवावा.
धन्यवाद.

मंगळवार, २६ मे, २०२०

"नियतीचा संकेत-४": "अभ्यासकांसाठी उपयुक्त माहिती":


"नियतीचा संकेत-४":
"अभ्यासकांसाठी उपयुक्त माहिती":

ज्योतिष पद्धती, राशी व नक्षत्रे त्यांचे स्वामी, तसेच राशींची, ग्रहांची व स्थानांची विविध वैशिष्ट्ये, ग्रहांच्या महादशा, राशींचे रोग.....इ.इ.....

१ "ज्योतिष पद्धती":
जन्मवेळच्या चंद्राच्या व रविच्या स्थिती आधारे ज्योतिष बघितले जाते. चंद्राच्या स्थितीवर आधारलेली भारतीय ज्योतिष पद्धत, तर
रविच्या आधाराची ही पाश्चात्य पद्धत. बारा राशींची कल्पना पायाभूत असते. या बारा राशी आपणा सर्वांच्या परिचयाच्या आहेत.

त्याप्रमाणे फक्त फरक इतका की, पाश्चात्त्य ज्योतिषात रवि वरून राशी ठरवली जाते. रवि एका महिन्यात एक राशी पूर्ण करतो. याप्रमाणे बारा राशी वाटल्या जातात या पद्धतीत फक्त जन्मतारीख व महिना यावरून राशी काढतात. जन्मवर्ष कोणतेही असले तरी चालते. रवि एका राशीत एक महिना असतो. ती राशी त्या तारखांप्रमाणे या व्यक्तींची धरतात. त्याउलट चंद्र एका महिन्यातच संपूर्ण बारा राशींचे चक्र पूर्ण करतो. त्यामुळे भारतीय पद्धतीत चंद्रावरून राशी ठरवताना जन्मतारीख जन्मवेळ व जन्म महिना वर्ष सगळं आवश्यक असतं.

मनाला केंद्रीभूत मानून चंद्र मनावर परीणाम नेहमी करत असतो. सहाजिकच भारतीय ज्योतिष पद्धत ही चंद्राच्या जन्मवेळी असलेली राशी ही जन्मरास मानतात. येथे पाश्चात्य पद्धत योग्य वा अयोग्य असे मानण्याचे कारण नाही. फक्त चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्म विचार करते एवढेच म्हणायचे. पाश्चात्य पद्धत रविच्या आधारे मांडलेली असल्यामुळे ही बरीचशी ढोबळ पद्धत होय.

मात्र दोन्ही पद्धतीवरून विविध नियतकालिकांत लिहिलेले राशिभविष्य पुष्कळ वाचक सवयीने आवर्जून वाचतात. इथे दोन पद्धतींची आम्हाला बरीवाईट अशी तुलना करावयाची नाही. आम्ही भारतीय चंद्रावरून राशी ठरवणे, या पद्धतीचा अवलंब व अभ्यास केला आहे. त्यासंबंधी आम्ही वेळोवेळी ज्या नोंदी ठेवल्या, त्यातील काही निवडक अशी उपयुक्त माहिती येथे देत आहोत. ती सर्वांना आवडेल अशी आशा आहे.

२ "बारा राशी व नक्षत्रे":
१ मेष रास: अश्विनी भरणी क्रुत्तिका पहिला चरण
२ वृषभ रास: क्रुत्तिका-तीन चरण रोहिणी म्रुग दोन चरण
३ मिथून रास: मृग-दोन चरण आर्द्रा पुनर्वसु-तीन चरण
४ कर्क: पुनर्वसु-एक चरण पुष्य आश्लेषा
५सिंह: मघा पूर्वा उत्तरा-एक चरण
६ कन्या: उत्तरा-तीन चरण हस्त चित्रा दोन चरण
७ तुळा: चित्रा दोन चरण स्वाती विशाखा तीन चरण
८ व्रुश्चिक: विशाखा एक चरण अनुराधा ज्येष्ठा
९ धनु: मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा एक चरण
१० मकर: उत्तराषाढा तीन चरण श्रवण धनिष्ठा दोन चरण
११ कुंभ: धनिष्ठा दोन चरण शततारका पूर्वाभाद्रपदा तीन चरण
१२ मीन: पूर्वाभाद्रपदा एक चरण उत्तराषाढा रेवती.

३ "नक्षत्रांचे स्वामी":
अश्विनी मघा मूळ: केतू
भरणी पूर्वा पूर्वाषाढा: शुक्र
कृतिका उत्तरा उत्तराषाढा: रवी
रोहीणी हस्त श्रवण: चंद्र
मृग चित्रा धनिष्ठा: मंगळ
आर्द्रा स्वाती शततारका: राहू
पुनर्वसु विशाखा पूर्वाभाद्रपदा: गुरु
पुष्य अनुराधा उत्तराभाद्रपदा: शनी
आश्लेषा ज्येष्ठा रेवती बुध

४ "ग्रहांच्या अवस्था":
ग्रहांच्या अवस्था 0 ते 6 बाल 6 ते 12 कुमार
12 ते 18 युवा 18 ते 24
वृद्ध चोवीस ते तीस मृत
याप्रमाणे ग्रहांच्या अवस्था असतात.

५ ग्रह आणि मालक व अवयव":
मेष रास: मंगळ मेंदू
वृषभ रास: शुक्र गळा डोळे
मिथुन रास: बुध बाहू
कर्क रास: चंद्र फुफ्फुसे
सिंह रास: रवि पोट
बुध: कन्या मोठी आतडी
तुळा: शुक्र जननेंद्रिय
वृश्चिक मंगळ मूत्राशय
धनु: गुरू पोटऱ्या
कुंभ शनी हृदय
मकर: शनी हृदय
कुंभ शनी रक्त आतडी मांड्या
मीन: गुरु पावले

६ "स्थान आणि अवयव"
प्रथम लग्न स्थान लोकं शरीरसौष्ठव
धनस्थान दुसरे, घसा उजवा डोळा
तिसरे स्थान: पराक्रम प्रवास उजवा कान हात चौथे स्थान: स्थावर माता मन सौख्य
पाचवे स्थान: स्तन विद्या संतती प्रेम
सहावे स्थान: पोट यकृत गर्भाशय शत्रू आरोग्य
सातवे स्थान: पोट मोठी आतडी भागीदार जोडीदार
आठवे स्थान: मृत्यू स्थान जननेंद्रिय अंतर्गत गर्भाशय
नववे स्थान: भाग्य वडिलांचं सुख मांड्या
दहावं स्थान: वडील व्यवसाय नोकरी व हृदय गुडघे
अकरावा स्थान: लाभ, डावा कान पिंढर्या
बारावे स्थान: मोक्ष खर्च पावले आणि डावा डोळा याप्रमाणे स्थानपरत्वे अवयव आपल्याला कळू शकतात.

७ "राशी क्रमांक आणि त्यांचे प्राणी":
मानव: ३ ६ ७ ९ ११
चतुष्पाद: १ २
जलचर: ४ १० १२
कीटक: ८
वनचर: ५
याप्रमाणे राशींची विभागणी आहे.

८ "राशी व विविध घटक":
अग्नि राशी: मेष सिंह धनू
पृथ्वी राशी: वृषभ कन्या मकर
वायु राशी: मिथुन तूळ कुंभ
जल राशी: कर्क वृश्चिक आणि मीन

स्थिर राशी: मेष कर्क तुला मकर
द्विस्वभाव राशी: वृषभ सिंह वृश्चिक कुंभ

पुरुष राशी: मेष मिथुन सिंह तुळा धनु कुंभ
स्त्री राशी: वृषभ कर्क कन्या वृश्चिक मकर मीन

पुरुष ग्रह: गुरु रवी नेपच्यून गुरू हर्षल मंगळ नपुंसक ग्रह: शनी बुध
स्त्री ग्रह: चंद्र शुक्र

उत्तर दिशेच्या राशी: कर्क वृश्चिक मीन
पूर्व दिशेचा राशी: मेष सिंह धनू
पश्चिम दिशेच्या राशी: मिथुन तूळ कुंभ
दक्षिण दिशेच्या राशी: वृषभ कन्या मकर राशी

९ राशी आणि आजार
मेष: मेंदूचे आजार
वृषभ: मधुमेह क्षय
मिथुन: दमा बहिरेपण
कर्क: मनोविकार
सिंह: हृदयविकार क्षय
कन्या: पोट दुखी
तुळा: मूत्राशयाचे विकार
वृश्चिक: मूळव्याध वेड
धनु: सांधेदुखी दमा
मकर: त्वचारोग मानसिक आजार
कुंभ: हृदयविकार
मीन: विषबाधा मनाचे रोग

१ "ग्रह व महादशा कालखंड":
केतू 7 वर्षे
शुक्र 20 वर्षे
रवि 6 वर्षे
चंद्र 10 वर्षे
मंगळ 7 वर्षे
राहू 18 वर्षे
गुरु 16 वर्षे
शनि 19 वर्षे
बुध 17 वर्षे
याप्रमाणे माणसाचे आयुष्य 120 वर्षे मानून ग्रहांमहादशांमध्ये असे विभागले जातात. मात्र कोणीही इतकी वर्ष जगात नसल्यामुळे काही महादशा माणसाच्या आयुष्यात येतच नाहीत आणि ते त्याच्या जन्म वेळेवर व कुठल्या ग्रहापासून त्याच्या महादशा सुरू होतात त्यावर अवलंबून असते.

१० "जन्मवेळ व महादशेचा प्रारंभ":
आपला जन्म ज्या नक्षत्रावर आणि त्याच्या स्वामी प्रमाणे आपल्याला सुरूवातीची महादशा सुरू होते. ती किती वर्षे भोगायची ते आपल्या जन्मवेळच्या चंद्राच्या अंशात्मक स्थितीवरून काढतात. आणि त्यानंतर ग्रहांच्या वरील क्रमाने महादशा येतात. मात्र सगळ्यांना सर्व मंडळींना उरलेल्या ग्रहांच्या महादशा जीवनामध्ये येतीलच असे नाही कारण कोणाचेच आयुष्य १२० वर्षे नसते. या नऊ ग्रहांच्या महादशा त्याच प्रमाणात पुढे अंतर्दशा, त्याच क्रमाने तसेच पुढे त्याच क्रमाने प्रत्येक ग्रहाच्या सूक्ष्मदर्शक दशा त्या-त्या अंतर्दशेत मांडता येऊन आपल्याला अगदी जवळचे असे कालखंड महादशा मध्ये विभागता येतात. हे गणित करावे लागते.

जीवनामध्ये सुख दुःख हे त्या त्या प्रमाणे महादशा त्यांच्या वर अवलंबून असते शुभ ग्रहांच्या महादशा सर्वसाधारण चांगल्या जातात. तर पाप ग्रहांच्या महादशा, आपली परीक्षा बघतात. म्हणूनच सगळ्यांचं जीवन सगळंच त्रासाच, दुःखाचं वा सुखाचं नसतं आणि चढ-उतार हे प्रत्येकाच्याच जीवनात येतात.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"माझ्या ब्लॉगवर एकापेक्षा एक विषय.........

'ह्रदयसंवाद', 'आजोबांचा बटवा', 'रंगांची दुनिया'
'वाचा, फुला आणि फुलवा'....
'नियतीचा संकेत'.......
'व्यवस्थापनशास्त्र'.......
असे विविध विषयांवरचे........
उत्तमोत्तम इंग्रजीत व मराठीत लेख आहेत.........

पुढील लिंक उघडून ते जरूर वाचा..........

http//moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनेलवरील......
एकसे बढकर एक विडीओज् पहा.....
ही लिंक उघडा....

https://www.youtube.com/user/SDNatu

हा संदेश whatsapp वर शेअरही करा.........

सोमवार, २५ मे, २०२०

"Mystery of Life & Power Games":


"Mystery of Life
& Power Games":

Life is a mystery, all of us experience in different part of life, success or
failure, the miseries or happiness,
a healthy long life or a life full of diseases, or a short life and each one's life is unique. The life is truly a Jigsaw puzzle. Why we fail to exploit to the fullest of our latent potential within? this is the question that haunts everyone. Carrying out blame game is always going on for our debacles, failures and setbacks is surely not the correct way; instead we must reflect and submit to our mistakes.

For that here are some pointers to above:
1 Not focused, your focus must take into consideration your strengths and limitations your likes and dislikes.
2 Not carrying out quality hard work.
3 Having wrong diversions.
4 Not doing the right things at the right time in the right way.
5 Diversions of not studying when required.
6 Whiling away the time in bad habits & vices, too much involvement in opposite sex.
7 Not having discipline, commitment dedication.
8 Not having good interpersonal relationships. Not having communication skill.
9 Not having a knowledge about politics-the games people play.
10 Not knowing how to get our things done through people.
11 Not having correct goals.
12 Not having favourable atmosphere or environment around: call it not having good luck.
13 Not having a balance of things, too much of good or too much bad is always too wrong.
14 Not having concern for others being too much self-centered.
And so on.....
You must review and reflect on above issues.

Please remember that Life you get is an outcome of a wonderful blend of some unknown biological reactions and some known emotional psychological desires and expectations, the life we get is unique and outcome of an ending quest for love, quest for togetherness and quest for belonging. You must thrive for making your Life a Life well lived.

"The Power Games":
So life is what life is all about but please remember in life what goes on regularly, knowingly or unknowingly are the Games of Power. Now let's talk about them.

Power comes out of some respect for the extraordinary achievements and contributions, which are impressive and consistent in the given field may be that in industry or commerce, science, sports arts or media or any other. It's an outcome of outstanding success; power is also due to the elevated position one holds and his capacity to influence very large number of people. But remember it is not easy to gain power.

The delegated power may not be effective and is possible, provided the person using it, has the desired leadership qualities.

The inherited power is like a dabt and cannot be utilised unless the person, getting it, has the competence confidence and the vision of the lender of that power to him.

The power games goes on and on in everybody's life almost all the time, professionally, personally, politically and universally. All the World is a moving picture of such games.

Finally, The Mind power, the one and only unique strenth of human beings had been at the core of progress & development of the human race and would always be the Super Power, navigating other powers like muscle, machine and knowledge/skill power.
The Mind Power is Born Power.

Sudhakar Natu

P.S.
.
"माझ्या ब्लॉगवर एकापेक्षा एक विषय.........

'ह्रदयसंवाद', 'आजोबांचा बटवा', 'रंगांची दुनिया'
'वाचा, फुला आणि फुलवा'....
'नियतीचा संकेत'.......
'व्यवस्थापनशास्त्र'.......
असे विविध विषयांवरचे........
उत्तमोत्तम इंग्रजीत व मराठीत लेख आहेत.........

पुढील लिंक उघडून ते जरूर वाचा..........

http//moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनेलवरील......
एकसे बढकर एक विडीओज् पहा.....
ही लिंक उघडा....

https://www.youtube.com/user/SDNatu

हा संदेश whatsapp वर शेअरही करा.........

शनिवार, १६ मे, २०२०

"ह्रदयसंवाद-२२": "लाँकडाऊनचे कवीत्व":


 "ह्रदयसंवाद-२२":
"लाँकडाऊनचे कवीत्व":

कोरोना संकटात, लाँकडाऊन चुकीचा होता हे मी बिलकूल मानत नाही. फक्त तो ज्या घिसाड घाईने सुरु केला गेला आणि राज्यांना न विचारता, पूर्वनियोजन नीट न करता, अंमलात आणला गेला ते पटणे कठीण आहे. कारण त्यामुळे अनेक गहन प्रश्न, विशेषतः परप्रांतीय मजुरांचे निर्माण होत गेले आणि त्यातून मार्ग काढणे अत्यंत बिकट बनत गेले हे नाकारता येणार नाही. जी काही विदारक परवड रस्त्यांमध्ये या गरीब बिचाऱ्या मजुरांची त्यांच्या कुटुंबीयांची झाली, त्याला जबाबदार कोण? योग्य वेळी, योग्य ते पूर्वनियोजन न करता, कोणतीही कृती बेधडकपणे करण्याचा परिणाम हा आहे. फाळणीनंतर नोटबंदीच्या वेळेस जे घडले, त्याची पुनरावृत्ती झालेली उघड्या डोळ्यांनी पहाण्याची वेळ सर्वांवर दुर्दैवाने आली आहे. लाँकडाऊन अत्यंत कठोरपणे अंमलात आणायला हवा होता व खरोखरच कोरोना संकट नियंत्रणात येइपर्यंत तो हवाच हवा.

दुर्दैवाने आपली जनता बहुतांश बेशिस्त व संकटाचे गांभीर्य न जाणणारी आहे. म्हणूनच
पहिल्या दिवसापासून, अक्षरशः लष्करी शिस्तीत तो पाळला गेलेला पहाणे, हे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य होते. त्या आघाडीवर अजून तरी यश नाही, हे सत्य होय. उलट एक हजाराहून अधिक पोलीसकर्मी कोरोनाग्रस्त होणे ही अत्यंत खेदाची व शरमेची बाब आहे.

सध्याच्या महासंकटाने विविध क्षेत्रात काय काय भीषण आर्थिक समस्यांचे आव्हान उभे केले आहे, ती वास्तवता आता आ वासून उभी आहे. लाँकडाऊन शिथिल करावा, तर किती मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त होतील, याचा नेम नाही. कारण इतके दिवस लाँकडाऊन असून देखील जर कोरोनाग्रस्त असे झपाट्याने भयानक वाढत गेलेले असतील, तर विविध घटकांच्या आर्थिक
मजबुरपायी, शिथिलता आणून जर लोकांना बाहेर वावरायला दिले, तर काय होईल याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे खरोखरच चक्रव्यूहात सापडल्यासारखी स्थिती झालेली आहे. Point of No return अशा विचित्र वळणावर गाडी आली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर आणखीनच धरतंय, अशी एकंदर परिस्थिती आहे.

अर्थात् शेवटी हे आव्हान स्विकारायचेच हा विचार आवश्यक आहे, हे बरोबर आहे. पण ही शिस्त, सामाजिक जाणीव समाजात एकदम येत नाही. त्यासाठी आदर्श असावे लागतात, एक कार्यक्रम असावा लागतो. अव्याहत दारु पिणारा बाप आपल्या मुलाला आज अचानक तू दारु पिऊ नकोस असे कुठल्या तोंडाने सांगणार? आडात नाही ते पोहोर्‍यात कुठून येणार? आज आपण लष्कराची मागणी करतो आहोत, कां? आपले एके काळी जगात नावाजलेले , मुंबई पोलिस आज इतके हतबल कसे झाले? त्यांनी अजून किती त्रास सहन करायचा? हे विचार करण्यासारखे नाही कां? जेव्हा प्रशासनावर पकड नसणारे नेत्रुत्व असेल तर अशी कार्यक्षम यंत्रणा पण हतबल होते, तिला विनाकारण नामुष्कीला, यातनांना सामोरे जावे लागते.

आज महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे, जिथल्या पोलीसांनी राज्यात लपलेल्या मरकजच्या किती तब्लिंगींना शोधले आहे? या मंडळींमुळे कोरोनाचा सर्वात जास्त प्रसार झाला हे आता सर्वश्रुत आहे. नुसती भावनेला हात घालणारी घरेलू भाषेतील उपदेश व मार्ग व्यक्त करुन पुरेसे होत नाही, हाच आता पन्नास दिवसांनंतर अनुभव येत आहे. सुरवातीला फक्त "लष्कर बोलवावं लागेल असे वागू नका", इतपत शामळू शब्दातील बोल बोलण्याचे धैर्य दाखवले गेले. त्यातून काही साध्य झाले नाही.

पहिल्या लाँकडाऊनच्या काळातच परप्रांतीय मजूरांची सुखरूप घरवापसीची योजना एकीकडे अंमलात आणून, दुसरीकडे निदान मुंबई व पुण्यात लष्कर बोलावून लाँकडाऊन तंतोतंत पाळला जाईल हे करून दाखवायला हवे होते. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे, केंद्र सरकारने महाराष्ट्रातले सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी परिस्थिती तरी येऊ नये.

ह्या पार्श्वभूमीवर ही चारोळी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

तुझं माझं, ब्रेक अप् जाहले,
पंत गेले, अन् राव चढले!
फतव्यांमागून फतवे निघती,
भरकटणार्या कारभाराची हीच रिती!

आता वास्तवतेचे एक उदाहरण पाहू:

एका सहकारी सोसायटीच्या ह्या घरात सत्तरीपुढच्या वयाचे ज्येष्ठ नागरिक असलेले फक्त दोघे पती पत्नी रहातात. त्या़ंनी आतापर्यंत lockdown च्या काळात मोलकरीण येत नसल्यामुळे तिची कामे ते करत आले आहेत. पण ह्यापुढे ते कठीण होत असल्याने त्यांच्या मोलकरीणीने येऊन घरातील तिची कामे करावीत अशी आवश्यकता भासत आहे. ती येण्यास तयारही आहे. तिला येण्याची परवानगी क्रुपया मिळावी, अशी ह्या ज्येष्ठ दांपत्याची अपेक्षा असणे रास्त आहे.

मात्र लाँकडाऊनमुळे सहकारी सोसायटीने कंपाऊंडच्या आंत इतर कोणालाही येण्यास मज्जाव केलेला आहे. सहाजिकच ही परवानगी सोसायटी देत नाही, कारण त्यांना इतर सदनिकाधारकांना धोका पोहोचावा, असे वाटत नाही. त्यामुळे बिचाऱ्या या ज्येष्ठ जोडप्याला भांडी घासणे केर लाद्या पुसणे वैगेरे सगळं कठीण असलं तरी घरातच करायला लागत आहे. ही मजबुरी आणि ही अगतिकता सध्याच्या विचित्र परिस्थितीमुळे आलेली आहे.

घरगुती सेवा देणार्यांचा विषय आलाच आहे, तर त्यासंबंधी सर्व साधारणपणे त्यांना त्यांचा महिन्याचा पूर्ण मोबदला देण्याकडे कल असावा, हे सहाजिक आहे. परंतु असा मोबदला आता लाँकडाऊन अनिश्चितपणे वाढत असल्यामुळे किती दिवस देत राहायचं, असा प्रश्नही मध्यमवर्गीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना येणं साहजिक आहे. कारण मेहनत त्यांची, फळ मात्र पूर्णपणे घरगुती सेवा देणार्याला द्यायचं हे तात्विक दृष्ट्या पटत नाही. जसं कुठल्याही कारखान्यात लाँकडाऊन केला किंवा टाळेबंदी केली, तर कामगारांना अर्धा पगार दिला जातो, त्याप्रमाणे घरगुती सेवकांना पहिल्या महिन्यानंतर तरी पुढच्या महिन्यांमध्ये अर्धा पगारच देणे, रास्त नव्हे कां? कारण त्यांचे श्रम वाचत असून, ते श्रम मालक करत आहेत, हा विचार त्यांनी देखील समजून घ्यायला नको कां?

एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे, हे कळले की काय होते, याची कल्पना देणारा एक संदेश आता सोशल मीडियावर फिरत आहे. तो वाचून कोणताही थरकाप होऊ शकतो. कारण नंतर तुमची उचलबांगडी कुठे होईल कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणत्या परिस्थितीत धावपळ करायला लागेल, याची कल्पना करवत नाही. शिवाय सध्या त्यावर औषध नसल्यामुळे या पुढे काय होणार या विचाराने देखील कोणाचीही घाबरगुंडी उडू शकते. शिवाय ज्या वेगाने ही लागण होत आहे, ते पाहिले तर खरोखर भीतीच वाटते.

हा भयानक विषाणू तुमच्या श्वासनलिके मधून फुफ्फुसांत पर्यंत धोका निर्माण करतो आणि एकदा शरीरात शिरला की, प्रचंड वेगाने वाढत जाऊन शेवटी श्वास घ्यायला जड जाते. व्हेंटिलेटरवर ठेवायला लागते, हे सगळं ऐकलं वाचलं की कोणाच्याही हृदयाचा ठोका थांबू शकतो. त्यामुळे ही लागण होऊ नये याकरता घरातच थांबणे नितांत आवश्यक आहे. सध्याचा काळ किती विचित्र आला बघा, लागण झाली आणि मृत्यू आला तर तुम्हाला ताबडतोब स्मशानात नेले जाऊन विल्हेवाट लावली जाते. हा संसर्ग समजा तुम्हाला झाला नाही, पण काही कारणाने तुम्ही आजारी पडला, तर तुम्हाला तुमचे नातेवाईक सुद्धा मदतीला, भेटायला येणे देखील तसे कठीणच. त्यातून जर मृत्यू आला तर काय आणि कोण कसे मदतीला येणार पुढे काय काय होणार, असे अनेक यक्षप्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनासमोर येणार हे सहाजिक आहे.

थोडक्यात, कधी नव्हे तो भयानक विचित्र असा काळ आला आहे आणि त्यातून कोणाचीच सुटका सहजासहजी नाही हे सत्य आहे. जोपर्यंत या रोगावर विषाणूवर जालीम औषध सापडत नाही व त्याची बाधा होऊ नये म्हणून लगेच सापडत नाही तोपर्यंत जो अनिश्चित काळ जाणार आहे तो पर्यंत रात्र काळोखाचीच आहे.

सुधाकर नातू

ता.क.
माझा ब्लॉग असून त्यावर असेच शंभराहून अधिक विविध विषयांवरील लेख आपण जरुर वाचा.

For that
Please Open this link
and share it too in your whatsapp grp:

http//moonsungrandson.blogspot.co

शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनलची लिंक आहे:

https://www.youtube.com/user/SDNatu

सदर लिंक उघडून चाळीसहूनही अधिक उपयुक्त विडीओज् जरुर पहावेत. अभिप्राय कळवावा.

धन्यवाद

बुधवार, १३ मे, २०२०

"नियतीचा संकेत-३": सर्वात नशिबवान कोण?":


 "नियतीचा संकेत-३":
सर्वात नशिबवान कोण?":

प्रत्येकाचे जीवन चक्र वेगळे असते किंवा सुरुवात केव्हा अंत केव्हा व कसा याची कल्पना आपल्याला नसते. हा जणू एका गाडीचा प्रवास आहे आणि तो प्रवास नऊ ग्रहांच्या महादशा पार करत आपण करत असतो. अर्थात्
सहसा कोणालाच या नऊच्या नऊ महादशा जीवनात अनुभवता येतातच असे नाही. त्यापैकी अनिष्ट ग्रहांच्या महादशा, तुम्हाला अनिष्ट फळे देतात. शनि, मंगळ राहू व केतू हे अनिष्ट ग्रह मानले आहेत. बुध, शुक्र व गुरू यांच्या महादशा त्यामानाने चांगली फळे देतात. रवीची महादशा तो कोणत्या स्थानाचा अधिपती आहे, त्यावरून तिचा दर्जा कळू शकतो.

पत्रिकेमध्ये ६, ८, १२ ही अनिष्ट स्थाने.
तुमचे जन्मलग्न कोणते आहे, त्यावरून अर्थातच सहा आठ बारा स्थाने कोणत्या ग्रहांच्या राशींची, येऊ शकतील, ते ग्रह शुभ की अशुभ असतील, ते समजेल. त्यादृष्टीने एकूण बारा जन्म लग्नाचा नशिबाचा क्रम ही संकल्पना या आधीच्या लेखात मांडली होती. भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे
आता हा एक वेगळी दिशा दाखवणारा लेख मुद्दामून संशोधन करून लिहिला आहे.

प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा येत असतात.
पत्रिकेमध्ये तीन, पाच, नऊ आणि अकरा ही त्रिकोण स्थाने, अत्यंत महत्त्वाची आणि जीवनाला यशाकडे नेणारे समृद्धीकडे व प्रगतीकडे नेणारी असतात. या स्थानांच्या महादशा प्रत्येक जन्मलग्नाला किती वर्ष येतात, याचे गणित करून सगळ्यात जास्त वर्ष ज्या लग्नाला मिळू शकतील, तो सगळ्यात नशीबवान असं म्हणता येईल. तेव्हा गणित करून सगळ्यात नशीबवान लग्नरास कोणती आणि सगळ्यातला तळाची लग्नरास कोणती हे या लेखात मांडले आहे.

त्याचे उत्तर आत्ताच सुरुवातीला देऊन तुमची उत्सुकता ताणत नाही. सर्वात नशीबवान जन्मलग्ने, व्रुषभ व व्रुश्चिक ही आहेत, तर सगळ्यात काळाला जन्मलग्ने मिथून व धनु ही आहेत.

आपले जन्मलग्न कोणते आहे, ते पाहून तुम्ही आपल्या नशिबाची परीक्षा त्या दृष्टीने पाहू शकता. एकंदर आयुष्याची गोळाबेरीज हे अर्थातच एवढ्याच एका गोष्टीवर अवलंबून असणार नाही, तर एकूण पत्रिकेतले ग्रहयोग यांचाही विचार करावा लागेल. मात्र महादशा मूलभूत धरून आपल्या पत्रिकेप्रमाणे आपल्या नशिबाचा दर्जा कसा असू शकेल ते एका अजून भिन्न द्रुष्टीने, या उपयुक्त लेखावरून समजेल.

ती कशी ते पुढे विस्ताराने मांडले आहे. क्रम असा पहा:
राशी/ ३वे स्थानराशी /५वे स्थानराशी/९वे स्थानराशी/११वे स्थानराशी/एकूण वर्षे/नशिबाचा क्रमांक
अशा क्रमाने प्रत्येक लग्न राशीच्या पुढील आकडे वाचावेत:

१ मेष ३/५/ ९/११/५८/ ३/अशातर्हेने...
२ वृषभ ४/ ६ /१०/१२/६२/१/
३ मिथुन ५/७/११/ १/ ५२/५/
४ कर्क ६/ ८ /१२/ २/६०/२/
५ सिंह ७/ ९/ १/ ३/ ६० /२/
६ कन्या ८/१०/ २/ ४/५६/४/
७ तूळ ९ / ११/ ३/५ /५८/३/
८ वृश्चिक १०/ १२/ ४/६ /६२ /१/
९ धनु ११/ १/ ५/ ७ / ५२ /५/
१० मकर १२/ २/ ६/८ / ६०/२/
११ कुंभ १/ ३/ ७/९ /६०/२/
१२ मीन २ /४ / ८/ १०/ ५६/४/

नमुना विश्लेषण:
मेष लग्न असेल तर..
तिसरे स्थान बुधाचे मिथून रास/पाचवे स्थान रविचे सिंह रास /नववे स्थान गुरुचे धनु रास/ अकरावे स्थान शनीचेचे कुंभ रास- म्हणून शुभफलदायी वर्षे महादशा वरील स्थानांच्या अशा:
१७ + ६ + १६ +१९ एकूण जास्तीत जास्त ५८

अजून एक उदाहरण:
कुंभ लग्न
तिसरे स्थान मेष मंगळ राशीचे/ पाचवे स्थान बुधाची मिथून रास/नववे स्थान शुक्राच्या तुळ राशीचे/ अकरावे स्थान गुरूच्या धनु राशीचे असेल.
म्हणून मंगळाच्या महादशेची ७ वर्षे + १७ बुधाची +२० शुक्राच्या राशीसाठी +गुरुच्या १६वर्षे महादशेची: एकूण जास्तीत जास्त ६० वर्षे.

प्रत्येक जन्मा लग्नाला वेगवेगळी शुभफलदायी वर्षे येणार आणि त्यामुळे प्रत्येक राशीचे नशीब हे वेगळे असणार. त्यामध्ये व्रुषभ लग्न व व्रुश्चिक लग्न ही ६२ वर्षगुण मिळाल्याने सगळ्यात नशिबवान म्हणायला हवीत, मात्र एक महत्वाची बाब अशी की, त्या व्यक्तींचा जन्म कोणत्या राशी नक्षत्री व चरणावर झाला, त्यावरुन जन्मानंतर
त्यांना कोणत्या ग्रहाची किती काळ महादशा उपभोगणे सुरु करेल त्यावर ह्या शुभस्थानराशींच्या ग्रहांच्या किती येतील व किती येणे अशक्य ठरेल ते समजेल. सगळ्यात कमी शुभमहादशाकाळ मिथून व धनु लग्नाला येतो असे हा अभ्यास दर्शवितो. बाकी बहुतेक राशींना ६० वा त्याच्याच जवळपास शुभफल वर्षे
मिळू शकतात असे दिसते.

ह्या प्रमाणे अभ्यास आणि संशोधन करून सर्वसाधारण जन्म लग्नावरून नशिबाची परीक्षा कशी करता येईल ते समजेल. अर्थातच सर्वसाधारण पत्रिकेमधील इतर ग्रहयोग यांचा अभ्यास करून संपूर्ण आयुष्याचे भवितव्य हे अधिक सखोलपणे मांडता येईल.

ज्योतिष संशोधनाला गणिताच्या साह्याने अजून एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये, मी केला आहे. तो तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरू शकेल, अशी आशा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वैविध्यपूर्ण व अनेक विषयांचा उहापोह करणारे शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....आपल्या संग्रही ठेवा....

http//moonsungrandson.blogspot.com

आणि
आपल्या whatsapp grps
वर शेअरही करा.......

शनिवार, ९ मे, २०२०

"ह्रदयसंवाद-२१": "करोना"-डरो ना? ना, ना, रोना ही रोना!":

"ह्रदयसंवाद-२१":
"करोना"-डरो ना? ना, ना, रोना ही रोना!":

पहिल्या व दुसर्या लाँकडाऊनमध्ये पूर्ण दुर्लक्षित ठेवलेल्या परप्रांतीय मजूरांच्या घरवापसीमुळे बिचार्यांवर पायी शेकडो मैल प्रवास करायची वेळ आली. अशाच एका अभागी मजुराची श्री हेरंब कुलकर्णी ह्यांनी घेतलेली ही मुलाखत वाचावी. ती डोळ्यात अंजन घालणारी व नियोजनाचा खेळखंडोबा ऐरणीवर आणणारी आहे:

प्रथम ही मुलाखत वाचा:

"*हैदराबाद ते बिहारपर्यत पायी निघालेल्या मजुराची मुलाखत* ****************************** स्थलांतरित मजूर रस्त्याने चालत गावाकडे निघाले आहेत हैदराबाद वरून थेट बिहार मध्ये. नागपूर मध्ये दिनानाथ वाघमारे व त्यांच्या 'संघर्ष वाहिनी' च्या सहकाऱ्यांनी त्यांना थांबविले व त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली.या पायी निघालेल्या मजुरांची हेरंब कुलकर्णी यांनी फोनवर घेतलेली मुलाखत ---------------------------- *तुझं नाव काय ?*
.राजीव . *सोबत किती कामगार आहेत ?* आम्ही ८ जण आहोत *कुठे कामाला होतात ?
* हैदराबादमध्ये बांधकाम साईटवर कामाला होतो * मग तिथून का निघालात* ?
*मालकाने काम बंद केले व खायलाही दैना हिशोबही करीना त्यामुळे तसेच गावाकडे निघालो.
*कधीपासून चालायला सुरुवात केली ?
*१३ दिवस चालतो आहे. .
*रोज किती किलोमीटर चालता ?
*४० ते ५० किलोमीटर पायी चालतो आहे. .
*पुढे कुठे जाणार ?तुमचे गाव किती लांब आहे हे माहित आहे
कां? .
* हो.आम्ही बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील बडोना गावचे। आहोत.इथून चौदाशे किलोमीटर दूर आहे. .
*मग इतके दूर पायी जाणार ?
*हो. मग दुसरे काय करू ? कोण खायला _देणार_ ? .
*पण रेल्वे सुरू होतील ? .
तोपर्यंत आम्हाला कोण खायला देणार? तेव्हा जमेल तसे पुढे जातो आहे. *वीटभट्टीवर तुम्हाला कोणी आणले होते ?*
आमच्या गावा जवळच्या एका मुकादमाने आम्हाला तिथे नेले व आता आम्हाला सोडून दिले .
*किती रुपये रोज मिळत होता ?
*चारशे रुपये ठरले होते. पण मालकाने आता हिशोब पूर्ण केला नाही व हाकलून दिले. त्या मुकादमाचा फोन लावतो आहे .त्याचा फोन लागत नाही. .
*गावाकडे गेल्यावर त्यालाशोधणार का ?
*शोधू. पण त्याचे गावात आम्हाला माहीत नाही। . । *मग पैसे सोडून देणार ?
*मग दुसरे काय करू भाऊ ? . *हैदराबादजवळ कुठे राहत होते ?
*तिथे खोली घेऊन राहत होतो। . *गावाकडे किती शेती आहे ?
*आम्हा आठ जणांपैकी दोघांना तीन एकर शेती आहे. मला शेती नाही. .
*मग तिथेच बिहार मध्ये काम का करत नाही ?
*तिथे सारखे काम मिळत नाही म्हणून मग आंध्रप्रदेशात गेलो होतो. *घरी फोन केला का ?
*हो .आई वडील काळजीत आहेत. ते म्हणतात तुम्ही इकडे गावाकडे निघून या. थोडेसे धान्य घरात आहे. तेच खाऊन राहू व पुन्हा तुम्ही जायचे नाही. तुम्ही कामाला जायचे नाही. इथेच उपाशी रहा. पण परत असे हाल करून घेऊ नका। . *मग तुम्ही पुन्हा येणार नाही का ?
*बघू, पण फसवल्यामुळे पुन्हा जावेसे वाटत नाही। .
*तुमच्या गावातील किती लोक बाहेर आहेत ?
*आमच्या गावात शेतीला पाणी नसल्याने बरेच जण असेच ठीक ठिकाणी आहेत.
*इथे तुम्हाला कोण भेटले ?
*आम्ही जबलपूर रस्त्याने निघालो होतो पण रस्ता चुकल्यामुळे हे लोक भेटले व तीन तारखेपर्यंत येथे थांबा म्हणालेत. जेवणाची राहण्याची सोय करतो म्हणालेत.
*समजा हे लोक भेटले नसते तर ?
* तर गेलो असतो पुढे पुढे... कधीतरी आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतोच ना ? ---------------------------
*हेरंब कुलकर्णी*
मुलाखत समाप्त.
---------------------------

"घरवापसीच्या जीवघेण्या यातना":

परप्रांतीय मजूरांवर आपल्या घरी शेकडो कि.मी. चालत जाण्याची वेळ येणे हे दुर्दैव होय. अशाच एका मजूराची श्री. हेरंब कुलकर्णी ह्यांनी घेतलेली मुलाखत वाचनात आली. ह्रदय पिळवटून टाकणारी व डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत आहे.

करोना महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी लाँकडाऊन करण्याचा निर्णय हा परप्रांतीयांना कसा महागात पडला, त्याचे हे दुःखद चित्र आहे.
परप्रांतीय मजुरांच्या घरवापसीची व्यवस्था, यथोचितपणे कुठलेही अडथळे न येता पार पाडण्याचे कर्तव्य, पार पाडण्यासाठी नको इतका विलंब केला गेला, ही वस्तुस्थिती टाळता येईल कां? दूरद्रुष्टीचा अभाव आणि संवेदनशीलता नसणे असे म्हणायचे कां?

फाळणीनंतरचे सर्वात भयानक व विघातक असे परप्रांतीयांचे घरवापसीचे स्थलांतर-ताजी बातमी-'मालगाडीने उडवल्याने १६ मजूरांचा दुर्दैवी म्रुत्यु'

😢😢 समस्येकडे इतके काळ पूर्ण दुर्लक्ष केल्याबद्दल माफी मागणे अधिक संयुक्तिक नाही कां?

"भरकटत जाणारा कारभार":

हे काही कमी नाही, म्हणून की काय, केंद्राने व राज्याने दोन्हीकडे दारु विक्रीला, मोकळीक अत्यंत नको त्या वेळी देणे व सगळीकडे बेवडे इतक्या संख्येने जमा होणे असा दुर्देवी क्षण कधीच आला नव्हता. नैतिकता इतक्या रसातळाला गेल्याचे दुःख पहाण्याची वेळ येणे, हा अधःपात पुढे काय काय भयंकर दिवस दाखवणार कोण जाणे.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या साधक बाधक परिणाम ध्यानात न घेता, बेधडक निर्णय घेण्याच्या पद्धतीचे एकामागोमाग एक भयानक परिणाम व्यथित करणारेच नाही कां? त्या परिणतींची जबाबदारी कोणावर?

आज सुरुवातीपासूनच इतकी वर्षे, धोरणकर्त्यांचे अपयश, नियोजनाचा संपूर्ण बोजवारा आणि आपल्या स्वार्थी कारभारापायी, स्थानिक रोजगार समस्येकडे काणाडोळा करणारे एका बाजूला, व मतांच्या पेटीकडे लक्ष ठेवत शहरे फुगवून देणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांच्या नादान कारस्थानाचे सारेजण बळी ठरलेले पहात आहोत.

सर्व प्रकारच्या साधनसामुग्री नि समृद्ध असलेला देश असून अयोग्य अशा कारभारामुळे, आज श्रीमंत, प्रचंड श्रीमंत आणि गरीब अधिकाधिक गरीब होत आहेत आणि आर्थिक दरी भयानक अशी झालेली बघायला मिळत आहे . निवडक राज्ये व शहरे विकसित होत जाताना अनेक राज्ये मागासलेली राहिल्याने, हा परप्रांतीयांचा लोंढा अनेक महानगरांना बकाल बनवून गेला.

दुसर्या बाजूला आरंभापासून आजपर्यंत आरक्षणाच्या अतिरेकी अट्टाहासामुळे ब्रेन ड्रेनपायी जी सर्वोत्तम गुणवत्ता होती, ती परदेशात जाऊन त्यांना त्या त्या परदेशांचे भले केले आणि इथे गुणवत्ते अभावी मामुली सामान्य अशा वकुबाच्या कारभार्यांमुळे आज ही वेळ आलेली बघायला मिळत आहे. गुणवंताना अपेक्षित संधी उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयश आल्याने ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. कालचक्र इतके विदारक दिवस दाखवेल असे कोणालाही त्यावेळेला वाटले नसेल.

कोरोना संकटाचा कुठलाही नायनाट झालेला नसताना उलट त्याचे अधिक भेसूर स्वरूप समोर येत असताना, अचानक दारू दुकाने उघडी करून काय साध्य होत आहे, तर समाजाचे जे विद्रूप स्वरूप आज समोर आले आहे. ते तर खरोखर मान खाली घालावे असेच आहे. समंजस सुसंस्कृत नीतिमान माणसाला मान खरोखर दुःखातिरेकाने खाली घालायला लागावी अशा तर्‍हेची सभोवतालची परिस्थिती अधिकाधिक उत्पन्न होताना पाहायला मिळत आहे.

परप्रांतीय मजुरांना घरवापसी करून देण्याची योजना लाँकडाऊन सुरू करतानाच अंमलात आणायला हवी होती. दोन लाँकडाऊन वाया जाऊ दिले गेले, त्यामुळे आजची भयानक व लाजिरवाणी स्थिती निर्माण झाली आहे.
नुसते (सतत बदलणारे) फतव्यांमागून फतवे काढून ईप्सित साध्य होत नसते. तहान लागली की, विहीर खणायची असे धोरण असल्याने अशीच वेळ सातत्याने येत रहाणार आणि मधल्यामधे सामान्य भरडले जाणार, दुसरे काय !

फेब्रुवारीत ह्या संकटाची कल्पना असताना एक दिवसाच्या, नंतर निरर्थक ठरलेल्या स्वागत सोहळ्यात शंभर कोटींचा चुराडा करण्यात मश्गुल राहून दुर्लक्ष केले गेले. शेवटी २४ मार्चला
पहिला लाँकडाऊन करताना रात्री आठ वाजता घोषणा केली गेली आणि बारा वाजता त्याची अंमलबजावणी ठेवणे, नोटाबंदी सारखाच हा धक्कादायक प्रकार झाला. तेव्हाही अशाच रांगाच रांगा ! कुठल्याही तऱ्हेची योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही, ना विविध राज्याच्या प्रमुखांबरोबर चर्चा करून योग्य ते नियोजन करून आणली गेली. एवढे करून तिची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. सर्व रामभरोसे असेच होत राहिल्याने अजूनही कोरना संकटापासून, अपेक्षित यश तर नाही व दुसरीकडे अर्थसंकट आ वासून उभे, त्यामुळे आता कशीही शिथीलता देत रहाण्याची अगतिकता आलेली दिसत आहे.
वस्तुनिष्ठ कारणमीमांसा":

अशी परिस्थिती निर्माण व्हायला, आपली जनता, हीदेखील कारणीभूत आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. साधी भाजी घेण्यासाठी किती माणसं कशी गर्दी करतात, हे आपण बघितले आहे आणि अशा गर्दीचे शेवटी रूपांतर हे कोरोनाची लागण लागण्यात होतं, एवढी साधी गोष्ट माणसं लक्षात घेत नाहीत. ज्याला त्याला घाई, मग ते दारूच्या दुकाना पुढची लाईन असो किंवा किराणा घेण्यासाठी लाईन असो, वा इतरत्र, कुठेही शिस्त म्हणून आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे पोलीसदलावरील ताण खूप वाढत गेलेला दिसत आहे. एकंदर परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात चालली आहे.

त्यात भर म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या. त्या लोकसंख्येच्या रेट्यामुळे आणि त्यातून बरेचसे जे काही लोक आहेत ते गरीब आहेत, पोट हातावर असलेले व दररोजची भ्रांत असलेले आहेत. त्यांची निरक्षरता वा शिक्षण, विचारशक्ती आणि अपेक्षा या वेगळ्या आहेत. त्यांच्याजवळ एवढी, जेवढी पांढरपेशा व मध्यमवर्गाला असते, तशी समज नाही आणि त्यामुळे लॉकडाऊन करून देखील म्हणावा, तितकासा फायदा झालेला नाही.

इतक्या दशकांनंतरही जर मोठ्या संख्येने अशा तर्‍हेचे शिस्त नसलेले आणि मूलभूत गरजा पुऱ्या होऊ न शकणारे असे नागरिकच प्रचंड संख्येने, देशात असले, तर दुसरं काय होणार? आपल्या इतक्या वर्षांच्या नियोजनाच्या व अंमलबजावणीच्या अपयशाचे, दूरद्रुष्टीच्या धोरणांच्या अभावाचे, गलथान कारभार व भ्रष्टाचाराचे तो स्वाभाविक परिणाम आहे, हे ह्या महासंकटाने दाखवून दिलेले आहे.

त्यामुळे शासनासमोरचाही प्रश्न अतिशय गहन आहे, कठीण आहे आणि त्याची सोडवणूक करणे, महाकर्म कठीण आहे, यात वाद नाही. पण जेवढा लाँकडाऊन वाढत जाईल, तेवढं अर्थचक्र मंदावल्यामुळे किंवा थांबल्यामुळे, समस्या अधिकाधिक उग्र आणि जिकिरीच्या होऊन बसतील दुसरं काय?

पुढे काय? ह्या यक्षप्रश्नावर उत्तर कोणालाही सापडत नाही, अशी विदारक स्थिती पहाण्याची वेळ सर्वसामान्य जनांवर आली आहे.
कोरोनामुळे पूर्वीपासून आतापर्यंत, ज्या ज्या चुका घडल्या, त्याचे दाहक परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. ह्यावरून तरी धडा घेऊन पुढील वाटचालीत योग्य ती आवश्यक सुधारणा होईल अशी आशा बाळगू या.

तोपर्यंत..
"करोना"-डरो ना? ना, ना, रोनाही रोना!":

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
राहून राहून आता असे वाटते की, स्वातंत्र्यापूर्वी राजकीय स्वातंत्र्याला पहिले प्राधान्य, असे आग्रहाने मांडणारे एका बाजूला व समाज सुधारणा व्हावी योग्य त्या तर्हेचे नागरिक निर्माण करणारे असे धोरण व प्रयत्न आधी असावेत, असे मानणारे सुधारक, यांच्यातील द्वंद्वात दुर्दैवाने राजकीय स्वातंत्र्य मंडळींना प्राधान्य व यश मिळाल्यामुळे, आपण आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य, सुसंस्कृत समंजस नागरिक न निर्माण झाल्यामुळे, आज या अवस्थेला आणून ठेवले आहे, असे नमूद करावेसे वाटते.......

असेच अंतर्मुख करणारे, शंभराहून अधिक..... लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा......
आपल्या whatsapp grp वर शेअरही करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

सोमवार, ४ मे, २०२०

"नियतीचा संकेत-२": सर्वात भाग्यवान कोण?":


"नियतीचा संकेत-२":
सर्वात भाग्यवान कोण?":

प्रत्येकाचे जीवन चक्र वेगळे असते किंवा सुरुवात केव्हा अंत केव्हा व कसा याची कल्पना आपल्याला नसते. हा जणू एका गाडीचा प्रवास आहे आणि तो प्रवास नऊ ग्रहांच्या महादशा पार करत आपण करत असतो. अर्थात सहसा कोणालाच या नऊच्या नऊ महादशा जीवनात येतातच असे नाही. त्यापैकी अनिष्ट ग्रहांच्या महादशा तुम्हाला अनिष्ट फळे देतात. शनि मंगळ राहू केतू हे अनिष्ट ग्रह मानले आहेत. बुध शुक्र गुरू यांच्या महादशा त्यामानाने चांगली फळे देतात. रवीची महादशा तो कोणत्या स्थानाचा अधिपती आहे त्यावरून तिचा दर्जा कळू शकतो.

पत्रिकेमध्ये ६, ८, १२ ही अनिष्ट स्थाने.
सहावे म्हणजे रोग स्थान, शत्रू स्थान आठवे स्थान म्हणजे मृत्यू स्थान किंवा एखाद्या गोष्टीचा अंत होणे, बारावे व्ययस्थान अशी ही तीन अनिष्ट स्थाने आहेत. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा येत असतात. प्रत्येक स्थानाचे एक विशिष्ट फळ असते. ६, ८, १२ या स्थानांचे  मालक त्यांच्या महादशा ज्या मंडळींच्या पत्रिकेत सर्वात कमी येतील, ते जास्त भाग्यवान. याउलट ज्यांच्या आयुष्यात या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा जास्त येतील ते त्यामानाने तेवढे नशीबवान नाहीत.

ही कल्पना या लेखात मांडली आहे. तुमचे जन्मलग्न कोणते आहे, त्यावरून अर्थातच सहा आठ बारा स्थाने कोणत्या ग्रहांच्या राशींची, येऊ शकतील, ते ग्रह शुभ की अशुभ असतील, ते समजेल. त्यादृष्टीने एकूण बारा जन्म लग्नाचा नशिबाचा क्रम ही संकल्पना या लेखात मांडली आहे.

आपले जन्मलग्न कोणते आहे, ते पाहून तुम्ही आपल्या नशिबाची परीक्षा त्या दृष्टीने पाहू शकता. एकंदर आयुष्याची गोळाबेरीज हे अर्थातच एवढ्याच एका गोष्टीवर अवलंबून असणार नाही, तर एकूण पत्रिकेतले ग्रहयोग यांचाही विचार करावा लागेल. मात्र महादशा मूलभूत धरून आपल्या पत्रिकेप्रमाणे आपल्या नशिबाचा दर्जा कसा असू शकेल ते, या उपयुक्त लेखावरून समजेल.

तुमची उत्सुकता न ताणता, ह्या अभ्यासाचा निकालच आधी येथे देतो.
जन्मलग्नांची भाग्याची क्रमवारी अशी आहे:
१ कन्या २ धनु ३ मेष ४ मकर ५ व्रुषभ
६ सिंह, व्रुश्चिक व मीन
७ मिथून व कुंभ
८ कर्क ९ तुळा
ती कशी ते पुढे विस्ताराने मांडले आहे.
राशी/ १२ स्थानराशी /६ स्थानराशी/८ स्थानराशी/
एकूण वर्षे/नशिबाचा क्रमांक
अशा क्रमाने प्रत्येक लग्न राशीच्या पुढील आकडे वाचावेत:

१ मेष १२/६/ ८/४०/४ अशातर्हेने...
२ वृषभ १ ७ ९ ४३ ५
३ मिथुन २ ८ १० ४६ ७
४ कर्क ३/ ९ /११/ ५२ /८
५ सिंह ४ १० १२ ४५ ६
६ कन्या ५ ११ १ ३२ १
७ तूळ ६ १२ २ ५३ ९
८ वृश्चिक ७ १ ३ ४४ ५
९ धनु ८/ २/ ४/ ३७ /२
१० मकर ९ ३ ५ ३९ ३
११ कुंभ १० ४ ६ ४६ ७
१२ मीन ११ /५ /७/ ४५ /६

नमुना विश्लेषण:
मेष लग्न असेल तर..
बारावे स्थान गुरुचे मीन रास/सहावे स्थान कन्या रास बुधाचे/ आणि आठवे स्थान मंगळाचे वृश्चिक रास- म्हणून त्रासदायक वर्षे महादशा स्थानांच्या अनिष्टतेमुळे अशी सोळा वर्षे गुरुची महादशा +सतरा वर्षे बुधाची महादशा + सात वर्षे मंगळाची महादशा
एकूण जास्तीत जास्त ४० वर्षे.

अजून एक उदाहरण:
कुंभ लग्न
बारावे स्थान शनीच्या मकर राशीचे/सहावे स्थान कर्क चंद्राची रास/आणि आठवे स्थान बुधाच्या कन्या राशीचे असेल.
म्हणून शनीच्या महादशेची १९वर्षे + चंद्राच्या कर्क राशीसाठी १० वर्षे + बुधाच्या महालशेची १७ वर्षे.
एकूण जास्तीत जास्त ४६ वर्षे.

प्रत्येक जन्मा लग्नाला वेगवेगळी त्रासदायक वर्षे येणार आणि त्यामुळे प्रत्येक राशीचे नशीब हे वेगळे असणार. त्यामध्ये कन्या लग्न हे सगळ्यात नशिबवान म्हणायला हवे, कारण त्यांच्या आयुष्यात पापस्थानांच्या महादशा एकूण जास्तीत जास्त बत्तीस वर्षे येतील. तर सगळ्यात त्रासदायक नशीब तुळा लग्नाचे, जिला 53 वर्षांचा कठीण काळ असू शकणार.

ह्या प्रमाणे अभ्यास आणि संशोधन करून सर्वसाधारण जन्म लग्नावरून नशिबाची परीक्षा कशी करता येईल ते समजेल. अर्थातच सर्वसाधारण पत्रिके मधील इतर ग्रहयोग यांचा अभ्यास करून संपूर्ण आयुष्याचे भवितव्य हे अधिक सखोलपणे मांडता येईल.

ज्योतिष संशोधनाला गणिताच्या साह्याने एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये, मी केला आहे. तो तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरू शकेल, अशी आशा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वैविध्यपूर्ण व अनेक विषयांचा उहापोह करणारे शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....आपल्या संग्रही ठेवा....

http//moonsungrandson.blogspot.com

आणि
आपल्या whatsapp grps
वर शेअरही करा...।।....

शनिवार, २ मे, २०२०

"आजोबांचा बटवा-५": "श्री ज्ञानेश्वरींतले अमूल्य विचारधन":


"आजोबांचा बटवा-५":
"श्री ज्ञानेश्वरींतले अमूल्य विचारधन":

"प्रास्ताविक":

गेले महिनाभराहून अधिक दिवस
lockdown असल्यामुळे घरातच बसायची वेळ आली आहे. त्याचा एक फायदा मात्र जरूर झाला: सध्या लायब्ररी चालू नाही, त्यामुळे नवीन वाचायला काहीही नाही, घरात पेपरही येत नाही, त्यामुळे रोजचा पेपर वाचण्याची सवयही जवळजवळ गेलेली, कारण कितीही नाही म्हटलं तरी ऑनलाईन पेपर मोबाईलवर वाचणे, हा नक्कीच त्रासदायक, विशेषतः आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना कष्टप्रद नकोसा असाच पर्याय असतो, त्यामुळे जुने ते सोने, असे अनुभव यावेत अशा तऱ्हेच्या घटना घडल्या.

माझे कपाट लावताना, मला माझ्या विविध जुन्या डायऱ्या मिळाल्या आणि त्या डायर्‍यांमधील दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या असूनही, त्यातील अनेक विचार मला विविध लेखांचा स्वरूपात या दिवसात मांडता आले, हे माझे भाग्यच होय. त्यातीलच आज माझ्यासमोर जे पान उघडले गेले, ते कधीतरी त्या काळात, कुठल्याशा मंदिरात डॉक्टर यशवंत पाठक यांची अतिशय मुलगामी, प्रासादिक व्याख्याने ऐकली आणि त्यांच्या माझ्या मनावरील उमटलेल्या प्रतिमा, मी या अशा शब्दरूपात नोंदवुन ठेवल्या होत्या, त्या सापडल्या. आज त्यातीलच ही नोंद मांडत आहे. ती नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेल व चांगलीच उपयुक्त वाटेल.

"अमूल्य विचारधन":

"डॉक्टर यशवंत पाठक यांची व्याख्याने ऐकणे, म्हणजे खरोखर चा एक अमृतानुभव असतो. मनाला, तर्काला पटतील, असे विचार ते आपल्या उगवत्या भाषेच्या शैलीत सांगत जातात आणि तास-दीड तास कसा निघून जातो, ते कळतच नाही. आपल्या पूर्वसुरींनी निसर्गाचे यथातथ्य भान राखून, मानवी जीवनाचा योग्य तो अर्थ जाणत, ते यशस्वी समाधानी करण्याची जीवनशैली निर्माण करण्याकरता, वेगवेगळे सणवार, व्रतवैकल्ये व उपास-तापास, पूजाअर्चा अशा परंपरा निर्माण केल्या. तसेच डॉ. पाठकांच्या निरूपणांतून मनावर ठसते की, आजच्या चंगळवादी भोगवादी युगात, विश्वातील निसर्गाचे सर्वव्यापी अस्तित्व
नाकारून, माणूस आपले श्रेष्ठत्व, वर्चस्व गाजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे, हे योग्य नव्हे. पूर्वीच्या आपल्या सांस्कृतिक ठेव्याची शिदोरी, बदलत्या काळात जाणीवपूर्वक व्यवस्थित जपावी, असेही डॉक्टर पाठकांच्या विचारधनांतून वाटले. त्यांच्या श्रीकृष्णदर्शन व ज्ञानेश्वरी अध्यात्म या दोन प्रवचनातील मला उमजलेले मोजके ज्ञानकण मी जसे ऐकले आहेत ते मांडतो:

# अभ्यास करून, मगच प्रकटावे. मेहनतीला एखाद्या विषयावरील निष्ठापूर्वक व्यासंगाला तोड नाही. तेवढी मेहनत जर जमत नसेल, तर उगाच बडबड करून, आपले नसलेले पांडित्य पाजळू नये.
# श्री ज्ञानेश्वरी व गीता, हे जीवन कसे जगावे, जीवनातील आपले प्रश्न कोणते, त्यांची उकल कशी करावी आणि विश्वाच्या पसार्‍यात आपले स्थान व बाह्य परिस्थितीशी व्यक्तींशी काय ऋणानुबंध आहे, या साऱ्याचे सोदाहरण विवेचन करणारे हे ग्रंथ होत.
# अवघ्या अठराव्या वर्षी अक्षरशः या माऊलीने श्री ज्ञानेश्वरी कशी रचली 9000 अशा ओव्यांचा हा अमृततुल्य विचारांचा खजिना कसा निर्मिला, हे खरोखर एक अद्भुत कोडे आहे.
# ज्ञानेश्वरांची थोरवी वादातीत आहे, कारण आज 830 वर्षांनी त्यांच्या विचारांचे जे काही अमोल धन आपल्याजवळ आहे, ते अजूनही पटण्याजोगे आहे.
# त्यांच्या विचारसंपदेवर प्रेम करणारे लाखो वारकरी आहेत म्हणूनच अजूनही माऊलींचे पुण्यस्मरण तत्मयतेने हजारोजण करत असतात. # जीवनात निसर्गाचे भान ठेवावे, ज्ञानोपासना करावी.
# एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा सहजसुंदर वाटते, तेव्हाच भक्ती निर्माण होते. जीवनात
भक्तीबरोबर, शक्तीची उपासनाही करावी. कारण अत्यावश्यक असे कर्मकर्तव्य पार पाडण्यासाठी, तिची नितांत आवश्यकता असते.
# सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण केवळ आपल्यापुरतेच न पाहता, साऱ्या विश्वाचे कल्याण साधण्यासाठी, आपल्या परीने झटत राहावे. 'दुरितांचे तिमिर जावो' अन जो जे वांछिल तो ते लाहो' असा आपल्या प्रयत्नांचा गाभा असावा.
( सध्याच्या कसोटीच्या काळात तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे)
# शब्द हेच खरे ब्रह्म होय. कारण माणसाला दिलेल्या सर्वात मोठ्या अन् श्रेष्ठ शक्तीचे जाणीवेचे प्रकटीकरण, जाणीवेची एकंदर ज्वलंत अशी प्रतिमा, आपल्याला व इतरेजनांना करून देण्याचे सामर्थ्य, ह्या शब्दांतच असते.
# अनुभवांच्या निकषांवर जेव्हा विचारांची जाणीव, तावून-सुलाखून पारख केली जाते, तेव्हाच शब्दब्रह्म निर्माण होते. शब्दब्रह्माच्या उपासनेसाठी भरपूर वाचन मनन व चिंतन व प्रसंगी ते जसे जमेल तसे लेखनही हवेच हवे.
# श्री ज्ञानेश्वरी वरील डॉक्टर पाठकांचा विचारांचा ओघ आहे, तो खरोखर ऐकतच जावे, त्यामध्ये डुंबत राहावे, असाच असतो."

आज डॉ यशवंत पाठक, आपल्यात जरी नसले तरी यानिमित्ताने माझ्या डायरीमधील ही निवडक शब्दपुष्पे, मी वेचली होती-सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी, ती आज या निमित्ताने तुमच्यासमोर उलगडून दाखवता आली. सध्याच्या काळात अशा तर्‍हेचे विचार मनात येणे आणि त्या विचारांप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करणे, हेच शेवटी आपले ध्येय असावे. त्याचा प्रामाणिकपणे आपण सर्वांनी पुरावा करायला हवा, एवढेच मी जाता जाता म्हणू शकतो.

घरातच रहा, नियम कसोशीने पाळा. स्वच्छ व स्वस्थ रहा.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वैविध्यपूर्ण व अनेक विषयांचा उहापोह करणारे शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....आपल्या संग्रही ठेवा....

http//moonsungrandson.blogspot.com

आणि
आपल्या whatsapp grps
वर शेअरही करा...।।....